How to Create a Business Email in Marathi आजकाल प्रत्येक जन आपल्या बिजनेस ईमेलच्या मदतीने एकमेकांना ईमेल पाठवितात. तसेच बिजनेस ईमेल वापरण्याचे फायदे देखील आहे. बिजनेस ईमेलमुळे आपण किती प्रोफेशनल आहोत हे देखील कळते आणि आपल्या ब्रँडचे नाव इतर लोकांना समजते. तुम्हाला देखील जर तुमच्या ब्रँडच्या नावाने बिजनेस ईमेल बनवायचा असेल तर आपण अगदी मोफत आपल्या वेबसाईटच्या सहायाने आपले बिजनेस ईमेल बनवू शकतो. तर जाणून घ्या आपण बिजनेस ईमेल कसा तयार करावा.
बिजनेस ईमेल बनविणे शक्य आहे का?
हो बिजनेस ईमेल बनविणे शक्य आहे फक्त यासाठी आपल्याकडे domain name असणे गरजेचे आहे. ज्याच्या सहायाने आपण abc@gmail.com अशा email address च्या ऐवजी contact@YourSite.com
जे साधारण ईमेल आयडी पेक्षा खूप जास्त प्रोफेशनल वाटते. याचाच अर्थ असा आहे कि तुम्ही ……@yoursite.com किव्वा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणे स्वतःचे बिजनेस ईमेल आयडी सहज तयार करू शकतो. सर्वात महत्वाचे आपल्या कडे एक domain असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला domain घ्यायचा असेल तर या link वर क्लिक करा. domain घेतल्यावर आम्ही या आर्टिकल मध्ये ज्या स्टेप्स सांगणार आहोत त्या सर्व तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत.
बिजनेस ईमेल कसे बनवायचे | How to Create a Business Email
आपल्या पसंतीचा बिजनेस ईमेल बनविण्यासाठी आपण 3 स्टेप्स वापरणार आहोत.
- Step 1 सर्वात अगोदर आपल्याला improvmx या वेबसाईट वर अकाऊन्ट बनवायचे आहे. Improvmx ही अशी वेबसाइट आहे जी आपल्या बिजनेस ईमेलवर येणार्या सर्व ईमेल इनबॉक्समध्ये forward करू देते जिथे आपण सर्व ईमेल वाचू शकता. या वेबसाईट वर Your domain name या ऑप्शनमध्ये आपल्या domain चे नाव टाइप करायचे आहे. त्यानंतर Your email address या ऑप्शनमध्ये आपला Gmail आयडी टाइप करून Create या बटनवर क्लिक करायची आहे. अशा प्रकारे आपले यात अकाऊन्ट तयार होईल. आता आपले अकाऊन्ट तयार झाल्यावर आपल्याला Add those MX entries मध्ये आपले MX रेकॉर्ड दिसेल.
- Step 2 आपले MX रेकॉर्ड्स आपल्याला DNS पेज मध्ये add करायचे आहे. आपण ज्या कंपनीचे domain घेतले आहे ती वेबसाईटवर नवीन पेज मध्ये open करायची आहे. Sign in वर क्लिक करून Log in करायचे आहे. My Products या ऑप्शन मध्ये आपल्या domain name समोर आपल्याला DNS हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून Record मध्ये Add वर क्लिक करून Type मध्ये MX सेलेक्ट करायचे आहे. Host या ऑप्शन मध्ये @ टाइप करायचे आहे आणि Points to मध्ये आपल्याला improvmx या वेबसाईट कडून मिळालेला पहिला MX रेकॉर्ड copy past करायचे आहे. Priority मध्ये 10 टाइप करून Save करायचे आहे. अशा पद्धतीने दुसरा MX रेकॉर्ड सुद्धा दिल्या प्रमाणे टाइप करून Save करायचे आहे. आता improvmx या वेबसाईट वर Continue वर क्लिक करून Check again वर क्लिक करायची आहे. आता आपली Email forwarding active होईल.
