How to Improve English Vocabulary in Marathi | इंग्रजी कशी सुधारावी

Share this

How to Improve English Vocabulary Power in Marathi: कुठली भाषा शिकणे पूर्वी त्या भाषेची Vocabulary शिकणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. कारण कुठल्याही भाषेचा महत्त्वाचा भाग vocabulary असते. तसेच भाषा बोलतांना, लिहितांना, ऐकताना, वाचतांना कुठल्याही विशिष्ट भाषेच्या vocabulary चे ज्ञान असणे गरजेचे असते. तेव्हाच भाषेच्या या चारही पार्ट मध्ये चांगले परफॉर्मन्स केले जाऊ शकते.

अशात जर तुम्हाला इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल परंतु तुम्ही vocabulary मुळे अनेकदा बोलताना अडखळत असाल तर आता तुम्हाला चिंता करण्याची मुळीच गरज नाही. कारण हा फक्त तुमचं प्रॉब्लेम नाही तर जवळ-जवळ इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा असाच गोंधळ होतो. तरी या प्रॉब्लेम चे सोल्युशन काय आहे हे समजून घेण्यासाठी आजचा आमचा लेख तुम्हाला शेवटपर्यंत वाचायचा आहे.

हा आर्टिकल वाचून संपेपर्यंत तुमच्या हे लक्षात आले असेल की इंग्रजी vocabulary शिकण्याची योग्य पद्धत काय आहे. चला तर मग बघुया इंग्रजी vocabulary शिकण्याचे सहा स्टेप्स ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य प्रकारे इंग्रजी बोलू शकतात.

How can I make my English word power stronger?

  1. वाचन करण्याची सवय करा: जसे की तुम्हाला माहितीच असेल जेव्हापण तुम्ही एखादी इंटरेस्टिंग आणि नॉलेजे बल कन्टेन्ट वाचत असतात तेव्हा तुम्हाला वाचन करत असताना बरेच नवीन शब्द देखील वाचायला मिळतात. वाचन करीत असताना तुम्हाला जे काही नविन शब्द मिळतात हे शब्द तुमची खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. कारण हे शब्द संदर्भा सोबत लिहिलेले असतात. त्यामुळे त्या शब्दाचा नेमका काय अर्थ आहे हे देखील तुम्हाला योग्य प्रकारे समजले जाते. त्यासोबतच तुम्हाला हे देखील कळते की या शब्दाला कधी आणि कुठल्या परिस्थितीमध्ये वापरले गेले पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला वाचनाच्या माध्यमातून नवीन शब्दांची माहिती घ्यायची असेल तर वाचना दरम्यान त्या शब्दांना underline करण्याची सवय करून घ्या. आणि वाचन करून झाल्यानंतर त्या शब्दांचा डिक्शनरी मध्ये अर्थ बघून तो शब्द तिथे लिहून टाका. तुम्हाला हवे असतील तर त्या शब्दाशी संबंधित तुम्हाला माहिती असलेला शब्द सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकतात. असे केल्यामुळे तुमच्या मेंदूचा असा व्यायाम होईल की जेव्हा कधी तुम्ही त्या शब्दांना पुन्हा वाचाल तेव्हा तुम्हाला त्या शब्दाचा नेमका काय अर्थ आहे हे देखील माहिती झालेली असेल. तसेच दोन तीन वेळेस जेव्हा तुम्ही त्या शब्दांचा अर्थ काय आहे हे चेक करून घेईल तेव्हा तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ देखील लक्षात राहील. तसेच अशा शब्दांचा कुठे वापर केला गेला पाहिजे हे देखील तुम्हाला पूर्णपणे लक्षात आले असेल. असे केल्यामुळे जेवण कधी वा सणाच्या दरम्यान तुम्हाला नवीन शब्द वाचायला मिळेल तेव्हा ते शब्द वाचून तुम्हाला नाराज होण्याऐवजी तुमच्यामधील त्या शब्दा विषयी ची उत्सुकता वाढेल. कारण त्या शब्दांचा अर्थ समजल्यानंतर तुमच्या vocabulary मध्ये तुम्ही या शब्दांचा साठा हळूहळू वाढवत जाणार.

