Dola Fadafadane Kase Thambavave | How to reduce or stop an eye twitching

Share this

Dola Fadafadane Kase Thambavave, डोळा फडफडणे शुभ कि अशुभ असते, उजवा किव्वा डावा डोळा फडफडणे आणि संकेत, स्त्री आणि पुरुष यांना नेमके काय संकेत मिळतात?

आपल्या भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत मग त्या घटना शुभ असो किव्वा अशुभ असो याचे पूर्व संकेत देण्याचे काम हे विशिष्ठ प्रकारचे डोळे फडफडणे किव्वा आपली पापणी फडफडणे करीत असतात. डोळे फडफडणे या विषयावर आपण खूप काही ऐकले असेल किव्वा कदाचित तुम्ही अनुभवले देखील असेल. तर डोळे फडफडणे या बद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुमचा देखील डोळा किव्वा पापणी अधूनमधून सारखी फडफडत असते का? आणि तुम्हाला सतत असा प्रश्न पडतो की नेमका डावा डोळा फडफडणे शुभ असते की अशुभ, तसेच जर तुमचा उजवा डोळा फडफडत असेल तर हा शुभ संकेत आहे की अशुभ. चला तर मग लगेच आपण जाणून घेऊ की कोणता डोळा फडफडणे किव्वा कोणती पापणी फडफडणे म्हणजे शुभ की अशुभ लक्षणे आहेत.

खरेतर आजवर आपण असे नेहमीच ऐकत आलो आहोत की आपल्या डोळ्यांची सतत होणारी फडफड आपल्याला ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार येऊ घातलेल्या घटनांबद्दल चेतावणी असू शकते. तसे जर बघायला गेलो तर प्रत्येक व्यक्तीचे डोळे हे फडफड करीत असतात आणि त्याच्या मागे काही वेगळी कारणे देखील असू शकतात. तर आपल्या डोळ्याचे फडफडणे हे खरोखर भविष्यात घडणाऱ्या काही शुभ किव्वा अशुभ गोष्टींचे संकेत असते का हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

उजवा डोळा फडफडणे शुभ कि अशुभ संकेत

सर्वात आगोदर आपण हे बघूया की तुमचा उजवा डोळा सतत फडफडण्याचा नेमका काय अर्थ असेल. हि लक्षणे तुम्ही भाग्यवान असण्याची आहेत किंवा अशुभ असण्याची किंवा तुमची उजवी पापणी किंवा कपाळ सतत फडफडने म्हणजे नेमके काय असेल.

मित्रांनो, समुद्र शास्त्रानुसार असे मानले जाते की कोणत्याही पुरुषाचा जर सतत उजवा डोळा किंवा उजव्या डोळ्याची पापणी सतत फडफडत असेल तर हे लक्षणे पवित्र मानले जाते. म्हणजेच हा संकेत शुभ मानला जातो. पुरुषांचा उजवा डोळा फडफाडल्याने त्या पुरुषाचे रखडलेली कामे पूर्ण होतात, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बढती मिळते, या सोबतच आर्थिक लाभ देखील होतो. अशा विविध लक्षणांना समुद्र शास्त्रानुसार यात सहभागी केले गेले आहे.

15 Best laptop for Video Editing

डावा डोळा फडफडणे संकेत

परंतु हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत घडत असेल तर, म्हणजेच स्त्रियांचा उजवा डोळा जर फडफडत असेल तर किव्वा पापणी डोळे फडफडत असेल तर समुद्र शास्त्रानुसार महिलांसाठी हि लक्षणे अशुभ मानली जातात. भविष्यात या महिलांच्या बाबतीच अशुभ घटना घडू शकते. या संकेताकडे कडे हि लक्षणे इशारा करीत असतात.

याउलट जर पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल तर हे समुद्र शास्त्रानुसार हि अशुभ लक्षणे मानली जातात. अशा व्यक्तींना भविष्यात वाईट बातमी ऐकू येणे, आर्थिक नुकसान होणे, शत्रुत्व किव्वा समाजात वैर निर्माण होणे अशा विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा वेळेस या पुरुषांनी आपल्या वर्तनात सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्या मुळे आपले कोणाशीही वाद होणार नाही किव्वा आपल्या मुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. Read more post : Dutta Rupee Loan Full Introduction In Marathi

या उलट जर कोणत्याही स्त्रियांचा जर डावा डोळा किव्वा डावी पापणी फडफडत असेल तर, याचा अर्थ असा आहे की या महिलांना भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता असते, या महिलांना कोणताना कोणता फायदा नक्कीच होणार असतो. जसेकी या महिलांना आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना बढती मिळू शकते, उद्याग करणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायात लाभ होऊ शकतो. अशा कोणत्याही प्रकारची चांगली आणि आनंद देणारी बातमी नक्कीच या महिलांना ऐकायला मिळते.

डोळा फडफडणे घरगुती उपाय | Dola Fadafadane Kase Thambavave

जर अशुभ पापणी किव्वा डोळा फडफडत असेल तर आपल्या पापणी वरून सोन्याची अंगठी फिरवावी. विवाहित स्त्रियांनी आपल्या कडे असलेल्या मंगळसुत्राच्या वाट्या उलट्या करून पापणीवर फिरवावे. असे केल्यामुळे जर काही दोष असेल तर ते दोष दूर होतात. पुरुषांची डावी पापणी आणि स्त्रियांची उजवी पापणी नाकाच्या बाजूस फडफडत असेल तर मोठे आजारपण किव्वा वाईट बातमी ऐकू येण्याचे संकेत असतात. अशा वेळेस या व्यक्तीने आपल्या पापणीला सोन्याचा स्पर्श करावा त्यामुळे पापणी फडफडणे बंद होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top