बरेच लोक इंटरनेट वर सर्च करीत असता “अति विचार करणे कसे थांबवावे म्हणजेच”, “HOW TO STOP OVERTHINKING”. जर तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल आणि तुमच्या मनात सुरू असलेले हे विचार येणे तुम्ही थांबवू शकत नसाल. तसेच सतत विचार केल्याने तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खचत चालले असाल. तर आजचा हा आमचा लेख तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आम्ही यामध्ये तुम्हाला 5 सोप्या पद्धती सांगितल्या आहे. या 5 पद्धतींचे तुम्ही नियमित पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील ताण तणावावर आणि कुठल्याही गोष्टीचा अति विचार करण्याच्या सवयीवर नियंत्रण करू शकतात. या आर्टिकल मध्ये आम्ही प्रसिद्ध लेखक डेल कार्नेगी यांच्या How to Stop Worrying and Start living या पुस्तकातील पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
HOW TO STOP OVERTHINKING IN MARATHI
Remember that no one ever kicks a dead dog (worrying about criticism) 1929 साली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामुळे शैक्षणिक विभागात खूप मोठी खळबळ उडाली होती. हा कार्यक्रम पाहण्यासाठी अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक शिकागोमध्ये जमा झाले होते. त्याचे कारण असे होते की एक मुलगा जो हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करीत होता, त्यानंतर त्याने लाकूड तोडण्याची काम केले, त्यानंतर एका कपडे धुण्याच्या दुकानांमध्ये त्याने सेल्समनची नोकरी केली. त्यानंतर अखेर तो अमेरिकेतील सर्वात टॉपच्या युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट झाला. त्यावेळेस त्याचे वय फक्त छत्तीस वर्ष होते आणि या मुलाचे नाव होते रॉबर्ट मेनार्ड हचकिंस. हे सर्व पाहून वयस्कर प्राध्यापकांना या गोष्टीचा खूप राग आला. कारण ते या पदावर इतक्या वर्षांचा अनुभव असून देखील पोहोचू नव्हते शकले. बरीच लोक अशी चर्चा करत होते कि या मुलाला तर अजिबात अनुभव नाही, बऱ्याच लोकांचे म्हणणे होते कि हे सर्व काही चुकीचे घडलेले आहे. इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रांमध्ये देखील या मुलाविषयी अपमानास्पद आणि वाईट लिहिले जायचे. एके दिवशी रॉबर्टचा मित्र असे बोलला की मी आज वर्तमानपत्र वाचत होतो आणि त्यामध्ये रॉबर्ट विषयी खूप काही चुकीचे लिहिले होते. हे वाचून मला तुमच्या मुलाविषयी खूप वाईट वाटले. तुम्हाला देखील या गोष्टीचे वाईट वाटते का? त्यावर रॉबर्टच्या वडिलांनी उत्तर दिले की नाही मला हे सर्व वाचून वाईट वाटत नाही. कारण कोणीही मेलेल्या कुत्र्याला लाथ मारत नाही. याचा अर्थ असा होता की लोकांना अशाच व्यक्तींविषयी वाईट बोलायला आवडते जे खरोखरच प्रसिद्ध आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही विशेष असे केलेच नाही तर लोकं तुमच्या विषयी कधीच चर्चा करणार नाही.
