English Speaking in Marathi: मित्रांनो, तुमच्यासोबत देखील असे अनेक वेळा झाले असेल की तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये गेला आहात आणि तिथे तुमच्या सारखीच बरीच लोकं मीटिंग करिता उपस्थित झाली होती. या मिटिंग मध्ये एक प्रमुख व्यक्ती आपल्याला मीटिंग विषयीची सर्व माहिती इंग्लिश मध्ये देत असतो आणि ती व्यक्ती जे काही बोलत असते ते सर्व आपल्याला कळत असते.
त्यानंतर अचानक आपल्यावर देखील काहीतरी बोलण्याची वेळ येते. परंतु त्यावेळेस आपण त्या मीटिंगमध्ये इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही आणि अडखळत इंग्लिश बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्या तोंडातून शब्द निघत नाही.
तर मित्रांनो तुमचा देखील हाच प्रॉब्लेम असेल की तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलले सर्व काही समजते परंतु आत्मविश्वासाने तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. तर आजचा आमचा English Speaking in Marathi हा लेख तुम्ही पूर्ण वाचा. कारण आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला पाच सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही किमान एक महिना जरी सराव केला तरी तुम्ही अगदी आरामशीर आणि फ़्लुएंट इंग्लिश बोलू शकाल.
जर तुम्हाला इंग्लिश बोलता येत नसेल तर सर्वात पहिल्यांदा हे समजून घ्या की त्यामुळे तुम्हाला स्वतःला कधीही कमी लेखून घेण्याची गरज नाही. किंवा तुम्ही असं मुळीच समजू नका की मी इतरांसारखा इंग्लिश बोलू शकत नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की इंग्लिश शिकणे खूप अवघड आहे ,जर तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही तर असे नका समजू की तुमच्यात तेवढी पात्रताच नाही.
कारण इंग्लिश ही आपली मातृभाषा नाही आणि इंग्लिश बोलणे ही एक स्पेशल स्किल आहे. ज्यामध्ये आपल्याला सराव करणे गरजेचे असते. परंतु अनेकांना इंग्लिश विषयाबद्दल भीती असते त्यामुळे ते या विषयापासून नेहमी दूर पळण्याचा प्रयत्न करीत असतात. चला तर मग बघुया ते कुठले पाच मुद्दे आहे ज्यांच्या सरावाने तुम्ही आत्मविश्वासाने कुणासमोरही बिना अडखळता इंग्लिश मध्ये बोलू शकतात.
इंग्रजी बोलण्याचा सराव कसा करावा
दृष्टीकोन जाणून घ्या (Know the Approach): जर तुम्हाला इंग्लिश या विषयांमध्ये उत्कृष्ट व्हायचा असेल आणि स्पष्ट इंग्लिश यायला हवी असेल तर तुम्हाला इंग्लिश ऐकण्यापेक्षा, इंग्लिश वाचण्यापेक्षा सर्वात जास्त तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता इंग्लिश मध्ये बोलताना हे गरजेचे नाही की तुम्ही संपूर्ण आणि मोठे मोठे वाक्य बोलले पाहिजे.
याची सुरुवात तुम्ही लहान वाक्यात पासून करू शकतात. कारण जितके जास्त तुम्ही इंग्रजी शब्द बोलण्याचा प्रयत्न कराल तेवढेच तुमची नवनवीन शब्द उचलण्याची सवयी होत जाईल आणि तुमच्यामध्ये हळूहळू इंग्लिश बोलण्याचा आत्मविश्वास येऊ लागेल. यासाठी तुम्ही एखाद्या सेल्समनचे उदाहरण घेऊ शकतात.
जेव्हा सेल्समॅन एखाद्या वस्तू विषयी आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन देत असतो त्यावेळेस तो फटाफट त्या प्रॉडक्टचे कुठले फिचर्स आहेत आणि ते प्रॉडक्ट कशा प्रकारे कार्य करते याची माहिती देत असतो. ही माहिती देताना तो कुठेही अडकत नाही किंवा त्या प्रॉडक्टचे डेमॉन्स्ट्रेशन करीत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा देखील येत नाही.
