या गोष्टी कोणाकडूनही फुकट घेऊ नये, घरातील शांती आणि संपत्ती संपेल | Never Take These 5 Things from Anyone

Share this

We will talk about why never take these 5 things from anyone & 5 things never share with anyone, 5 things you should never share with anyone

.

कोणाचीही मदत करणे हि नक्कीच चांगली गोष्ट असते. तसंच कोणाकडूनही मदत घेतल्यामुळे कधी कमीपणायेत नाही. मात्र काही मदत करण्याच्या आणि मदत घेण्याच्या सवयींमुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनावधानान अशा काही चुका घडतात किव्वा होतात ज्याचा विपरीत परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो.

Never Take These 5 Things from Anyone in Marathi

आपण नकळतपणे अशाच काही गोष्टी घेत असतो किंवा करत असतो त्यामुळे आपल्या जीवनात संकटांना आमंत्रण मिळते. शास्त्रामध्ये काही गोष्टींबाबत असं सांगण्यात आले की पैसे न घेता किंवा कोणतीही वस्तू परत न देता आपण एखाद्याकडून एक वस्तू घेतली तर फक्त आर्थिकच नव्हे तर घरातील सुख शांतीमध्ये सुद्धा बाधा येऊ शकतात. पैसे न देता आपण काही गोष्टी चुकुनही घेण अपशकून मानला जातो.

आपल्या रोजचे जीवनात आपण एकमेकांसोबत काहीही अगदी सहजपणे शेयर करीत असतो. पण असे जरी असले तरी काही विशिष्ट गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करू नये नाहीतर वास्तुदोष उद्भवू शकतो. कोणत्या आहेत त्या वस्तू आणि कोणाकडून त्या फुकट का घेऊ नये चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सर्वात पहिली वस्तू म्हणजे रुमाल.

रुमाल फुकटात कधीही एकमेकांकडून घेऊ नये. एखाद्याकडून रुमाल घेतला किंवा वापरला तर त्यामुळे व्यक्तिमध्ये दुरावा निर्माण होत असतो. एखाद्या व्यक्तीकडून फुकटात रुमाल घेणं ही एक लहान गोष्ट जरी वाटत असली तरी लहानशा गोष्टीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो आणि त्या दुराव्यामुळे शत्रुत्व सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नेहमी रुमाल पैसे देऊनच खरेदी करावा. इतरांकडून मागून रुमाल कधीही वापरू नये. तसेच रुमाल कधीच भेट वस्तू म्हणून सुद्धा कोणालाही देऊ नये असे सांगण्यात येते.

दुसरी वस्तू म्हणजे सुई:

आपण शेजाऱ्यांना बऱ्याचदा सुई मागतो मात्र ती परत केली नाही आणि सतत आपण वापरत राहिलात तर ही सुई आपल्याला फुकटातच प्राप्त झाली ना. मग हीच फुकटात वापरलेली सुई तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढवू शकते आणि घरातील लोकांमध्ये प्रेम संबंध बिघडला आणि दुसऱ्याने दिलेली सुई हि आपल्याला बोचत असते असं सांगितलं जात. म्हणून कधीही कोणाकडून शिवणकामाची सुई मोफत घेऊ नये. यामुळे आपल्या वैवाहिक आणि प्रेमाच्या नात्यावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो असं म्हणतात. त्यासोबतच यामुळे आर्थिक नुकसानही वाढू शकतात आणि लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होऊ शकते. Read More: चांगला काळ येण्याआधी कोणती ७ लक्षणे दिसतात?

तिसरी वस्तू म्हणजे मीठ:

वास्तू आणि ज्योतिष शास्त्रनुसार मिठाचा संबंध शनि सोबत असतो. त्यामुळे ते कधीही इतरांकडून फुकटात किंवा मोफत घेऊ नये. मिठाचा फुकट वापर केल्यानंतर जीवनात आजार आणि कर्जाचा डोंगरही वाढतो. त्यामुळे आपण कोणाकडूनही मीठ मोफत घेऊ नये. यामुळे आजारपणाचा वेडखा आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना बसू शकतो. मीठ घेण्याबद्दल तशीच जर वेळ आली तर मीठा बदली दुसरी वस्तू विकत द्यावी.

Never Take These Things from Anyone

चौथी वस्तू म्हणजे तेल:

वैदिक स्थितीशास्त्रनुसार तेल सुद्धा कधीही कोणाकडूनही मोफत घेऊ नये. असे केल्याने शनिदेवाची अशुभ स्थिती आपल्याला पहावी लागू शकते. त्यामुळे कोणाकडूनही किव्वा शेजार्यांकडून कधीच तेल मागू नये किव्वा मोफत तेल आणून वापर करू नये. याउलट आपल्या घरातील जर तेल संपणार असेल तर शक्यतो उरलेले तेल संपण्यापूर्वीच दुकानातून परत तेल विकत घेऊन यावे. म्हणजे आपल्याला अचानक तेल मागण्याची गरजच पडणार नाही.

पाचवी वस्तू म्हणजे माचीस:

माचीस म्हणजे आगपेटी हि आग दर्शवते. त्यामुळे चुकूनही आगपेटी किंवा आगपेटीच्या काड्या आपण कोणाकडूनही मोफत घेऊ नये. यामुळे आपल्या घरात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला कोणत्या ना कोणत्या वस्तूची गरज असते. ती वस्तू आपल्याकडे नसेल तर ती कोणाकडूनही घ्यावी. मात्र मोफत घेऊ नये त्याबद्दल काही ना काही तरी वस्तू किंवा पैसे देऊनच ती वस्तू वापरावी. त्यामुळे जीवनात संकटांना आमंत्रण मिळत नाही. Read More: Which Laptop is Best for Drawing | Review & Details

शास्त्रामध्ये काही गोष्टींबाबत असं सांगितलं जातं की ज्या पैसे न देता घेताच, त्यामुळे फक्त आर्थिक नव्हे तर घरातील सुख शांती मध्ये सुद्धा बाधा येऊ शकते. पैसे न देता काही गोष्टी घेणं हा अपशकुन सुद्धा मानला जातो. म्हणूनच कधीही या गोष्टी दुसऱ्याकडून घेताना सावधगिरीने घ्याव्या किंवा त्या बदल्यात दुसऱ्या वस्तू त्यांना परत द्यावे. तुम्ही कधी दुसऱ्याकडून या गोष्टी मोफत घेतल्यात का आणि त्यामुळे तुमच्या सुख संपत्तीवर काही परिणाम जाणवलाय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

आशा करती आजची पोस्ट (Never Take These 5 Things from Anyone) नक्कीच आवडली असेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि आम्ही या पोस्टच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेयर देखील नक्की करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top