तसेच एकदा वेल्सचा राजपुत्र जे पुढे जाऊन आठवे एडवर्ड बनले. ते जेव्हा 14 वर्षाचे होते आणि नौदल ॲकॅडमी मध्ये शिक्षण घेत होते. एके दिवशी तेथील नौदल ऑफिसरने हे पहिले कि तो राजपुत्र किनाऱ्यावर बसून खूप रडत होता. त्या ऑफिसरने राजपुत्राला त्याचे रडण्याचे कारण विचारले. तर तो म्हणाला की मला सर्व मुलं रोज लाथ मारतात. त्यानंतर त्या ऑफिसरने तेथील इतर मुलांना बोलावले आणि त्या राजपुत्राला लाथ मारण्याचे कारण विचारले. खूप जास्त चौकशी केल्यावर त्या मुलांनी उत्तर दिले कि आम्हाला माहित आहे की भविष्यात जेव्हा आम्ही मोठे होऊ तेव्हा याच राजपुत्राच्या सैन्यामध्ये आम्ही कमांडर किंवा कॅप्टन अशा पदावर नोकरी करणार आहोत. शेवटी आम्हाला याच्याच हाताखाली नोकरी करायची आहे. त्यामुळे आमच्याकडे देखील बोलण्यासारखे असायला पाहिजे की आम्ही देखील या राजपुत्राला लाथा मारल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती तुमच्या विषयी वाईट बोलत आहे. म्हणजेच त्याला तुम्ही महत्वाची व्यक्ती आहे असे वाटत असते. ते लोकं हे गोष्ट मान्य करतात की तुम्ही खरेच असे काहीतरी काम केले आहे ज्यामुळे तुम्हाला महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे लोक जर आपले विषयी वाईट बोलत असेल तर आपल्याला अति विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही.
HOW TO TRAIN YOUR BRAIN | अति विचार करणे कसे थांबवावे
Don’t worry about ingratitude: आनंद मिळविण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे आनंद देणे होय. एक व्यक्ती होता. त्याला नेहमी असेच वाटायचे कि त्याच्या सावत्र मुलांनी त्याचे कधीच कौतुक केले नाही. त्यांनी एका विधवा महिले सोबत लग्न केले होते आणि पैसे उधार घेऊन त्याने तिच्या या दोन मुलांचे सांभाळ देखील केले होते. त्याने या मुलांना खूप चांगले शिक्षण देखील दिले तसेच तो त्याच्या परिवारासाठी एखाद्या मजूरा प्रमाणे काम करीत राहिला. कारण त्याला त्याच्या परिवारातील सदस्यांचे स्वप्न, इच्छा, अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या. हे सर्व करत असताना त्याने एकदाही या विषयी कधीच तक्रार देखील केली नाही. त्याच्या या कार्यासाठी त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांनी त्याचे एकदाही आभार मानले नाही. कारण त्याच्या परिवाराला वाटायचं की तो जे काही करत आहे हे त्याचे कर्तव्य आहे. यावर लेखकाचे असे म्हणणे आहे की यामध्ये खरी चूक कोणाची आहे. ज्यांनी आभार मानले नाही त्यांची की ज्याने आभाराची अपेक्षा ठेवली त्याची? यावर लेखक असे म्हणतात की यामध्ये त्याच्या पत्नीची आणि त्याच्या मुलांची तर चुकी आहेस परंतु त्या व्यक्तीची देखील चूक आहे. ज्याने ही अपेक्षा ठेवली की त्यांने केलेल्या कामाबद्दल लोक त्याचे आभार मानतील, त्याचे कौतुक करतील. याचे कारण असे आहे की मनुष्याचा स्वभावच असा असतो की त्याचे काम झाल्यानंतर तो उपकार विसरून जातो. कारण लोकं सकारात्मक गोष्टींच्या ऐवजी नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करतात.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या परिवारासाठी दहा करोड रुपये ठेवले तर ते तुमचे कौतुक करतील? अँड्र्यू कार्नेगी यांनी देखील हेच केले होते. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या परिवारासाठी दहा करोड रुपये ठेऊन गेले होते. परंतु अँड्र्यू कार्नेगी त्यांच्या समाधीतून उठून बाहेर जरी आले असते हे ऐकण्यासाठी कि त्यांचा परिवार त्यांच्या विषयी काय बोलत आहे. तर त्यांचा परिवार देखील त्यांच्याविषयी वाईटच बोलत असेल. याचे कारण असे होते की त्यांच्या परिवाराला या गोष्टीचे आनंद नव्हते की अँड्र्यू कार्नेगी यांनी त्यांच्यासाठी दहा करोड रुपये ठेवले होते. परंतु या गोष्टीचे दुःख वाटत होते की अँड्र्यू कार्नेगी यांनी तीन हजार करोड रुपये दान केलेले होते. त्यामुळे लेखक असे सांगतात की जर तुम्ही इतरांसाठी काही चांगले कार्य करत असाल तर त्यांच्याकडून तुम्ही आभाराची अपेक्षा अजिबात ठेवू नका. उलट जर तुम्ही कोणासाठी काही करत असाल तर त्यामध्ये तुम्ही तुमचं सुख शोधलं पाहिजे.
