7 Ways to be Positive: मित्रांनो आजच्या जीवनात कोणीही पटकन नकारात्मक विचार आणि निराशेचे शिकारी होत आहेत. कारण बऱ्याच वेळेस परिस्थिती अशी होऊन जाते की आपल्या मनात वाईट आणि नकारात्मक विचार येऊ लागतात. त्यामुळे एखादी आशेची किरण नाही दिसत. परंतु यापैकी तेच लोकं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहतात जे अशा परिस्थितीत देखील सकारात्मक विचार करतात.
7 Ways to be Positive in Marathi: पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला फक्त चांगला विचारच देत नाही तर चांगले जिवन जगण्यास मदत देखील करते. चला तर मग बघुया सकारात्मक विचार करण्याचे सात मार्ग (7 Ways to be Positive). जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी नकारात्मक विचार करत असाल आणि तुमच्या आयुष्यात काही चांगले होईल अशी आशा सोडून दिली आहे तर आजचा हा आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मक विचार येथीलच त्यासोबतच तुम्ही सकारात्मक जीवन देखील जगू शकाल.
सकारात्मक विचार कसा करावा
Start your Day Right: हे सत्य आहे की ज्या प्रकारे आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होत असतो. जसे आपण सकाळी उठल्यावर आपल्या हातात सर्वात अगोदर आपला मोबाईल घेतो आणि सोशल मीडिया वापरू लागतो. परंतु या सवयीचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर अप्रत्यक्षरित्या होऊ शकतो. म्हणजेच काय तर तुम्ही जर सकाळी उशिरा उठत असाल तर तुमची उरलेली सर्व कामदेखील उशिरा होत जातील.
जर तुम्ही सकाळी उठल्यावर वर्तमानपत्रात, बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर नकारात्मक काही वाचले किंवा बघितले तर तुमचा माईंड सेट देखील संपूर्ण दिवस नकारात्मक होऊ शकतो. त्यामुळे आपण सकाळी उठण्याची एक विशिष्ट वेळ ठरविणे गरजेचे आहे. त्यासोबतच सकाळी उठून हातात मोबाईल घेऊन सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी किमान पंधरा मिनिटे सकारात्मक गोष्टींसाठी वेळ दिला पाहिजे किंवा एखादे सकारात्मक पुस्तक वाचले पाहिजे.
असे केल्यामुळे आपला मेंदू दिवसाच्या सुरुवातीलाच एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. याव्यतिरिक्त जर दिवसभरात तुमच्या मनात कधीही नकारात्मक विचार आला तरीदेखील तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता.
Sakaratmak Vichar in Marathi
Focus on Good Things: आता हे गरजेचे नाही की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टी ने केली तर तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक जाईल. मुळातच ही गोष्ट शक्य नसते कारण प्रत्येक दिवस हा कधीच सारखा नसतो. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतात तसेच नकारात्मक गोष्टी देखील घडतच राहणार आणि आपण त्या नकारात्मक गोष्टी होण्यापासून थांबवू शकत नाही. प्रत्येक मनुष्याला दररोज नवीन अडचणींचा सामना करावाच लागतो.
खरंतर प्रॉब्लेम्स हे मनुष्याच्या जीवनाचा एक भाग आहे आणि बिना प्रॉब्लेम चे जीवन असू शकत नाही. त्यामुळे आलेल्या प्रॉब्लेमला समोर जाताना नेहमी असा विचार केला पाहिजे की ठीक आहे की मला या प्रॉब्लेम चा सामना करायचा आहे परंतु सध्या माझ्याकडे असा कुठला पर्याय आहे का ज्यामुळे या प्रॉब्लेम चा उपाय निघू शकेल. तसेच जर हा प्रॉब्लेम मी आत्ता नाही सोडू शकत तर आतापासूनच नकारात्मक विचार करून वेळ घालविण्यापेक्षा चांगले की मी एखादी अशी गोष्ट करू शकतो ज्यात मला सकारात्मकता जाणवेल.
उदाहरणार्थ- नकारात्मक विचार करणारी व्यक्ती जर एखाद्या ट्राफिक जाम मध्ये अडकली तर ती व्यक्ती लगेच चिडचिड करायला लागते आणि असा समज करून घेते की माझा हा आजचा दिवसच खराब आहे. याउलट सकारात्मक विचार करणारी व्यक्ती ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्यावर असा विचार करते की आता ही ट्राफिक जाम मी तर नाही केली आणि माझ्या प्रमाणे इतरही लोक अडकलेली आहेत.
