5 Skills that will make you rich | श्रीमंत होण्याचे नियम

Share this

5 Skills that will make you rich: आजच आर्टिकल्स मार्फत आपण बघणार आहोत पाच अशा स्किल्स जे तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी मदत करतील. जर तुम्हाला देखील या मनी गेम मध्ये एक्सपर्ट बनायचं असेल किंवा हा मनी गेम शिकायचं असेल तर सर्वात आगोदर 5 स्किल्स कुठल्या आहेत हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मित्रांनो या 5 स्किल्स फेमस व्यक्ती, इन्वेस्टर, सीईओ, फाउंडर या सर्व व्यक्ती वापरतात आणि या स्किल च्या सहाय्याने ते सर्वसामान्य व्यक्तींना पासून श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

जर तुम्हाला असं वाटत असेल की या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला पैसे कसे खर्च करावे किंवा पैशाचा योग्य वापर कसा करावा हे सांगणार आहोत तर असे मुळीच नाही. कारण मुळातच तुम्हाला देखील हे माहिती आहे की पैसा कसा वापरावा आणि खर्च कसा करावा. आम्ही आपल्याला या आर्टिकल च्या मार्फत श्रीमंत लोकांचा माइंड सेट कसा असतो याची माहिती देणार आहे.

हे श्रीमंत लोक कुठली स्किल वापरून श्रीमंत बनतात आणि त्यांचा माईंड सेट कसा असतो या बद्दल आम्ही आपल्या सोबत चर्चा करणार आहोत. आम्ही जगातील काही श्रीमंत आणि सक्सेसफुल लोकांचा स्टडी केला आहे आणि तीच माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर मित्रांनो या 5 स्किल्स जाणून घेण्यासाठी आमचा हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

श्रीमंत कसे होता येईल

Being Specific: आपण सर्वांनी हे ऐकलं असेल आणि पाहिलं देखील असेल की श्रीमंत लोक त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या लाइफस्टाइल विषय खूप स्पेसिफिक असतात. आपला बिजनेस किती वर्षात वाढवायचा आहे, यावर्षी त्यांना किती पैसा कमवायचा आहे, कोणत्या दिवशी त्यांनी काय करायचं आहे, या सर्व गोष्टींचे ते अगोदरपासूनच नियोजन करतात.

तर हे सर्व काय आहे याचा अर्थ ही श्रीमंत लोकं स्पेसिफिक असतात आणि त्यांना हे माहिती असतं की त्यांना काय पाहिजे आणि काय नको. त्यामुळे तुम्हाला देखील स्पेसिफिक राहण्याची स्किल शिकावी लागेल. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण बोलू लागल की मला श्रीमंत व्हायचं आहे. याउलट तुम्ही असे बोलले पाहिजे की मला एवढ्या वर्षात एवढे पैसे कमवायचे आहेत आणि त्यासाठी मला अशा प्रकारे काम करावे लागेल.

परंतु स्पेसिफिक कसे राहिले पाहिजे? तरी ही स्किल जसजसा वेळ जातो त्याप्रमाणे हळूहळू डेव्हलप होत जाते. परंतु इथे आम्ही तुम्हाला काही प्रश्न देत आहोत आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे एका पेपर वर लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली काय हवं ते समजेल.
तसेच तुम्हाला हे देखील समजेल कि तुमच्याकडे नेमकी किती रक्कम असायला हवी म्हणजे तुम्ही स्वतःला श्रीमंत समजू शकाल.

  • Q. 1 What is your financial goal? आपले आर्थिक ध्येय काय आहे?
  • Q. 2 What work or business do you want to do? आपण कोणते कार्य किंवा व्यवसाय करू इच्छिता?
  • Q. 3 On What date will you Achieve your Goal? आपण कोणत्या तारखेला आपले ध्येय साध्य कराल?
  • Q. 4 What sacrifices you can make? आपण काय त्याग करू शकता?
  • Q. 5 Exactly why you want to be Rich? नक्की आपण श्रीमंत का होऊ इच्छिता?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका कागदावर लिहून काढायची आहे त्यामुळे तुम्हाला एक स्पेसिफिक (विजन ) दृष्टिकोन मिळेल.

श्रीमंत कसे बनवायचे

Financial Literacy: बऱ्याच लोकांना असे वाटते की एकदा कि मी एकदा श्रीमंत झालो तर मग काय टेन्शन नाही. मी आयुष्यभर श्रीमंतच राहणार. परंतु असा विचार करणे चुकीचे आहे कारण आपण कितीतरी श्रीमंत लोकांना आणि सेलिब्रिटींना बघितले आहे. परंतु हेच सेलिब्रिटी काही वर्षानंतर कर्जामध्ये बुडालेले असतात. त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाही आणि त्याचे प्रमुख कारण आहे की त्यांना फायनान्शिअल लिटरसी बद्दल अजिबात माहिती नसते.

