eBook काय आहे आणि फायदे काय आहे | What is eBook in Marathi

Share this

मित्रांनो आपण आजच्या या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत What is eBook in Marathi बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल कि “eBook काय आहे आणि त्याचे काय फायदे असतात.” तर सर्वात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ कि eBook या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे. तर e या अक्षराचा अर्थ इलेक्ट्रोनिक असा होतो आणि बुक म्हणजे तुम्हाला हे माहितीच असेल कि याला आपण मराठीत पुस्तक असे म्हणतो. म्हणजेच eBook हे असे इलेक्ट्रोनिक पुस्तक आहे ज्याला निर्माण करण्यासाठी आपल्याला कागदाचा वापरकरावा लागत नाही. ह्या पुस्तकाला आपण स्पर्श देखील करू शकत नाही.

What is an eBook in Marathi | eBook काय आहे?

इंटरनेटवर आपल्याला अशा अनेक वेबसाईट पाहायला मिळतील जशी अमेझॉन या कंपनीची Kindle, किव्वा eBay ज्यांच्या मार्फत आपण text फॉर्म मध्ये लिहून अपलोड करू शकतो आणि त्या वेबसाईट वर पब्लिश करू शकतो. तर या eBook चा फायदा हा आहे कि याला आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. तसेच आपल्याला eBooks वर अनेक वेळा discount देखील मिळत असतात. तसेच जर तुम्ही अमेझॉन सारख्या मोठ्या वेबसाईट वर तुमची eBook publish केली तर तुम्हाला सोप्या पद्धतीने कमी खर्चात आपण लोकां पर्यंत पोहचवू शकतो. थोडक्यात सांगायचे तर एखाद्या वाचनालयात जाऊन पुस्तके आणण्या पेक्षा आपल्याला वेबसाईट वर eBook घेणे जास्त सोयीस्कर होते.

दुसरा फायदा म्हणजे eBook तुम्ही वाटेल तेव्हा कुठेही वाचू शकतात. कारण समजा आपल्याला जर एखादे पुस्तक प्रवासात वाचायचे असेल तर ते पुस्तक आपल्या सोबत असणे गरजेचे आहे परंतु आता जग हे आधुनिक होत चालले आहे बऱ्याच गोष्टी हे डिजिटल होत चालल्या आहेत तेव्हा आपण देखील पेपर लेस गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. तसेच आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हा असतोच आणि त्यात इंटरनेट हे सुरु असते. तर तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये eBook वाचू शकतात.

eBook वाचताना जर तुम्हाला एखादा paragraph आवडला असेल तर त्या लाईनला तुम्ही सहज पणे मार्क करू शकतात किव्वा हवे असेल तर कॉपी करू शकतात. अशा अनेक गोष्टींचे तुम्हाला फायदे मिळू शकतात. थोडक्यात काय तर तुम्ही तुमची पूर्ण library म्हणजेच वाचनालय तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन फिरू शकतात.

How to make eBook | eBook कशी बनवायची?

जर तुम्हाला काही लिहिण्याची आवड असेल तर आपण स्वतःची eBook बनवून या मार्फत पैसे देखील कमवू शकतात. यासाठी तुम्ही तुमचा mobile, laptop, pc यांचा वापर करू शकतात आणि 1000 प्रती देखील विकू शकतात. आजच्या आधुनिक युगात लोकांना कोणतीही माहिती हवी असेल तर लोक इंटरनेट वापरतात. त्यामुळे लोकांची eBook आणि eLearning मध्ये जास्त आवड निर्माण होत आहे. तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता आणि स्वताची eBook बनवून विकू शकतात. तर eBook बनविण्यासाठी आपण 4 स्टेप्स वापरणार आहोत.

