How to Stop Phone Addiction: Stanford University द्वारे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. इथे त्यांना असे विचारण्यात आले की जर ते घराबाहेर असेल आणि त्यांचा मोबाईल आणि वॉलेट यापैकी कुठली गोष्ट ते घरातच विसरून गेले तर त्यांना कुठलाही फरक पडणार नाही. तर विध्यार्थ्यांचे एकदम शॉकिंग असे उत्तर त्यांना मिळाले.
कारण जवळजवळ 75% विद्यार्थ्यांनी असे सांगितले की त्यांचा मोबाईल आणि वॉलेट या दोघांपैकी जर ते घरातच त्यांचा वॉलेट विसरले तरीही त्यांना कुठलाही फरक पडणार नाही. परंतु याउलट जर ते त्यांचा मोबाईल घरात विसरले तर हे त्यांना मुळीच आवडणार नाही आणि ते यामुळे अस्वस्थ देखील होतील.
प्रत्येक मोबाईलचा युजर दिवसभरात साधारणपणे 110 वेळेस आपला मोबाईल चेक करीत असतो आणि साधारणपणे एक तरुण व्यक्ती दिवसभरात किमान 4.7 तास मोबाईलवर व्यतीत करतो. त्यामुळे हेच प्रमुख कारण आहे की बऱ्याच लोकांचे त्यांच्या कामात आणि शिक्षणात लक्ष लागत नाही आणि त्यांच्याकडून चुका होण्याचे प्रमाण देखील वाढू लागली आहे. फक्त एवढेच नाही तर आपल्या मेंदू करण्याची कार्यक्षमता देखील कमी होऊ लागली आहे.
How to Stop Phone Addiction: ही फक्त ऍव्हरेज विद्यार्थ्यांची मोजलेली स्थिती आहे. तसेच साधारण 18 ते 29 वयोगटातील 93% लोकं मोबाईल फोन त्यांना कंटाळा नको यायला याकरिता वापरीत असतात . त्यामुळे आजच्या तरूण पिढीमध्ये नैराश्य, दुखी होणे, सतत चिंता करणे ही लक्षणे वाढू लागली आहे.
आणि याचे प्रमुख कारण आहे तरुण पिढी मध्ये वाढत असलेले त्यांच्या मोबाईल वापरण्याचे प्रमाण त्यासोबतच सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असणे. यामुळेच आपल्या Circadian rhythm (सर्कॅडियन रिदम) यावर देखील दुष्परिणाम होत असतो.
कारण की 2010 नंतर प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोनचा वापर करू लागला आहे. तेव्हापासूनच गुगल या वेबसाईटवर डिप्रेशन या विषयावर सर्च करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तर मित्रांनो जर तुम्ही देखील निराश, दुःखी आणि सतत चिंता करत असाल. तर याचे प्रमुख कारण तुमचे सतत मोबाईल फोन वापरणे आणि सोशल मीडियावर ॲक्टिव राहणे देखील असू शकते.
परंतु इथे आम्ही तुम्हाला असे नाही बोलत की तुम्हाला Phone Addiction झाले आहे. कारण आपल्याला खरे तर फोन वापरायची सवय लागत नाही तर आपल्या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या काही गेम्स आणि ॲप्स वापरण्याची आपल्याला सवय लागते.
How to Stop Phone Addiction in Marathi
आपल्या मोबाईल मधील ॲप्स आणि गेम्स आपल्याला वापरण्याची सवय लागते. त्यामुळे आपण सतत आपल्या मोबाईलचा लोक उघडतो आणि त्या ॲप्स किंवा गेम्सला वापरण्यास सुरुवात करतो. तर मित्रांनो जर बघायला गेले तर हा प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलचा नसून तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या गेम्स आणि ॲप्स आहे . या गेम्स आणि ॲप्सचा वापर करणे तुम्हाला बंद करणे गरजेचे आहे.
कारण मोबाइल फोनची जर आपण दुसरी बाजू बघितली तर मोबाईल फोन हा एक खूप चांगला अविष्कार आहे आणि त्यामुळे माणसाचे जीवन जगण्याची पद्धत देखील खूप सोपी झाली आहे. त्यामुळे आपली बरीचशी कामं ही पटकन केली जातात आणि एकदम सोयीस्कर रित्या आपली अडलेली कामे देखील आपण मोबाईल मार्फत पूर्ण करू शकतो.
