Railway Recruitments 2023: भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व तरुण आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) चार्टर्ड अकाउंटंट/ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे.
Railway Recruitments संपूर्ण माहिती
या पदासाठी उच्च शिक्षित आणि अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार असून मुलाखतीची तारीख 14 जुलै 2023 आहे. हे पद दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख, नियुक्तीनंतर दिले जाणारे वेतन इत्यादींविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
IRCTC मध्ये चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या उमेदवारांना विभागीय कार्यालय, सिकंदराबाद येथे नियुक्त केले जाईल. तथापि, IRCTC ने नियुक्त केलेल्या उमेदवाराची भारतात कुठेही बदली करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. चला तर मग जाणून घेऊया या पदासाठी नेमकी पात्रता काय आहे, किती वेतन दिले जाईल.
चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट
शैक्षणिक पात्रता /अनुभव
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवाराला किमान 2 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव, ERP/SAP आणि Oracle मध्ये 1 वर्षाचा अनुभव असावा.
वय श्रेणी
पात्र आणि इच्छुक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. SC/ST अर्जदारांसाठी 5 वर्षे, OBC अर्जदारांसाठी 3 वर्षे आणि PWD अर्जदारांसाठी 10 वर्षे वयाची सूट दिली जाते तसेच माजी सैनिकांना नियमाप्रमाणे वयोमर्यादेतून सूट देण्यात आली आहे.
पदांची संख्या आणि पगार
अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी घेतली जात आहे. निवडलेल्या उमेदवाराला 70000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
Railway Recruitments
वयोमर्यादा किती आहे?
रेल्वे विभागाच्या अधिसूचनेनुसार, चार्टर्ड अकाउंटंट/ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. SC/ST अर्जदारांसाठी 5 वर्षे, OBC अर्जदारांसाठी 3 वर्षे आणि PWD अर्जदारांसाठी 10 वर्षे वयाची सूट दिली जाते तसेच माजी सैनिकांना नियमाप्रमाणे वयोमर्यादेतून सूट देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत आहे.
या पदासाठी पात्रता
अधिकृत भरती अधिसूचनेनुसार, अर्जदारांना 2 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल. तथापि, नियुक्तीचा कालावधी आवश्यकता आणि समाधानकारक कामगिरीवर अवलंबून एक वर्षापर्यंत वाढवता येतो. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवाराला किमान 2 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव, ERP/SAP आणि Oracle मध्ये 1 वर्षाचा अनुभव असावा. लेखापरीक्षणाचा अनुभव असलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त, इतर उमेदवारांना लेखा आणि कर आकारणीचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवाराची थेट मुलाखत घेतली जाईल
अधिकृत भरती अधिसूचनेनुसार, उमेदवाराची निवड हि थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखत 14 जुलै 2023 रोजी IRCTC झोनल ऑफिस / दक्षिण मध्य विभाग, 1 ला मजला, ऑक्सफर्ड प्लाझा, SD रोड, सिकंदराबाद – 500003 येथे होईल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना अधिकृत भरती अधिसूचनेसह अर्जाचा फॉर्म, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि सत्यापनासाठी मुलाखतीच्या ठिकाणी दोन अलीकडील पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्यावर वॉक-इन मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पदांची संख्या आणि पगार
अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी घेतली जात आहे. निवडलेल्या उमेदवाराला 70000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
दरम्यान, रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. परंतु, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.