Correct wall clock vastu direction in Marathi | घरातील घड्याळ कोणत्या दिशेला लावावे 2023|

Share this

Correct wall clock Vastu direction in Marathi

Correct wall clock Vastu direction in Marathi: मनगटी घड्याळापासून ते डिजिटल घड्याळापर्यंत आपण अनेक प्रकारची घड्याळ दररोज पाहतो आणि वापरतो सुद्धा. माणसाच्या आवडीनिवडीनुसार पसंतीनुसार घड्याळाची खरेदी केली जाते. वास्तविक पाहता आपल्आया सर्पवांनाच असे लक्लषात येईल की आपल्या सर्वांचे आयुष्य घडाळ्याच्या काट्यावरच बांधलेला आहे, अशी आजच्या काळातील परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र आपल्या घरातील भिंतीवर लावले जाणाऱ्या घड्याळाविषयी वास्तुशास्त्रात काही अत्यंत महत्वाच्या आणि उपयोगी टिप्स सांगण्यात आले आहेत. याबद्दल आजच्या या लेखातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

घड्याळ कोणत्या दिशेला असू नये

कारण आपले जीवनाची वेळ सांगणारे घड्याळ एका विशिष्ट दिशेला लावल्यास मोठ नुकसान ही होऊ शकतं. याच नुकसानापासून बचाव करण्यासाठी चला वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला असू नये आणि त्यामुळे होणारे नुकसान काय याविषयी जाणून घेऊया.

नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते

वास्तु तज्ञ सांगतात की घरातील घड्याळांना महत्त्वाचं स्थान असतं. आपल्या घराची सजावट करताना नेहमी घड्याळाच्या स्थानाकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची सुद्धा आवश्यकता असते. घड्याळ लावताना नेहमी दक्षिण दिशा टाळावी म्हणजेच कधीही दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये असं सांगितले जातात. कारण दक्षिण दिशेला घरातील घड्याळ लावल्यास नकळत आपले लक्ष सतत दक्षिणेकडे जाऊ लागते. त्यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते.

Correct wall clock vastu direction in Marathi

म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये असा सल्ला दिला जातो आणि यामुळे सौभाग्य धन आणि वैभव सुद्धा येणं थांबत असे सांगण्यात येतात. वास्तविकता केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळाची निर्मिती करण्यात आली. अगदी सगळ्या गोष्टी घड्याळाच्या वेळेप्रमाणे करण्याची सवय ही आजच्याकाळात सर्वांनाच लागली आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. मात्र आपल्या जीवनात काही समस्या असतील तर त्यामागे वेळ हा ही एक घटक कारणीभूत असू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतात.

घड्याळाची योग्य दिशा कोणती असावी

वास्तुशास्त्रानुसार वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ असाही आहे. वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करूनच आपण आपली वेळही सुधारू शकतो बर का. वास्तुशास्त्रानुसार जर घड्याळ योग्य दिशेने सेट केलं नाही तर त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागू शकतो असेही वास्तुशास्त्र सांगतात. अशा परिस्थितीत आपल्या घरामध्ये असलेले घड्याळ हे नेहमीच योग्य दिशेला लावणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की दक्षिण दिशेला आपल्या घरातील घड्याळ लावल्यास वारंवार आपल्याला नुकसान सोसावं लागू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही घरात घड्याळ ठेवता किंवा ते लावता तेव्हा नेहमी पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेकडे ठेवावं. यापैकी एकच दिशा निवडावी कारण या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करतात. याशिवाय सुख-समृद्धी, वृद्धी होते असेही सांगितले जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये असेही सांगितले जाते.

घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये

याबाबत बोलताना वास्तु तज्ञ सांगतात की घरातील घड्याळ किमान एक ते दोन मिनिटं पुढे ठेवलं पाहिजे. तंतोतंत वेळेप्रमाणे आपल्या घरातील घड्याळ ठेवल्यास आपल्या जीवनात बाधा निर्माण होण्याच्या शक्यता निर्माण होतात असे सांगण्यात आले आहे. तसेच परिश्रमा इतके फळ मिळत नाही. कार्यक्षेत्रात अडचणी येतात, समस्यांना सामोरे जावं लागू शकतात, नातेसंबंध बिघडले जाऊ शकतात.

याचबरोबर अनेक रंगाची, प्रकारांची, आकारांची, शैलीची पद्धतीची घड्याळे आपण पाहतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार पेंडुलम असलेले घड्याळ अधिक शुभ मानले जाते. बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये. Read more: मुलांना चांगल्या सवयी व संस्कार कशे करावे

बंद पडलेले घड्याळामुळे होणारे परिणाम

घड्याळातील सेल्स संपले असतील तर लगेच बदलावेत किंवा घड्याळामध्ये तांत्रिककृती शक्य तितक्या लगेच दुरुस्त करून घ्याव्यात. बंद पडलेल्या घड्याळामुळे आपल्या घरात येणाऱ्या धनाचा प्रवाह रोखला जातो असं सांगितलं जातं. याशिवाय घड्याळ खरेदी करताना कधीही निळ्या रंगाचं, काळ्या रंगाचं किंवा नारंगी रंगाचे घड्याळ कधीही खरेदी करू नये. यातूनच बाहेर पडणारी ऊर्जा नकारात्मक ठरू शकते. शिवाय त्याचप्रमाणे पलंगावर घड्याळ ठेवणे यामुळे डोकेदुखी सुद्धा वाढू शकते असेही सांगितले जातात.

तर अशा प्रकारे आपल्या घरात घड्याळ ठेवण्याच्या दिशा सुद्धा ठरलेल्या आहेत. वास्तु वास्तुशास्त्रानुसार त्याचा अवलंब केल्यास आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळतो असा सांगण्यात येतात. तुमच्या घरात कोणत्या दिशेला घड्याळ लावले आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला अथवा नुकसान झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी आमचा WhasApp ग्रुप जॉईन करा आणि आजचा आमचा घड्याळा विषयीचा लेख “Correct wall clock Vastu direction in Marathi” आवडला असेल तर इतरांसोबत शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top