मित्रांनो सध्याच्या काळात तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच लोकांना covid-19 मुळे आपल्या नोकऱ्या गमवावा लागल्याआहेत आणि त्यांना त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडलेला आहे. परंतु आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला घरी बसून पैसे कसे कमवावे याचे काही मुद्दे सांगणार आहोत.
त्याच्यामार्फत आपण नोकरी न करता आपल्याकडे अवगत असलेले स्किल्सचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो. Online पैसे कमाविण्यासाठी तुम्हाला कुठलीही गुंतवणूक करण्याची देखील गरज पडणार नाही.
घरी बसून पैसे कमवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हे शोधणे गरजेचे आहे की तुमच्या मध्ये अशी कुठली कला आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू इच्छिता आणि तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे देखील गरजेचे आहे. इंटरनेटवर पैसे कमवण्याचे तसे बरेच मार्ग उपलब्ध आहे परंतु इथे आपल्याला सुरुवातीच्या काळात संयम ठेवणे देखील गरजेचे आहे.
कारण जर तुम्हाला ऑनलाईन अर्निंग करायची असेल तर इथे तुम्हाला काही वेळ द्यावाच लागतो आणि त्यासोबतच तुम्ही ज्या स्किलच्या साह्याने पैसे कमवू इच्छितात त्यात तुम्हाला इतरांचे रिव्ह्यू येणे गरजेचे असते आणि लोकांनी तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओळखणे देखील तितकेच गरजेचे असते. चला तर मग बघुया की आपण घरी बसून कुठल्या कुठल्या मार्गाने पैसे कमवू शकतो.
घरी बसून पैसे कसे कमवायचे ?
युट्युब चॅनल सुरु करणे: तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती असेल की यूट्यूब चैनलवर पैसे कमवता येतात पण बरेच लोक आजही असे आहेत जे फक्त युट्युब वर व्हिडिओ बघत असतात परंतु त्यांना हे माहीत नसते की या प्लॅटफॉर्मवर देखील आपण सहज पैसे कमवू शकतो.
जेव्हापासून इंटरनेटचे दर स्वस्त झाले आहे तेव्हा पासून बरेच युट्युबवर नवीन चॅनल देखील बनवले गेले आहे आणि वेगवेगळे प्रकारचे लोक त्यांच्याकडे अवगत असलेल्या ज्ञानाचा वापर करून यूट्यूब चॅनलवर त्यांचे व्हिडीओ अपलोड करतात आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून ते भरपूर पैसे देखील कमवतात.
युट्युब चॅनल सुरु करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही तुमच्याकडे एक ईमेल आयडी असणे गरजेचे आहे. त्याद्वारे तुम्हाला युट्युबवर लॉगिन करायची आहे आणि तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करून Your Channel हा पर्याय निवडायचा आहे. इथे तुम्हाला तुमचे यूट्यूब चॅनल कुठल्या नावाने बनवायचे आहे ते नाव टाईप करायचे आहे.
यानंतर आपल्याला क्रिएट चॅनल या बटनवर क्लीक करायची आहे. अशाप्रकारे आपण आपले यूट्यूब चॅनल अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. चॅनल तयार झाल्यानंतर सर्वात आगोदर तुम्हाला Edit Channel या ऑप्शन वर क्लिक करून तुमचे चॅनल नेमके कशाविषयी आहे त्याची माहिती Description box मध्ये टाईप करायची आहे.
इथे आपल्या चॅनलची माहिती टाईप करताना तुम्हाला तुम्ही ज्या विषया बद्दल या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे काही पॉप्युलर कीवर्ड्स आणि Hashtags चा देखील वापर करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुम्ही तयार केलेल्या चॅनेलवर तुम्ही निवडलेल्या विषयाची व्हिडिओ नियमीतपणे अपलोड करत जायचे आहे.
जसे जसे तुमच्या चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओला Views मिळू लागतील तसे तुमच्या चॅनलला विवर्स कडून सबस्क्राईब देखील करण्यात येईल. एकदा तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्राईबर्स आणि तुम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओचा मिळून 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण झाला की तुम्हाला तुम्ही बनवलेले युट्यूब चॅनलवर गुगल द्वारे पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते.