याउलट श्रीमंत लोक तरुणपणीच फायनान्शिअल नॉलेज घ्यायची सुरुवात करतात आणि अभ्यास केल्यामुळे त्यांना फायनान्स कसे करावे याचे स्वातंत्र्य देखील मिळते. परंतु आजच्या काळात आपण इंटरनेटच्या माध्यमातून अगदी कमी पैशात किंवा फ्री मध्ये देखील फायनान्शियल नॉलेज मिळवू शकतो. यासाठी तुम्हाला फायनान्शिअल पुस्तके, आर्टिकल्स वाचावी लागतील किंवा युट्युब वर व्हिडिओज बघावे लागतील. याव्यतिरिक्त देखील बरेच पर्याय आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही फायनान्शिअल लिटरेसी बद्दल नॉलेज घेऊ शकतात.

श्रीमंत कसे व्हायचे / 5 Skills that will make you rich in Marathi

Long Term Vision: आजच्या जगामध्ये आपल्याला सर्व काही फटाफट पाहिजे असते जितके लवकर होईल तितके लवकर ती गोष्ट आपल्याला पाहिजे असते. परंतु या सवयीचा श्रीमंत बनण्यासाठी उपयोग अजिबात होत नाही. याच कारणामुळे बऱ्याच लोकांना आर्थिक नुकसानीचा सामना देखील करावा लागतो. कारण आपण कधीच शॉर्टकट पर्याय निवडून आयुष्यभर श्रीमंत नाही राहू शकत.

त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला गेट रीच क्विकली या मेंटॅलिटी बाहेर येणे गरजेचे आहे. श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला लॉन्ग टर्म विजन ठेवणे खूप गरजेचे आहे. नाहीतर जेफ बेझोस यांनी त्यांची कंपनी ॲमेझॉन देखील बंद करून टाकली असती. तसेच अलीबाबा कंपनीचे फाउंडर Jack Ma यांचादेखील पुढील तीन वर्षाचा बिजनेस प्लान तयार आहे. तर तुम्ही असा विचार नका करू की मला श्रीमंत व्हायचं आहे तुम्ही असा विचार करा की तुम्हाला आयुष्यभर श्रीमंत राहायचं आहे.

एवढेच नाहीतर त्यासाठी तुम्हाला असे काहीतरी करायची आहे की पुढची येणारी पिढी देखील तुमच्यामुळे श्रीमंत आणि भरभराटीचे जीवन जगेल. जर तुमच्याकडे शॉर्ट टर्म विजन असेल तर ते तुम्हाला शॉर्ट टर्म साठी श्रीमंती आणि यश देईल परंतु जर तुम्ही लॉंग टर्म विजन ठेवले तर तुमची श्रीमंती आणि तुमचे यश हे लॉंग टर्म असेल.

लोक श्रीमंत कसे बनतात / 5 Skills that will make you rich for Lifetime

Insane Discipline: जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुमचा विजय नक्कीच होतो हे तुम्हाला माहिती असेलच. परंतु कठोर परिश्रमाने तुम्हाला विजय तेव्हाच मिळते जेव्हा ते परिश्रम लगातार केले जातात. लगातार परिश्रम करण्यासाठी (डिसिप्लिन) शिस्त पाळणे देखील खूप गरजेचे असते. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला आपण तीन महिन्यासाठी जरी व्यवस्थित पाळले तरी आपण ते मिळवू शकतो जे कोणी एक ते दोन वर्षात देखील नाही मिळू शकत.

भलेही एखादे काम करण्याचा तुमचे मन नसेल, तुमचा दिवस चांगला नसेल, बाहेर जोराचा पाऊस पडत असेल. असे कुठले जरी कारण असेल तरी देखील तुमच्या समोर या सर्व गोष्टीला कुठलेच स्थान नसले पाहिजे. काहीही झाले तरी तुम्हाला तुम्ही ठरवलेले काम करायचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फायनान्शिअल गोल करायचं आहे. ते देखील दर हप्त्याला, दर महिन्याला आणि दर वर्षाला.

त्यामुळे हा नियम पाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवर दया करणे सोडावी लागेल आणि तुमच्या कामाला सुरुवात करावी लागेल. कारण फक्त इंसेन लेवल डिसिप्लिन तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवेल.

Shrimant Kase Vhave

Effective Communication: असे समजू या की तुमच्याकडे एक अशी कल्पना आहे किंवा एक असे प्रॉडक्ट आहे त्याची मार्केटमध्ये खूप गरज आहे. परंतु याविषयी जेव्हा तुम्हाला एखाद्या मीटिंगमध्ये समजून सांगायचे असते किंवा लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे असते. तेव्हा त्या विषयी तुम्ही लोकांना व्यवस्थितपणे नाही समजू शकत. तसेच तुमच्या बोलण्याचा कोणावरही अजिबात प्रभाव पडत नाही.