उदाहरणार्थ आपल्या मोबाईल मध्ये असलेले मॅपच्या साह्याने आपण कुठलाही मार्ग सहज आणि सोप्या पद्धतीने शोधू शकतो, यूटीआय पेमेंट ॲप मार्फत आपण सहज पैशांची देवाण-घेवाण करु शकतो, झूम ॲपच्या मदतीने आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील ऑनलाईन मीटिंग अटेंड करू शकतो तसेच विद्यार्थ्यांची शिक्षण देखील ऑनलाइन सुरू आहे. अशी बरीचशी ॲप्स प्लेस्टोअर उपलब्ध आहे आणि त्याच्या मदतीने आपण आपले जीवन अधिक सोयीस्कर पणे जगू शकतो.
तर आपल्याला फोन वापरणे बंद करण्याची मुळीच गरज नाही आपल्याला इथे आपले फोन वापरण्याचे प्रमाण कमी करायचे आहे. कारण आजच्या काळामध्ये पूर्णपणे मोबाईल फोनचा वापर करणे हे देखील एक योग्य पर्याय नाही ठरणार. कारण मोबाईल फोन ही काळाची गरज बनली आहे.
मोबाईलचा वापर कमी कसा करावा? | How to Stop Phone Addiction in Marathi
मोबाईलचा वापर कमी कसा करावा असा जर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. तर त्याचे उत्तर आम्ही आपल्याला सांगणार आहोत. याकरिता आम्ही आपल्याला काही स्टेप-बाय-स्टेप उपाय सांगणार आहे. त्याचा तुम्हाला नियमितपणे वापर करायचा आहे. त्याच्या सहाय्याने तुम्हाला मोबाईल वापर कमी कसा करावा याचे उत्तर मिळेल.
Change your phone unlock feature: जसजसे मोबाइल टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत गेले आहे त्याच प्रमाणे मोबाईल कंपन्यांनी देखील मोबाईलचे अनलॉक करण्याचे फिचरमध्ये बदल केला आहे आणि अतिशय फास्ट पद्धतीने मोबाईल अनलॉक कसा केला जाईल यामध्ये देखील सुधारणा केली आहे.
आजच्या काळात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन कडे बघून देखील आपला मोबाईल फोन अनलॉक करू शकतो. सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून फेसलॉक आणि फिंगर प्रिंट लॉक हे दोन्ही ऑप्शन बंद करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक मोठा टाईप करावा लागणारा (password) पासवर्ड सेट करायचा आहे. उदाहरणार्थ #DONOTUSEPHONENOW.
पासवर्ड असा सेट करायचा आहे की त्यामध्ये काही सिम्बॉल्स, अक्षरे आणि नंबर असले पाहिजे. हा पासवर्ड थोडा अवघड असल्यामुळे विनाकारण तुम्ही फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तुमचा फोन तेव्हाच अनलॉक कराल जेव्हा खरंच तो मोबाईल वापरणे गरजेचे असेल.
How to Break Phone Addiction
Turn off Notifications and Colours: फेसबुकने सुरवातीच्या काळामध्ये नोटिफिकेशनचा रंग निळा ठेवला होता. परंतु युजर्स नोटिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करीतच नव्हते किंवा खूप कमी प्रमाणात त्यावर क्लिक केले जायचे. त्यानंतर कालांतराने फेसबुकने नोटिफिकेशनचा रंग लाल केला. कारण पिवळा आणि लाल हे दोन कलर असे आहेत जी आपले लक्ष केंद्रित करून घेतात. Read more: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र PDF आणि संपूर्ण माहिती
त्यानंतर इतर सोशल मीडियाने देखील नोटिफिकेशनचा लाल रंग करून घेतला. त्यामुळे कुठल्याही नोटिफिकेशन कडे आपले लगेच लक्ष जाते आणि आपण ते ॲप ओपन करून बघत असतो. How to Stop Phone Addiction in Marathi | मोबाईलचा वापर कमी कसा करावा
याच गोष्टीचा फायदा घेऊन सर्व सोशल मीडिया कंपनी प्रचंड प्रमाणात पैसे देखील कमवीत असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन वापरण्याचे प्रमाण कमी करायची असेल.
