Daily Habits of Successful People | यशस्वी लोकांच्या सवयी

Share this

Daily Habits of Successful People: मनुष्य आपल्या जीवनात अगोदर स्वतःला काही सवयी लावून घेतो आणि आयुष्यभर त्या सवयींवर अवलंबून असतो. महान शास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल यांनी असे सांगितले होते की आपण दिवसभरात जे काही काम करत असतो त्यातील 95% गोष्टी हे आपल्या सवयीमुळे करत असतो. चांगल्या सवयी लावणे खरच खूप अवघड असते पण त्यांच्यासोबत जगणे खूप सोपे आहे. त्याचप्रमाणे वाईट सवयी लावणे खूप सोपे आहे परंतु त्या सवयी सोबत जगणे खूप अवघड असते. चला तर मग आजच्या या आर्टिकल मध्ये आपण (Daily Habits of Successful People) अशा दहा सवयी बघून ज्यांचा यशस्वी लोक त्यांच्या जीवनामध्ये रोज वापर करतात. या दहा सवयींना आम्ही तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले आहे. 1. भावनिक सवय 2. करिअरच्या सवयी 3. आरोग्याच्या सवयी

. तर आपण सुरुवात करू या भावनिक सवयींपासून.

10 Habits of Successful People in Marathi

भावनिक सवयीं: तुमच्या प्रियजनां सोबत पहाटे चर्चा करा: तुमचे प्रियजन कदाचित तुमचे पालक, भाऊ, बहीण, पत्नी कुणीही असू शकतात. त्यांना तुम्ही हे सांगा की तुमचे त्यांच्यावर खरच मनापासून प्रेम आहे. असे केल्यामुळे तुमचे संबंध तर सुधारतीलच त्यासोबतच तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचे रसायन पसरू लागेल. ज्यामुळे तुमची सकाळ ही पूर्ण एनर्जीने भरलेली असेल आणि तुम्हाला असे वाटू लागेल की तुमच्या जीवनात खरोखरच असं कोणीतरी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व स्वप्नांना पूर्ण करायचे आहे.

चिंतन: बऱ्याच लोकांना असे वाटते की चिंतन केल्यामुळे आपण वाईट विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो परंतु हे खरे नाही. निसर्गाला पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण करायला हजारो वर्ष लागले परंतु या सर्व सजीवांपैकी मनुष्य असा प्राणी आहे जो इतरांपेक्षा खरोखरच श्रेष्ठ आहे.मनुष्य फक्त त्याच्याकडे असलेल्या मेंदूमुळे इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो.त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांना बिलकुल थांबवायचे नाहीये परंतु आपल्याला आपल्या विचारांवर ती नियंत्रण ठेवायचे आहे. ज्यामुळे आपले विचार आपल्या भावनांना नियंत्रित करू शकणार नाही. याचे उदाहरण देण्यासाठी असे समजू की मनुष्याच्या मेंदूमध्ये एक माकड आहे तो सतत काही ना काही बडबड करीत असतो आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण करत असतो.

परंतु खरी समस्या केव्हा निर्माण होते जेव्हा आपण त्या विचारांना खरे मानायला लागतो किंवा त्या विचारान सोबत आपण लढू लागतो. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आपण भावनिक होऊ लागतो किंवा खुश होतो, स्वतःला त्रास करून घेतो, किंवा चिडचिड करू लागतो कदाचित रडू लागतो. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळेस लोक असा विचार करतात की आपला मेंदू आपल्याला इतके नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत आहेत ज्यामुळे आपल्या मनात इतके नकारात्मक भावना येत आहेत. त्यामुळे आपल्याला असे वाटते की हे विचार येणेच बंद व्हायला पाहिजे परंतु हे शक्य नसते.

तर आता आपल्या मेंदू मध्ये असलेल्या माकडावर आपण नियंत्रण ठेवू शकतो जर आपण त्या माकडाला आपला कर्मचारी आणि आपण त्याचे मालक झालो तर. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर या माकडांना प्रशिक्षण द्यायचे आहे आणि आपल्या मनातील माकडाला काही छोटी छोटी कार्य द्यायची आहे .त्याला सांगायचे आहे की तू माझ्या श्वासा वरती लक्ष ठेव आणि माझ्या श्वासाच्या संदर्भातील विचार माझ्या मनात निर्माण कर. जेव्हा कधी भविष्यामध्ये तुमच्या मनात निराशाजनक विचार येऊ लागतील तेव्हा माकड तुमच्या मनात नकारात्मक कल्पना निर्माण करू लागेल.

