युट्युबवर पैसे कसे कमवायचे | How to earn money from YouTube in Marathi

Share this

How to earn money from YouTube in Marathi: तुम्ही नेहमी युट्युबचा वापर करत असाल आणि वेगवेगळे व्हिडिओ बघत असाल. परंतु तुम्हाला हे माहित आहे का यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाखो रुपये दर महिन्याला कमवू शकतो. युट्युब हे गुगलचे ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर दररोज क्रीएटर कडून शेकडो व्हिडिओ अपलोड केले जातात आणि करोडो लोक युट्युबवरील व्हिडिओ बघत असतात.

यूट्यूबच्या माध्यमातून आज सामान्य व्यक्ती देखील लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकला आहे आणि त्यांच्यामध्ये असलेले टॅलेंट जगासमोर मांडू शकला आहे. यूट्यूबवर दररोज व्हिडिओ अपलोड करून अनेक लोकांनी आपले करियर देखील घडवली आहे. त्यासोबतच प्रसिद्धी देखील मिळवली आहे.

त्यामुळे तुम्हाला देखील जर हा प्रश्न पडला असेल की युट्युब वर पैसे कसे कमवावे (How to earn money from YouTube) आणि त्यासाठी नेमके काय करावे लागते. तर आमचा हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा कारण येथे आम्ही आपल्याला युट्युबवर पैसे कसे कमवायचे याची स्टेप-बाय-स्टेप माहिती देणार आहोत.

युट्युब विषयी थोडक्यात माहिती | Information about How to earn money from YouTube

युट्युब हे प्रसिद्ध असे व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे आणि इथे तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व विषयांची व्हिडिओ बघायला मिळतात. तसेच युट्युबवर स्वतःची चॅनल बनवून एखाद्या विशिष्ट विषयाची माहिती नियमितपणे देणाऱ्या व्यक्तीला यूट्यूबवर (Youtuber) असे म्हटले जाते.

हे युट्युबवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देतात त्याला प्रेक्षकांची पसंती मिळते आणि प्रेक्षक या व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी त्या व्हिडिओला कमेंट देखील करतात. आपल्या आवडत्या युट्युबरचे व्हिडिओ पाहण्यासाठी लोक त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करतात.

जेव्हा युट्युब चॅनलवर 100000 सबस्क्राईबर्स पूर्ण होतात तेव्हा युट्युब कडून त्यांना सन्मानचिन्ह म्हणून सिल्वर प्ले बटन देण्यात येते आणि 1 मिल्लियन सबस्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर गोल्ड प्ले बटन देण्यात येते. तसेच टॉप यूट्यूबरला युट्युब फॅन फेस्ट नावाच्या कार्यक्रमात बोलवून त्यांना रेड कार्पेटवर चालण्याची संधी देखील देण्यात येते.

तसेच प्रेक्षकांसमोर त्यांच्याशी त्यांच्या अनुभवाविषयी आणि त्यांच्या या प्रवासाविषयी चर्चा देखील करण्यात येते. थोडक्यात काय तर हे युट्युबर कुठल्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नसतात. त्यामुळे जर तुम्हाला देखील एक प्रोफेशनल युट्यूबर व्हायचे असेल आणि तुम्हाला तुमचे करिअर युट्युबवर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला युट्युबच्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणजेच नियमांचे पालन करावे लागेल.

युट्यूबर कसे बनावे? | युट्युब मधून पैसे कसे कमवायचे

जर तुम्हाला तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवून युट्युबर बनायचे असेल आणि त्यामार्फत पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनल बनवावे लागेल. या चॅनलवर तुम्हाला नियमितपणे व्हिडिओ बनवून अपलोड करावे लागेल. परंतु सर्वात अगोदर या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे की तुम्ही नेमक्या कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू शकतात.

सर्वात अगोदर तुम्हाला हे बघायचे आहे की तुम्हाला कुठली गोष्ट चांगल्या प्रकारे जमते, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहात किंवा तुमच्याकडे अशी कुठली (Skill) स्किल आहे जे तुम्ही युट्युब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतात. आता तुम्ही कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवणार हे ठरल्यानंतर तुम्हाला त्या विषयाशी संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे आहेत.

