What is Cryptocurrency in Marathi | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय

Share this

What is Cryptocurrency in Marathi: 2017 मध्ये माझा मित्र धीरज क्रिप्टोकरन्सी विषयी माझ्या सोबत चर्चा करायचा, क्रिप्टोकरन्सी विषयी नेहमी वाचन करायचा. त्यानंतर त्याने यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात केली व तो क्रिप्टोकरन्सी मध्ये ट्रेडिंग देखील करू लागला. तो याविषयी मला नेहमी सांगायचा परंतु मला यात विशेष आवड नव्हती. त्यामुळे मी फार काही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मला याविषयी अर्धवट माहिती होती. कारण त्यावेळेस क्रिप्टोकरन्सी विषयी खूप कमी लोक बोलायचे आणि हा विषय सर्वांमध्ये कॉमन देखील नव्हता.

परंतु मित्रांनो जेव्हा एखादी गोष्ट ही कॉमन होऊ लागते तेव्हा सर्वांच्याच मनात त्या गोष्टीविषयी उत्सुकता निर्माण होऊ लागते. तसेच सध्या क्रिप्टोकरन्सी प्रसिध्द देखील झाली आहे. कारण हल्लीचे सर्विस लोक क्रिप्टोकरन्सी विषयी बोलू लागले आहे. त्यामुळे मी देखील याचा अभ्यास करणे सुरुवात केली आणि क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइं, ब्लॉकचेन हे सर्व काय प्रकरण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी बरेच वाचन देखील केले, अनेक प्रसिद्ध लोकांचे ब्लॉग वाचले, या विषयावर आधारित असलेले युट्युब वर व्हिडिओ देखील पाहिले.

हल्ली सर्वांच्याच मनात क्रिप्टोकरन्सी नेमकी काय आहे? हे कशाप्रकारे कार्य करते आणि याविषयीचे बरेच प्रश्न पडलेले असतात. तर आजच्या या लेखामध्ये मी आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये क्रिप्टोकरन्सी काय आहे याविषयी सांगणार आहे. आणि हे समजावण्यासाठी मी अगदी सोपी पद्धत वापरणार आहे की माझा हा ब्लॉग जर एखादा लहान मुलाने जरी वाचला तरी त्याला समजेल की नेमकी क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे कार्य करते.

तर या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत क्रिप्टोकरन्सी काय आहे, ब्लॉकचैन काय असते, याच्या रेट्स मध्ये चढ-उतार का होत असतात, मायनर काय असते आणि मायनिंग काय असते, पीअर टू पीअर नेटवर्क म्हणजे काय, भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीला मान्यता आहे का, क्रिप्टोकरन्सीची ट्रेडिंग कशी केली जाते, तुमच्या अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आम्ही या लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचा हा आजचा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? What is Cryptocurrency?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एका गोष्टीचा आधार घेऊन. मनोज आणि प्रमोद हे दोघे मित्र आहेत. मनोजने प्रमोद कडून 10 रुपयाचे काम करून घेतले आणि त्याला 10 रुपये देण्याऐवजी एक कॅडबरी दिली. आता इथे मनोज आणि प्रमोदने असे ठरविले की या व्यवहारातील सर्व गोष्टी सोप्या आणि स्पष्ट असल्या पाहिजेत तसेच प्रत्येक व्यवहाराचा व्यवस्थित हिशोब देखील असला पाहिजे.

कारण पुढे जाऊन आपल्यात मैत्री असेल नसेल. त्यामुळे आपण हा हिशोब डिजिटल पद्धतीने करू या. आता यासाठी त्यांनी एक डिजिटल कॅडबरी निर्माण केली. परंतु त्यांच्या पुढे एक प्रश्न असा होता की आपण ही कॅडबरी डिजिटल बनवू शकतो. पण एक प्रॉब्लेम असा आहे की कॅडबरीची कॉपी डिजिटल असल्यामुळे कोणीही या कॅडबरीला सहज कॉपी करू शकते. ज्यामुळे डिजिटल कॅडबरीला कॉपी करून एका कॅडबरीचे हजारो कॉपी बनविले जाऊ शकतात. कुणालाही कधीही याच्या कॉपी सहज ई-मेल द्वारे आणि इंटरनेटद्वारे पाठविले जाऊ शकतात.