सेलिब्रिटीज, बिझनेस टायकून, मिनिस्टर यांना इफेक्टिव्ह कम्युनिकेशनच्या पावर विषयी माहिती असते आणि त्याचाच वापर ते आपल्या भाषणांमध्ये करतात. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या सोबत इफेक्टिव कम्युनिकेशन करतात तेव्हा तुमचे न होणारे काम देखील पूर्ण होते. ज्यामुळे तुम्ही एखाद्या नॉर्मल प्रॉडक्ट विषयी जरी बोललात तरी सर्वांना ते प्रॉडक्ट जबरदस्त वाटू लागते.

सेलिंग आणि मार्केटिंग म्हणजेच एखादी गोष्ट विकणे किंवा त्याची मार्केटिंग करणे हे देखील याच स्किल मध्ये येतात. तुम्हाला भविष्यात अनेक प्रोफेशनल लोक मिळत जातील यांच्यासोबत तुम्हाला मीटिंग करायची आहे. त्यांच्यासोबत तुमच्या प्रोडक्ट विषयी सौदा करायचा आहे.

तिथे तुम्हाला तुमची इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल कामात येणार आहे. वॉरेन बफेट यांना जेव्हा एका मुलाखतीमध्ये विचारले की तुमची सर्वात उत्कृष्ट गुंतवणुक कुठली आहे? त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की मी एक पब्लिक स्पीकिंग कोर्स विकत घेतला होता आणि या कोर्स ने माझे आयुष्यच बदलून टाकले. त्यामुळे हा कोर्स माझ्या आयुष्यातील उत्कृष्ट गुंतवणुकी पैकी एक आहे.

Shrimant Kase Banvave

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण ( 5 Skills that will make you rich) पाच स्किल्स बघितल्या जे तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी उपयोगात येतील. यातली पहिली स्किल आपण बघितली Being Specific: ज्यात असे सांगितले आहे की तुम्हाला काय करायचे आहे? एखादी गोष्ट कधी करायची आहे. या वर्षात तुम्हाला किती पैसे कमवायचे आहे? या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला स्पेसिफिक राहावे लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे काम करावे लागेल.

दुसरी स्किल आपण बघितली Financial Literacy: ज्यात आपण असे पाहिले की अनेक श्रीमंत लोक कालांतराने कर्जबाजारी होऊन गेले आणि त्यांच्याकडे श्रीमंती राहिली नाही. याउलट श्रीमंत लोक तरुणपणातच फायनान्स विषयी शिकू लागतात आणि त्यांना पैशाचे नियोजन कसे करायचे हे माहित असते.

तिसरी स्किल आपण पाहिली Long Term Vision: यात आपण असे बघितले की जर तुम्हाला आयुष्यभर श्रीमंत बनायचे असेल तर तुमचा दृष्टिकोन हा तात्पुरता नसला पाहिजे तर तुमचा दृष्टिकोन हा पुढच्या काही वर्षांचा असायला हवा. जर तुम्ही फक्त आजचा विचार केला तर उद्याच्या परिस्थितीत तुम्ही सामना करू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे भविष्याचा प्लान देखील नेहमीच तयार पाहिजे.

चौथी स्किल आपण पहिली Insane Discipline: यात आपण हे पाहिले की जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्हाला परिश्रम करावे लागेल परंतु तुम्ही परिश्रम सतत करत असाल तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. कुठलीही परिस्थिती असो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमचे काम सतत करत राहायचे आहे.

पाचवी स्किल आपण पाहिले Effective Communication: यात आपण असे पाहिले की जर तुम्हाला तुमचे एखादे प्रॉडक्ट विकायची असेल तर तुम्हाला इफेक्टिव कम्युनिकेशन येणे खूप गरजेचे आहे नाहीतर तुम्ही तुमच्या विषयी आणि तुमच्या प्रॉडक्ट विषयी कुणालाही व्यवस्थित माहिती देऊ शकत नाही आणि तुमच्या बोलण्याचा कोणावर प्रभाव देखील पडणार नाही. जर तुम्हाला इफेक्टिव कम्युनिकेशन येत असेल तर तुम्ही एखाद्या साध्या गोष्टीविषयी जरी बोललात तरी लोकांना ती गोष्ट छान वाटू लागते.

तर मित्रांनो आजच्या या आर्टिकल मार्फत आपण 5 Skills that will make you rich ( श्रीमंत लोकांच्या पाच स्किल्स) बघितल्यात. या पाचही स्किल चा जर तुम्ही तुमच्या जीवनात वापर केला तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही देखील ठरवलेल्या वेळेत तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि तात्पुरते नाही तर आयुष्यभरासाठी श्रीमंत होऊ शकतात. आम्ही आशा करतो की आमचा हा आर्टिकल आपल्याला आवडला असेल. हि माहिती तुम्ही इतरान सोबत देखील नक्की शेअर करा.

READ MORE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top