How can I improve my English vocabulary and fluency?

  1. नवीन शब्दांचे उच्चार आणि स्पेलिंग शिकणे: असे समजा की तुम्ही वाचन करण्याच्या दरम्यान तुम्हाला जे काही नवीन शब्द मिळाले त्याचा तुम्ही अर्थ शोधून काढला आणि त्याचा वापर कधी करायचा हे देखील तुम्हाला समजले. परंतु जर तुम्हाला इंग्रजी भाषेच्या vocabulary वर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला वासना दरम्यान मिळणाऱ्या प्रत्येक नवीन शब्दाला एका मिशन प्रमाणे बघावे लागेल. आणि तुमच्या समोर येणाऱ्या या मिशनला तुम्हाला यशस्वीपणे पार सुद्धा करावे लागेल. म्हणजेच काय तर प्रत्येक नवीन शब्दाचा अर्थ समजून घेण्यास सोबतच त्या शब्दाचा योग्य प्रकारे कसा उच्चार केला गेला पाहिजे हे देखील शिकले पाहिजे. आणि त्या शब्दाची स्पेलिंग काय आहे हे देखील तुम्ही पाठ केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नवीन शब्दासोबत फ्रेंडली हवे लागेल आणि त्या शब्दाची तुम्हाला पूर्ण माहिती देखील घ्यावी लागेल.

How can I improve my vocabulary in 10 days in Marathi?

  1. प्रत्येक शब्दाचे वेगळे प्रकार जाणून घेणे: जर तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजी बोलायचे असेल तर तुम्ही vocabulary कडे दुर्लक्ष करू नका. याउलट तुम्हाला एका शब्दाचे नेमके किती प्रकार आहे हे जाणून घेतले पाहिजे. जसे की एका शब्दाचे वेगवेगळे प्रकार. जसे की Beauty हे Noun आहे, Beautiful हे Adjective Form आहे, Beautify हे Verb आहे, Beautifully हे Adverb आहे. अशा प्रकारे एका शब्दाचे चार प्रकार तयार होतात. अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक शब्दाचे चार प्रकार काय आहे हे माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक शब्दाचे उच्चार अर्थ जाणून घेणे आणि लक्षात ठेवले थोडेसे अवघड वाटू शकते परंतु विश्वास ठेवा हे खूप सोपे आहे. ही क्रिया तुम्ही सतत केल्यानंतर काही दिवसांनंतर आपोआप तुम्ही नवीन माहिती करून घेतलेल्या शब्दाचे चार प्रकार शोधु लागला आणि सराव करून तुम्हाला ते शब्द लक्षात ठेवणे सुद्धा तेवढेच सोपे वाटत जाईल.

How can I master English grammar?

  1. ऑनलाइन डिक्शनरी ची मदत घ्या: अशा भराच्या ऑनलाइन डिक्शनरी उपलब्ध आहे जे दररोज तुम्हाला एक नवीन शब्दांची माहिती देत असते. जर तुम्हाला दररोज एका नवीन शब्दाविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन डिक्शनरीचा नक्कीच वापर केला पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला दररोज येणाऱ्या नवीन शब्दांची माहिती लक्षात ठेवून त्या शब्दाचे चार प्रकार सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये बोलल्या जाणाऱ्या वाक्यांमध्ये तुम्ही या नवीन शब्दांचा सुद्धा योग्यप्रकारे वापर केला पाहिजे. असे केल्यामुळे सुरुवातीला हळूहळू का होईना पण इंग्रजी vocabulary वर तुमचे प्रभुत्व निर्माण होऊ लागेल.

How can I learn English grammar on my own?