ताण तणाव आणि अति विचार करणे कसे थांबवावे
Stop Loss: अति विचार करण्यापासून जर तुम्हाला दूर राहायचे असेल तर पुढची पद्धत आहे स्टॉप लॉस. लेखक असे सांगतात की त्याने ट्रेडिंगची प्रोसेस स्टॉप लॉसला आपल्या जीवनावर देखील वापरून बघितले. यामध्ये त्यांनी असं सुनिच्छित केलं होतं की एका विशिष्ट वेळेपेक्षा जास्त ते कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही. ते उदाहरण देताना असे सांगतात की ते दररोज जेवतांना त्यांच्या मित्राची वाट बघायचे. परंतु त्याच्या मित्राला कितीही बोलावले, कितीही फोन केले तरीही तो अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जेवणासाठी यायला लावायचा. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवनात स्टॉप लॉस ही स्टेप वापरली आणि त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितले की जर तू जेवायला दहा मिनिटात आला नाही तर मी माझे जेवण करून घेईल. असे केल्यामुळे त्यांचा विनाकारण वाया जाणारा वेळ देखील वाचू लागला आणि त्यांनी अतिविचार करणे देखील बंद केले. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जास्त त्रास होत असेल तर त्या विषयावर तुम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त विचार करू नये आणि लगेचच स्वतःला दुसऱ्या कामांमध्ये गुंतवून घ्यावी. असे काम निवडावे की जे करतांना तुम्हाला आनंद मिळतो.
HOW TO CONTROL OVERTHINKING
What is the worst that can happen: एका ऑइल कंपनीच्या डीलरला असे कळाले की त्याच्या कंपनीतील काही कामगार कंपनीमध्ये गैरव्यवहार करीत आहे. ते ग्राहकांना कमी ऑइल देत आहे आणि उरलेले ऑइल गुपचूप दुसर्या लोकांना विकत आहे आणि अशाप्रकारे ते कामगार पैसे कमवत आहे. ही गोष्ट त्या डीलरला एका पोलिस ऑफिसर कडून समजली. त्यानंतर ह्या पोलिस ऑफिसर ने डीलरला धमकावणे सुरू केले की जर त्याने त्याला पैसे नाही दिले तर तो त्याची कंपनी बंद करून टाकेल आणि त्याला जेलमध्ये टाकले. पोलीसच्या या धमकीला तो डीलर घाबरला आणि या घटनेचा तो अति विचार करू लागला. त्याने या गोष्टीचा खूप जास्त विचार केला आणि त्यामुळे त्याची तब्येत खराब होऊ लागली. त्याला हा प्रश्न पडला होता की त्या पोलिसाला लाच द्यायची की नाही कारण त्याची यात चूक काहीच नव्हती सर्व सुख तर त्याच्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी केले होते. त्यानंतर डीलरने स्वतःलाच तीन प्रश्न विचारले. 1) सर्वात वाईट गोष्ट काय होऊ शकते? त्याला या प्रश्नाचे उत्तर असे मिळाले की यात सर्वात वाईट हेच घडू शकते की सरकार त्याची कंपनी बंद करून टाकेल. परंतु त्याला जेलमध्ये नाही जावे लागणार नाही कारण यामध्ये त्याची कुठलीच चूक नव्हती. 2) जर अशी वाईट परिस्थिती आलीच तर त्यानंतर काय होईल? यावर त्याला असे उत्तर मिळाले की जास्तीत जास्त त्याला एखादी नोकरी करावी लागेल. परंतु मुळातच त्याची या उद्योगात बऱ्याच लोकांसोबत, व्यावासायीकांसोबत चांगले संबंध असल्यामुळे त्याला कुठलीही मोठी कंपनी चांगल्या पगाराची नोकरी देऊ शकेल. 3) त्याच्या सोबत घडणाऱ्या या वाईट परिस्थितीला तो चांगली परिस्थिती बनू शकतो का? अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर त्याला असे कळले कि जर तो स्वतःहून न्यायाधीशकडे