युट्युब शॉट्सद्वारे पैसे कसे कमवायचे | How To Make Money With YouTube Shots

Share this

युट्युब शॉट्सद्वारे पैसे कसे कमवायचे: नुकताच काही दिवसापूर्वी YouTube ने जाहीर केले आहे की YouTube Shorts Video वर देखील आता सहज पैसे कमवता येऊ शकेल. जे लोक युट्युबवर शॉर्ट व्हिडिओ बनवतात त्यांना दर महिन्याला युट्युब द्वारे $100

ते $10000 पर्यंत बोनस देण्यात येईल. भलेही याकरिता त्यांचे चॅनल मोनेटाइज असो किंवा नसो. हे पैसे कसे मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल, कुठल्या स्टेप्स फॉलो करावे लागेल या सर्वांची माहिती आज मी आपल्याला या आर्टिकल मध्ये देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात जर हा प्रश्न असेल की युट्यूब शॉट्स द्वारे पैसे कसे कमवायचे तर आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

युट्युब शॉट्सचा बोनस कोणाला आणि कसा मिळेल?

युट्युब शॉट्सद्वारे पैसे कमविण्या करिता युट्युब ने काही नियम बनवले आहे तर या नियमांचे पालन तुमच्याकडून होणे गरजेचे आहे तर बघूया हे नियम नेमके कुठले आणि कसे आहेत.

  1. ज्या व्यक्तीने मागील 180 दिवसांमध्ये स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे अशी व्यक्ती याकरिता पात्र आहे. भलेही त्याचे चॅनल नवीन असले किंवा जुने असले तरी याचा इथे कुठलाही फरक पडणार नाही. फक्त जो शोर्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड केला आहे तो तुमचा स्वतःचा बनवलेला असणे गरजेचे आहे तिथे तुम्ही कोणाचाही शॉर्ट व्हिडिओ कॉपी करून अपलोड केलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार नाही.
  2. तुम्ही बनवलेला शॉर्ट व्हिडीओ हा तुमच्या स्वतः असला पाहिजे परंतु यामध्ये यूट्यूबच्या कमुनिटी गाईडलाईनचे उल्लंघन देखील होता कामा नये. जर तुमचा शॉट्स व्हिडिओ खूप व्हायरल झाला असेल परंतु या व्हिडिओमध्ये तुम्ही कम्युनिटी गाईडलाईनचे पालन केले नसेल तर तुम्ही युट्युब शॉर्ट बोनस करीता पात्र ठरत नाही. त्यामुळे तुम्ही बनवलेला शॉर्ट व्हिडिओ हा कम्युनिटी गाईडलाईनच्या नियमत असला पाहिजे.
  3. तुम्ही बनवलेल्या शॉर्ट व्हिडीओमध्ये कुठलाही कॉपीराइट कन्टेन्ट असायला नको. जेव्हा तुम्ही शॉट्स व्हिडिओ बनवतात तेव्हा शॉर्ट तयार करण्यातसाठी जो कॅमेरा दिला आहे. त्याचा उपयोग करून जर तुम्ही या लिस्ट मध्ये असलेल्या गाण्यांचा किव्वा म्युसिकचा वापर केला तर योग्य आहे. परंतु शॉट्स व्हिडिओ बनवताना तुम्ही दिलेल्या लिस्टच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही म्युझिकचा वापर करीत असाल तरीही तुम्ही याकरिता पात्र ठरणार नाही. त्यामुळे शॉट्स व्हिडिओ बनविण्यासाठी तुम्हाला शॉर्ट ऑप्शन मध्ये असलेल्या म्युझिकचा वापर करायचा आहे आणि कुठलीही कॉपीराइट कन्टेन्टचा वापर करायचा नाही.
  4. तुम्ही बनवलेला शॉर्ट व्हिडिओ हा कुठलाही थर्ड पार्टी ॲप द्वारे बनवलेला नसला पाहिजे. म्हणजेच काय तर तुम्ही टिक टॉक, इंस्टाग्राम, रील्स असे कुठलेही व्हिडिओला शोर्टवर अपलोड करू शकत नाही.
  5. तुम्ही तुमच्या शॉट्स व्हिडिओ मध्ये एखाद्या टीव्ही शोचा किंवा व्हिडिओ क्लीपचा वापर करीत असाल परंतु त्यावर तुम्ही तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी काहीच केली नसेल आणि जसा आहे तसाच जर तुम्ही अपलोड केला असेल तरीसुद्धा तुम्ही युट्यूब शॉट्स बोनस करिता पात्र ठरणार नाही.
  6. युट्यूब शॉट्स बोनस करिता तुम्ही कुठल्या देशात राहतात हे देखील महत्त्वाचे आहे. कारण सर्व देश याकरिता Eligible केलेले नाही. परंतु तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही कारण भारत YouTube Shorts बोनस करिता Eligible आहे.
  7. यूट्यूब शॉर्ट्स बोनस मिळविण्याकरिता तुमचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. परंतु जर तुम्ही अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तरी हरकत नाही तुम्ही तुमच्या पालकांच्या नावाने एडसेंस अकाउंट ओपन करून YouTube Shorts बोनसचे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतात.