गुगल अड्सेंस हे तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर दाखवण्यात आलेल्या जाहिरातीचे डॉलरच्या स्वरूपात पैसे देते आणि हे पैसे तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतात.
घर बसल्या सोप्या पद्धतीने पैसे कसे कमवावेत?
इंस्टाग्राम द्वारे पैसे कमविणे: इंस्टाग्राम हे हल्ली खुप पॉप्युलर असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. संपूर्ण जगभरातून या प्लॅटफॉर्मचा अनेक लोकांकडून, सेलिब्रिटीज, पॉप्युलर पर्सनालिटी कडून वापर करण्यात येतो. या प्लॅटफॉर्मवर आपण आपली प्रोफाइल तयार करून इमेजेस व्हिडिओज अपलोड करू शकतो. आज प्रत्येक सामान्य माणूस इंस्टाग्रामचा वापर करीत आहे.
परंतु खूप कमी लोकांना हे माहीत आहे की इंस्टाग्रामवर आपण दररोज पोस्ट अपलोड करून त्याद्वारे पैसे कमवू शकतो. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इंस्टाग्रामवर तुमची प्रोफाईल नॉर्मल न ठेवता तुम्हाला एक प्रोफेशनल पेज तयार करायचं आहे आणि इथे तुम्हाला ज्या विषयाच्या संबंधित माहिती इमेजेस आणि व्हिडिओच्या स्वरुपात शेअर करायची आहे ते सर्व तुम्हाला या पेजवर शेअर करायची आहे.
इंस्टाग्राम वर तुम्ही Photo/Video, IGTV Video, Carousel Post, Reels, Story या माध्यमातून पोस्ट अपलोड करू शकता. जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॅशन या विषयाशी संबंधित पेज तयार केला असेल तर तूम्हाला नियमितपणे फॅशन विषयीचे इमेजेस, व्हिडिओज, स्टोरीज आणि शॉर्ट बनवून ते शेअर करायचे आहे. शेअर करण्यापूर्वी तुम्हाला योग्य Hashtags वापर करायचा आहे.
म्हणजेच तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तुम्ही प्रत्येक पोस्ट मध्ये 30 Hashtags चा उपयोग करू शकतात. तुम्हाला सुरुवातीला दररोज सहा ते आठ पोस्ट शेअर करायच्या आहे. जसजसे तुम्ही नियमितपणे पोस्ट शेअर करू लागेल तसे तसे तुमचे फॉलोवर्स देखील वाढू लागतील. त्यामुळे तुम्ही शेअर केलेल्या पोस्टवर तुमच्या फॉलोवर्सची एंगेजमेंट वाढू लागेल.
तुमचे फॉलोवर्स जर हजारो मध्ये असेल तर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विषयाशी संबंधित ब्रँड तुम्हाला कॉन्टॅक्ट करू लागतील आणि त्यांचे प्रॉडक्ट विषयी माहिती देण्यासाठी ते तुम्हाला पैसे देऊ लागतील. तुम्हाला फक्त त्यांनी जे प्रोडक्स विषयी माहिती द्यायला लावली आहे त्याचे तुम्हाला व्हिडिओ, स्टोरी किंवा शॉर्ट बनवून तुमच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करायची आहे.
एक वेळेस युट्युबवर तुम्हाला काही मिनिटांचे व्हिडिओ बनवावे लागतील परंतु इथे तुम्हाला फक्त काही सेकंद याचा व्हिडिओ बनवून अपलोड करायचा आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला बँड कडून पैसे कमवायचे आहे. तसेच तुम्ही तुमच्या बायो मध्ये अफीलिएट मार्केटिंगची लिंक शेअर करुन देखील पैसे कमवू शकतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला इंस्टाग्राम डायरेक्ट मॉनेटायझेशनचे ऑप्शन देत नाही परंतु असे लाखो लोक आहेत जे इंस्टाग्रामवर फक्त ब्रँड चे प्रमोशन करून दर महिन्याला किमान तीन ते चार हजार डॉलरची कमाई करतात.
