महाराष्ट्र शासनातील Talathi Bharti 2023: तलाठी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. कारण, राज्यात भरती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकूण ४६४४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र शासनातील Talathi Bharti 2023: तलाठी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. कारण, राज्यात भरती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकूण ४६४४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रातील तलाठी भरती: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांसाठी थेट सेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
पदाचे नाव – तलाठी
विभाग – महसूल आणि वन विभाग
वेतनमान – S-8: 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता आणि याव्यतिरिक्त नियमांनुसार देय इतर भत्ते
एकूण पदे– 4644
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी तलाठी भरती अधिसूचना PDF या लिंकवर क्लिक करा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतरच अर्ज सादर करावा.
तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Read more: तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि टायपिंग येतं? मग पुणे महापालिकेत नोकरीची संधी सोडू नका
Job Details | Talathi Bharti 2023 |
या पदांसाठी भरती | तलाठी |
शैक्षणिक पात्रता /अनुभव | उमेदवार कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. संगणकाची माहिती तंत्रज्ञान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत ते प्राप्त करावे लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. माध्यमिक शालेय परीक्षेत मराठी/हिंदीचा समावेश नसल्यास, निवडलेल्या उमेदवारांना एटाधर मंडळाची मराठी/हिंदी भाषा चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. |
परीक्षेचे स्वरूप | परीक्षा ऑनलाइन होणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नांचे गुण जास्तीत जास्त 2 असेल. एकूण 200 गुणांसाठी 50 गुणांसह मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची लेखी परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांना एकूण किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक असेल. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सादर करण्यास प्रारंभ – 26 जून 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रात्री 11.55 पर्यंत
परीक्षा शुल्क भरण्यासाठीची अंतिम तारीख – 17 जुलै 2023 आहे आणि वेळ रात्री 11.55 पर्यंत
परीक्षेची तारीख आणि कालावधी mahabhumi.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे माहिती दिली जाईल.