थोडक्यात काय तर युट्युब शॉट्स्स बोनस जर तुम्हाला हवा असेल तर मागील सहा महिन्याच्या आत तुम्ही तुमचा स्वतःचा ओरीजनल शॉट्स व्हिडिओ बनवून अपलोड केलेला असला पाहिजे.

YouTube Shorts चे पैसे अकाउंटला कसे मिळतील?

युट्युब शॉट्सद्वारे पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला समजून घ्या: तुम्ही युट्युब शॉर्ट व्हिडिओ कधीही अपलोड केलेला असेल त्याचा इथे कुठलाही फरक पडणार नाही. परंतु तिथे YouTube Team द्वारे हे तपासण्यात येईल की तुमचा शॉर्ट व्हिडिओ हा कुठल्या महिन्यामध्ये वायरल झाला होता. उदाहरणार्थ:- ज्या महिन्यामध्ये तुमचा व्हिडीओ व्हायरल झाला असेल त्या महिन्यातील तुमचे व्हिडिओचा परफॉर्मस अगोदर YouTube Team द्वारे बघण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला 100 डॉलर ते 10000 हजार डॉलर पर्यंत पैसे देण्यात येतील. परंतु इथे हे स्पष्टपणे सांगितले नाही की किती Views वर किती पैसे देण्यात येणार आहे.

जर तुम्ही तुमचा शॉट्स व्हिडिओ मे महिन्यामध्ये अपलोड केला असेल परंतु तो व्हिडिओ सप्टेंबर महिन्यात व्हायरल झाला तर YouTube Team द्वारे सप्टेंबर महिन्याचा तुमच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स तपासण्यात येईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आठ ते दहा तारखेच्या आसपास तुम्हाला YouTube Team द्वारे एक ईमेल पाठविण्यात येईल. या ईमेलमध्ये तुम्ही मागच्या महिन्यात यूट्यूब द्वारे किती बोनस जिंकले आहात त्याची माहिती दिलेली असेल. उदाहरणार्थ या ई-मेलमध्ये हे स्पष्ट लिहिले असेल की युट्यूब शॉट्स्स व्हिडिओद्वारे तुम्ही $100, $5000 किंवा $10000 जिंकलेले आहात.

आणि या ई-मेलमध्ये तुम्हाला Claim Bonus हे ऑप्शन मिळेल. सर्वात आगोदर तुम्हाला Claim Bonus या बटन वर क्लिक करून तुमच्या बोनससाठी तुम्हाला Claim करायचा आहे.

जर तुमचे अकाउंट पूर्वीपासूनच मोनेटाइज असेल तर तुम्हाला इथे कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही केलेला Claim हा डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर गुगल एडसेंस द्वारे ट्रान्सफर करण्यात येईल. परंतु जर तुमचे यूट्यूब चॅनल मोनेटाइज नसेल तर तुम्हाला Claim Bonus वर क्लिक केल्यानंतर एडसेंस लिंक करण्याचे ऑप्शन देण्यात येईल. इथे तुम्हाला एडसेंस अकाउंटला लिंक करून घ्यायचं आहे आणि आपली सर्व माहिती यामध्ये सबमिट करायची आहे. तसेच जर तुम्ही यूट्यूब द्वारे कधीही पैसे कमवले नसेल तर तुम्हाला इथे US टॅक्स इन्फॉर्मेशन देखील भरणे गरजेचे आहे.

