Today in this post we will discuss Vastu Tips For Home by JagaatBhaari and Vastu Tips for a Home in Marathi, also we will see Vastu Shastra tips for good luck in Marathi.
8 सुख शांतीसाठी उपाय व तोडगे | स्वतः अनुभव घ्या | Vastu Tips For Home by Jagaatbhaari
Vastu Tips For Home by Jagaatbhaari: वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात. त्यातले काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी. दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील. चला तर मग बघूया सुख शांती साठी उपाय आणि तोडगे काय आहे? त्यापूर्वी अशीच माहिती नियमितपणे मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.
घराचा किराणा कधी भरावा
घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस. आवडता दिवस असल्यानं लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते. खरंतर आपण नेहमी नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण केल्याने आपलं मन शांत होत आणि आपली काम सुद्धा मार्गी लागतात. जर तुमच्या घरी झाडं असतील झाडांना नेहमी पाणी द्यावं झाडं अजिबात सुकू देऊ नये. कारण झाडं सुकल्याण आपल्या घरात नकारात्मकता येते म्हणून नियमित पाणी नक्की द्यावं ती सुकू देऊ नये.
नियमित देवासमोर काय करावे
याबरोबरच नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो. दिवा लावताना दोन वादींची एक वाद करूनच दिवा लावावा. घरातील देवघर नेहमी घरात ईशान्य कोपऱ्यातच असावं नियमित गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या मनाला शांती लाभते. मात्र गायत्री मंत्राचा जप रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये, एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा. त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात.
कचऱ्याचा डब्याची योग्य दिशा कोणती
घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डबा नियमित दक्षिण किंवा वायव्य दिशेलाच ठेवावा. महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावं आणि या पाण्याने घर किंवा आपला व्यवसायातील दुकान पुसावं. यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याची योग्य मार्ग सुद्धा मोकळे होतात.
घरात नियमित काय करावे | Vastu Tips For Home by Jagaatbhaari
नियमितपणे एकादशीच व्रत करावं एकादशीचं व्रत करण्यास जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये. घराच्या मुख्य दरवाज्याच्या डावीकडे नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. घरामध्ये बंद पडलेला घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे. घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी घ्यावी आणि तुळस सुकली तर लगेच काढून टाकावी व त्या जागी नवीन तुळस लावावी.
घराबाहेर जाताना नेहमी काय करावे
घरातील फरशीचा रंग काळा असू नये, घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच निघावे, देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावं. बाहेरून घरी परत आल्यावर पुन्हा देवाचे दर्शन घ्यावे. Read more: या गोष्टी कोणाकडूनही फुकट घेऊ नये, घरातील शांती आणि संपत्ती संपेल
स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी
स्वयंपाक करताना स्वयंपाक करण्याचे दक्षिणेला तोंड नसावे. घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप, अगरबत्ती ,दिवा लावावा. रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावं. असे केल्याने आपले मन शांत राहते शिवाय कामात मनही लागतं. घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये.
घरातील नकारात्मकता कशी घालवावी
याबरोबरच घरातील लादी पुसताना गोमूत्र, हळद याचाही वापर केला जाऊ शकतो. टॉयलेट आणि बाथरूम मध्ये एक वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलत राहावं. यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते. घरावर कोणतीही आर्थिक संकट आले असतील तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात दोन लवंगा टाकून दिवा लावावा. यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होतात.
झोपतांना कोणती काळजी घ्यावी
पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोकं करून झोपू नये. स्वयंपाक घरात किंवा स्वयंपाक घरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात असू नये. स्वयंपाक घरात आरसा लावणं अशुभ मानल्या जातात. याबरोबरच फरशी किंवा भिंतीला रंग पूर्ण पांढरा असू नये, यामध्ये थोडा तरी रंग मिसळावा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा आणि हि माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्की शेयर करा.