- Step 3 आता आपल्याला Email forwarding तयार करायची आहे म्हणजे आपले इमेल आपल्या Gmail inbox मध्ये येतील . यासाठी improvmx या वेबसाईट वर ADD या ऑप्शन मध्ये आपले बिजनेस email टाइप करून forward मध्ये ज्या Gmail id वर पाठवायचे ती mail id टाइप करायची आहे. उदा. जर आपलयाला info@abcd.com असे पाहिजे असेल तर आपल्या domain name च्या अगोदर असे info टाइप करून domain name नंतर Gmail id टाइप करा आणि ADD बटनवर क्लिक करा. आता आपली email forwarding तयार झाली आहे. आता आपण आपल्या बिजनेस इमेलने पाठवलेले email receive करू शकतो.
बिजनेस ईमेलने email कशे पाठवायचे?
आपल्या बिजनेस email द्वारे emails पाठविण्यासाठी आपण Gmail ची फ्री SMTP सर्विस वापरणार आहोत. ज्याच्या सहायाने आपण दर महिन्याला 3000 emails फ्री मध्ये पाठवू शकतो. आपल्या बिजनेस email द्वारे emails पाठीविण्यासाठी आपण 2 स्टेप्स फॉलो करणार आहोत.
- Step 1 सर्वात अगोर आपल्याला आपल्या Gmail अकाऊन्टची सेटिंग बदलावी लागेल त्यासाठी आपल्या Gmail अकाऊन्ट मध्ये आपल्या प्रोफाईल वर क्लिक करून Google Account वर क्लिक करा. Search ऑप्शन मध्ये ‘less secure apps access‘ टाइप करून सर्च करायचे आहे. हे ऑप्शन आल्यावर आपल्याला हे बटन Enable करायचे आहे. आता आपण Google अकाऊन्टची सेटिंग बदलली आहे.
- Step 2 आता आपल्याला आपले बिजनेस इमेल आपल्या Gmail मध्ये add करायचे आहे. म्हणजे आपण Gmail वापरून आपल्या बिजनेस ईमेलने कोणालाही इमेल पाठवू शकतो. यासाठी आपल्या Gmail inbox वर क्लिक करून सेटिंग icon वर क्लिक करा आणि Settings वर क्लिक करून Account and Import हे ऑप्शन निवडायचे आहे. यात Send email as या ऑप्शन मध्ये Add another email address वर क्लिक करा. एक नवीन विंडोव ओपन होईल यात Add मध्ये ते नाव लिहा जे तुम्हाला कोणाकडून इमेल पाठविला आहे ते टाइप करायचे आहे आणि Email address मध्ये आपण बनविलेले बिजनेस इमेल टाइप करायचे आहे. Next Step वर क्लिक करून Gmail चे Username आणि password type करायचे आहे. SMTP Server मध्ये आपल्याला smtp.gmail.com असे टाइप करून Add account वर क्लिक करा. आता आपल्या बिजनेस email च्या inbox मध्ये एक confirmation कोड येईल तो copy करून यात past करायचा आहे आणि Verify करायचे आहे. आता आपण आपल्या बिजनेस इमेल द्वारे इमेल्स पाठवू शकतो.
Compose वर क्लिक करून From ऑप्शन मधून आपले बिजनेस इमेल सेलेक्ट करायचे आहे ज्याला इमेल पाठवायचे त्याचा इमेल address to मध्ये टाइप करून आपला Subject आणि इमेल टाइप करून आपण आपल्या बिजनेस इमेल द्वारे इमेल पाठवू शकतात. याचाच अर्थ आता आपण यशस्वीरीत्या आपला बिजनेस इमेल तयार केला आणि त्या द्वारे आपण इमेल receive करू शकतो आणि send देखील करू शकतो. जर आपल्याला How to Create a Business Email in Marathi लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
इतर पोस्ट
Post Views: 1,563