या समस्येचे समाधानासाठी त्यांनी असे ठरविले की जेव्हा मनोज डिजिटल कॅडबरी प्रमोदला देईल तर त्यांच्या या व्यवहाराची कम्प्यूटर मध्ये नोंद होणे गरजेचे आहे. अशाप्रकारे जेव्हा जेव्हा या डिजिटल कॅडबरी कोणालाही देण्यात येईल तर त्याची कम्प्युटरमध्ये लगेच नोंद केली जाईल आणि या प्रणालीला लेझर असे म्हटले जाते.

आता प्रश्न असा आहे की या लेझर मध्ये देखील एका व्यवहाराच्या ठिकाणी अनेक व्यवहाराची देखील परस्पर नोंद केली जाऊ शकते. त्यामुळेच इथे एका नवीन अर्थक्रांतीचा वापर केला गेला. त्यामुळेच असा पर्याय काढला गेला की हे लेझर सर्व कम्प्युटरमध्ये स्टोअर असेल आणि सर्व कम्प्युटर मिळून या लेझरचा हिशोब देखील ठेवतील. ज्यामुळे हे समजणे सोपे होईल की किती डिजिटल कॅडबरी वाटल्या गेल्या आहेत आणि किती डिजिटल कॅडबरी सध्या शिल्लक आहे. म्हणजेच हे समजणे सोपे होईल की मनोज कडे सध्या किती डिजिटल कॅडबरी आहे आणि त्याने प्रमोदला किती डिजिटल कॅडबरी दिलेल्या आहेत.

आता जर या केल्या गेलेल्या या हिशोबामध्ये एखाद्या कम्प्युटरने गडबड करण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित सर्व कम्प्युटरमध्ये देखील हा डेटा स्टोअर असल्यामुळे इतर सर्व कम्प्युटरमधून हा हिशोब मिसमॅच होणार आणि कुठली व्यक्ती हा सर्व घोटाळा करत आहे हे देखील समजणे सोपे होईल.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय संपूर्ण माहिती | What is cryptocurrency is Complete information

तसंच मनोज आणि प्रमोदच्या उदाहरण घेऊन आपण सर्व कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करून. यात आपण सर्वात अगोदर हे बघू की क्रिप्टोकरन्सी काय आहे. तर मनोज आणि प्रमोद या दोन मित्रांनी एका व्यवहारासाठी जे काही डिजिटल कॅडबरीची देवाण-घेवाण केले त्यालाच क्रिप्टोकरन्सी असे नाव देण्यात आलेले आहे.

क्रिप्टो म्हणजेच सीक्रेट आणि करन्सी म्हणजे वस्तू आणि सेवा विकत घेण्याचे माध्यम. मी आतापर्यंत अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचे नाव देखील ऐकले असेल. जसे बिटकॉइं, ट्रिपल, इथिरियम, रिपल, dogecoin. तसेच यासाठी वापरल्या जाणाऱ्या पब्लिक लेझरला असंख्य कम्प्यूटर मिळून मेंटेन करत असतात आणि असंख्य लोक मिळून यावर काम करत असतात. यालाच पीअर टू पीअर नेटवर्क (Peer to Peer Network) असे म्हटले जाते. ज्याला अनेक लोक मिळून आणि असंख्य कंप्यूटर मिळून हे लेझर मेंटेन करीत असतात आणि कोणी एक व्यक्ती यावर कंट्रोल नाही करू शकत.

बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान | The technology behind bitcoin and cryptocurrency

आता हे लेझर मेण्टेन करण्यासाठी एका विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो यालाच ब्लॉकचेन असे म्हटले जाते. ब्लॉकचेन हा शब्द दोन वेगळ्या शब्दात पासून बनलेला आहे. म्हणजेच ब्लॉकची चेन ज्याप्रमाणे एखाद्या रेल्वेचे इंजिनच्या मागे अनेक डबे जोडलेले असतात. एक डबा भरलेला असेल तर त्याच्या पुढील डब्यांमध्ये माल भरला जातो, एकामागे एक डबे हे जोडले जातात आणि त्यामध्ये माल भरला जातो.