तर आपण त्या सेल्समॅन बद्दल असा विचार करू की तो इतक्या उत्कृष्ट पद्धतीने प्रॉडक्ट विषयीची सर्व माहिती कसे काय देऊ शकतो? तर त्याचे एकच कारण आहे की तो सेल्समन त्या प्रॉडक्टची अनेक दिवसापासून मार्केटिंग करीत आहे आणि प्रॉडक्ट विषयीचे डेमॉन्स्ट्रेशन करीत आहे.
त्यामुळे त्या प्रॉडक्ट विषयी सतत बोलून बोलून त्याच्यात आपोआप आत्मविश्वास तयार झाला आणि तो बिनधास्तपणे कुणा समोर ही त्या प्रॉडक्टचे डेमॉन्स्ट्रेशन छान पद्धतीने करू शकतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देखील उत्तम इंग्लिश बोलायचे असेल तर फक्त मनातल्या मनात विचार न करता तुम्ही इंग्लिश बोलण्याचा देखील प्रयत्न केलाच पाहिजे.
इंग्रजी वाचण्याची सोपी पद्धत
स्वतःशी बोला (Talk with yourself): जसे मी आपल्याला पहिले मुद्दा सांगितले की आपण एखाद्या गोष्टीचा सतत सराव केला तर त्या गोष्टींमध्ये आपण हळूहळू परफेक्ट होत जातो. तसेच इंग्लिश बोलण्यासाठी देखील आपण इंग्लिश मध्ये बोलणे गरजेचे आहे. परंतु जर तुम्हाला असे वाटत असेल की इंग्लिश बोलण्यासाठी मी काय केले पाहिजे आणि कोणासमोर इंग्लिश बोलले पाहिजे.
तसेच जर तुमच्या मनात असा प्रश्न देखील येत असेल की जर मी एखाद्या समोर इंग्लिश बोलू लागलो आणि माझ्याकडून बोलताना काही चुकले तर समोरील व्यक्ती माझ्यावर हसेल का? तर तुम्हाला या सर्व चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही.
इंग्लिश बोलण्यासाठी तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडची मदत घेऊ शकतात आणि तुमच्या बेस्ट फ्रेंड चे नाव आहे तुमच्या घरात असलेला “आरसा”. कारण इथे तुमचा हा मित्र असा आहे की तुम्ही जर बोलण्यामध्ये चुकी केली तरी तो तुमच्यावर अजिबात हसणार नाही आणि तुमची चेष्टा देखील करणार नाही.
तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले सुपरस्टार शाहरूख खान देखील सुरवातीच्या काळामध्ये स्क्रिप्ट वाचून परफॉर्मन्स करण्यासाठी आरशाची मदत घेत असे. चित्रपटात उत्कृष्ट परफॉर्मन्स करता यावा या करिता ते स्वतःला एका रूम मध्ये बंद करून घेत असे आणि आरशासमोर सतत त्यांच्या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करत असेल.
त्यांनी केलेले या प्रॅक्टिसचे फळ त्यांना कशाप्रकारे मिळाले आहे हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. तसेच जर शाहरुख खान सारखी व्यक्ती स्वतःची स्किल डेव्हलप करण्यासाठी आरशाची मदत घेऊ शकतात तर आपण का म्हणून आरशासमोर उभे राहून बोलण्यासाठी लाजले पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांविषयी कल्पना करायची आहे.
आणि त्याविषयी आरशासमोर उभे राहून चर्चा करायचे आहे. आता तुम्ही इथे वेगवेगळ्या कल्पना करू शकतात जसे की तुम्हाला एखादा फॉरेनर टुरिस्ट तुमच्या शहरा विषयी माहिती विचारत आहे आणि त्याला तुम्ही सर्व माहिती इंग्लिश मध्ये देत आहेत किंवा तुम्हाला एखादा आवडलेला चित्रपटाविषयी तुम्ही तुमच्या मित्राला इंग्लिश मध्ये स्टोरी सांगत आहात.
अशा वेगवेगळ्या कल्पना तुम्ही करू शकतात आणि त्याविषयी तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलायचे आहे. परंतु लक्षात ठेवा इथे तुम्हाला मनातल्या मनात नाही तर स्पष्ट उच्चार करून इंग्लिश मध्ये बोलायचे आहे.