आणि युट्युब चॅनलवर अपलोड करायचे आहे. बरेच लोक युट्युबवर आपले चॅनल बनवतात आणि त्यावर व्हिडिओ अपलोड करतात. परंतु कालांतराने ते निराश होऊ लागतात. कारण की त्यांच्या व्हिडिओला व्युज (Views) मिळत नाही, लाईक्स मिळत नाही आणि सबस्क्राईबर्स देखील वाढत नाही.

त्यामुळे जर तुम्हाला युट्युबवर करिअर करायचे असेल तर तुमच्या मध्ये (पेशन्स) सय्यम असणे खूप गरजेचे आहे. कारण हे सांगता येत नाही की तुमचा कुठला व्हिडिओ अचानक व्हायरल होईल आणि अचानक तुमचे सबस्क्राईबर्स वाढू लागेल. त्यामुळे तुम्हाला सतत व्हिडिओ बनवायचे आहे आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करायचे आहे.

हळूहळू जसे-जसे तुमचे व्हिडीओ चालतील तसे-तसे तुमचे सबस्क्राईबर्स देखील वाढतील. सबस्क्राईबर्स वाढल्यामुळे तुमचे येणारे पुढचे व्हिडिओ देखील सबस्क्राईबर्स बघू लागतील. अशाप्रकारे तुम्ही तुमचे व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू शकता आणि तुमचे सबस्क्राईबर्स देखील वाढवू शकतात.

यूट्यूब मोनेटायझेशन चे कोणते नियम आहे? | How to Earn Money From Youtube Channel

जर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून त्यामार्फत पैसे कमवायचे असेल तर तुमच्या यूट्यूब चॅनलवर मोनेटायझेशन सुरू असणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या यूट्यूब चॅनलवर किती व्हिडिओ आहेत हे गरजेचे नाही परंतु तुमच्या चॅनलचे किती सस्क्रायबर आहे हे खूप महत्त्वाचे आहे.

तुमच्या यूट्यूब चॅनलवर मोनेटायझेशन सुरू करण्यासाठी एका वर्षाच्या आत तुमच्या चॅनलला किमान एक हजार लोकांनी सबस्क्राइब केले पाहिजे आणि तुमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ मिळून 4 हजार तासांचा वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमचा एकच व्हिडिओ देखील मिळवून देऊ शकतो किंवा तुम्हाला बरेच व्हिडिओ देखील बनवावे लागतील.

तुमच्या चॅनलवर बनवलेला जो व्हिडीओ जास्त चालू लागेल त्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढू लागेल आणि तुमचा वॉच टाईम देखील पूर्ण होऊ शकेल. एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरील एखादा व्हिडिओ जरी वायरल झाला तरी त्यासोबत आपोआप तुमचे इतर व्हिडिओ देखील चालू लागतील.

यासाठी तुम्हाला ज्या विषयावर व्हिडीओ बनवायचा आहे त्या विषयाचा व्हिडिओ बनवण्यापूर्वी पूर्णपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्हाला हे देखील बघणे गरजेचे आहे की इतरांनी त्या विषयावरील व्हिडिओ कशाप्रकारे बनवला आहे, त्या व्हिडिओ मध्ये असा कुठला मुद्दा आहे का जो त्यांनी सांगितला नाही आणि तो मुद्दा तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगू शकाल.

तसेच तुम्हाला हे देखील बघायचे आहे की या विषयावर इतरांनी किती मिनिटांचा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमीत कमी वेळामध्ये त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीने तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे. जे मुद्दे त्यांनी सांगितले नाही ते मुद्दे तुम्हाला तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगायचे आहे.

अशाप्रकारे तुमचा व्हिडिओचा कंटेंट हा इतरांपेक्षा युनिक होतो. तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने सांगितले आणि काहीतरी नवीन मुद्दे देखील त्यामध्ये नोंदवले हे प्रेक्षकांच्या लक्षात येते. याच कारणामुळे तुमचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी युट्युबवर तुम्हाला सबस्क्राईब करू लागतात.

थंम्बनेल काय आहे? Know more about How to earn money from YouTube

जेव्हा पण तुम्ही युट्युब सुरु करतात तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर व्हिडीओ दिसतात. परंतु तो व्हिडिओ नेमका कुठल्या विषयावर आहे हे तुम्हाला व्हिडीओवर असलेल्या चित्रामुळे समजते. त्या व्हिडिओला लावलेल्या चित्रालाच (Thumbnail) थंम्बनेल असे म्हटले जाते. जर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओवर लोकांचे लक्ष केंद्रित करून घ्यायचे असेल.