त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ लागतील. या नकारात्मक भावनां पासून दूर राहण्यासाठी आपल्याला नकारात्मक कल्पनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणि जसे आपण आपल्या मेंदूतील माकडांना प्रशिक्षण दिले आहे त्यामुळे आपण त्या माकडाला पुन्हा एकदा आपल्या श्वासावर लक्ष द्यायला लावू आणि आपल्या श्वासाशी संबंधित विचार निर्माण करायला सांगू. त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येण्या ऐवजी आपल्याला आपल्या श्वासाची संबंधित विचार येऊ लागतील आणि अशाप्रकारे आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहू शकतो. असे केल्याने लोक तुमच्याबद्दल असे बोलू लागतील की हा खरच किती चिंतामुक्त राहतो. आणि हे खरे देखील आहे जर तुम्ही ही सवय स्वतःला लावून घेतली तर तुमच्या आयुष्यातून चिंता ही कायमची निघून जाणार.

यशस्वी लोकांच्या सवयी

शांतता: प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा त्याच्या दररोजच्या जीवनातील थोडावेळ शांततेत आणि एकांतात व्यतीत करतो. आणि तेव्हा तो या गोष्टीचा विचार करत असतो की तो जे काही करत आहे त्यात तो त्याचा उद्देश पूर्ण होत आहे की नाही. तो जे काही करत आहे त्यात त्याचा खरच फायदा होत आहे की नाही. या शांतते मध्ये आणि एकांतामध्ये इतर कुणाशी नाही तर स्वतःच्या मनाशी चर्चा करीत असतात.

कृतज्ञता: भलेही आपण कुठल्याही धर्माचे असो परंतु प्रत्येक धर्मात हेच सांगितले आहे की आपण नेहमी देवाचे आभार मानले पाहिजे आणि त्यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते.

करियरच्या सवयी (लक्ष्य / ध्येय) तुम्हाला एकही असा यशस्वी माणूस भेटणार नाही ज्यांनी आयुष्यामध्ये त्याचे ध्येय निश्चित केले नव्हते आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही ध्येय निर्माण केले नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्हाला हेच माहिती नसेल की तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचे आहे तर तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्हाला कधीच जायचे नव्हते. यशस्वी लोक त्यांच्यासाठी प्रत्येक दिवशी छोटे छोटे ध्येय निर्माण करतात आणि ते त्यांची ध्येय दररोज पूर्ण देखील करत असतात. ज्यामुळे त्यांना त्यांच्या मुळ ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या मुळ ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी रोजच्या जीवनात छोटे छोटे ध्येय बनवायचे आहे आणि एकेक करून ते पूर्ण करत जायचे आहे. दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमचा त्या दिवसाचा कुठला ध्येय आहे हे सुनिश्चित करायची आहे. खरेतर तुम्हाला तुमचे ध्येय यांची एक चेकलिस्ट देखील बनवून घ्यायची आहे. जर्मन सायकॉलॉजिस्टच्या मध्ये जर तुम्ही तुमच्या ध्येयांची चेकलिस्ट बनवली नसेल तर तुमच्या त्या ठरविलेल्या कामांपैकी 42 टक्के कामे तुम्ही सुरुवातीच्या 20 मिनिटातच विसरली असाल. त्यामुळे तुमच्या ध्येयाची चेकलिस्ट हे खूप गरजेचे आहे.

Good Habits Of Successful Person in Marathi

प्राधान्य: जर तुम्ही तुमच्या चेकलिस्ट प्रमाणे तुमच्या ध्येयांना गाठण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी कदाचित जास्त वेळ लागू शकतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला कुठल्या गोष्टीला अगोदर प्राधान्य द्यायचे आहे हे ठरवणे गरजेचे आहे. यशस्वी लोक कुठल्या कामाला अगोदर प्राधान्य दिले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी चेकलिस्टचा वापर करतात. ते असा विचार करतात की जर त्यांना दोन महिन्यासाठी या शहराच्या बाहेर जावे लागेल तर या चेकलिस्ट प्रमाणे असं कुठलं एक काम आहे ज्याला ते अगोदर पूर्ण करू इच्छितात. त्यानंतर ते त्या कामावरती चेकमार्क करतात आणि त्या कामाची सुरुवात करतात.

वाचन: बऱ्याच लोकांना असे वाटते की पुस्तक वाचून आपला काय फायदा होणार. जर तुमचे पाच खास मित्र हे अभ्यासामध्ये अजिबात हुशार नसेल तर परीक्षेत तुमची देखील मार्क्स कमी येणार. जर तुमचे पाच खास मित्रांना व्यायामाची आवड असेल तर तुमची प्रकृती देखील नक्कीच चांगली असेल. तसेच जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि पुस्तक वाचल्याने तुमचा काय फायदा होईल तर तुम्ही तुमचे पाच मित्र तुमच्या मर्जीप्रमाणे निवडू शकतात. आता ही पाच पुस्तके असू शकतात ए.पी. जी. अब्दुल कलाम, बिल गेट्स, लिओनार्दो द विंची, दलाई लामा, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद. जर तुम्ही अशा व्यक्तिमत्वांचे जीवन चरित्र वाचले तर तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या आयडीया मिळू शकतात, त्यांच्या अनुभवाविषयी जाणून घेऊ शकतात, त्यांचा सल्ला घेऊ शकतात आणि सर्वात महत्वाचे तुम्ही तुमचे माईंड सेट करू शकतात. या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला एक सुंदर जीवन जगण्यासाठी होऊ शकतो.