इंग्रजी बोलण्याची सुरुवात कशी करावी
करमणूकीचे शिक्षणामध्ये रूपांतर करा (Convert Entertainment into Learning): हे गरजेचे नाही की तुम्ही इंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फक्त तुमचे मनोरंजनच करतात. तर मनोरंजनासोबत तुम्ही त्यातून बरेच काही शिकू देखील शकतात. कारण बघायला गेले तर इंटरटेनमेंट आणि एज्युकेशन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी नसून हे एक आहे म्हणजेच एज्युटेनमेंट आहे.
याच्या माध्यमातून आपण मनोरंजनासोबत काहीतरी नवीन शिकू देखील शकतो. जर आपण इंग्लिश बोलण्यासाठी एज्युटेनमेंटचा आधार घेणार आहोत तर यासाठी आपण इंग्लिश मूव्हीज, इंग्लिश सॉंग्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट यासारख्या विविध प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकतात. युट्युब वर तुम्हाला बरेच व्हिडिओ देखील मिळेल जिथे तुम्ही म्युझिक ऐकताना लिरिक्स वाचून गाऊ देखील शकतात.
इंग्लिश मूव्हीज किंवा वेबसिरिज जर तुम्ही बघत असाल तर सबटायटल्सचा देखील तुम्ही उपयोग करू शकतात. सबटायटल्स मध्ये काय लिहून येत आहे हे तुम्ही वाचून त्याचा उच्चार करू शकतात. ज्यामुळे तुमच्या सरावात देखील जास्त भर पडेल. तुम्हाला हे माहित आहे का 60% लोक ज्यांनी इंग्लिश शिकली आहे.
त्यांनी अशाच प्रकारे इंग्लिश चित्रपटांचा, इंग्लिश गाण्यांचा आधार घेतला आहे आणि इंग्लिश बोलण्याचा सराव केला आहे. परंतु हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की तुम्ही प्रत्येक बघत असलेली मूवी किंवा सॉंग हे एंटरटेनिंग असेल. त्यामुळे तुम्ही अशा मूवी बघितले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळू शकेल, आपल्यामध्ये एकादी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे गाणे तुम्ही ऐकू शकतात.
इंग्रजी शिकण्याची सर्वात सोपी ट्रिक
तुमाच्या सारख्या लोकांसोबत रहा (Follow Like Minded People): आता आपण असे गृहीत धरू की तुम्ही इंग्लिश बोलण्याचा सराव करीत आहात आणि त्यासाठी तुम्ही दररोज आरशासमोर उभे राहून स्वतःशी इंग्लिश मध्ये बोलत आहात, निरनिराळ्या विषयांवर तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहात, तुमच्या मनातील मुद्दे तुम्ही इंग्लिशमधून मांडण्याचा प्रयत्न करीत आहात.
तसेच तुमच्या इंग्लिश मध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही दररोज इंग्लिश मूव्हीज, सॉंग्स, डॉक्युमेंट्री, पॉडकास्ट या सर्व प्लॅटफॉर्मचा देखील आधार घेत आहात. परत तुमच्या आसपास असे देखील लोक असतील जे तुम्हाला कदाचित बोलू शकतात की मला देखील इंग्लिश बोलता येत नाही. परंतु त्यामुळे मला कुठलाही फरक पडत नाही तर तुला देखील इंग्लिश शिकण्याची काय गरज आहे.
हे असे लोक असतात जे स्वतः देखील काही नवीन शिकत नाही आणि दुसरे कोणी जर शिकत असेल तर त्यांना देखील प्रेरित करण्याऐवजी चुकीचा मार्ग दाखवतात. तर तुम्हाला जर इंग्लिश बोलणे शिकायचे असेल तर अशा लोकांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे आणि अशा लोकांच्या सहवासात राहिला पाहिजे जे तुमच्याप्रमाणेच इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा ज्यांना छान इंग्लिश बोलता येते.
