रश्मिका मंदानाला लाखोंची लूट, तिच्या विश्वासू साथीदाराने केली लूट. रश्मिकाने करिअर सुरू केल्यापासून ही व्यक्ती रश्मिकाच्या सोबत होती आणि जसजसा रश्मिकाने या व्यक्तीवर विश्वास ठेवायला सुरुवात केली, तसतशी या व्यक्तीने रश्मिकाला लुटण्यास सुरुवात केली आणि ही व्यक्ती दुसरी कोणी नसून रश्मिका मंदानाची मॅनेजर आहे.
जो मॅनेजर रश्मिका मंदाना सोबत वर्षानुवर्षे काम करीत होता, तोच मॅनेजर रश्मिकाच्या समोर तिची फसवणूक करत असल्याचं उघड झालं. इतकी वर्षे रश्मिकाची फसवणूक करून या मॅनेजरने 80 लाख रुपये लुटले. यामुळे रश्मिका मंदाना यांना मोठा धक्का बसला आहे. कारण तिने तिच्या मॅनेजरवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता.
सत्य समजल्यावर नाही वाटले आश्चर्य
मात्र, रश्मिका मंदाना यांनी तिच्या मॅनेजरची सत्यता समजल्यानंतरही तिच्या मॅनेजरवर कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. किंवा असे म्हणता येईल की केवळ कारवाईसाठी रश्मिकानी त्या मॅनेजरला हटवून आता नवीन मॅनेजर नेमला आहे.
रश्मिका मंदाना ही दक्षिणेतील टॉपची अभिनेत्री आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. गेल्या वर्षी रश्मिकाने सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट पुष्पा चित्रपटातही काम केले आहे. एवढेच नाही तर तिने अमिताभ बच्चन सारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे आणि ती लवकरच पुष्पा 2 मध्ये दिसणार आहे. रणवीर करुपसोबत रश्मिका मंदाना Animal या फिल्मचा देखील एक भाग आहे.
रश्मिका मंदाना नेहमी कामात व्यस्त असल्याचा घेतला फायदा
रश्मिका मंदाना ही एक टॉपची अभिनेत्री आहे आणि तिची कमाई बऱ्यापैकी आहे. त्यामुळेच रश्मिकाच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा त्याच्या मॅनेजरने वेळोवेळी घेतला आणि पैशांची उधळपट्टी केली. रिपोर्टनुसार, याविषयीची चर्चा वाढावी आणि मीडियापर्यंतही पोहोचावी, असे रश्मिकाला वाटत नाही. यामुळेच रश्मिकाने तिच्या मॅनेजरवर कोणतीही अधिकृत कारवाई केलेली नाही आणि पोलिसांत तक्रारही केलेली नाही.