भाषणाची सुरुवात कशी करावी | Free Learn How to Start Speech in Marathi in 2023

Share this

How to Start Speech in Marathi: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये भाषणाची सुरुवात कशी करावी याविषयी काही टिप्स देणार आहोत. या आर्टिकल द्वारे सांगितल्या जाणाऱ्या भाषणाविषयी खास टिप्स सर्वांच्या उपयोगात येतील. तुम्ही जर विद्यार्थी असाल, प्रोफेशनल असाल किंवा तुम्ही जर ट्रेनर असाल तरी देखील आम्ही सांगितलेल्या टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरतील.

How to Start Speech in Marathi in 2023

आपण असा विचार करून की समजा तुम्ही एक ट्रेनर आहात आणि तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगची सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी आहात आणि तुम्हाला भाषण करायचे आहे. किंवा तुम्ही एक प्रोफेशनल आहात आणि तुम्हाला तुमच्या प्रेझेन्टेशनची सुरुवात करायची आहे.

तर तुमच्या भाषणाची सुरुवात तुम्ही नेहमी अशी केली पाहिजे की भाषणाच्या सुरुवातीलाच जणू जोरदार धमाका झाला आहे आणि सर्वांचे लक्ष तुमच्याकडे पूर्णपणे केंद्रित झाले पाहिजे.

भाषणाची सुरुवात तुम्ही नेहमी उत्कृष्ट पद्धतीने केली पाहिजे कारण असे म्हटले जाते की A good beginning makes a good ending म्हणजेच चांगली सुरुवात चांगली शेवट करते. जर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात उत्कृष्ट पणे केली तर अर्ध काम तुमचं तिथेच पूर्ण झालेले असते.

त्यामुळे मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहे की आपण भाषणाची सुरुवात चांगली का केली पाहिजे? तसेच भाषण किव्वा बोलण्याची सुरू करताना कुठल्या 3 गोष्टी केल्या पाहिजे आणि 3 स्टेप्स ज्याच्या सहाय्याने तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने भाषणाची किवा बोलण्याची सुरुवात करू शकता.

How to Start Speech in Marathi | भाषणाची सुरुवात कशी करावी
How to Start Speech in Marathi

3 Steps of How to Start Speech in Marathi

सर्वात अगोदर आपण हे बघू की आपल्या भाषणाची सुरुवात चांगल्या पद्धतीने होणे का गरजेचे आहे? त्याचे उत्तर आहे की आपल्या समोर उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेता यायला पाहिजे. असे समजा की कोणीतरी नुकतेच भाषण करून गेले आहे किंवा तुमच्या भाषणाच्या नंतर कुणीतरी आणखीन एखादी व्यक्ती भाषण करणार आहे.

होय हे खरोखरच अतिशय महत्त्वाची आहे की आपल्या समोर उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष आपण वेधून घेतले पाहिजे. जर तुम्हाला सर्वांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे भाषणाची सुरुवात करण्यापूर्वीचे काही सेकंद असतात.

जेव्हा तुम्ही भाषण करण्यासाठी स्टेजवर येतात किंवा प्लॅटफॉर्मवर येतात आणि जर तुम्ही सर्वांची लक्ष तुमच्याकडे केंद्रित नाही करून घेतले तर पुढील परिस्थिती फार अवघड होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला सर्वांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील.

How to Start Speech in Marathi | भाषणाची सुरुवात कशी करावी
How to Start Speech in Marathi

भाषण कसे करावे सोपी पद्धत | Learn How to Start Speech in Marathi

दुसरे कारण असे आहे की भाषणाची सुरुवात करताना कंट्रोल असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी भाषण करण्यासाठी स्टेजवर जाणार तेव्हा तुमचा स्वतःवर कंट्रोल असणे गरजेचे आहे. कारण एकदा जर हा कंट्रोल तुमच्या समोर उपस्थित लोकांच्या ताब्यात गेला. तर तुमचे भाषण उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकणार नाही.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाषण मार्फत हा कंट्रोल पूर्णपणे तुमच्या ताब्यात घ्यायचा आहे आणि समोरच्याला तुम्ही काय बोलत आहात हे ऐकण्यासाठी भाग पाडायचे आहे. अन्यथा तुमच्या समोर उपस्थित असलेले लोक हे आपसात चर्चा करू लागतील आणि एकमेकांसोबत बोलू लागेल.