घरी करता येणारे उद्योग | घरी बसून पैसे कसे कमवावे सोपी पद्धत
अफीलिएट मार्केटिंग द्वारे पैसे कमविणे: अफीलिएट मार्केटिंग हा असा पर्याय आहे की इथे तुम्हाला एकही रुपया न गुंतवता तुम्ही तुमच्या स्वतःचे ऑनलाइन स्टोर तयार करू शकता आणि इथे तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि मोठ्या मोठ्या ब्रँडचे प्रोडक्स घरी बसल्या बसल्या ऑनलाईन सेल करू शकता. यासाठी तुम्हाला अफीलिएट लिंक देण्यात येते.
तुम्ही शेअर केलेल्या लिंक द्वारे जो कोणी जी कुठली वस्तू विकत घेईल त्याच्या बदल्यात तुम्हाला काही टक्के प्रमाणे कमिशन देण्यात येते. अफीलिएट मार्केटिंग द्वारे देखील अनेक लोक दर महिन्याला लाखो रुपये कमवत असतात. जर तुम्हाला अफीलिएट मार्केटिंग विषय सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल त्यात इथे मी तुम्हाला अजून सविस्तर पणे सांगतो.
तुम्ही कुठलीही वस्तू ऑनलाईन विकत घेण्यासाठी Amazon, Flipcart, Myntra, Meesho अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. इथे तुम्ही तुम्हाला हवा असलेला प्रोडक्ट सर्च करतात याविषयीची डिस्क्रिप्शन मध्ये माहिती वाचतात आणि तुम्हाला हवे असलेल्या प्राइज रेंजमध्ये जर ते प्रोडक्ट असेल तर त्याची तुम्ही ऑनलाइन पेमेंट करून किंवा कॅश ऑन डिलिव्हरी हे पर्याय निवडून त्या प्रोडक्सची ऑर्डर करतात.
तरी इथे तुम्हाला प्रोडक्ट सेल करून कमिशन मिळवायची असेल तर सर्वात आगोदर Amazon, Flipcart, Myntra, Meesho यासारखे प्लॅटफॉर्मचे अफीलिएट प्रोग्राम जॉईंन करावे लागेल. यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या अफीलिएट प्रोग्राम लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती या मध्ये ऍड करायची आहे तसेच तुमची बँक डिटेल्स देखील या मध्ये ऍड करायची आहे.
या सर्व प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर ॲक्सेस करू शकता. आता इथे तुम्ही तुम्हाला हवा असलेला प्रोडक्ट सर्च करून त्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे आणि त्या लिंकला short links मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. आता ही तयार झालेली लिंक ही एक युनिक लिंक आहे.
या लिंक ला तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून शेअर करायचं आहे ही लिंक जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितके जास्त लोक त्या लिंकद्वारे ऑनलाइन शॉपिंग करू शकतात आणि या लिंकचा उपयोग करून जो कोणी ऑनलाईन खरेदी करेल त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या अकाउंटवर कमिशन देण्यात येईल.
अशाप्रकारे तुम्ही एकही रुपया खर्च न करता मोठे मोठे ब्रँडचे आणि मोठे मोठे कंपन्यांचे प्रोडक्स तुम्ही ऑनलाइन विकू शकतात आणि घरी बसल्या पैसे कमवू शकतात. अफीलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही Flipkart Affiliate, Amazon Associates, BigRock Affiliate, Yatra Affiliate, CJ Affiliate, Shopify Affiliate, Meesho, Clickbank अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकतात.
घरगुती व्यवसाय महिलांसाठी | घरी बसून पैसे कसे कमवावे याची माहिती
फ्रीलान्सिंग द्वारे पैसे कमविणे: आपल्या घरातूनच आपल्याला हव्या त्या वेळेत हवी त्या पद्धतीने काम करून पैसे कमविण्यासाठी फ्रीलान्सिंग हा एक उत्तम पर्याय आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेल्या कुठलेही स्किलचा उपयोग करून तुम्ही तुमची सर्विस इंटरनेटच्या माध्यमातून देशातील आणि विदेशातील ग्राहकांना देणे.
