10 Good Habits for Kids in Marathi for bright future | मुलांना चांगल्या सवयी व संस्कार कशे करावे

Share this

Good habits for kids in marathi: अस म्हणतात की मुलं मोठ्यांच बघून अनुसरण करतात. त्यांच्या सवयी, बोलण्याची पद्धती, विचार करणे, इत्यादी. मुलांसाठी त्यांचे पालकच त्यांचा आदर्श असतात. अडचणी आल्यावर पालकच मुलांना शिकवत असतात आणि त्यांची मदतही करतात. जसंजसं मुलं मोठ होत ते पालकांचं अनुकरण करतात. मुलांच्या चांगल्या घडनांमध्ये पालकांचे महत्त्व ची भूमिका असते. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण आणि त्याची सवय लावणं देखील महत्त्वाचं असतं. काही चांगल्या सवयी ज्या मुलांमध्ये असायलाच हव्या. कोणत्या आहेत त्या दहा सवयी चला जाणून घेऊयात पण त्याआधी अशाच पोस्ट नियमित वाचण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला

नक्की जॉईन करा.

सकाळी लवकर उठणे

तर सर्वात पहिली सवय म्हणजे सकाळी लवकर उठण्याची. कुटुंबातील सदस्य खास करून आई आणि वडील जर सकाळी लवकर उठत असतील तर मुलांना ती सवय लागायला वेळ लागत नाही. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो ही भावना मुलांच्या मनात रुजवायला हवी. पालकांनी स्वतःपासून ही सुरुवात करावी. भविष्यातही वाढत्या वयात त्यांच्या मुलांचा फायदाच होईल. ते दिवसभर ताजेतवाने राहतील आणि आपोआपच रात्री लवकर झोपायची सवय सुद्धा त्यांना लागेल.

हात स्वच्छ धुणे

त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हात स्वच्छ धुणे. मुलांना बाहेरून आल्यावर किंवा खेळून आल्यावर जेवणाच्यापूर्वी हात धुवायला शिकवावं. हात न धुतल्याने मुलं आजारी होऊ शकतात असं त्यांना समजून सांगावं. जेवणापूर्वी हात धुण्याची चांगली सवय मुलांना नक्कीच लावावी.

सकाळी उठल्यावर अगोदर दात घासणे

सकाळी उठल्या उठल्या दात घासणे हि सवय खूप महत्वाची आहे. दररोज सकाळी उठल्यावर दात घासण्याची सवय मुलांना लावावी. दात न घासल्याने दातात कीड लागून दात खराब होऊ शकतात असं समजून सांगावं. दररोज दोन वेळा ब्रश करण्याची चांगली सवय मुलांना लावावी.

नियमितपणे नख कापणे

मुलांना नियमित नख कापण्याची सवय लावावी. नखांवर बसलेल्या घानीमध्ये जीवाणू असतात जे तोंडात नाकात किंवा परिच्छेद्वारे शरीरात सुद्धा प्रवेश करतात आणि विविध रोगांना जन्म देतात. मुलांना नखे कापण्यासाठी सांगावं जेणेकरून त्यांच्यावर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

वेळेवर आंघोळ करण्याची सवय

मुलांना नेहमी वेळेवर आंघोळ करण्याची सवय लावावी. मुलांना आंघोळीचे महत्व पटवन किती आवश्यक आहे यासाठी तुम्ही त्यांना आंघोळीचे फायदे, अंघोळीचे महत्त्व पटवून द्यावे. बादली किंवा टब मध्ये मुलं आंघोळ करत असतील तर त्यांना आंघोळीची मज्जा घेऊ द्यावी जेणेकरून ते त्रास देणार नाही. Read more: करोडोंचे कर्जही माफ होईल | कर्ज मुक्ती साठी उपाय

योग्य आणि पोषक आहारा

मुलांना योग्य आणि पोषक आहाराची सवय लावावी. ही प्रत्येक आईची काळजी असते की तिच्या मुलांनी सकस आहार घ्यावा पण ही सवय मुलांना फार लहान वयातच लागू शकते. म्हणून ज्या वेळेस मुलं शाळेत जायला लागतात त्यावेळी पासूनच त्यांना डब्यात पोषक पदार्थ देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांना घरच्या खाण्याची आवड निर्माण होईल.