जर असे लोक तुमच्या आसपास उपलब्ध नसतील तर या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अशा लोकांना फॉलो करू शकतात जे इंग्लिशमध्ये एक्सपर्ट आहेत. अशा लोकांना फॉलो करून तुम्ही त्यांच्या जीवनाविषयी बरेच काही माहिती मिळवू शकतात की त्यांनी कशाप्रकारे इंग्लिश बोलण्याची सुरुवात केली.
त्यांच्या आयुष्यात कुठल्या अडचणी आल्या होत्या आणि त्यावर त्यांनी कशाप्रकारे मात केली. या सर्व गोष्टींची तुम्हाला जर त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे माहिती मिळाली तर तुमच्या मध्ये देखील एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्हाला देखील असे वाटू लागेल की जर ही मंडळी इंग्लिश बोलू शकते तर मी देखील त्यांच्या प्रमाणे सहज बोलू शकतो.
इंग्रजी बोलण्याचा सराव कसा करावा
संसाधनांचा आधार घ्या (Go to Resources): या मुद्द्याचा अर्थ समजून सांगण्यासाठी मी माझे स्वतःचे उदाहरण देतो. ज्या प्रकारे मी दररोज माझ्या ब्लॉग वेबसाईट वर वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग लिहितो. तेव्हा अनेकदा मला असे वाटते की आज मी कुठल्याही विषयावर ब्लॉग लिहिला पाहिजे. त्यासाठी मी माझ्या काही रिसोर्सेसचा वापर करतो आणि हे रिसोर्सेस कुठलेही असू शकतात.
उदाहरणार्थ माझ्याकडे असलेली काही पुस्तके, काही पॉप्युलर लोकांचे व्हिडिओज, काही आर्टिकल्स या सर्वांच्या माध्यमातून मला कुठल्या नवीन टॉपिक वर ब्लॉग लिहायचा आहे याची आयडिया मिळते आणि त्यांना वाचून किंवा बघून समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्या नवीन मिळालेल्या आयडिया मी माझ्या पद्धतीने तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो.
तर मित्रांनो ज्याप्रकारे जेव्हा मला आज नेमके कुठल्या टॉपिक वर ब्लॉग लिहिले पाहिजे हे कळत नाही त्यावेळेस मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसचा आधार घेतो. त्याचप्रमाणे तुम्ही देखील तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस उपलब्ध असेल त्याचा आधार घेतला पाहिजे. याकरिता तुमच्याकडे एखादे असे ॲप असले पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश कशाप्रकारे बोलले जाते हे समजण्यास मदत मिळेल.
त्याचप्रमाणे इंटरनेट वर अशा अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहे ज्यांच्या मार्फत तुम्ही इंग्लिश कशाप्रकारे बोलली पाहिजे हे शिकू शकतात. तसेच तुम्हाला इंग्लिश विषयाची संबंधित असलेले बुक किंवा ई बुक्सचा देखील आधार घ्यावा लागेल. ज्यामध्ये तुमची इंग्लिश बोलण्याची स्किल कशाप्रकारे सुधारेल याची माहिती असेल.
बरेच पॉडकास्ट प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध आहेत यांच्यामार्फत तुम्हाला इंग्लिश स्पिकिंग विषयी अधिक माहिती मिळू शकेल. जेव्हापण तुम्हाला असे वाटेल की आता तुमच्याकडे रिकामा वेळ आहे तेव्हा तुम्ही या वेळेचा इंग्लिश शिकण्यासाठी सदुपयोग करू शकतात आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसची तुम्ही मदत घेऊ शकतात.
आजच्या काळात इंटरनेटवर बरेच इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील उपलब्ध आहे जिथे तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग कशी केली पाहिजे याचे ज्ञान दिले जाते. अशाप्रकारे तुम्हाला शक्य असलेले सर्व रिसोर्सेस तुम्ही इंग्लिश स्पिकिंग साठी वापरले पाहिजे.