गेला आणि सत्य परिस्थिती सांगितली तर कदाचित त्याचा व्यवसाय देखील बंद पडणार नाही. त्याला एकदा दंड भरावा लागेल. सर्व प्रश्नांची उत्तरे भेटल्यानंतर डीलरची बरीचशी चिंता कमी झाली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला कि तो स्वतः न्यायाधीशकडे जाईल आणि सर्व काही खरे सांगेल. त्यानंतर त्याने असेच करण्याचा निर्णय घेतले आणि न्यायाधीशला भेटून सर्व काही खरे सांगितले. न्यायाधीशने त्याला सांगितले की जो पोलीस त्याच्याकडून पैसे मागत होते खरंतर तो पोलीस नव्हता. तो एक तोतया पोलीस आहे आणि त्याने अनेक लोकांना अशेच फसविले आहे त्यामुळे पोलिस त्याच्या शोधात आहे. अशाप्रकारे ऑइल कंपनीच्या डीलरने सांगितले की तीन स्टेप्सचा वापर करून माझ्या मेंदूचा ताण पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे हाच तीन स्टेप चा फॉर्मुला मी बाकीच्या कुठलाही प्रॉब्लेम मध्ये वापरतो. त्यामुळे तुम्ही देखील जर एखाद्या अडचणी मध्ये सापडले असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर हा विचार करायचा आहे की अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सोबत जास्तीत जास्त काय वाईट घडू शकेल. जर अशी वाईट परिस्थिती आलीच तर त्यानंतर काय होईल? तुमच्या सोबत होणाऱ्या या वाईट परिस्थितीला तुम्ही चांगली परिस्थिती बनू शकता का?
सकारात्मक विचार कसा करावा | सकारात्मक विचार कसे करावे
Don’t try to saw sawdust: एक शाळेतील विद्यार्थी होता तो सतत विचारांमध्ये असायचा की मला मागच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते. माझा गणित विषय अजूनही पूर्ण झालेला नाही. सतत काही ना काही तो विचार करत असे. एक दिवस त्यांच्या वर्गामध्ये गणिताच्या शिक्षिका आल्या आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची शिक्षिका त्या प्रयोगशाळेत आल्या तर त्यांच्या हातामध्ये एक दुधाने भरलेला ग्लास होता. सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले की ह्या तर गणिताच्या शिक्षिका आहेत तर मग हे दुधाने भरलेला ग्लास घेऊन का बरं आल्या असाव्यात? त्यानंतर त्या शिक्षिकेने दुधाने भरलेला ग्लास सिंकमध्ये फेकून दिला आणि सर्वांना जोरात ओरडून सांगितले की आता तुम्ही या सांडलेल्या दुधासाठी रडू नका. शिक्षिका म्हणाल्या तुम्ही सर्वांनी या दुधाकडे व्यवस्थित बघा आणि आयुष्यभर माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रमाणे या सिंक मधून दूध निघून गेलेले आहे आणि तुमच्या रडण्याने किंवा ओरडण्याने हे सांडलेले दूध पुन्हा येणार नाही. तसेच तुमच्या आयुष्यात अशा खूप काही घटना घडून गेल्या असेल ज्या बद्दल तुम्ही कितीही विचार केला तरी ती गोष्ट तुम्ही मुळीच बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी पुढे जात राहिले पाहिजे आणि जी गोष्ट तुम्हाला करण्यासारखी आहे ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. हे ऐकल्यानंतर तो विद्यार्थी खूप आनंदी झाला आणि त्याला कळून चुकले की कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करण्याऐवजी पुढे काय ॲक्शन घ्यावी यावर विचार करणे योग्य आहे. कारण पुढील ऍक्शन घेतल्यावर तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त टेन्शन संपून गेले असेल.
