YouTube shorts काय आहे? युट्यूब शोर्टसची पूर्ण माहिती

Share this

बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल कि YouTube shorts काय आहे? पण आपणा सर्वानीच मागच्या काही दिवसापूर्वी चीन या देशाने बनविलेल्या Tiktok या एप्लिकेशनला मोबाईल मधून डिलीट केले असेलच त्याचीच कमी दूर करण्यासाठी YouTube shorts हे नवीन फिचर युट्यूबने बनविले आहे. खरेतर Tiktok मुळे जगभरातून बरेच लोक युट्यूब पासून दूर गेली होती आणि आपला प्रेक्षक वर्ग टिकवून ठेवण्यासाठी युट्यूब शोर्टसची निर्मिती करण्यात आली आहे. या पोस्टच्या मार्फत आम्ही आपल्याला सांगणार आहोत कि YouTube Shorts काय आहे? युट्यूब शोर्टस कसे वापरावे.

YouTube shorts काय आहे?

युट्यूब द्वारे या फिचरला सप्टेंबर 2020 मध्ये सुरु करण्यात आले आहे आणि यात आपण साधारण 15 sec पर्यंत व्हिडीओ तयार करू शकतो. तुम्ही शोर्टसया icon वर क्लिक केल्यावर लगेच त्तुमच्या समोर नव-नवीन शोर्टस व्हिडीओ येण्यास सुरुवात होईल. आपल्याला नवीन शोर्टस व्हिडीओ पाहण्यासाठी फक्त स्क्रीनला खालून वरच्या बाजूला swipe करायचे आहे. स्क्रीन वर आपल्याला Like, deslike, comments आणि share अशे पर्याय देखील पाहायला मिळतात.

युट्यूब शोर्टस बनविण्याचे काय कारण आहे?

जसे कि आपणा सर्वाना हे माहित आहे कि आजच्या या धावपळीच्या युगात थोडक्यात सांगता येतील अशा गोष्टींची मार्केट मध्ये जरा जास्तच डिमांड आहे. त्यामुळे शोर्टस व्हिडीओ हे देखील आजच्या काळाची गरज बनली आहे. यात कुठल्याही प्रकारचे आपण स्वताचे content उपलोड करू शकतो. मात्र या करिता एव्हडीच अट आहे कि आपला व्हिडीओ 15 सेकंद पेक्षा कमी असावा. आजकाल शोर्टस व्हिडीओ बनविण्याची पद्धत आली आहे. प्रत्येक जन कोणत्या न कोणत्या कारणाने स्वतःचे शोर्टस व्हिडीओ बनवून सोशल मिडिया वर पोस्ट करीत असतात.

युट्यूब शोर्टस व्हिडीओ कसे बनवायचे?

युट्यूब शोर्टस व्हिडीओ बनविण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम युट्यूब या एप्लिकेशनला सुरु करावे लागेल. त्यानंतर यात आपल्याला YouTube या नावाच्या बाजूला शोर्टसचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर उजव्या बाजूस तुम्हाला कॅमेराचे ऑप्शन दिसेल.

1) आता युट्यूब शोर्टस व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी Red बटन वर क्लीच्क करा.

2) तुमच्या समोर एक प्रोग्रेस बार दिसेल जे तुमचे व्हिडीओ रेकॉर्ड करेल.

3) शोर्टस व्हिडीओ रेकॉर्ड झाल्यावर यात तुम्हाला Music, Text, Timeline हे ऑप्शन दिसेल. आपल्या आवश्यकते नुसार आपण पाहिजे ते पर्याय निवडू शकतात.

4) Next बटन वर क्लिक केल्यावर आपल्या समोर Add details हे ऑप्शन येईल यात आपल्याला शोर्टस व्हिडीओचे Title add करायचे आहे. Select audience वर क्लिक करून हा व्हिडीओ लहान मुलां साठी आहे का नाही? हे सेलेक्ट करावे.

5) Upload या बटन वर click करून आपण बनविलेला शोर्टस व्हिडीओ publish करावा. म्हणजे व्हिडीओ पूर्णपणे अपलोड होईल.

युट्यूब शोर्टस व्हिडीओचे ऑप्शन आपल्याला फक्त Android mobile वरच वापरता येतात.. कारण desktop मध्ये हे ऑप्शन अजून आलेले नाही.

युट्यूब शोर्टसची अधिक माहिती

तुम्हाला हे माहित आहे का जगातील बऱ्याच लोकांनी YouTube ला आपले प्रोफेशन बनविले आहे आणि ते युट्यूबच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतात. आज पूर्ण जगभरात युट्यूबचे 2.3 बिलियन्स पेक्षा जास्त user बनले आहेत. जे ह्या platform वर रोज नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी येतात. संपूर्ण जगात युट्यूब हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्च इंगीन आहे. आपण देखील या platform च्या माध्यामातून लोकांना आवडेल, त्यांचे अधिक मनोरंजन होईल अशे सुंदर शोर्टसची व्हिडीओ निर्माण करा आणि युट्यूब शोर्टसवर अपलोड करा. तुम्ही देखील युट्यूब शोर्टसच्या माध्यमातून नाव आणि पैसा कमवू शकतात.

युट्यूब शोर्टस व्हिडीओ कसे जास्त चालतात आणि व्हायरल होतात.

युट्यूबचा कंपनीचे स्वताचा काही algorithm आहेत. आपण अपलोड केलेले सर्व व्हिडीओ युट्यूबचे boats मॉनिटर करत असतात. त्यामुळे व्हिडीओ अपलोड करताना title योग्य ते द्यावे तसेच hashtag चा उपयोग करावा. जसे जसे त्या व्हिडीओला लोग पूर्ण किव्वा साधारण पणे ७०% ते ८०% पाहू लागतात तसे तसे त्या व्हिडीओला युट्यूब द्वारे आणखी लोकांना सजेस्ट केले जाते. त्यामुळे तो युट्यूब व्हिडीओ जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहचू लागतो आणि अशा प्रकारे व्हिडीओ वायरल होतो. कुठलाही युट्यूब व्हिडीओ चालण्यासाठी योग्य keyword वापरणे खूप गरजेचे असते. तर आता आपल्या लक्षात आले असेल कि YouTube shorts काय आहे? आणि ते कसे वापरावे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top