Habits of Successful People in Marathi

तुमचे अंथरून बनवा: हा मुद्दा सुरुवातीला बऱ्याच लोकांना विचित्र वाटू शकतो की आपले अंथरून बनविण्यामध्ये काय फायदा होऊ शकतो. अमेरिकेचे नेव्ही सील ऑफिसर विल्यम हॅरी मॅक सांगतात की जर तुम्ही सकाळी उठल्या बरोबर तुमचे अंथरून व्यवस्थित करीत असाल तर तुम्हाला स्वतःलाच ही गोष्ट चांगली वाटू लागेल आणि तुम्ही विजय मिळवला आहे असे वाटू लागेल. असे केल्याने तुमच्या मध्ये गती निर्माण होईल आणि तुम्ही कल्पनेतून बाहेर निघून कृतीकडे वळाल. ज्यामुळे तुम्ही एका मागे एक कृती करू लागल. तुमची एक कृती संपली की तुम्ही दुसऱ्या कृतीकडे जाऊ लागाल आणि अशा प्रकारे छोटी छोटी कार्य एक खूप मोठं कार्य पूर्ण करण्यास तुमची मदत करेल.

आरोग्याच्या सवयी: पाणी आणि ग्रीन टी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपले आरोग्य चांगले असणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी महान न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ एक्सपर्ट असा सल्ला देतात की आपण दररोज सकाळी उठल्यानंतर पाणी आणि ग्रीन टी प्यायला हवे. ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो त्यावेळेस आपले शरीर भरपूर पाण्याचा उपयोग करतो आणि आपला मेंदू जवळजवळ 80 टक्के हा पाण्याने भरलेला असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आपण पोटभर पाणी पिणे हे गरजेचे असते म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा एकदा भरपूर पाणी मिळते. तसेच ग्रीन टी पिल्यामुळे आपल्या शरीरातील विनाकारण वाढत असलेली चरबी जाण्यास मदत होते आणि मधुमेह यांसारख्या आजारांपासून देखील आपण दूर राहू शकतो, ग्रीन टी कॅन्सर सारख्या आजाराना देखील दूर ठेऊ शकतो.

चांगल्या सवयी आरोग्यासाठी

व्यायाम: सर्वात शेवटची सवय आहे ती व्यायाम. आपण जेवढे विचार करत असतो व्यायामाचा फायदा त्याहून खूप जास्त आहे. व्यायाम केल्यामुळे आपल्याला आनंदी वाटू लागते, आपल्या शरीरातील चरबी कमी होऊ लागते, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि सर्वात महत्वाचे आपला मेंदू आरोग्यदायी होतो, आपल्याला स्मृती वाढविण्यात मदत मिळते, आणि आपण तणाव मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे मानवी शरीराला व्यायाम करण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या मनाने आनंदी असला तर हाच आनंद तुम्हाला तुमच्या कामात देखील जाणवेल. ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो.

तर आजच्या या Daily Habits of Successful People आर्टिकल मध्ये आपण दहा यशस्वी लोकांच्या सवयी बघितल्या त्यातील भावनिक सवयींमध्ये हे पाहिले की आपण सकाळी उठल्यावर ती सर्वात अगोदर आपल्या प्रिय व्यक्तीला हे सांगायचे की आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो आणि आपल्याला त्यांची काळजी वाटते. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या ध्येयांविषयी विचार करायला हवा, आपण चिंतन करायला हवे, त्यासोबतच आपण कृतज्ञता देखील बाळगली पाहिजे. त्यानंतर करिअरच्या सवयींमध्ये आपण हे पाहिले कि आपण आपला ध्येय निश्चित केला पाहिजे, त्यासाठी एक चेकलिस्ट बनविली पाहिजे, सर्व कामांपैकी प्राधान्य कशाला द्यायचे हे ठरविले पाहिजे, पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे, आणि सकाळी उठल्यावर आपले अंथरून व्यवस्थित केले पाहिजे. आरोग्याच्या सवयी मध्ये आपण हे पाहिले की दररोज सकाळी उठल्यावर आपण पोटभर पाणी पिले पाहिजे आणि त्यासोबतच ग्रीन टी देखील प्यायला हवे, त्यासोबतच दररोज सकाळी आपण व्यायाम देखील केला पाहिजे कारण व्यायामाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आणि जर आपण निरोगी असाल तर आपण लवकरच आपले ध्येय पूर्ण करू शकतो.

तर मित्रांनो या होत्या Daily Habits of Successful People in Marathi यशस्वी लोकांच्या दहा सवयी ज्याचे पालन ते नियमितपणे करतात. आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये ध्येय पूर्ण करायची असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही देखील या सवयींचे पालन करा आणि लवकर यशस्वी बना. आम्ही आशा करतो की आपल्याला आमचा आर्टिकल आवडला असेल.

READ MORE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top