तर मित्रांनो आजच्या या आर्टिकल मधून आम्ही सकारात्मक विचार मराठी लेख लिहिण्याचा प्रयत्न केला. आपण ताण आणि अति विचारांपासून स्वतःला दूर कसे ठेवावे यासाठी 5 मुद्दे बघितलेत. यातील सर्वात पहिला मुद्दा होता की कोणीही मेलेल्या कुत्र्याला लाथ कधीच मारत नाही. याचाच अर्थ असा आहे की जर तुमच्या विषयी कोणी वाईट बोलत आहे, तुमची निंदा करत आहे. तर ती व्यक्ती ही गोष्ट मान्य करते की तुम्ही नक्कीच असे काहीतरी काम केलेले आहे जे तो स्वतः करू शकलेला नाही. जर तुम्ही एखादी साधारण व्यक्ती असाल तर तुमच्या विषयी कधीच कोणीही बोलणार नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन असे काहीच केलेले नाही. पुढील उदाहरण होते Don’t worry about ingratitude यामध्ये आपण हे पाहिले होते की जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांसाठी करोडो रुपये जरी ठेऊन गेलात तरीही ते तुमचे आभार मानणार नाही. कारण त्यांना असेच वाटेल की हे तुमचे कर्तव्य होते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही कुठले चांगले काम कराल तेव्हा समोरच्याकडून आभाराची अपेक्षा ठेवू नका आणि सतत चांगले काम करत रहा. त्यानंतर पुढचा मुद्दा होता Stop Loss आपण हे पाहिले होते की आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा आहे हे आपल्याला अगोदर ठरवावे लागेल. ती गोष्ट कोणासोबत वेळ घालवणे असो किंवा तुमच्या मनावरचा ताण तणाव कमी करणं असो. त्यानंतर आपण पुढील मुद्दा बघितला What is the worst that can happen यामध्ये आपण हे पाहिले की आपण कशाप्रकारे ताण आणि अति विचारांपासून दूर राहू शकतो आणि त्यासाठी आपण तीन स्टेप फॉर्मुला वापरणे गरजेचे आहे. या पुढील मुद्दा आपण बघितला Don’t try to saw sawdust: यात आपण हे पाहिले कि गोष्ट घडून गेलेली आहे त्यावर विचार करण्याऐवजी पुढील ॲक्शन म्हणजेच कृती कुठली केली पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे आणि प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही पाचही मुद्दे जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरण्यास सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील ताणतणाव आणि अति विचार करण्याच्या त्रासापासून तुम्ही मुक्त होऊ शकाल. आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून सुचविलेले हे पाच मुद्दे लेखक डेल कार्नेगी यांच्या How to Stop Worrying and Start living (काळजी करणे कसे थांबवायचे आणि जगणे प्रारंभ कसे करावे) पुस्तकातून सांगितले आहे.
आम्ही आशा करतो की आजचा HOW TO STOP OVERTHINKING | अति विचार करणे कसे थांबवावे हा आर्टिकल आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि यांच्यामार्फत तुमच्या आयुष्यातील असलेला ताण तणाव नक्कीच कमी होऊ शकेल.
READ MORE
Post Views: 4,073