Podcast म्हणजे काय?| What is Podcast in Marathi

Share this

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि Podcast म्हणजे काय? डिजिटल युगात नवीन तंत्रज्ञान जसेजसे येत आहेत तसेच त्या प्रमाणे जगण्याची पद्धत हि बदलत चालली आहे. पूर्वी लोक नवीन ज्ञान मिळविण्यासाठी कादंबरी, मॅगझीन, वर्तमान पत्र वाचायची त्यांची जागा आता वेबसाईट आणि YouTube व्हिडिओने घेतली. कुठलीही नाविन माहिती पाहिजे तर आपण पटकन Google वर जाऊन सर्च करतो. आता याचे एक नवे रूप म्हणजे Podcast आहे ज्याची सुरुवात भारतात साधारण 2006 मध्ये सुरु झाली. ज्याच्यातून तुम्हाला हव्या त्या विषयावर तुम्ही Podcast वापरू शकता. ते नेमके कसे हे आपण सविस्तर समजून घेऊ. What is Podcast in Marathi

PODCAST म्हणजे काय? | What is Podcast in marathi

PODCAST म्हणजे ऑनलाइन ऑडीओ ब्रॉडकास्ट सेवा आहे. ज्या प्रमाणे आपण रेडीओ ऐकतो त्याच प्रमाणे इंटरनेरच्या माध्यमातून आपल्याला स्मार्टफोनचा वापर करून PODCAST ऐकता येते. PODCAST हा शब्द iPod आणि Broadcast या दोन शब्दांना मिळवून बनवला आहे. PODCASTआपण ऑडीओच्या माध्यमातून कार, बस, ऑफिस मध्ये जाताना, जिम करताना कुठेही ऐकू शकतो. ह्या साठी आपल्याकडे इंटरनेट सेवा असणे गरजेचे आहे. फक्त भारतातच 500 मिलियन पेक्षा जास्त USER इंटरनेटचा वापर करतात. यातील साधारण 40 मिलियन USER PODCAST ऐकणे पसंत करतात.

PODCAST चे फायदे काय आहे? | Benifits of PODCAST in Marathi

  • PODCAST वापरणे हे खूप सोपे असते याला आपण केव्हाही आणि कुठेही वापरू शकतो.
  • PODCAST ऐकताना तुम्ही इतर कामे देखील करू शकतात.
  • PODCAST तुम्हाला हव्या त्या विषयावर उपलब्ध असतात.
  • PODCAST द्वारे तुम्ही पैसे देखील कमवू शकतात.
  • PODCAST सेवा तुम्हाला हव्या त्या भाषेत उपलब्ध होते.

हल्ली PODCAST सर्विसला जास्त मागणी आहे निरनिराळ्या विषयावर PODCAST बनविले जातात. तुम्ही देखील अगदी सहज तुमचे स्वतःचे PODCAST बनवू शकतात आणि त्यामार्फत पैसे देखील कमवू शकतात. जग DIGITAL होत चालले आहे आणि त्याचा तुम्ही देखील फायदा घेऊ शकतात कारण एका सर्वेक्षानानुसार भारतात 2018 मध्ये साधारण PODCAST ऐकणाऱ्यांची संख्या जवळ जवळ 60% वाढली होती.

PODCAST मध्ये काय करतात?

PODCAST मध्ये लोक साधारण पणे सोलो SOLO PODCAST करतात किव्वा एखाद्या व्यक्तीची मुलाखात घेतात. काही PODCAST असे असतात ज्यात दोन मित्र एखाद्या अशा विषयावर बोलत असतात ज्याबद्दल ते दोघेही खूप महत्वकांक्षी असतात. एखादी कथा (Story Taling) साठी खूपच उपयुक्त असे माध्यम आहे. अगोदर बरेच लोक कथा वाचण्यासाठी वाचनालयातून वेगवेगळी पुस्तके आणायची परंतु आता हि सोय PODCAST वर उपलब्द्ग झाली आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या कथा, कादंबरी आणि बरेच काही ऐकता येतात. PODCAST ची लांबी (Lenght) साधारण 1 मिनिट पासून 3 तासांपर्यंत असू शकते. जेव्हा तुम्ही एखाद्याची मुलाखात घेतात तेव्हा साधारण PODCAST अर्ध्या तासापासून पावून तासंपार्यान होऊन जातो. तसेच SOLO PODCAST मध्ये तुमच्या विषयावर अवलंबून असते कि तुम्ही किती खोलवर त्या विषयावर बोलू इच्छिता. जर तुम्हाला एखाद्या विषयावर सखोल बोलायचे असेल तर तुम्ही जास्त कालावधीचा PODCAST बनवू शकतात.

PODCAST ची frequency काय असावी?

जर आपण PODCAST ची सुरुवात करीत असला तर तुम्ही सुरुवातीला हफ्त्यातून एकदा सुरुवात करायची आहे जर आपल्याला शक्य असेल तर तुम्ही किमान रोज एक PODCAST बनवू शकतात. PODCAST बनविण्यासाठी तुम्हाला काय चांगले येते किव्वा असा कुठला विषय आहे ज्यात तुम्हाला खूप चांगले ज्ञान आहे त्याविषयावर आधारित तुम्ही वेगवेगळे PODCAST बनवू शकतात. ज्याला आपण PODCAST EPISODS असे म्हणतो. ह्या PODCAST EPISODS च्या सहायाने तुम्ही एका विषयावर वेगवेगळे मुद्दे सादर करू शकतात. जसे FITNESS, FASHION, MOVIES, STORY, MOTIVATION या प्रमाणे तुम्ही कुठल्याही विषयावर (NICH) वर तुम्ही PODCAST बनवू शकतात.