त्यामुळे तुम्ही काय बोलत आहात याकडे कोणाचेच लक्ष नसेल. बर्‍याचदा तुम्ही देखील असे बघितले असेल की जी व्यक्ती भाषण करण्यासाठी आलेली आहे. त्याचा जर स्वतःवर आत्मविश्वास नसेल आणि ती व्यक्ती काय बोलत आहे याच्याकडे कुणाचीच लक्ष नसेल.

तर यामुळे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना भाषणाचा कंटाळा येऊ लागतो आणि हे भाषण कधी संपेल याची लोकं वाट बघू लागतात. अशा परिस्थितीत लोक एकमेकांसोबत चर्चा करू लागतात किंवा आपले मोबाईल ओपन करून त्यामध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करू लागतात.

त्यामुळे आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यावर आपला कंट्रोल असणे हे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात पूर्ण आत्मविश्वासाने केली तर तुमचे भाषणावर लोकांचे लक्ष केंद्रित होऊ लागते आणि तुम्ही काय बोलत आहात याकडे लोक पूर्णपणे लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागतात.

सभेत कसे बोलावे? Sabhet Kase Bolave?

How to Start Speech in Marathi | भाषणाची सुरुवात कशी करावी
How to Start Speech in Marathi Full Details

भाषण करताना या तीन गोष्टींचा वापर केला पाहिजे | Learn How to Start Speech in Marathi

ताठ मान करून बघणे:

जेव्हा पण तुम्ही भाषण करण्यासाठी स्टेज किंवा प्लॅटफॉर्मवर येणार तेव्हा सुरुवातीला काहीच न बोलता ताठ मानेने तुम्हाला समोर बसलेल्या सर्व लोकांकडे फक्त दोन ते तीन सेकंड बघायचे आहे. परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला दोन ते तीन सेकंड पेक्षा जास्त समोरील लोकांकडे ताठ मानेने बघायचे नाही.

हावभाव निर्माण करणे:

तुमच्या समोरील लोकांकडे ताठ मानेने बघून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे भाषण कुठल्या विषयावर आहे. त्याप्रमाणे तुमच्या चेहर्‍यावर भाव निर्माण करायचा आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल की आपल्या चेहऱ्यावर आपण नऊ प्रकारचे हावभाव निर्माण करू शकतो. जसे की राग, दुःख, आनंद, भाऊक, भीती, हसणे इत्यादी.

त्यामुळे जर तुमच्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी एखादा विनोद करायचा असेल तर तुमचा चेहऱ्यावर हसू असणे गरजेचे आहे. थोडक्यात काय तर तुमच्या बोलण्याचा जो काही विषय आहे त्याच्याशी संबंधित तुमच्या चेहऱ्यावर हावभाव असणे हे देखील तितकेच गरजेचे असते. Read more: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र PDF आणि संपूर्ण माहिती

जर तुम्हाला एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करायची असेल तर सहाजिकच तुमच्या चेहऱ्यावर आनंदी किंवा हसू असलेले भाव चालणार नाही. तसेच जर तुम्हाला प्रेरणादायी भाषण करायचे असेल तर तुमचा चेहऱ्यावरची इतका आत्मविश्वास दिसला पाहिजे की तुम्ही काय बोलत आहात हे समोरच्याला मनापासून पटले पाहिजे.