तर तुम्हाला देखील व्हिडिओसाठी थंम्बनेल बनवणे तितकेच गरजेचे आहे. तुमचे थंम्बनेल जितके आकर्षक असेल तितके जास्त लोकं तुमचे व्हिडीओ बघण्याची शक्यता देखील वाढते. कारण आपण नेहमी त्या व्हिडिओमध्ये काय आहे हे नंतर बघतो परंतु त्या थंम्बनेलवर काय लिहिले आहे हे वाचूनच आपण तो व्हिडिओ प्ले करीत असतो.

त्यामुळे तुमच्या व्हिडिओचा जो काही विषय असेल त्याला अगदी थोडक्यात आणि ठळक पद्धतीने तुमच्या थंम्बनेलवर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि अशा शब्दांचा वापर करा की जो युजर ते थंम्बनेल वाचेल तो तुमच्या व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ ओपन करेलच. तुमच्या व्हिडिओवर युजरची एंगेजमेंट येण्यासाठी थंम्बनेल ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

थंम्बनेल बनवण्यासाठी तुम्ही फोटोशॉपचा वापर करू शकता किंवा मोबाईलवर थंम्बनेल बनवायचा असेल तर Canva ॲप किव्वा प्ले स्टोअरवर बरेच ॲप देखील उपलब्ध आहेत. ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मोबईलमध्ये उत्कृष्ट असे थंम्बनेल सहज बनवू शकतात.

कीवर्ड्स काय आहे? | Simple Steps of How to earn money from YouTube

कीवर्ड्स म्हणजे काही शब्दांचा समूह जे युजर्सकडून वेगवेगळ्या पद्धतीने युट्युबच्या सर्च बॉक्स मध्ये टाईप केले जातात आणि युट्युब त्यांच्यासमोर वेगवेगळे प्रकारचे कीवर्ड्स शी संबंधित रिझल्ट युट्युब द्वारे दाखविले जातात. त्यामुळे तुम्हाला ज्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल त्या विषयाचा कुठला कीवर्ड युजर्सकडून जास्त प्रमाणात सर्च केला जातो हे तुम्हाला शोधावे लागेल.

आणि तुमच्या व्हिडीओच्या टायटल मध्ये ते कीवर्ड्स तुम्हाला टाईप करावे लागेल. याचा तुम्हाला फायदा असा होईल की जेव्हा कोणी युजर कीवर्ड्स टाईप करून सर्च करेल तेव्हा सर्च मध्ये तुमचा व्हिडिओ सजेस्ट होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे तुमच्या व्हिडिओच्या टायटल मध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, Hashtag मध्ये, तसेच टॅग ऑप्शन मध्ये तुमच्या व्हिडीओशी संबंधित असलेले जास्तीत जास्त कीवर्ड्स तुम्हाला ऍड करायचे आहे.

असे केल्याने गुगलच्या बोट्सला हे समजते की तुम्ही बनवलेला व्हिडिओ नेमका कुठल्या विषयावर आधारित आहे. कीवर्ड्सचा व्हिडिओमध्ये योग्य प्रकारे वापर करणे यालाच टेक्निकल भाषेमध्ये S.E.O म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे म्हणतात. जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये S.E.O चा वापर कराल तेवढा जास्त तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे तुमच्या चॅनल वरील व्हिडिओला व्युज मिळतील आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर युजर्सची एंगेजमेंट वाढेल.

युट्युब चॅनलसाठी कुठले नियम पाळावे? | What are the rules for YouTube channels?

युट्युबवर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही स्वतः ऑन स्क्रिन येऊन व्हिडिओ बनवू शकता किंवा स्वतःचा चेहरा न दाखवता देखील व्हिडिओ बनवू शकता. तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ बनवायचा हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु व्हिडिओ बनवताना तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष देणे हे देखील तितकेच गरजेचे आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचे कॉपीराईटेड कन्टेन्ट नसावेत.

कॉपीराइट म्हणजे काय तर एखादा असा व्हिडिओ, एखादे म्युझिक किंवा एखादी इमेज जी तुम्ही स्वतः तयार केली नाही आणि जे दुसऱ्याच्या मालकीचे आहे. असे कुठल्याही प्रकारचे कन्टेन्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू नका. प्रयत्न असा करा की तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वकाही कंटेंट तुमच्या स्वतःचे असतील.