अशाच प्रकारे ब्लॉकचेन देखील कार्य करत असते. एका ब्लॉक मध्ये ज्यावेळेस ट्रांजेक्शन भरले जातात तर त्याच्या पुढील ब्लॉक मध्ये पुढील ट्रांजेक्शनची नोंद केली जाते, दुसरे ब्लॉक ट्रांजेक्शन ने भरेल तर त्यापुढील ब्लॉक मध्ये ट्रांजेक्शन भरले जातील. तसेच प्रत्येक नवीन ब्लॉक मध्ये सुरू केलेले ट्रांजेक्शन हे त्याच्या मागील ब्लॉकच्या ट्रांजेक्शन सोबत जोडलेले असते. म्हणजेच काय तर हे सर्वच ट्रांजेक्शन एकमेकांमध्ये जोडले गेलेले असतात आणि प्रत्येक एक ब्लॉक हा चेनच्या स्वरूपात एकमेकांशी जोडले गेलेले असतात.

आता ह्या ब्लॉकचेन फक्त कुठल्याही एका विशिष्ट कम्प्युटरमध्ये नाही तर असंख्य कम्प्युटरमध्ये एकमेकांशी पारदर्शकपणे जोडले गेलेले असतात. त्यामुळे यामध्ये जरी कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची ही चोरी सहज पकडली जाऊ शकते.

म्हणजेच काय तर मनोज आणि प्रमोद या दोघांकडे क्रिप्टोकरन्सी आहे आणि मनोजने त्याच्याकडे असलेल्या दोन बिटकॉइन पैकी एक बिटकॉइन जर प्रमोद दिला तर लगेचच हे सर्व कम्प्युटर त्यांचे काम करण्यास सुरुवात करतात आणि मनोजचे सर्व मागील सर्व ट्रांजेक्शन चेक करून बघतात की खरोखर मनोज कडे दोन बिटकॉइं आहेत का आणि असल्यास त्याने त्यातील एक बिटकॉइन जर प्रमोदला दिला तर त्याच्याकडे 1 बिटकॉइं शिल्लक राहिला हवा.

त्याचप्रमाणे जर हा एक बिटकॉइन प्रमोदला मिळाला तर या अगोदर प्रमोद कडे किती बिटकॉइंस होते आणि त्यामध्ये हा एक बिटकॉइन जोडला तर प्रमोद कडे किती बिटकॉइंस शिल्लक असायला हवे. हे सर्व शोधून काढण्याचे काम आणि याचे लेझर मेंटेन करण्याचे काम या ब्लॉकचेन द्वारे केले जाते. तसेच हे सर्व ट्रान्सलेशन काही क्षणांमध्ये केले जातात आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अजिबात चूक देखील होत नाही.

मायनर काय आहे? What are Minor and Mining?

जे लोक या पब्लिक लेझरला मेंटेन करतात, पब्लिक लेझरची जबाबदारी सांभाळतात त्यांना मायनर्स असे म्हटले जाते. यांच्या कार्यप्रणालीला म्हणजेच लेझर मेंटेन करणे, ट्रांजेक्शन चेक करणे यालाच मायनिंग असे म्हटले जाते. हे काम कुणीही व्यक्ती बसून करीत नाही यासाठी हाय-टेक सिस्टिमचा वापर केला जातो. हे सर्व काम ऑटोमॅटिक केले जाते.

परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी स्पेशल कम्प्युटरची गरज पडते आणि सॉफ्टवेअरची देखील मदत घ्यावी लागते. या सर्व कार्यप्रणालीसाठी जो काही वेळ आणि पैसा खर्च केला जातो त्याच्या बदल्यात मायनर्सला या करन्सी मधील काही भाग रिवॉर्ड पॉइंट म्हणून दिले जातात.

थोडक्यात तुमच्या हे लक्षात आले असेल की क्रिप्टोकरन्सी ही एक प्रायव्हेट डिजिटल करन्सी आहे. त्यामध्ये जे काही व्यवहार केले जातात ते एका पब्लिक लेझर मध्ये मेंटेन केले जातात. ज्यासाठी असंख्य कम्प्युटर मिळून ब्लॉकचेन मेंटेन करीत असतात. मायनर्स हे सर्व रेकॉर्ड मायनिंग द्वारे मेंटेन करीत असतात. परंतु तुमच्या मनात आता असा प्रश्न निर्माण होईल की माझ्याकडे किती पैसे आहेत हे जर प्रत्येक सिस्टीममध्ये नोंदविले जात असेल तर यामध्ये कुठलीही प्रायव्हसी शिल्लक राहत नाही. कुणालाही हे सहज समजले जाऊ शकते की कोणाकडे किती क्रिप्टोकरन्सी आहेत.