जसे मी आपल्याला सांगितले की YouTube Team द्वारे तुम्हाला आठ ते दहा तारखेच्या आसपास बोनस क्लेम करण्यासाठी ई-मेल पाठवण्यात येईल. तुम्हाला ई-मेल द्वारे आलेला बोनस क्लेम त्याच महिन्याच्या 25 तारखेच्या आत Claim करावा लागेल. अन्यथा हा क्लेम एक्सपायर होऊन जाईल आणि तुम्हाला कुठलीही पैसे मिळणार नाही. ही प्रक्रिया तुम्हाला दर महिन्याला करावी लागेल. तुम्ही जितक्या लवकर तुम्हाला आलेला Claim एक्सेप्ट कराल तितक्या लवकर तुमच्या एडसेंस अकाउंट द्वारे हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतील. एडसेंस अकाउंट मध्ये तुमचा बोनस ॲड झाल्यानंतर हे पैसे तुम्हाला महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या आत तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येतील.

युट्युब शॉट्स कसे बनवायचे?

इंस्टाग्राम रिल्स, फेसबूक रिल्स प्रमाण YouTube Shorts देखील हल्ली लोकांमध्ये खूप पॉप्युलर होऊ लागले आहे. युट्यूब शॉट्स हे YouTube द्वारे बनविलेले शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचे प्लॅटफॉर्म आहे. युट्युब शॉर्ट व्हिडीओ हे 15 सेकंद पासून तर 60 सेकंड या length मध्ये बनवू शकतात. दररोज लोकांकडून युट्युब शॉर्ट वर लाखो व्हिडिओ अपलोड करण्यात येतात. जर तुम्हाला युट्यूब व्हिडिओ शॉर्ट कसे बनवायचे हे माहीत नसेल तर आम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे युट्यूब शॉर्ट व्हिडिओ बनविले जातात.

युट्यूब शॉट्स बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या फोनमध्ये युट्युब ॲप ओपन करा. युट्युब ॲप ओपन झाल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला + हे ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे.

इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसेल यातून तुम्हाला Create a Short हा पर्याय निवडायचा आहे.

या पर्याय निवडल्यानंतर तुमच्या फोनचा कॅमेरा सुरू होईल आणि तुमच्या फोनवर खालच्या बाजूला लाल रंगाचे बटन दिसेल. या बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ रिकॉर्ड होण्यास सुरुवात होईल.

व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर याच बटनवर क्लिक केल्यावर व्हिडिओ पोज होईल.

यानंतर तुम्हाला इथे Add Music, Speed, Timer असे वेगवेगळे ऑप्शन दिसू लागेल. यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही निवडू शकता आणि चेक () या बटन वर क्लिक करून Next हे ऑप्शन निवडायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला युट्यूब शॉर्ट व्हिडिओचे Title टाईप करायचे आहे. तसेच तुम्ही तुमच्या व्हिडिओचे Title मध्ये आणि Description मध्ये #Short असे टाईप करायचे आहे म्हणजे यूट्यूबला समजेल की तुम्ही आपलोड केलेला व्हिडिओ हा Short Video आहे.

तुमच्या व्हिडिओची सर्व डिटेल्स व्यवस्थित भरून झाल्यानंतर Set Visibility या पर्यायावर क्लिक करायची आहे. इथे पुन्हा तुमच्या समोर तीन वेगळे पर्याय येतील Public, Unlisted आणि Private. यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला व्हिडिओ लगेच पब्लिश करायचा असेल तर तुम्ही Public या पर्यायावर क्लिक करून Upload हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे.

जर तुम्हाला हा व्हिडीओ काही वेळानंतर पब्लिश करायचा असेल तर तुम्ही तुमच्या शॉर्ट व्हिडीओला Private या पर्यायावर सेलेक्ट करून अपलोड करू शकतात आणि तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या व्हिडिओचा Private मोड बदलून Public करू शकतात आणि तुमचा व्हिडिओ रिलीज करू शकतात. आता तुम्हा सर्वांच्या शंका दूर झाल्या असेल कि युट्युब शॉट्सद्वारे पैसे कसे कमवायचे.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा Original video content युट्युबवर शॉर्ट व्हिडिओ बनवून अपलोड करू शकतो. तर मित्रांनो तुम्ही देखील आम्हाला कमेंट करुन हे नक्की सांगा की तुम्ही बनवलेला शॉट्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे का? तुम्ही कधी शॉट्स व्हिडिओ बनवला आहे का? किंवा ही माहिती वाचून तुम्ही शॉट्स व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहे का? आम्ही आशा करतो की आजच्या या आर्टिकल मध्ये सांगितलेली “युट्युब शॉट्सद्वारे पैसे कसे कमवायचे” ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल.

READ MORE POSTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top