चांगले भाषण करण्यासाठी काय आवश्यक आहे?
How to Start Speech in Marathi

भाषणाची तयारी कशी करायची ? | Know How to Start Speech in Marathi

देहबोली वापरणे:

तसेच तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही बोलण्याची सुरुवात कराल तेव्हा तुम्ही तुमचे हात खिशात ठेवू नका, हाताची घडी घालून उभे राहू नका, हात मागे करून उभे राहू नका. जेव्हा पण तुम्हाला इतरांसमोर बोलायचे असेल तेव्हा तुमचे दोन्ही हात मोकळे असणे गरजेचे आहे यालाच आपण इंग्लिश मध्ये (Open Body Language) ओपन बॉडी लँग्वेज असे बोलतो. Read more: मुलांना चांगल्या सवयी व संस्कार कशे करावे

थोडक्यात काय तर तुम्हाला कोणासोबत ही संवाद साधताना तुमचे हात मोकळे करून बोलायचे आहे तसेच बोलतांना तुम्हाला हातवारे करून बोलायचे आहे आणि यासाठी तुमच्या शरीराचा देखील बोलताना वापर करायचा आहे. नेहमी स्टेजवर बोलताना तुम्ही स्वतःला एखाद्या टेबलच्या मागे किंवा स्टेजवर ठेवलेल्या पोडियम मागे लपविण्याचा प्रयत्न करू नका.

या उलट तुम्ही सर्वांसमोर मोकळ्या मनाने उभे राहिले पाहिजे. जेव्हा पण तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये ओपन बॉडी लँग्वेजचा उपयोग करून लागतात. त्याचा देखील तुम्हाला कंट्रोल मिळवण्यासाठी फायदा होतो आणि त्यामुळे तुम्ही तुमची बोलण्याची सुरुवात उत्कृष्टपणे करू शकतात. अशाप्रकारे नेहमी भाषण सुरू करताना आपण या तीन गोष्टींचा वापर केला पाहिजे.


चांगले भाषण कशे करावे?
How to Start Speech in Marathi

उत्कृष्ट भाषण किंवा बोलण्याची सुरुवात केली पाहिजे?

प्रश्न विचारणे:

जेव्हा पण तुम्ही भाषणाची किंवा बोलण्याची सुरुवात कराल तेव्हा लगेच मूळ विषयावर येऊ नका. असे केल्याने तुमच्या समोर उपस्थित असलेले लोक तुमच्याकडे ताबडतोब लक्ष देणार नाही आणि तुमचे बोलणे सुरू होण्यापूर्वी ते जे काही करत असेल तीच गोष्ट ते पुढे देखील करत राहतील. त्यामुळे तुम्हाला जर सर्वांचे लक्ष तुमच्याकडे केंद्रित करायची असेल.

तर तुमचे भाषणाच्या किंवा बोलण्याच्या सुरुवातीला तुम्ही त्यांना तुमच्या विषयाशी संबंधित एखादा प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यामुळे सर्व लोक लगेच तुम्ही काय बोलत आहात याकडे लक्ष देऊन लागेल आणि तुम्हाला त्यांच्यावर कंट्रोल करण्याची एक चांगली संधी देखील मिळते.

तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर एखादा सेल्स कॉल आला असेल तर तुम्ही हे निरीक्षण केले आहे का की सेल्स कॉल करणारी व्यक्ती कधीही तुम्ही फोन उचलल्यावर त्यांच्या प्रोडक्टची माहिती देण्यास सुरुवात करत नाही. या उलट ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात. जसे की मिस्टर कुलकर्णी बोलत आहे का? किंवा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करता का?

असे प्रश्न विचारल्या मुळे समोरील व्यक्ती तुम्ही काय बोलत आहे याकडे लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यामुळे फोनवर बोलणारी व्यक्ती सेल्स कॉल करणार्‍याच्या कंट्रोलमध्ये देखील येऊ लागते. त्यामुळे सर्वात पहिला पर्याय हा आहे की तुमच्या भाषणाची किंवा तुमच्या बोलण्याची सुरुवात तुम्ही एखाद्या प्रश्ना विचारून करावी?