क्रिप्टोग्राफी म्हणजेच काय? What is Cryptography?

परंतु या इथे अजून एक टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे यालाच क्रिप्टोग्राफी असे म्हटले जाते. क्रिप्टोग्राफी म्हणजेच सर्व काही कोडींगच्या स्वरूपात असणे. क्रिप्टोग्राफी मुळेच खरेतर क्रिप्टोकरन्सीमध्ये हल्ली बरेच लोक गुंतवणूक करू लागले आहेत. कारण बरेच लोकांना या गोष्टीची अडचण वाटत होती की जर पैसे आमचे आहे. तर ते इतरांना का म्हणून समजले पाहिजे की आमच्याकडे किती पैसे आहेत.

त्यामुळे त्यांचे असे म्हणणे होते की या सर्व गोष्टींचा कंट्रोल एखाद्या बँकेच्या किंवा एखाद्या एजन्सीच्या हातात का असावा? कारण सरकार जेव्हा पाहिजे तेव्हा महागाई वाढविते आणि कमी देखील करते. रुपयाची किंमत कधी कमी होते तर कधी डॉलरची किंमत वाढली जाते. तसेच गोष्टींचे बरेच लोकांना अडचणी वाटत होत्या आणि त्यांनी असे ठरवले की अशी एखादी करन्सी निर्माण केली पाहिजे.

त्यावर कुठल्याही केंद्राचे नियम नसेल. जर ही करन्सी सर्वांची आहे तर कुणा एकाच्या ऐवजी सर्वांचा यावर कंट्रोल असणे गरजेचे आहे. माझ्याकडे किती पैसे आहे हे कुठल्याही बँकेला नाही समजले पाहिजे किंवा कुठल्याही क्रेडिट एजन्सीला नाही कळले पाहिजे.

जाणून घ्या Cryptocurrency म्हणजे काय? | What is Cryptocurrency?

तर इथे खरा मुद्दा हा आहे की या वर कुठल्याही एका शाखेचा कंट्रोल नाही आणि यावरती सर्वजण मिळून कंट्रोल करत आहेत. तर या करन्सीची किंमत कशी ठरवली जाते. आपल्याला सारखे असे का ऐकू येते की बिटकॉइनचा रेट हा वाढलेला आहे किंवा बिटकॉइनचा रेट कमी झालेला आहे. हे सर्व कोणाकडून ठरविले जाते.

तर याचे उत्तर असे आहे की प्रत्येक क्रिप्टोकरन्सी मध्ये हे मुळातच ठरविलेले असते की किती कॉइंसचे उत्पादन केले गेले पाहिजे. तसेच जेव्हा एखादी गोष्ट ही फिक्स असते आणि लिमिटेड असते तेव्हा हे देखील बघितले जाते की त्या गोष्टीची मार्केटमध्ये किती डिमांड म्हणजेच मागणी आहे . अजून सोप्या भाषेत सांगायचे तर असे समजा की एक एकर जमीन आहे आणि ती जमीन विकायची आहे.

ही जमीन विकत घेण्यासाठी जर बरेच ग्राहक उपलब्ध असेल तर त्या जमिनीचे भाव देखील वाढलेले असेल परंतु ही जमीन खरेदी करण्यासाठी ग्राहक कमी असेल तर निश्चितच त्या जमिनीचा भाव देखील कमी असेल. अशाच प्रकारे क्रिप्टोकरन्सी मध्ये देखील ज्या वेळेस एखाद्या करन्सीची डिमांड मार्केटमध्ये वाढलेली असते, तर करन्सीची पोपुलारिटी झालेली असते.त्यावेळेस त्याचे रेट्स वाढलेले असतात.

आणि ही क्रिप्टोकरन्सी विकत घेणारे ज्यावेळेस कमी असतात त्यावेळेस त्याचा रेट देखील कमी झालेला असतो. क्रिप्टोकरन्सीची किंमत यावर ती पण अवलंबून असते की बातम्या काय आहेत, कंपनी कशी आहे, गुंतवणूकदार किती गुंतवणूक करीत आहे

क्रिप्टोकरन्सी वापरण्याचे फायदे काय? | Benefits of using cryptocurrency?