तर तुमच्या फोन मधील सेटिंग मध्ये जाऊन फेसबूक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम अशा प्रकारचे ऍप्सची नोटिफिकेशन तुम्हाला बंद करायचे आहे. तसेच तुम्ही फोनचा ग्रे स्केल मोड ऑन करू शकतात. त्यामुळे तुमच्या स्क्रीनवर असलेले डार्क कलर तुमच्या डोळ्यांवर परिणाम करणार नाही. तसेच जेव्हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचे काम असेल तेव्हा तुम्ही ग्रे स्केल मोडला बदलून कलर स्क्रीन ऑन करू शकता. (How to Stop Phone Addiction in Marathi)
मोबाईलचा वापर कमी कसा करावा | How to Stop Phone Addiction Step by Step
Put Your Phone on Airplane Mode: तुम्ही कदाचित विद्यार्थी असाल किंवा ऑफिसमध्ये काम करीत असाल. परंतु तुम्ही जेव्हा तुमचा अभ्यास किंवा ऑफिसचे काम करीत असाल. तेव्हा असा प्रयत्न करा की तेवढा वेळ तुमचा मोबाईल हा एरोप्लेन मोड वर असायला हवा. असे केल्याने तुमच्या मोबाईल वर कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन येणार नाही, कुठलेही कॉल्स देखील तुमच्या मोबाईलवर येणार नाही.
याचा परिणाम असा होईल की तुम्ही करीत असलेला अभ्यास किंवा तुमच्या ऑफिसचे काम तुम्ही अगदी मन लावून करू शकाल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा करीत असलेल्या कामात अडथळा देखील येणार नाही. असे केल्याने तुमची एकाग्रता देखील वाढू लागेल आणि तुमच्या अभ्यासात किंवा कामात आलेल्या अडथळ्यामुळे तुमची होणारी चिडचिड देखील कमी होऊ लागेल.
परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की कामाच्या दरम्यान तुमच्या ऑफिसचा महत्त्वाचा फोन येऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही तुमचा फोन एरोप्लेन मोड वर न ठेवता फक्त तुमच्या मोबाईलचे नेट किंवा वाय-फाय ऑप्शन बंद करून ठेवा.
त्यामुळे तुमच्या मोबाईलवर विनाकारनचे कुठलीही नोटिफिकेशन्स येणार नाही आणि तुम्ही महत्त्वाचा येणारा फोन देखील रिसीव्ह करू शकतात. परंतु जर तुम्हाला खूप वेळ कुठल्याही अडथळ्याशिवाय तुमचे काम करायचे असेल तर एरोप्लेन मोड नक्की ऑन करा. How to Stop Phone Addiction in Marathi | मोबाईलचा वापर कमी कसा करावा
How to Stop Social Media Addiction
Fix a Time for Social Media and Phone: तुम्हाला जर सोशल मीडियावर वेळ व्यतीत करणे आवडत असेल तर तुम्ही आत्ता देखील सोशल मीडियासाठी तुमचा वेळ देऊ शकता. परंतु सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा एक ठराविक वेळ निश्चित करायचा आहे. तसेच या ठरलेल्या वेळातच तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करायचा आहे.
याकरिता तुम्हाला सर्वात आगोदर एक वेळ सुनिश्चित करावा लागेल की दिवसभरातील चोवीस तासांपैकी मी साधारण एक तास सोशल मीडिया वापरण्यासाठी वापरेल. परंतु तुम्हाला या देखील गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की तुम्ही ठरविलेला एक तास हा रात्री झोपण्याच्या वेळीचा देखील नसायला हवा आणि सकाळी उठल्यावरचा देखील नसायला हवा.
यानंतर तुम्ही ठरवलेल्या वेळेमध्ये आरामशीर बसून सोशल मिडीयाचा वापर करू शकतात आणि या ॲप्सचा आनंद देखील घेऊ शकतात. परंतु तुमचा हा ठरवलेला एक तास पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा मोबाईल ठेवून द्यायचा आहे. तसेच कुठलीही चीटिंग न करता ठरलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिटे देखील जास्त तुमचा फोन वापरायचा नाही याकरिता तुम्ही असा वॉलपेपर देखील वापर करू शकतात ज्यामुळे तुम्हाला सतत हे आठवत राहील की तुम्हाला फोन ठेवून द्यायचा आहे. उदाहरणार्थ “Put The Phone Down”.
मोबाईल जास्त वापरण्याचे परिणाम
Replace it with Something Else: आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की आपण जर जास्त वेळ मोबईल वापरायचं नाही. तर या उरलेल्या वेळेमध्ये काय केले पाहिजे. मित्रांनो या उरलेल्या वेळेचा तुम्ही योग्य आणि चांगल्या प्रकारे वापर करू शकतात. तुम्हाला सर्वात आगोदर हे शोधून काढायचे आहे अशी कुठली स्किल आहे का जी तुम्हाला शिकायची आहे, तुमची एखादी हॉबी जी तुम्हाला रिकाम्या वेळेत करताना आनंद वाटेल.