PODCAST आणि PODCAST EPISODS यातील फरक

PODCAST EPISODS याचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा झाला तर ज्या प्रमाणे आपण टेलीविजन वर एखादी आवडती मालिका पाहतो तर त्या मालिकेचे आपल्याला रोज वेगवेगळे भाग पाहायला मिळतात. ज्याला आपण EPISODS म्हणतो तसेच एखाद्या विषयावर जेव्हा आपण वेगवेगळ्या भागात PODCAST बनवितो त्यालाच PODCAST एपिसोड्स असे म्हटले जाते.

PODCAST कसे बनवावे?

PODCAST बनविण्यासाठी तुम्ही mobile मध्ये आपला आवाज रेकॉर्ड करू शकतात किव्वा आपल्याकडे PC किव्व्वा LAPTOP असेल तर त्यात देखील तुम्ही आपला आवाज रेकॉर्ड करू शकता. लक्षात ठेवा PODCAST साठी आवाज रेकॉर्ड करताना आपल्या आजूबाजूचा आवाज नका येऊ देऊ जेने करून PODCAST ऐकणाऱ्याला विचित्र नको वाटायला थोडक्यात आपल्याला प्रोफेशनल PODCAST बनवायचा आहे. जर आपल्या कडे स्वतःची वेबसाईट असेल तर तुम्हाला फक्त एक Plugin download करायची आहे जिचे नाव आहे SERIOSULY SIMPLE PODCASTING PLUGIN. याच्या सहायाने तुम्ही आपल्या वेबसाईट वर PODCAST अपलोड करू शकतात.

जर तुमची स्वताची वेबसाईट नसेल तर खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला login करायचे आहे आणि येथे आपल्याला PODCAST अपलोड करता येतील. यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देखील मिळतात जसे EFFECT आणि background music. याचा तुम्ही आपला PODCAST आणखी चांगले बनविण्यासाठी सहज आणि मोफत उपयोग करू शकतात.

anchor.fm

PODCAST द्वारे पैसे कसे कमवावे?

PODCAST च्या सहायाने जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला anchor या वेबसाईट वर जाऊन login करायचे आहे आपले PODCAST यात अपलोड करायचे आहे. लक्षात ठेवा जेव्हडे जास्त लोक तुमचे PODCAST ऐकतील तितके जास्त तुम्ही यात पैसे कमवू शकतात. या platform वर तुम्हाला 1000 लीस्त्णर (Listner) च्या बदल्यात 15 डॉलर्स मिळतात. आपला PODCAST जितका जास्त उत्तम असेल तेव्हडा आपला PODCAST वायरल होतो आणि आपल्याला जास्त पैसे कमविता येतात. या व्यतिरिक्त आणखी वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही PODCAST अपलोड करू शकतात.

PODCAST चे किती प्रकार असतात.

PODCAST बनविण्यासाठी त्यात किती जणांनी सहभाग घेतला आहे म्हणजेच त्या PODCAST मध्ये किती लोकांचा आवाज आहे यावरून देखील PODCAST चे प्रकार ठरविले जातात.

Solo Podcast / सोलो पॉडकास्ट

Solo Podcast या प्रकारात एक व्यक्ती असते जी आपला आवज रेकॉर्ड करून एकटीच बोलतात आणि आपल्या मनातील सर्व काही शेयर करतात. Solo Podcast चा उपयोग जास्त करून आपला अनुभव सांगण्यासाठी, प्रेरणेसाठी, जीवन जगण्याची कला अशा निरनिराळ्या विषयावर माहिती शेयर करीत असतात. बऱ्याच वेळेला लोक जेव्हा निराश होतात तेव्हा सोलो पॉडकास्ट ऐकणे जास्त पसंद करतात.

Interview Podcast | इंटरव्हिव पॉडकास्ट

Podcast मध्ये जास्त करून Interview Podcast जास्त प्रचलित प्रकार आहे ज्यात दोन व्यक्ती एकमेकांशी सव्वाद सादतात. एक व्यक्ती हि प्रश्न विचारत असते आणि समोरील व्यक्ती हि त्याच्या विचारलेल्या प्रश्नंची उत्तरे देत असते. या प्रकारात आपल्याला बऱ्याच प्रसिध्द लोकांचे Interview ऐकायला मिळतात.

Conversation Podcast/ संभाषणपर पॉडकास्ट

Conversation Podcast मध्ये दोन लोक एकमेकान सोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करीत असतात. अशा संभाषणात बऱ्याच वेळेला ते एकमेका सोबत सहमत असतात किव्वा एकमेकांच्या विरुद्ध बोलत असतात. जसे आपण दोन वेगवेगळ्या पक्षांचे संभाषण ऐकतो त्याच प्रमाणे येथेही संभाषणपर पॉडकास्ट आपल्याला ऐकायला मिळतात.

मित्रानो जर आता आपल्याला समजले असेल कि (What is Podcast in Marathi) PODCAST म्हणजे काय ? PODCAST चे किती प्रकार असतात आणि PODCAST द्वारे पैसे कसे कमवावे? तर आमचा हा लेख शेयर करायला विसरू नका आणि आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

इतर पोस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top