How to Start Speaking English
मित्रांनो अशा प्रकारे सांगितलेल्या पाच स्टेप्सचा जर तुम्ही तुमच्या जीवनात वापर केला तर माझी गॅरेंटी आहे की तुम्ही 30 दिवसांमध्ये उत्कृष्टपणे आणि बिनधास्तपणे इंग्लिश स्पीकिंग करू शकतात. तुमच्याकडे जो वेळ उपलब्ध आहे त्याचा तुम्ही सदुपयोग करा आणि तुमच्या मनातील इंग्लिश विषयी असलेली भीती दूर करून तुम्ही देखील उत्तम प्रकारे इंग्लिश बोलू शकतात हे सिद्ध करू शकतात.
याव्यतिरिक्त इंग्लिश शिकण्यासाठी तुम्हाला यु ट्यूब वर फ्री मध्ये अनेक व्हिडिओ बघायला भेटेल जिथे तुम्हाला हे शिकवले जाते की फोन वर बोलताना कशा प्रकारे इंग्लिश मध्ये कन्वर्सेशन केले पाहिजे, आपण मीटिंग मध्ये कशाप्रकारे बोलले पाहिजे, ई-मेल कशाप्रकारे लिहिला पाहिजे, आपल्या वरिष्ठ अधिकारी सोबत, सहकर्मचारी सोबत, तसेच दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलले पाहिजे.
अशाप्रकारे तुम्ही जर वेगवेगळ्या विषयांवर आधारित माहिती घेत गेलात तर हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल आणि सराव करत असताना काही दिवसानंतर आपोआप तुमच्या लक्षात येईल की तुमची इंग्लिश बोलण्याची स्किल कशाप्रकारे डेव्हलप होऊ लागली आहे.
How to practice speaking in English
अशा प्रकारे English Speaking in Marathi या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगितलेल्या 5 स्टेप्स तुम्हाला 30 दिवस फॉलो करायच्या आहे. यातील पहिल्या स्टेप मध्ये आम्ही आपल्याला सांगितले आहे की कशा प्रकारे आपण हे जाणून घेऊ की इंग्लिश कशाप्रकारे शिकली जाऊ शकते, कुठली वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांच्या मार्फत आपल्याला इंग्लिश शिकता येते.
दुसरी स्टेप आपण हि पाहिले की इंग्लिश उत्कृष्टपणे बोलता येण्यासाठी आपल्याला दररोज आरशासमोर उभे राहून निरनिराळ्या विषयांवर स्वतःशी संभाषण करायचं आहे. ज्यामुळे तुमची इंग्लिश सुधारणा होण्यास अधिक मदत मिळेल. तिसरी स्टेप आपण बघितली की आपण आपल्या इंटरटेनमेंट साठी उपलब्ध असलेल्या ऑप्शनला एज्युकेशन मध्ये बदलायचे आहे.
आणि मनोरंजनातून कशाप्रकारे ज्ञान घेता येईल याचा विचार करायचा आहे. त्यासाठी तुम्ही इंग्लिश मुव्हीज, इंग्लिश सॉंग्स, पॉडकास्ट अशा अनेक गोष्टींचा वापर करू शकतात. चौथ्या स्टेप मध्ये आपण बघितले की तुम्हाला अशा लोकांपासून नेहमी दूर राहायचे आहे जे तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी प्रेरित करत नाही याउलट तुम्हाला असे सोबती निवडायचे आहे जे तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी अधिक मदत करू शकेल.
असे जोडीदार मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा देखील वापर करू शकतात. पाचवी स्टेप आपण बघितला की तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनाचा तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी वापर केला पाहिजे. याकरिता तुमच्याकडे असलेले पुस्तक, ई बुक्स, वेबसाइट्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्स अशा अनेक गोष्टींचा वापर करू शकतात.
मित्रांनो आम्ही आशा करतो आजचा हा आमचा आर्टिकल English Speaking in Marathi हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या आर्टिकलला तुम्ही नक्की शेअर करा. म्हणजे इतरांना देखील इंग्लिश स्पीकिंग कशी करावी हे समजेल आणि त्यांचा देखील आत्मविश्वास तुमच्या प्रमाणेच वाढेल. तसेच आमचा हा आर्टिकल वाचून जर तुमच्या इंग्लिश मध्ये सुधारणा झाली असेल तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
READ MORE POSTS
Post Views: 5,293