कारण जर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कॉपीराईटेड कँटेनचा वापर केला असेल तर तुमच्या व्हिडिओला मुळ क्रियेटर कडून कॉपीराइट स्ट्राइक येऊ शकतो. ज्याचा तुमच्या यूट्यूब चॅनलवर फार मोठा प्रभाव पडू शकतो आणि तुम्ही बनवलेला व्हिडिओ युट्युब कडून डिलीट देखील केला जाऊ शकतो.

एवढेच नाही तर तुमच्या चॅनलवर असलेले मोनेटायझेशन चे ऑप्शन देखील युट्युब बंद करू शकतो आणि त्याचा फटका तुमच्या कमाईवर होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी इमेजेस किंवा व्हिडिओचा वापर करायचा असेल तर तुम्ही रॉयल्टी फ्री वेबसाईटचा उपयोग करू शकता. जिथे तुम्हाला भरपूर इमेजेस आणि व्हिडिओज उपलब्ध असतील. यासाठी तुम्ही Pixels, Pixabay, Unplash अशा वेबसाईटचा उपयोग करू शकतात.

युट्युब चॅनलवर व्हिडीओला पैसे कोण देते? | Who pays for a video on a YouTube channel?

जर तुमच्या यूट्यूब चॅनलवर मोनेटायझेशन सुरु करायचे असेल तर तुम्हाला क्रिएटर स्टुडिओ ऑप्शनमध्ये जाऊन मोनेटायझेशन ऑप्शन वर क्लिक करावी लागेल. इथे तुम्हाला रिव्ह्यूचे ऑप्शन मिळेल यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे युट्युब चॅनल रिव्ह्यूसाठी पाठवू शकता. त्यानंतर युट्युब टीमकडून तुमच्या चॅनलचे रिव्ह्यू करण्यात येईल.

जर तुम्ही सर्व नियमांचे व्यवस्थितपणे पालन केले असेल आणि कुठलीही कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन केले नसेल. तर तुमच्या चॅनलवर मोनेटायझेशन सुरू करण्यात येते. रिव्ह्यू प्रोसिजरसाठी साधारणपणे एक महिना किव्वा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. परंतु ही प्रोसिजर करण्या अगोदर तुमच्या चॅनलवर एका वर्षाच्या आत एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम पूर्ण होणे गरजेचे आहे.

त्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलवर मोनेटायझेशन सुरू करू शकतात. मोनेटायझेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला गूगल अॅड्सेंचे अप्रूवल दिले जाते. गुगल अॅड्सेंस हे गुगलचा एक भाग आहे आणि यांच्याद्वारे युट्युब वरील व्हिडीओवर आणि वेबसाईटवर निरनिराळ्या एडवर्टाइजमेंट दाखविणे, एडवर्टाइजमेंटची सीपीसी (C.P.C) ठरविणे, प्रत्येक धारकाचे हिशोब ठेवणे, आणि त्यांना त्यांच्या बँक अकाउंट वर पैसे ट्रान्सफर करणे ही सर्व कामे केली जातात.

यासाठी तुम्हाला गुगल अड्सेंस कडून पत्राद्वारे तुम्ही सबमिट केलेल्या ऍड्रेस वर एक पिन पाठविण्यात येतो. तो पिन तुम्हाला व्हेरिफाय करावा लागतो. त्यानंतरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये गुगल द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात येतात. तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी तुमच्या अॅड्सेंस अकाउंटवर किमान शंभर डॉलर बॅलेन्स होणे गरजेचे आहे.

अन्यथा तुमचे पेमेंट होल्ड करण्यात येते आणि जेव्हा तुमचे शंभर डॉलर किंवा त्याहून अधिक जमा होतील तेव्हा तुमच्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्यात येतात. जर तुम्हाला भारतात तुमच्या बँक अकाउंटवर पैसे मागवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेचा स्विफ्ट कोड सबमिट करणे गरजेचे आहे.

तसेच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यासारखे गव्हर्मेंट द्वारे दिलेले आयडी प्रुफ देखील गूगल अड्सेंस द्वारे व्हेरिफाय करणे गरजेचे असते. इथे तुम्ही आधार कार्डचा उपयोग करू शकत नाही. सर्वात महत्वाचे गुगल अॅड्सेंसचे अप्रूवल हे एका व्यक्तीला फक्त एकदाच दिले जाते.

