नमस्कार मित्रानो, आजच्या या पोस्ट मध्ये मी आपल्याला 8 सोप्या स्टेप्स मध्ये शिकविणार आहे कि आपण एक सुंदर आणि प्रोफेशनल ब्लॉग कसा तयार करावा. या साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कोडिंग किव्वा विशिष्ठ प्रकारचे ज्ञान असण्याची मुळीच आवश्यकता नसते. आपण अगदी सहज software आणि plugins च्या सहायाने आपल्याला पाहिजे तसा ब्लॉग बनवू शकतो. बर, काही लोकांना कदाचित हे माहित नसेल कि ब्लॉग म्हणजे नेमके काय? अगदी सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर आपण इंटरनेट च्या माध्यमातून कुठल्याही स्वरुपाची माहिती share करतो यालाच ब्लॉग असे म्हटले जाते. तसेच जो ब्लॉग लिहितो त्याला ब्लॉगर असे म्हटले जाते.
ब्लॉग बनविण्यासाठी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींची गरज असते ती म्हणजे Domain Name आणि Hosting. तर चला बघू ब्लॉग कसा तयार करावा!
Step -1 आपल्या ब्लॉगचे नाव select करणे
सर्वात प्रथम आपण जो ब्लॉग तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला blog चे नाव शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी Hostinger.com या website चा उपयोग करू. कारण येथे तुम्हाला Premium web होस्टिंग सोबत 1 domain name देखील फ्री मध्ये मिळते. Add to cart वर click करून आपल्याला हा प्लान किती महिन्यासाठी घ्यायचा आहे ते select करावे. (जितका जास्त आपण कालावधी निवडाल तेव्हडा आपल्याला जास्त discount मिळेल) त्यानंतर search domain here येथे click करून आपल्या ब्लॉगसाठी हवे असलेले domain name सर्च करावे. उपलब्ध नसल्यास .com .in .net .org हे extension वापरून try करावे. नंतर checkout now वर click करून Sign Up करावे व आपण select केलेल्या प्लान चे payment करावे.
Step 2: WordPress install करणे
आपण select केलेल्या प्लानचे payment झाल्यावर आपल्याला HPanel या पेज वर redirect करण्यात येईल. HPanel च्या सहायाने आपण पूर्ण ब्लॉगच्या सेटिंग आणि कन्ट्रोल करू शकतो. Start या button वर click करून पुढे जावे select domain वर click करून आपला domain select करावा. त्यानंतर आपल्याला यामध्ये wordpress या software ला install करावे लागेल. यासाठी आपल्या website च्या नावा समोर manage बटण असेल, त्यावर click करावी. आपल्या dashboard ची सर्व माहिती तुम्हाला येथून मिळू शकते. यातून आपल्याला website नावाचे option search करायचे आहे. यात तुम्हाला Auto Installer हे option मिळेल यावर click करून wordpress हे option select करावे.
Step 3: WordPress ची details add करणे
तुमच्या समोर Install WordPress नावाची नवी window open होईल. यात तुम्हाला आपल्या ब्लॉगची संपूर्ण माहिती add करायची आहे. जसे https://, Administrator Username, Administrator password, Administrator Email, website Title, हे सर्व update करून install वर click करावी.
Step 4: ब्लॉगच्या Dashboard मध्ये Log in करणे
installation पूर्ण झाल्यावर address bar वर click करून आपले domain name type करावे व domain name च्या शेवटी wp-admin असे type करावे. उदा. जर तुमचे domain name असेल abcd.com आत तुम्हाला abcd.com/wp-admin असे type करावे. Page open झाल्यावर आपण सुरुवातीला wordpress install करताना जो admin name आणि password add केला होता ते type करून Log in वर click करावे. अशा प्रकारे आपणा आपल्या ब्लॉगच्या dashboard मध्ये प्रवेश कराल.
Step 5: नवीन Theme Installing करणे
आपल्या या नव्या ब्लॉगला एक प्रोफेशनल रूप देण्यासाठी आपल्याला यात theme install करावी लागेल त्यासाठी dashboard मध्ये डाव्या हाताला आपल्याला वेगवेगळे option दिसत असेल त्यापैकी आपल्याला Appearance हे option select करून Themes वर click करायची आहे. Add new वर click करून आपणा हवी ती theme ब्लॉगसाठी install करू शकता. मी आपल्याला सुचवेल कि आपण generatepress या theme चा वापर करावा. कारण हि खूप प्रोफेशनल आणि mobile freindly theme आहे. theme select करून install वर click करावे म्हणजे theme install होईल.
Step 6: ब्लॉग मध्ये Content add करणे
आपला ब्लॉग पूर्ण करण्यासाठी आता आपणा यात काही items ला add करणार आहोत.
1) ब्लॉग पोस्ट add करणे
ब्लॉग पोस्ट म्हणजेच सोप्या भाषेत ‘लेख‘ जो तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहितात. नवीन ब्लॉग पोस्ट तयार करण्यासाठी dashboard मध्ये जाऊन Post option वर जाऊन click करून Add New हे option select करावे.
2) ब्लॉग पोस्ट मध्ये पोस्टचे Title add करण्यासाठी Add Title वर click करावे. त्यानंतर Start writing or type वर click करून ब्लॉग पोस्ट लिहण्यास सुरुवात करावी. उजव्या बाजूला वेगवेगळ्या सेटिंग असतात, ज्यांच्या सहायाने आपण पोस्टची Parmalink, Categories, Featured Image या सर्व गोष्टी add करू शकतात.
Step 7) ब्लॉगचे Title कसे बदलावे
ब्लॉगचे Title बदलायचे असल्यास Homepage वर जाऊन Customize हे option select करून Site Identity या option वर click करावे. आपल्याला हवे असलेले ब्लॉगचे नाव type करून save वर click करावे.
Step 8) Menu कसे बनवायचे
Customize हे option select करून Menu हे option निवडावे. New Menu हे option निवडून मेनुचे नाव type करावे आणि save करावे. आता यात आपण नवीन pages आणि Categories देखील add करू शकतात.
तर आता तुम्हाला समजले असेल कि एक सुंदर ब्लॉग कसा तयार करावा, ते देखील कुठल्याही coding knowledge शिवाय आणि कुठल्याही अनुभव शिवाय. आपल्याला अजून काही शंका आणि प्रश्न विचारायचे असेल तर आपण comment करून निसंकोच पणे विचारू शकतात.
Post Views: 1,712