नेहमी वस्तू जागेवर ठेवणे

आपल्या मुलांना नेहमी वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लावावी. घर आवरण म्हणजे प्रत्येक आईची कसरत असते. आपली खेळणी खेळून झाल्यावर त्यांच्या जागेवर ठेवन हे आपल्या मुलांना आपण अगदी लहान वयात शिकवलं पाहिजे. यासाठी आपण स्वतः रोज त्यांच्यासमोर खेळणी भरायला किंवा जागेवर ठेवायला सुरुवात करावी व त्यांना सुद्धा त्यात सहभागी करावं. हे काम न चिडता प्रेमानं करून घेतलं तर मुलांना ते करण्यात मज्जा येईल. प्रत्येक मूल वेगळं असतं त्याप्रमाणे त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल. पण आपलं सातत्य ठेवायला हवं. नुसतं सोप्यावर बसून त्यांना ऑर्डर दिल्यासारखे करू नये. यामुळेच मुलं मुजूर बनतात.

मोठ्यांचा आदर करणे

मुलांना नेहमी मोठ्या व्यक्तींचा आदर करायला शिकावं. आदर फक्त मनात असणं पुरेसं नाही. ते मुलांना कळत नाही. आदर कृती मधून दिसून येईल अशी शिकवण द्यावी त्यासाठी फक्त पाया पडून उपयोगाचे नाही. आपण बसलो आहोत आणि तिथे कोणी मोठी व्यक्ती आली तर आपण पटकन उठून त्यांना आरामशीर बसायला जागा करून द्यायला हवी. मोठ्यांसोबत जेवायला बसावं आणि ते आपल्याशी काय बोलत आहे ते मन लावून ऐकायला सांगावं. अशा गोष्टी जाणीवपूर्वक मुलांकडून करून घ्याव्यात. याबरोबरच वाईट न बोलणे किवा उलट उत्तर न देण्याची सवय सुद्धा अतिशय प्रेमान मुलांना लावावी.

सायंकाळी देवा जवळ प्रार्थना करणे

त्यानंतर सर्वात महत्वाच म्हणजे सायंकाळी पालकांनीच देवाजवळ प्रार्थना करणे. आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांनाच देवाजवळ प्रार्थना करायला वेळ नाही मग मुलांना ही सवय कशी लागणार. पालकांनी जर हे नियमना पाळला, तर मुलं पण त्याकडे आकर्षित होतात. रोज संद्याकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणायचा नित्यक्रम आपल्याकडून चुकायला नको. मुलांवर देवाजवळ प्रार्थना करण्याचे संस्कार फार लहान वयातच पडू शकतात. नंतर त्यांना या सवयी लावणं पालकांसाठी कठीण होऊ शकत. घरात आजी आजोबा असतील तर उत्तम पण नसतील तर आपण स्वतः याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. म्हणून किमान पाच मिनिटे तरी मुलांसोबत देवासमोर घालवावी. याचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो आणि मुलांना धार्मिक गोष्टीबद्दल आस्थाहि वाटू लागेल.

जेवताना श्लोक म्हणावे

यानंतर सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे जेवताना श्लोक म्हणणं किंवा अन्नाचा सन्मान करण्यास शिकवण. जेवणापूर्वीच्या प्रार्थनेलाही खूप महत्त्व आहे. या श्लोकाद्वारे किंवा प्रार्थनेद्वारे आपण पोटातल्या अग्नीची पूजा त्याला वंदन करतो. अन्नग्रहण हे एक पवित्र यज्ञ कर्म मानले जाते म्हणून ते विनम्र आणि समाधानानं करणं आवश्यक असते. आपल्या जगण्यासाठी पूर्णब्रह्म असलेलं अन्न प्राप्त करून दिल्याबद्दल या श्लोकात आपण देवाचं आणि निसर्गाचे आभार मानततो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. Read more: 8 सुख शांतीसाठी उपाय व तोडगे

Good Habits for Kids in Marathi

तर वरील दहा सवयी मुलांना योग्य वयात लागणं खूप महत्त्वाच आहे. आपण जर नोकरी करणारे असाल तर हे काम जरा अवघड वाटू शकतं पण अशक्य नाही. मुलं आपलं अनुकरण सर्वात आधी करतात आणि बाहेरच्या जगाची ओळख होण्याआधी परिवाराची ओळख होणं महत्त्वाचं असतं. त्यांना आपल्यातच एकरूप करावं. मुलांचं बालपण अनुभवन ही फार सुंदर आणि आनंद देणारी भावना आहे. आम्हाला याची कल्पपना आहे की हे करतांना तुमच्या मातृत्वाची कसोटी प्रत्येक पावलावर लागेल पण तुम्हाला हे सर्व नक्कींच जमून जाईल. देवावर विश्वास ठेवावा आणि कुटुंबाच्या मदतीने आव्हानं पार करत जावी. तुम्हाला नक्कीच मदत होईल. हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top