आता या ट्रॅफिक जाम मध्ये मी काहीच करू शकत नाही परंतु मला मिळालेल्या या वेळेचा मी चांगला उपयोग करू शकतो. एखादी चांगली ऑडिओ बुक किंवा पॉडकास्ट ऐकून स्वतः सकारात्मक होऊ शकतो. थोडक्यात काय तर इथे फक्त विचारांचं फरक आहे ज्यामुळे सकारात्मक विचार करणारी व्यक्ती मिळालेल्या संधीचा देखील चांगला लाभ घेऊ शकते आणि नकारात्मक विचार करणारे व्यक्ती विनाकारण चिडचिड करून माझा संपूर्ण दिवस खराब आहे असा विचार करू लागते.
आपल्या मनात नेगेटिव्ह आणि वाईट विचार आल्यावर काय करायचे ?
Turn Mistakes and Failures into Lessons: बघायला जर गेले तर आपण मनुष्य प्राणी आहोत आणि शेवटी चुका तर मनुष्य करत असतो. त्यामुळे आपण ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात ज्या काही चुका तुमच्याकडून घडल्यात त्या चुका आपण पुन्हा नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या मनात जरी स्वतःविषयी नकारात्मक विचार असतील आणि तुमच्याकडून झालेल्या चुकीचा तुम्हाला पश्चाताप होत असेल.
तर तुम्ही असा विचार केला पाहिजे की आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य हा नेहमी स्वतःच्या झालेल्या चुकांमधून किंवा इतरांकडून घडलेल्या चुकांना बघूनच शिकत असतो. जोपर्यंत आपण केलेल्या चुकांमधून काही शिकत नाही तोपर्यंत आपण समजदार नाही होत. तुम्ही आयुष्यात ज्या काही चुका केल्या आहेत त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळाले याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि या गोष्टीची काळजी घ्यायची की तुमच्याकडून झालेल्या भूतकाळातील चुका तुमच्याकडून पुन्हा होणार नाही.
त्यामुळे नकारात्मक गोष्टींचा विचार करण्याऐवजी किंवा घडलेल्या चुकांचा स्वतःला दोष देण्याऐवजी आपल्याकडून चुका पुन्हा कशा होणार नाही याचा विचार केला पाहिजे.
How To Stop Negative Thinking In Marathi
Focus only on what you can control: बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटते की आपण सर्व काही आपल्या ताब्यात घेऊ शकतो सर्व गोष्टींवर आपला कंट्रोल असू शकतो. इतर लोकांनी देखील तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागले पाहिजे परंतु असं नाही होऊ शकत. या जगात जर तुम्ही कोणाला कंट्रोल करू शकत असाल तर ती व्यक्ती म्हणजे फक्त तुम्हीच. तुम्ही स्वतःच्या क्रिया आणि विचार करण्याच्या पद्धतीवर कंट्रोल करू शकतात.
ही गोष्ट तुम्ही जेवढे लवकर समजाल तेवढे तुमच्या साठी चांगले आहे कारण तुमच्या आसपासची लोक आणि ऋतू यांच्यावर तुम्ही कधीच कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींचा मुळातच विचार करू नका ज्यावर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे यापुढे जेव्हा ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही स्वतःलाच विचारा की ही परिस्थिती माझ्या कंट्रोल मध्ये आहे का?
जर तुम्हाला असे वाटले की या परिस्थितीला तुम्ही कंट्रोल करू शकतात आणि जर तुम्हाला तुमचे उत्तर हो असे मिळाले तर लगेचच तो प्रॉब्लेम सोडविण्याचा प्रयत्न करा किंवा त्या परिस्थितीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. आणि जर या परिस्थितीवर तुम्ही नियंत्रण करू नसाल शकत तर त्या गोष्टीचा विचार करणं लगेच बंद करा. त्यामुळे फक्त अशाच गोष्टींचा विचार करा ज्या गोष्टींवर तुम्ही कंट्रोल करू शकतात त्या गोष्टींचा अजिबात नाही ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोल मध्येच नाही.
मनाला शांत कसे करायचे? | 7 Ways to be Positive Thinking
Practice Positive Self-Talk: आपण स्वतःच्याच मनाशी कधी नकारात्मक बोलू लागतो आणि या गोष्टींची आपल्याला कधीच सवय होऊन जाते हे आपल्याला देखील कळत नाही. बराच वेळ आपण असा विचार करतो की हे काम मी करू शकत नाही, असे करणे मला जमणार नाही, किंवा मला त्या गोष्टीचा प्रयत्नच करायला नको होता. परंतु असे नकारात्मक केलेले विचार केव्हा आपले व्यक्तिमत्त्व बनते हे आपल्याला देखील कळत नाही.