काही कारणास्तव जर तुमचे गूगल अॅड्सेंसचे अकाउंट (डिसॅबल) बंद करण्यात आले तर पुन्हा तुम्ही कधीच गुगल अड्सेंसचे अप्रूवल घेऊ शकत नाही. त्यामुळे युट्युबवर तुम्हाला नेहमी गुगल अड्सेंसच्या नियमात राहूनच व्हिडिओ बनवायचे आहे. काही कारणास्तव जर तुमचे गुगल अड्सेंस बंद झाले असेल तर तुम्ही तुमच्या परिवारातील इतर सदस्यांच्या नावाने अप्रूवल मिळवू शकता. फक्त हे लक्षात ठेवा कि त्या व्यक्तीकडे गरजेचे आयडी प्रुफ असावे आणि ती व्यक्ती १८ वर्षे पूर्ण झालेली असावी.

युट्यूब चॅनल बनवण्यासाठी किती खर्च येतो? | How much does it cost to create a YouTube channel?

मित्रांनो जर तुम्हाला युट्युबवर आपल्या स्वतःचे चॅनल बनवायचे असेल तर तुम्हाला एकही रुपया इथे खर्च करावा लागत नाही. परंतु बरेच लोक व्हिडीओ बनवण्यासाठी सुरुवातीला एखादा महागडा डी.एस्.एल्.आर. कॅमेरा विकत घेतात, माईक विकत घेतात, लाईट्स विकत घेतात. या सर्व गोष्टी तुमच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये असणे गरजेचे नाही.

परंतु तुमच्याकडे जर या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तर वापरायला देखील मुळीच हरकत नाही. परंतु जर तुम्हाला युट्युबवर तुमचे करिअर करायचे असेल तर या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कडे उपलब्ध असलेला मोबाईलचा वापर करून देखील व्हिडिओ बनवू शकता. आज-काल सर्व स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट क्वालिटी असलेले कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत.

त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग करून चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करू शकता. मोबाईल मध्ये व्हिडीओ शूट करायचं असल्यास तुम्ही प्ले स्टोर वरून ओपन कॅमेरा (Open Camera) हे ॲप डाऊनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला बरेच फीचर्स असे मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही उत्कृष्ट क्वालिटीचा व्हिडीओ तुमच्या मोबाईल फोन मध्ये शूट करू शकतात.

व्हिडिओ शूट करताना कोणती काळजी घ्यावी? | What to look out for when shooting a video?

व्हिडिओ शूट करताना तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा म्हणजे शूटिंग सुरू असताना कुठलाही कॉल येणार नाही. ज्यामुळे तुम्हाला शूटिंग करताना अडथळा देखील येणार नाही आणि तुमचा शूट करीत असलेला व्हिडिओ मध्येच कट देखील होणार नाही.

तसेच या गोष्टीची देखील काळजी घ्या की तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही माहिती द्यायची असेल आणि बोलायचे जर असेल तर आजूबाजूचा आवाज त्या व्हिडिओमध्ये यायला नको. त्यासाठी तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूट करू शकता किंवा ते शक्य नसल्यास असा वेळ निवडा जेव्हा तुमच्या आजूबाजूला पूर्णपणे शांतता असेल.

बऱ्याच वेळा असे होते की आपण एखादा व्हिडिओ बघत असतो परंतु त्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या आवाजामुळे आपण स्वतः वैतागतो आणि तो व्हिडिओ बंद करतो. व्हिडिओ पूर्ण न बघता मध्येच बंद लेका तर त्याचा सरळ परिणाम तुमच्या व्हिडिओच्या वॉच टाईमवर होतो. आपला प्रेत्यक व्हिडिओ उत्कृष्ट पद्धतीने बनला पाहिजे म्हणजे बघणाऱ्या विवर्सचे पूर्णपणे मनोरंजन आणि समाधान होणे गरजेचे आहे.