5. (Thesaurus) कोशचा वापर करणे: ऑनलाइन डिक्शनरी मध्ये मिळणाऱ्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेण्यासोबतच तुम्हाला Thesaurus च्या माध्यमातून या नव्या शब्दांचा (synomses) समानार्थी शब्द किंवा (antonyms) विरुद्धार्थी शब्द शोधू शकतात. आणि त्या शब्द सोबतच तुम्ही या शब्दांना सुद्धा लिहू शकतात. याचा तुम्हाला असा फायदा होईल की तुम्ही जेव्हा पण अशा शब्दांना पुन्हा बघाल तेव्हा एकाच ठिकाणी तुम्हाला त्या शब्दांचे चार प्रकार तसेच त्या शब्दाचे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे एकाच ठिकाणी असल्यामुळे त्या शब्दाची सर्व माहिती तुम्हाला एकत्रपणे मिळेल. यासोबत तुम्हाला हीदेखील काळजी घ्यायची आहे की तुम्हाला केवळ नवीन शब्दांचा अर्थ, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यातच वेळ वाया नाही घालवायचा आहे याउलट तुम्हाला सुरुवातीलाच त्या शब्दांना व्यवस्थितपणे समजून घेण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे.

What is the first step to learning English?

  1. संभाषण करणे: तुम्हाला (How to Improve English Vocabulary in Marathi) इंग्रजी भाषेच्या vocabulary व वर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला नवीन शब्दांचा अर्थ आणि त्याचे विविध प्रकार जाणून घ्यायचेच आहे त्यासोबतच नवीन शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करण्यासाठी तुम्हाला संभाषण देखील करायचे आहे. कारण जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मित्रासोबत, किंवा परिवारातील व्यक्ती सोबत इंग्रजी भाषेत संभाषण करेल तेव्हा तुम्हाला नवीन शब्दांची माहिती तर मिळणारच आहे परंतु तुम्ही घेतलेल्या नवीन शब्दांचे माहितीला सुद्धा तुम्हाला तुमच्या सम भाषणांमध्ये वापरायचे आहे. असे केल्यामुळे तुमचे इंग्रजी बोलण्याचे कौशल्य देखील हळूहळू वाढत जाईल. त्यामुळे संभाषण करीत असताना तुम्हाला समोरील व्यक्ती कुठल्या विषयावर बोलत आहे हे ऐकणे आणि समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला समोरील व्यक्ती काय बोलत आहे या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे. अशा प्रकारे केवळ ऐकण्या मुळे सुद्धा तुम्हाला नवीन शब्दांविषयी ची माहिती मिळू शकते. त्यासोबतच कुठल्या शब्दाला नेमके कुठे वापरले गेले पाहिजे याची देखील तुम्हाला माहिती मिळत जाईल. परंतु इथे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की तुम्ही अशा लोकांसोबत संभाषण केले पाहिजे ज्यांची मुळातच इंग्रजी भाषेवर उत्कृष्ट प्रकारची कमांड असेल आणि ज्यांची इंग्रजी भाषेतील vocabulary उत्कृष्ट असेल. तुम्ही अशा लोकांची नक्कीच मदत घेऊ शकतात. त्याकरिता संभाषण करण्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्तीची निवड करणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्ही जर लक्ष दिले असेल तर तुम्हाला नवीन शब्द शिकून तुमची vocabulary उत्कृष्ट करण्याच्या या मिशनमध्ये तुम्ही तुमची वाचनाची स्किन, ऐकण्याची स्किल आणि बोलण्याची स्किल स्ट्रॉंग करणारच आहात यासोबतच तुमची लिखाणाची स्कीन सुद्धा अजून स्ट्रॉंग होत जाईल. कारण जेव्हा तुमच्याकडे तुमचे विचार लिहिण्यासाठी नवीन शब्द असेल तेव्हा तेव्हा तुमच्या इंग्रजी लिखाणात सुद्धा चांगल्या प्रकारे सुधार होऊ लागेल.