  • Step 1 सर्वात अगोदर आपण दिलेल्या link वर click करून अकाऊंट बनवू crello.com या पेज मध्ये आपल्याला signup बटणावर क्लिक करून आपली email id आणि password टाईप करायचे आहे आणि signup बटणावर क्लिक करायची आहे म्हणजे आपले अकाऊंट पूर्णपणे तयार होईल.
  • Step 2 सर्वात अगोदर आपल्याला आपल्या eBook साठी एक सुंदर अशी डिजाईन निवडायची आहे. यासाठी आपल्याला search या ऑप्शन वर क्लिक करून eBook टाईप करायचे आहे. आपल्याला आवडलेली डिजाईन सेलेक्ट करा.
  • Step 3 आपण सेलेक्ट केलेल्या डिजाईन मध्ये आपल्याला आपले content add करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला TEXT सेलेक्ट करायचे आहे आणि तेथे आपले TEXT add करायचे आहे. तसेच यात तुम्हाला image बदलता येतील, background color बदलता येईल, font style बदलता येईल थोडक्यात तुम्हाला हवे तशे या मध्ये तुम्ही बदल अगदी सहज करू शकतात. यामध्ये आपल्याला पाहिजे तर scratch पासून देखील स्वतःचा page डिजाईन करू शकतात, हवे तेव्हडे pages बनवू शकतात, डुप्लिकेट pages बनवू शकतात. pages डिलीट करू शकतात.
  • Step 4 तुम्हाला हवे आसलेले सर्व बदल करून झाल्यावर आपल्या eBook चे नाव टाईप करायचे आहे आणि download करण्यासाठी शेजारी दिलेल्या download बटणावर क्लिक करायची आहे. आता आपल्या समोर वेगवेगळे format येतील आपल्याला हवा तो format आपण सेलेक्ट करून आपण बनविलेली eBook download करू शकता. या वेबसाईट मध्ये आपण दर महिन्याला 5 eBooks download करू शकता.

eBook कशी sale करायची? How to sell eBooks online?

आपण तयार केलेली eBook जर आपल्याला विकायची असेल आणि त्यामार्फत पैसे कमवायचे असेल यासाठी आपण Amazon Kindle या वेबसाईटचा वापर करणार आहोत. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे यात आपण आपल्या eBook ची जी काही रक्कम ठरविणार आहेत त्यातील 30% रक्कम हि Amazon घेते आणि बाकी 70% रक्कम हि तुम्हाला मिळते. आपण तयार केलेली eBook अपलोड करण्यासाठी आपण 4 स्टेप्स वापरणार आहोत.

  • Step 1 Amazon या वेबसाईटवर यायचे आहे आणि पेजच्या खालच्या बाजूला तुम्हाला Kindle Direct हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. आता आपण Amazon Kindle पेज वर याल. यात तुम्हाला तुमच्या Amazon account ने Sign Up करायचे आहे.
  • Step 2 Create a new title या ऑप्शन मध्ये + Kindle eBook यावर क्लिक करायचे आहे. आता आपल्याला यात Language, Book title, Subtitle, Author Name, Description, Keywords आणि Categories अशा विचारलेल्या सर्व माहिती यात टाईप करून save करायचे आहे.
  • Step 3 Kindle eBook Content यात आपल्याला बनवलेली eBook अपलोड करायची आहे. eBook अपलोड झाल्यावर त्या eBook चे अगोदर Amazon Kindle टीम कडून review करण्यात येईल review साठी साधारण पणे 24 तास लागतात.
  • Step 4 तुम्ही अपलोड केलेल्या eBook चे Approval मिळाल्यावर Kindle eBook Pricing यात क्लिक करून आपल्या eBook ची काय किंमत आहे ते टाईप करून Publish Your eBook या बटणावर क्लिक करून आपण आपली eBook publish करायचे आहे .

तर हि होती माहिती कि eBook काय आहे? What is eBook in Marathi, eBook कशी बनवायची? आणि त्याचे काय फायदे आहेत? eBook कशी sale करायची ? जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

इतर पोस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top