त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतः सोबतच नकारात्मक गोष्टी बोलत आहात आणि पुढे जाऊन याच गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात दिसू लागतील तर लगेच असा विचार करणं थांबवा आणि स्वतःला सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यात व्यस्त करा. म्हणजेच तुम्ही स्वतःला सांगा की हो मला हे मान्य आहे की सध्या ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे येत नाही परंतु मी जर सतत प्रयत्न केला तर नक्कीच ही गोष्ट मी उत्तम प्रकारे करू शकतो.
किंवा मी असे नव्हते करायला पाहिजे या ऐवजी असे बोला की मी खरे तर या गोष्टीचा व्यवस्थित नियोजन केलेले नव्हते मला नवीन पद्धतीने नियोजन करून पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यामुळे तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार तुमच्यावर हावी होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या विचारांवर कंट्रोल देखील करता येईल आणि नकारात्मक विचारांना तुम्ही सकारात्मक विचारांमध्ये बदलू शकाल. याचा आणखीन एक फायदा असा की सकारात्मक विचार केल्यामुळे तुमचे हे सकारात्मक विचार तुमच्या व्यक्तीमत्वात देखील जाणवू लागेल.
7 Ways to be Positive in Life
Focus on Present Moment: मी आता इथे आजच्या दिवसा बद्दल नाही बोलत, आजच्या तासा बद्दल नाही बोलत किंवा या मिनिटा बद्दल देखील नाही बोलत. मी इथे सध्या च्या क्षणा बद्दल बोलत आहे. त्याचे कारण भूतकाळात घडून गेला आहे भविष्यकाळ यायचा आहे. तुमच्याकडे जे आहे ते फक्त सध्याचा वर्तमानातला क्षण. तुम्ही नेहमी वर्तमानातल्या क्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे की तुम्ही ह्या क्षणाला काय करत आहात आणि असे काय आहे जे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात.
कारण तुम्ही कधीच भूतकाळाचे ओझे तुमच्या खांद्यावर घेऊन आणि भविष्याची भीती मनात बाळगून तुमचा वर्तमान चांगला नाही बनवू शकत. तसेच जर बघायला गेले तर सध्याचा हा वर्तमानातील क्षण पुढे गेल्यास भविष्यकाळ बनतो आणि मागे गेल्यास भूतकाळ बनतो. तुम्ही तुमच्या भूतकाळा कडून धडा शिकायचा आहे आणि भविष्यासाठी चांगली योजना तयार करायची आहे. त्यासाठी आलेल्या क्षणाचा तुम्हाला नेहमी चांगला उपयोग करायचा आहे आणि हीच सवय तुम्हाला भविष्यात देखील सकारात्मक रिजल्ट देतील.
त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानातील क्षणावर लक्ष केंद्रित करा त्यावर कंट्रोल करा आणि त्या क्षणाचा चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सकारात्मक रहायचे असेल तर या क्षणापासूनच तुम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे. असा विचार करा की मी खरच खूप भाग्यवान आहे की माझ्याकडे हा मोबाईल आहे, माझ्याकडे इंटरनेट आहे ज्यामुळे मी एवढी महत्वपूर्ण माहिती फ्री मध्ये वाचत आहे.
Positive Mindset in Marathi | 7 Ways to be Positive in Marathi
Be with Positive People: जर तुमच्या आसपास सकारात्मक विचार करणारी लोक असतील तेव्हा तुम्ही त्यांच्या तोंडून पॉझिटिव्ह गोष्टी एैकाल, पॉझिटिव्ह गोष्टी समजून घ्याल. ज्यामुळे तुमच्या मेंदूपर्यंत सर्व पॉझिटिव्ह माहिती पोहोचत जाणार. त्यांचे सकारात्मक विचार तुमच्या शब्दांमध्ये येऊ लागेल आणि तुमच्या मनापर्यंत हे सकारात्मक विचार खोलवर पोहोचले जातील. याचा फायदा तुम्हाला असा जाणवेल कि तुम्ही देखील कुठल्याही गोष्टी कडे सकारात्मकतेने बघु लागाल आणि तुमच्या कृतीमध्ये देखील एक सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू लागेल.
बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्या आजूबाजूला अशी सकारात्मक लोकांना नाही शोधू शकत. अशा वेळेस तुम्ही सकारात्मक पुस्तकांचा आधार घेऊ शकतात, सकारात्मक ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्ट देखील वापरू शकतात. याव्यतिरिक्त यूट्यूब चैनल वर तुम्हाला बऱ्याच पॉपुलर मोटिवेशनल स्पीकरचे व्हिडिओ फ्री मध्ये बघायला मिळतील. असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सकारात्मक गोष्टी ऐकू शकतात किंवा बघू शकतात.
परंतु त्यासोबत तुम्ही या गोष्टीकडे देखील लक्ष दिले पाहिजे की हे सर्व करत असताना तुम्ही नकारात्मक लोकांपासून देखील तितकेच दूर राहिले पाहिजे. हे सर्व प्रयत्न करून देखील जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही सकारात्मक विचार नाही करू शकत. तर तुम्ही सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत बोललं पाहिजे. त्यांचे विचार जाणून घ्यायला पाहिजे जे तुम्हाला एक नवीन आणि सकारात्मक दृष्टीकोन देऊ शकतील.
यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार
तर मित्रानो आपण आजच्या या (7 Ways to be Positive) आर्टिकल मध्ये सकारात्मक विचार करण्याचे सात मार्ग बघितले. यातील पहिला मार्ग Start your Day Right असे सांगतो की आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही योग्य प्रकारे केली पाहिजे. वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी पाहण्या किंवा वाचण्या ऐवजी आपण आपल्या दिवसाची सुरुवात किमान पंधरा मिनिटे सकारात्मक गोष्टी वाचून करायला हवी. ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस देखील सकारात्मक होतो.
दुसरा मार्ग आपण बघितला Focus on Good Things ज्यात असे सांगितले आहे की आपण नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. जर तुम्ही एखाद्या अडचणींत सापडले असाल तर त्या वेळेचा तुम्ही सकारात्मक पद्धतीने कसा वापर करू शकता या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
तिसरा मार्ग आपण बघितला Turn Mistakes and Failures into Lessons त्यात असे सांगितले आहे की शेवटी चुका या मनुष्याकडूनच होणार. परंतु आपण भूतकाळात ज्या काही चुका केल्या आहे त्यातून धडा घेतला पाहिजे आणि या चुका भविष्यामध्ये आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी भूतकाळाकडून आपण जे काही शिकलो आहे त्याचा वर्तमानात आपण नेहमी उपयोग केला पाहिजे.
चौथा मार्ग आपण बघितला Focus only on what you can control यात असे सांगितले आहे की जरी आपल्याला वाटत असेल की प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या कंट्रोल मध्ये असायला हवी तर असे होणे अशक्य आहे. त्यामुळे आपण त्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असू शकतात आणि अशा गोष्टींचा विचार करणे नेहमी टाळायचे ज्यावर आपण कंट्रोल नाही करू शकत.
पाचवा मार्ग आपण बघितला Practice Positive Self-Talk यात असे सांगितले आहे की जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येउ लागेल तर ते विचार लगेचच थांबवून आपण सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण आपण आपल्या मनात जो काही विचार करत असतो भविष्यात तेच विचार आपल्या व्यक्तिमत्व देखील दिसू लागतात.
सहावा मार्ग आपण बघितला Focus on Present Moment यात असे सांगितले आहे की भूतकाळात घडलेल्या चुकांचे आपल्या खांद्यावर ओझे घेऊन आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची मनात भीती ठेवून जगण्यापेक्षा वर्तमानातील क्षणाचा योग्य वापर केला पाहिजे म्हणजे आपण आपले उत्तम भविष्य घडवू शकतो.
सातवा मार्ग आपण बघितला Be with Positive People यात असे सांगितले आहे की आपण सतत सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिले पाहिजे म्हणजे त्यांच्या तोंडून आपल्याला नेहमी सकारात्मक गोष्टी ऐकू येतील, त्यांच्यासोबत राहून आपण सकारात्मक गोष्टी करू लागू आणि त्यामुळे आपल्याला देखील सकारात्मकता जाणवू लागेल.
आम्ही आशा करतो सकारात्मक विचार करण्याची सात मार्ग (7 Ways to be Positive) हा आर्टिकल आपल्याला नक्की आवडला असेल आणि या मार्गांचा आपण वापर करून आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करू शकतात आणि आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन सहज निर्माण करू शकतात. ही माहिती आपल्याला आवडल्यास आपण इतरांसोबत देखील नक्की शेअर करा.
READ MORE POSTS
Post Views: 17,665