आजच्या या आर्टिकल मेध्ये आम्ही आपल्यासाठी Well Done Baby Movie Review घेऊन आलो आहोत. हि फिल्म आपल्याला Amazon Prime या OTT platform वर पाहायला मिळेल. हि एक नवी कोरी फिल्म आहे ज्याची स्टोरी इतर फिल्म पेक्षा जराशी वेगळी आहे. या फिल्मच्या लीड स्टार कास्ट मध्ये आपल्याला पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर पाहायला मिळतात आणि हे दोघेही मराठी फिल्म इंडस्ट्रीतले प्रसिध्द कलाकार आहे. जात तुम्हाला लॉकडाऊन मध्ये एक चांगली फिल्म बघायची असेल तर हि आपल्यासाठी एक परफेक्ट फिल्म आहे जिचा तुम्ही आनंद घेऊ शकता. Well Done Baby चे डायरेक्शन प्रियांका तंवर ने केले आहे. प्रियांका यांची हि पहिली मराठी फिल्म आहे.
या फिल्मची कथा एका जोडप्याच्या लवस्टोरी वर आधारित आहे या फिल्मला आपण पूर्ण परिवार सोबत बघू शकता. ह्या फिल्म मधील जोडपे हे एनआरआय जोडपे (NRI couple) आहेत आणि यांच्या वैवाहिक जीवनात खूप साऱ्या अडचणी येत आहे तसेच यांच्या जीवनातील तणाव वाढत चालला आहे. या दोघानाही सतत होणाऱ्या भांडणांचा आता कंटाळा आला आहे त्यामुळे त्यांना आता एकमेका पासून वेगेळे व्हायचे आहे. परंतु यांच्या जीवनात अचानक एक वळण येते ज्मुयाळे या फिल्मच्या स्टोरीमध्ये नवीन वळण येते अशी या फिल्मची प्रमुख कथा आहे.
Well Done Baby Movie Performance | वेलडन बेबी फिल्म सादरीकरण
या फिल्म मध्ये पुष्कर जोग एका मनोरोग चिकित्सक (Psychiatrists) या भूमिकेत दिसणारआहे आणि अमृता खानविलकरने एका PHD student ची भूमिका केली आहे. या दोघांच्या भूमिका खूप व्यवस्तीत आहे तसेच या दोघांची अक्टिंग देखील खूप सुन्दर आहे. फिल्मच्या डायरेक्टर आणि स्टोरी रायटरने कथेला खूपच हलके-फुलके आणि मनोरंजक बनविले आहे. बऱ्याचश्या सीनमध्ये खूप चांगले Punch देखील आहेत. विशेष म्हणजे या फिल्मचा टोटल कालावधी फक्त 100 मिनिट्स एव्हडाच आहे ज्यामुळे हि फिल्म बघणाऱ्या कुणालाही कंटाळा बिलकुल येणार नाही. आजकाल बऱ्याच OTT platform वर क्राईम आणि अशा फिल्म रिलीज होत आहेत ज्या आपण आपल्या परिवार सोबत नाही बघू शकत. तर अशा परिस्थितीत हि फिल्म म्हणजे खरच एक खूप चांगला बदल आहे ज्याचे आपण मना पासून स्वागत केले पाहिजे. कारण Well Done Baby Movie हि तुम्ही आपल्या परिवार सोबत बघू शकतात. हो काही सीन यात देखील अपवाद आहेत पण ते एव्हडे पण विचित्र अशे नाही.
Well Done Baby Movie Storyline | वेलडन बेबी फिल्म स्टोरी
Well Done Baby Movie ची कथा अगदी साधी आणि सोपी आहे. एक पती पत्नी आपल्या वैवाहिक जीवनात असलेले ताणताणाव दूर करून लग्न टिकविण्याचा पर्यंत करीत आहेत. परंतु दरवेळी या दोघांचा अहंकार (Ego) मध्ये येतो आणि सुरळीत चाललेल्या त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. फिल्मच्या सुरुवातीलाच दाखविण्यात आले आहे कि हे जोडपे एकमेका पासून वेगळे होणार आहे आणि घटस्फोट घेणार आहे. परंतु यांच्या जीवनात नवी आशेची किरण निर्माण होते जेव्हा मीरा (अमृता खानविलकर) गर्भवती होते. त्यामुळे या दोघानाही आपल्या जवाबदारी आणि प्रेमाची जाणीव होऊ लागते. तेव्हा हे दोघेही आपल्या तुटत असलेल्या नात्याला पुन्हा वाचविण्याचा पर्यंत करतात. इथूनच यांच्या जीवनाचा एक नवीन प्रवास सुरु होतो.
Positive points of Well Done Baby Movie
या फिल्म मध्ये आपल्याला या दोन्ही कलाकारांची उत्तम कामगिरी पाहायला मिळते. नेहमी प्रमाणेच अमृता खानविलकर एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिने ह्या फिल्मच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे प्रेक्षकांना सिद्ध करून दाखविले आहे. पुष्कर जोगने साकारलेली भूमिका अत्यंत उत्कृष्ट पणे निभावली आहे या भुमिकेसाठी पुष्कर हा एक परफेक्ट कलाकार आहे. एक NRI Psychiatrists जो पूर्ण जगाला कौन्सिलिंग करतो तो स्वतः आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल गोंधळलेला आहे अशी भूमिका पुष्कर ने उत्कृष्ट पद्धतीने साकारलेली आहे. या मराठी फिल्ममध्ये आपल्याला उत्तम आणि चांगले लोकेशन पाहायला मिळतात. या फिल्म मधील बरेच सीन हे लंडन मध्ये शूट करण्यात आलेले आहेत.
Negative points of Well Done Baby Movie
जसे मी आपल्यला सांगितले कि ह्या फिल्मचे बरेच सीन हे विदेशात म्हणजेच लंडन मध्ये शूट केले आहेत परंतु हेच सीन बर्याच वेळ बिना कारण दाखविण्यात आले आहेत. जे कदाचित या फिल्म मध्ये बिनाकारण आणि जरा जास्तच दाखविले आहे. प्रियांका तंवरची हि पहिली मराठी फिल्म आहे आणि त्यांचा हा अनुभव या फिल्म मध्ये दिसून येतो. या फिल्म मध्ये बरेच ड्रामा सीन अशे आहेत जे बिना कारण जास्त लांब खेचले आहेत ह्या सीनला थोडेसे कट करून आणखी शोर्ट आणि स्वीट करता आले असते.
Well Done Baby Movie बघिलती पाहिजे किव्वा नाही?
जर आपल्याला एक मराठी आणि सुंदर पारिवारिक फिल्म बघायची असेल विशेष म्हणजे ज्याची स्टोरी व्यवस्थित आहे, तर तुम्ही हि फिल्म नक्कीच बघितली पाहिजे. कारण यात तुम्हाला उत्कृष्ट अभिनया सोबत एक उत्तम स्टोरी देखील पाहायला मिळेल. एकंदरीत या फिल्मची स्टोरी, background music, स्क्रीन-प्लेय सर्वांचा एकंदरीत विचार केला तर जगात भारी ह्या फिल्मसाठी 5 पैकी 3 हि रेटिंग देत आहे. आपल्याला आजच्या पोस्ट मधील Well Done Baby Movie Review आवडला का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.