How to Improve English Vocabulary Power

तर अशाप्रकारे इंग्रजी भाषेच्या vocabulary मध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण सहा स्टेप बघितल्यास त्यातील पहिली स्टेप आहे वाचन करण्याची सवय करा: नियम वाचन केल्यामुळे तुमची नवी शब्दांसोबत ओळख होऊ लागेल आणि त्या शब्दांचे वेगवेगळे प्रकार काय आहे हे देखील तुम्हाला कळू लागेल. तुम्हाला लगेच या नवीन शब्दांना अंडरलाईन करून ठेवायचे आहे. यामुळे तुमची How to Improve English Vocabulary in Marathi वाढेल.

दुसरी स्टेप आहे नवीन शब्दांचे उच्चार आणि स्पेलिंग शिकणे: यात सांगितले आहे की तुम्हाला जे काही नवीन शब्द वाचताना मध्ये मिळत जातील त्या शब्दांचा योग्य प्रकारे कसा उच्चार केला जातो हे तुम्हाला शिकायची आहे त्यासोबतच या सर्व नवीन शब्दांची स्पेलिंग काय आहे हे देखील तुम्हाला पाठ करणे गरजेचे आहे.

त्यानंतर तिसरी स्टेप आहे प्रत्येक शब्दाचे वेगळे प्रकार जाणून घेणे: या स्टेपमध्ये तुम्हाला प्रत्येक शब्दांचा वेगवेगळ्या प्रकार समजून घ्यायचा आहे त्यासोबतच त्या शब्दांचा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द काय आहे हे सुद्धा पाठ करायचे आहे. तुम्हाला संभाषण करताना चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.

चौथी स्टेप आहे ऑनलाइन डिक्शनरी ची मदत घ्या: तुम्हाला जर दररोज नवीन शब्दांनी विषयीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन डिक्शनरीचा वापर केला पाहिजे. ऑनलाइन डिक्शनरी च्या माध्यमातून तुम्हाला दररोज नवे शब्दांविषयी ची माहिती मिळत जाईल. या येणाऱ्या नवीन शब्दांचे तुम्ही वेगवेगळे प्रकार पाठ करायचे आहे.

पाचवी स्टेप आहे (Thesaurus) कोशचा वापर करणे: ऑनलाइन डिक्शनरी द्वारे तुम्हाला जे काही नविन शब्द मिळेल या शब्दांची तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द कोणते आहे हे लक्षात ठेवायचे आहे ज्यामुळे तुमच्याकडे शब्दांचा समूह वाढू लागेल.

सहावी स्टेप आहे संभाषण करणे: तुम्हाला जर इंग्रजी भाषेच्या vocabulary वर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला केवळ नवीन शब्द शब्दांचे विविध प्रकार पाठ करून चालणार नाही तर त्यासोबतच तुम्हाला संभाषण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण जोपर्यंत तुम्ही संभाषण करणार नाही तोपर्यंत कुठल्या शब्दाचा नेमका कुठे वापर केला पाहिजे हे तुम्हाला कळणार नाही. संभाषणाचा तुम्ही जितका जास्त सराव कराल तितक्या जास्त तुम्ही इंग्रजी भाषेच्या vocabulary वर सहजपणे प्रभुत्व मिळवाल.

How can I improve my English for beginners?

त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच तुमच्या इंग्रजी भाषेच्या vocabulary उत्कृष्ट बनवायचे असेल तर या आर्टिकल मध्ये सांगितलेल्या सहा स्टेपला तुम्ही नक्की वापरून बघा. यासोबतच तुम्हाला डेडिकेशन आणि पेशन्स ठेवणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. सतत सराव केल्यामुळे तुम्हाला आपोआप जादू लागेल की तुमची इंग्रजी बोलण्याची स्किल खूप चांगल्या प्रकारे सुधारली आहे. या स्कील च्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वतःची प्रगती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. मित्रांनो आम्ही आशा करतो की आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगितलेली How to Improve English Vocabulary Power in Marathi ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर आपण हा आर्टिकल तुमच्या मित्र परिवारामध्ये देखील शेअर करू शकतात आणि आपले काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात.

READ MORE POSTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top