उदाहरणार्थ (How to Start Speech in Marathi) जर तुम्ही मार्केटिंग कंपनीचे ट्रेनर असेल तर तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांना विचारू शकता की तुमच्यापैकी किती लोकांना मार्केटिंग विषयी माहिती आहे? किंवा तुमच्यापैकी किती लोक असे आहे ज्यांनी यापूर्वी देखील मार्केटिंग केली आहे? असे केल्याने तुमच्या समोर बसलेले सर्व लोकं तुमच्या प्रश्नाकडे आणि तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतात.

परंतु तुम्ही प्रश्न विचारताना हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की तुमचा प्रश्न इतका सोपा असला पाहिजे की समोर उपस्थित असलेल्या सर्वांना त्याचे उत्तर माहिती असेल.

How to start speech in marathi
How to Start Speech in Marathi

सुविचार किंवा वस्तुस्थिती सांगणे:

बोलण्याची किंवा भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही एखादा सुविचार देखील वापरू शकता. जसे की “इच्छा असेल तर मार्ग मिळतोच”. किंवा असा एखादा सुविचार जो समोर बसलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेईल आणि हा सुविचार तुमच्या विषयाशी निगडित असने देखील तितकेच गरजेचे आहे.

या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या वस्तुस्थितीचा देखील बोलण्यापूर्वी उपयोग करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे का कि मागील वर्षी जवळजवळ 45% विद्यार्थ्यांनी मार्केटिंग हा विषय निवडला. अशा प्रकारे जर बोलण्याची सुरुवात तुम्ही एखादा सुविचार किंवा वस्तुस्थिती सांगून केले तरी देखील सर्वांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाते.

How to do speech in marathi
How to Start Speech in Marathi

गोष्ट किंवा कहानी सांगणे:

भाषणाची किंवा बोलण्याची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही येऊन उभी रहा, ताठ मानेने सर्वांकडे बघा, तुमच्या विषयाशी संबंधित चेहऱ्यावर हावभाव निर्माण करा आणि जो काही तुमचा विषय असेल त्याच्याशी निगडीत एखादी छोटीशी गोष्ट तुम्ही सांगण्यास सुरुवात करा.

आता ही गोष्ट कदाचित तुमच्या स्वतःची असू शकते किंवा एखादी अशी गोष्ट किंवा घटना जी तुमच्या विषयाशी निगडित आहे. उदाहरणार्थ मी तीन वर्षांपूर्वी तुमच्या सारखाच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर नोकरी करण्यास सुरुवात केली आणि आज तुमच्यासमोर मी एक ट्रेनर म्हणून उभा आहे.

परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही जी कुठली गोष्ट किंवा घटना सांगणार आहे ती छोटी असावी आणि त्या गोष्टीमध्ये काहीतरी प्रेरणादायी असणे गरजेचे आहे. ज्यामुळे समोरच्याला ऐकतांना तुमच्या बोलण्यामुळे आत्मविश्वास वाटू लागेल. अशाप्रकारे तुम्ही एखादी छोटीशी गोष्ट किंवा कहाणी सांगून तुमच्या भाषणाची उत्कृष्टपणे सुरुवात करू शकता आणि सर्वांचे लक्ष तुमच्याकडे केंद्रित करून घेऊ शकता.

तर मित्रांनो हे आहेत ते तीन मुद्दे ज्यांचा तुम्हाला (How to Start Speech in Marathi) भाषण करताना वापर करायचा आहे आणि तीन मार्ग ज्यांच्या मदतीने तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने तुमच्या भाषणाची किंवा बोलण्याची सुरुवात करू शकता तसेच समोर उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष तुमच्याकडे केंद्रित करून घेऊ शकता.

How to Start Speech in Marathi

आम्ही आशा करतो आमचा (How to Start Speech in Marathi) भाषणाची सुरुवात कशी करावी हा आर्टिकल आपल्याला नक्की आवडला असेल आणि या विषयी आपले काय मत आहे हे आम्हालाच कमेंट करून नक्की कळवा.

READ MORE POSTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top