त्यामुळे आपल्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असावी यासाठी फक्त तुमचा आवाज आणि व्हिडिओचा दर्जा कसा उत्कृष्ट असेल याचा विचार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही एखादे ठिकाण किंवा स्वतःला व्हिडीओ मध्ये दाखवत असाल तर शक्यतो शूटिंग तुम्ही उजेड असताना करा किंवा दिवसा करा. म्हणजे तुमच्या व्हिडीओमध्ये जे तुम्हाला दाखवायचे आहे ते सर्व स्पष्ट दिसेल. जर तुम्ही अंधारामध्ये काही शूट करीत असाल तर ते युजरला व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे देखील तुमचा व्हिडिओ बघण्यात लोकं इंट्रेस घेणार नाही.

यूट्यूब व्हिडिओ वायरल कसा होतो? | How does a YouTube video go viral?

आपण युट्युबवर एखादा ठराविक व्हिडिओ ठरवून वायरल करू शकत नाही तो व्हायरल होतो ते फक्त त्या व्हिडीओमध्ये असलेल्या कन्टेन्ट मुळे आणि तो व्हिडिओ कुठल्या विषयावर आधारित आहे त्यामुळेच. परंतु जर तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त युजर्स बघू लागले तर तुमचा व्हिडिओ हा अन्य लोकांना आपोआप सजेशन मध्ये दिसू लागतो.

अशाप्रकारे तुमचा व्हिडिओ अशा लोकांना समोर देखील सजेस्ट केला जातो जे तुमचे सबस्क्रायबर देखील नाही. अशाप्रकारे तुम्ही तयार केलेला व्हिडिओ हा आपोआप वायरल होऊ लागतो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ तुमच्या व्हिडिओचा थंम्बनेल हा असा बनवला पाहिजे की कोणीही बघताक्षणी तुमचा व्हिडिओ ओपन केला पाहिजे. तसेच तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही युजरला Hook केले पाहिजे.

त्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीचे 10 ते 30 सेकंद असे काहीतरी बोलले पाहिजे किंवा दाखविले पाहिजे की जो कोणी तुमचा व्हिडिओ बघत आहे त्याने तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे. जो काही तुमचे व्हिडिओचा विषय आहे त्याच्याशी संदर्भात तुम्ही विषय मांडला पाहिजे आणि तुमचा युजर समाधानी होईल याची तुम्ही काळजी देखील घेतली पाहिजे.

असे केल्याने तुमचा व्हिडीओ पूर्णपणे युजर कडून बघितला जातो आणि तुमच्या व्हिडिओला लाईक शेअर केले जाते. तसेच युजर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी तुमचे व्हिडिओमध्ये दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंट करतात. जर तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडून लाईक, शेअर आणि कमेंट केले जाऊ लागले तरी देखील तुमचा व्हिडिओ युट्युबद्वारे अन्य युजर्सला देखील सजेस्ट केला.

अशाप्रकारे जास्तीत जास्त युजर्सकडून तुमचं व्हिडिओ बघण्यात येतो आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ वायरल होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला कोणी असे बोलत असेल की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुमचा व्हिडीओ व्हायरल करतो. तर कोणाच्याही बोलण्याला तुम्ही बळी पडू नका कारण शेवटी व्हिडिओ व्हायरल करणे हे फक्त युजरच्या हातात असते आपल्या हातात कधीच नसते.

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही युट्युबवर पैसे कसे कमवायचे | How to earn money from YouTube in Marathi याची माहिती दिलेली आहे. युट्यूबवर पैसे कसे कमवावे आणि कशा प्रकारे आपण आपले करियर बनवू शकतो.

यासाठी फक्त आम्ही सांगितलेल्या सर्व माहितीचे व्यवस्थित पालन करायचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला युट्युबवर करिअर करायचे असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि पेशन्स या दोन गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे.

तसेच या दोन्ही गोष्टी जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला एक उत्कृष्ट युट्युबर होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि लाखो रुपये कमविण्यापासून देखील तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आमच्या शुभेच्छा नेहमी आपल्या सोबत आहे तसेच जर तुमच्या काही शाना असेल कि How to earn money from YouTube तर आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता. जर आमचा हा आर्टिकल आपल्याला आवडला असेल तर तुम्ही कमेंट द्वारे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता आणि तुमच्या मित्र परिवारात हा आर्टिकल शेयर देखील करू शकतात.

READ MORE POSTS

भाषणाची सुरुवात कशी करावी

मोबाईलचा वापर कमी कसा करावा

इंग्लिश स्पीकिंग कशी करावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top