या वेळेत तुम्ही एखादे चांगले पुस्तक वाचू शकतात, एखाद्या नवीन गोष्टीचे शिक्षण घेऊ शकता, मेडिटेशन करणे, सायकलिंग करणे, जॉगिंग करणे, अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या तुम्ही या उरलेल्या वेळात करू शकता आणि तुमच्या जीवनात एक वेगळा बदल घडवून आणू शकता.
तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये उत्कृष्ट बोलायचं असेल आणि ती गोष्ट शिकावीशी वाटत असेल तर नक्कीच या उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. How to Stop Phone Addiction in Marathi | मोबाईलचा वापर कमी कसा करावा.
जर तुम्ही अशा गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलं तर तुमच्या मनाचा आनंद देखील वाढेल आणि या गोष्टी करीत असताना तुमच्या मोबाईल फोन कडे तुमचे लक्ष देखील जाणार नाही आणि याचा फायदा असा होईल की तुमच्याकडून काहीतरी प्रॉडक्टिव काम होऊ शकते ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा देखील होईल.
Addiction to Social Media
मित्रांनो जर तुम्हाला मोबाईल फोन वापरण्याचे प्रमाण कमी करायचे असेल (How to Stop Phone Addiction in Marathi) तर आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगितलेल्या 5 स्टेप्स तुमच्या जीवनात नक्की वापर करून बघा.
यामध्ये सर्वात पहिली स्टेप आम्ही आपल्याला सांगितली होती Change your phone unlock feature: यात असे सांगितले आहे की सर्वात अगोदर आपल्या फोनचा फेसलॉक आणि फिंगर प्रिंट लॉक ही ऑप्शन बंद करायचे आहे आणि अवघड असा टाईप करणारा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे.
ज्यामुळे विना कारण तुम्ही तुमच्या मोबाईलचा लॉक ओपन करणार नाही. स्टेप 2 मध्ये आपण बघितले Turn off Notifications and Colours: यात असे सांगितले आहे की तुम्हाला तुमच्या मोबाईलचे सर्व नोटिफिकेशन्स बंद करायचे आहे. त्यामुळे तुमचे त्या नोटिफिकेशन्स कडे लक्ष जाणार नाही आणि तुम्ही सतत तुमचा मोबाईल हातात घेणार नाही.
तिसरी स्टेप आपण बघितली Put Your Phone on Airplane Mode: यात असे सांगितले आहे की जितका जास्त वेळ शक्य असेल तितका जास्त वेळ आपल्या मोबाईलचे एरोप्लेन मोड ऑप्शन ऑन करून ठेवायचे आहे. त्यामुळे आपण करीत असलेल्या कामात आपल्याला कुठलाही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि आपले काम आपण पूर्णपणे लक्ष देऊन करू शकतो.
चौथ्या स्टेप मध्ये आपण पाहिले Fix a Time for Social Media and Phone: यात असे सांगितले आहे की दिवसभरातल्या चोवीस तासांपैकी आपल्याला एखादी वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेपुरता सोशल मीडियाचा वापर करायचा आहे. त्यानंतर स्वतःच्या मनाला फसवून पाच मिनिट देखील जास्त फोनचा वापर करायचा नाही.
पाचव्या स्टेप मध्ये आपण बघितले Replace it with Something Else: यात असे सांगितले आहे की जो वेळ तुम्ही यापूर्वी फोनवर घालवत होता त्याऐवजी तुम्ही असे काहीतरी करण्यास सुरुवात करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. यासाठी तुम्ही एखादी नवीन स्किल शिकू शकता किंवा तुमचा जो काही छंद असेल त्यासाठी तुमचा उरलेला वेळ तुम्ही देऊ शकता.
तर मित्रांनो आम्ही आशा करतो की आजचा (How to Stop Phone Addiction) मोबाईलचा वापर कमी कसा करावा? हा आर्टिकल आवडला असेल आणि तुमची देखील सतत चिडचिड होत असेल, राग लवकर येत असेल, तुम्हाला तुमच्या जीवनात जर नैराश्य वाटत असेल तर तुम्ही देखील हा प्रयोग नक्की करून बघा.
या सांगितलेल्या 5 स्टेट्सचा उपयोग करणे खूप सोपे आहे. ज्यामुळे आपण सतत मोबाईलचा वापर करण्याची सवय देखील कमी करू शकतो आणि हाच वेळ चांगल्या कामासाठी वापरून आपल्या जीवनात एक वेगळा आनंद देखील निर्माण करू शकतो. आमचा हा आर्टिकल How to Stop Phone Addiction in Marathi | मोबाईलचा वापर कमी कसा करावा जर आपल्याला आवडला असेल तर या आर्टिकलला शेअर करायला विसरू नका आणि यावर आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.