क्रिप्टोकरन्सी हि विकेंद्रित आहे यावर कुठल्याही देशाचे, कुठल्याही सरकारचे नियंत्रण नाही. कुठलीही एक व्यक्ती यावर ती नियंत्रण ठेवत नसून अनेक सिस्टीम्स एकत्र येऊन क्रिप्टोकरन्सी वर नियंत्रण ठेवत असतात. त्यामुळे शासनाच्या कुठलेही नियमाखाली न राहता हवे त्या प्रमाणे ट्रांजेक्शन करता येतात.

क्रिप्टोकरन्सी लिमिटेड आहेत जसे बिटकॉइनची संख्या आहे 21 मिलियन आणि यापुढे याचा नंबर नाही वाटत.

बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असल्यामुळे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

क्रिप्टोकरन्सी वापरण्याचे तोटे काय? | Disadvantages of cryptocurrency consumers?

क्रिप्टोकरन्सी वापरत असताना जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल तर यामध्ये कुठलीही एखादी एजन्सी किंवा गव्हर्मेंट नसल्यामुळे मदतीसाठी तुम्ही नेमके कोणाकडे जाणार.

तसेच ही एक सिक्रेट करन्सी असल्यामुळे बरेच लोक या करन्सीचा अनैतिक कामासाठी देखील वापर करतात.

तसेच मायनिंग करण्याची जी प्रोसेस आहे ही इको फ्रेंडली नाही आणि यासाठी खूप जास्त पावरचा वापर केला जातो. या प्रोसेस साठी खूप जास्त इलेक्ट्रिसिटीचा आणि इतर रिसोर्सेसचा वापर केला जातो.

भारतात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का? Is Cryptocurrency Legal In India?

आता सर्वात महत्वाचा प्रश्न की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी कायदेशीरपणे वापरता येते का? तर याचे उत्तर असेल हो तुम्ही भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी कायदेशीरपणे वापरू शकतात. क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणे लीगल आहे. परंतु क्रिप्टोकरन्सी अजूनही legal tender of money म्हणजेच पैशाची कायदेशीर निविदा नाही. थोडक्यात काय तर क्रिप्टोकरन्सीला तुम्ही पैशाऐवजी वापरू शकत नाही.

जसे काही देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीला लीगल टेंडर मानले गेलेले आहे. म्हणजेच क्रिप्टोकरन्सी मार्फत तुम्ही दुकानांमध्ये किंवा कुठेही जाऊन खरेदी-विक्री करू शकतात. त्यामुळे जर भारतामध्ये तुम्हाला रुपयाच्या ऐवजी बिटकॉइन देणे किंवा घेणे सध्या तरी शक्य होणार नाही.

तसेच भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्वेस्ट करणे, ट्रेडिंग करणे हे लीगल आहे. 2018 मध्ये आरबीआयने सर्व बँकांना स्पष्ट सांगितले होते की क्रिप्टोकरन्सीच्या कुठल्याही व्यवहारात सहभाग घ्यायचा नाही. परंतु 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक खूप मोठा निर्णय घेतला आणि आरबीआयला सर्व बँकांवरील लावलेले प्रतिबंध हटविण्यास सांगितले. त्यानंतर भारतातील खूप लोकांनी क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्वेस्टमेंट करण्यास सुरुवात केलेली आहे.

तर मित्रांनो आम्ही अशी आशा करतो की आपल्याला क्रिप्टोकरन्सी विषयी पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल. तुमच्या हे लक्षात आले असेल की क्रिप्टोकरन्सी नेमकी काय आहे? ब्लॉकचेन म्हणजे काय? पीअर टू पीअर नेटवर्क काय असते? मायनर आणि मायनिंग म्हणजे काय? भारतामध्ये बिटकॉइनचा कायदेशीरपणे वापर करता येतो का?

परंतु मित्रांनो क्रिप्टोकरन्सी कडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला एक स्वतंत्र असा दृष्टीकोण आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल रिव्होल्यूशन आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की हा एक तात्पुरता पर्याय आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की क्रिप्टोकरन्सी हे एक स्मार्ट सोल्युशन आहे.

याप्रकारे ज्याची त्याची आपापली मतं आहेत. तर आपण देखील आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा की क्रिप्टोकरन्सी विषयी आपले काय मत आहे?. आमचा What is Cryptocurrency हा क्रिप्टोकरन्सी विषयीचा आर्टिकल तुम्हाला आवडला असेल तर शेयर नक्की करा म्हणजे इतरांना देखील समजून घेता येईल की क्रिप्टोकरन्सी नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे कार्य करते.

READ MORE POSTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top