यासाठी तुम्हाला फ्रीलान्सिंग वेबसाईटवर आपली प्रोफाईल तयार करावी लागेल आणि या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या सर्विसेस दिसेल त्या पैकी तुम्ही कुठली सर्विसेस देऊन पैसे कमवू इच्छितात हे पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्सला सर्विसच्या स्वरूपात सेल करून पैसे कमवू शकतात.
उदाहरणार्थ ग्राफिक डिझाईनिंग, व्हिडिओ एडिटिंग, एम. एस. ऑफिस किंवा पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वेब साईट डिझाईनिंग, मोबाइल एप्लिकेशन्स डिझाईनिंग, डेटा इंट्री अशा असंख्य प्रकारच्या स्किल्सचा उपयोग करुन तुम्ही मिळालेले प्रोजेक्ट पूर्ण करू शकतात आणि केलेल्या कामाच्या बदल्यात पैसे कमवू शकतात.
जर तुम्हाला फ्रीलान्सिंग द्वारे पैसे कमवायचे असेल तर Freelancer.in, Upwork.com, Guru.com, FlexC.work, Fiverr, Youth4Work, Peopleperhour.com, 99 Designs, Truelancer, Outsourcely वेबसाईटचा उपयोग करू शकता. या वेबसाईटवर विजीट करून तुम्हाला साइन इन करायचे आहे आणि आपली संपूर्ण माहिती इथे तुम्हाला सबमिट करायची आहे.
त्यानंतर तुम्ही कुठल्या सर्विसेस फ्रीलान्सर म्हणून देणार आहे हे निवडायचे आहे. फ्रीलान्सिंग वेबसाइट्स वर इतर देशातील लोकांकडून प्रोजेक्ट देण्यात येतात. कारण त्यांच्या देशांमध्ये हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो आणि कमी पैशात काम करण्यासाठी फ्रीलान्सिंग वेबसाइट्स वर भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ अशा देशातील नागरिक येथे फ्रीलान्सर म्हणून काम करतात.
या सर्व देशांमध्ये डॉलरची किंमत जास्त आहे त्यामुळे इतर देशातून मिळणारे कमी डॉलर्स मधले प्रोजेक्ट देखील आपल्या करिता जास्त पैसे करून देणारे प्रोजेक्ट करतात. याच कारणामुळे इतर देशातील लोकांना फ्रीलान्सिंग वेबसाइट्सवर प्रोजेक्ट देणेदेखील परवडते आणि कमी पैशात त्यांचे चांगले काम देखील होऊन जाते.
तुम्हाला देखील जर फ्रीलान्सर व्हायचे असेल तर तुमची कुठली स्किल आहे जी तुम्ही या प्लॅटफॉर्मवर देऊन पैसे कमवू शकता हे तुम्हाला सर्वात आगोदर शोधावे लागेल.
ऑनलाईन पैसे कसे कमवायचे | ब्लॉगिंग करून घरी बसून पैसे कसे कमवावे
ब्लॉगिंग द्वारे पैसे कमविणे: बऱ्याच वेळा आपण एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी गुगलवर सर्च करतो आणि आपल्याला त्याचे अनेक रिझल्ट बघायला मिळतात. त्यापैकी काही रिझल्ट हे व्हिडिओच्या स्वरुपात दाखविण्यात येतात तर काही आर्टिकलच्या स्वरुपात दाखविण्यात येतात.
या जगात बरेच लोक वेगवेगळ्या विषयांची माहिती इंटरनेटवर शेअर करण्यासाठी ब्लोगिंग चा वापर करतात आणि त्याद्वारे लाखो रुपये कमवितात. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की फक्त तेच लोक ब्लॉगिंग करू शकतात ज्यांच्याकडे वर्डप्रेस वेबसाइट आहे. तुम्हाला जर ब्लॉगिंग करायची असेल तर तुम्ही एकही रुपया खर्च न करता Blogger.com वर आपला स्वतःचा ब्लॉग बनवून ब्लॉगिंगची सुरुवात करू शकतात.
Blogger.com हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या थीमचा वापर करून तुमचा ब्लॉग तयार करू शकतात. हे प्लॅटफॉर्म अशा लोकांसाठी आहे ज्यांना लेखन करण्याची खूप जास्त आवड असते. कारण इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर आर्टिकल लिहायचे असतात आणि तुम्ही लिहिलेले आर्टिकल्स हे गुगल वर लोकांकडून सर्च करण्यात येतात.
ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे असेल तर गूगल अड्सेंसच्या काही नियमांचे तुम्हाला पालम करणे देखील गरजेचे आहे. सर्वात अगोदर तुम्हाला असा विषय निवडायचा आहे की ज्या विषयाचे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. आणि अशा विषयावर ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करायची आहे. यासाठी तुम्ही निवडलेली NICHE कुठली आहे हे देखील बघणे तितकेच महत्त्वाचे आहे.
ब्लॉगिंग करुन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 30 ते 40 आर्टिकल लिहायचे आहे आणि प्रत्येक आर्टिकल किमान हजार शब्दांपेक्षा जास्त असावा आणि तुम्ही पोस्ट केलेले कन्टेन्ट हे युनिक असावे. ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्ही इतर वेबसाईटचा आधार घेऊ शकतात परंतु तुम्हाला काळजी या गोष्टीची घ्यायची आहे की तुमचा ब्लॉग हा तंतोतंत इतरांच्या ब्लॉग प्रमाणे नसला पाहिजे.
तसेच योग्य पद्धतीने तुमच्या ब्लॉग मध्ये हेडिंग आणि सब हेडिंगचा उपयोग करणे. योग्य पद्धतीने तुमच्या ब्लॉगचे अरेंजमेंट करणे आणि सर्वात महत्वाचे तुम्ही लिहिलेला ब्लॉग SEO फ्रेण्डली असणे गरजेचे आहे. असे केल्याने तुमचा ब्लॉग गुगलच्या सर्च रिझल्ट मध्ये येऊ लागेल आणि तुमच्या ब्लॉग वेबसाईटवर ट्राफिक देखील वाढू लागेल.
तुमच्या स्वतःचे तीस-चाळीस युनिक आर्टिकल बनवून झाल्यानंतर तुम्हाला तुमची ब्लॉग वेबसाईट ही गूगल अड्सेंस कडे अपृवल साठी सबमीट करावी लागेल. गुगल अड्सेंसचे अपृवल मिळाल्यानंतर तुमच्या ब्लॉग वेबसाईटवर विविध जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल.
जितके जास्त लोक तुमच्या वेबसाईट वर दररोज विजीट करू लागतील तितके जास्त तुमच्या ब्लॉग वेबसाईटवर जाहिराती दिसू लागेल आणि जितक्या जास्त प्रमाणात त्या जाहिरातींवर युजर द्वारे क्लिक करण्यात येईल तितके जास्त पैसे ब्लॉग वेबसाईट द्वारे तुम्ही कमवू शकाल.
ऑनलाईन मधुन पैसे कमवायचे मार्ग
मित्रांनो या व्यतिरिक्त देखील इंटरनेटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पर्यायाने पैसे कमवू शकतो. आणि हे सर्व पर्याय असे आहे की यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज देखील पडत नाही. बरेच लोक हे काम फुल टाइम करतात तर काही लोक आपला नोकरीधंदा सांभाळून पार्ट टाइम हे काम करीत असतात.
इथे आम्ही तुम्हाला जे काही पर्याय सांगितले आहे त्याद्वारे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला वेळ देणे देखील खूप गरजेचे आहे कारण इथे असे होत नाही की तुम्ही आज तुमचे ऑनलाईन पैसे कमवण्याची सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला त्या दिवसापासून पैसे मिळणे चालू होईल. त्यामुळे तुमच्यामध्ये संयम असणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
जसे जसे तुम्हाला लोक या प्लॅटफॉर्मवर ओळखू लागतील तुमचे नाव बनू लागेल तसे तसे तुमच्या नावाप्रमाणे तुमच्याकडे येणारा पैसा देखील वाढत जाईल. आम्ही आशा करतो की घरी बसून पैसे कसे कमवावे या आजच्या लेखामध्ये आम्ही जी काही आपल्याला माहिती सांगितली आहे ती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडली असल्यास या लेखाला तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपली याविषयी काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
READ MORE POSTS
Post Views: 6,848