HOW TO FIND YOUR PASSION AND INTEREST: एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की या जगात 87 टक्के लोक असे आहेत की ज्यांना ते करीत असलेले काम अजिबात पसंत नाही. ते सध्या जी काम करत आहे त्या कामात ते समाधानी नाहीत. ते फक्त आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी हे काम करत आहे आणि त्यांच्या आयुष्यातले साधारण रोजचे आठ ते नऊ तास या कामासाठी खर्च करत आहे. म्हणजे जर आपण बघायला गेले तर त्यांच्या जीवनातले साधारण त 33 टक्के वेळ ते नापसंत असलेल्या कामासाठी खर्च करीत आहेत. आता उरलेले ते 33 टक्के आयुष्य ते झोपण्यामध्ये व्यतीत करीत आहेत.
आपल्याला ही गोष्ट माहितीच असेल की या जगात तेच लोक यशस्वी झाली आहेत ज्यांना ते करीत असलेल्या कामात पॅशन म्हणजेच आवड असते. ही लोकं तेच काम करतात जे त्यांना करायला आवडते आणि हे काम करताना ते अजिबात थकत देखील नाही. तर मित्रांनो आजच्या या आर्टिकलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत लेखक जेफ गोइन्स यांच्या The Art of Work (द आर्ट ऑफ वर्क) पुस्तकातील सात मुद्दे शेयर करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील कुठले काम करायला आवडते आणि तुमचे पॅशन नेमके काय आहे हे तुम्हाला कळेल. तुमचे पॅशन काय आहे हे शोधण्यात साठी आपल्याला पुढे दिलेल्या सात मुद्द्यांचे व्यवस्थितपणे पालन करायचे आहे.
HOW TO FIND YOUR PASSION IN 5 MINUTES
Prepare: यासाठी सर्वात अगोदर तुमच्या मनात असे येणे गरजेचे आहे की तुम्ही सध्या जे काही काम करत आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील असे काहीतरी आहे जे करताना तुम्हाला एक वेगळी मजा येईल, अशी काहीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला उत्तम प्रकारे जमते. आता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एका कागदावर तुमच्या आयुष्यात घडलेल्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी लिहून काढायचे आहेत. आता ह्या घडलेल्या घडामोडी चांगल्या देखील असू शकतात किंवा वाईट देखील असू शकतात. कारण या सर्व त्याच घडामोडी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या जिवनाला एक आकार निर्माण होत गेलेला आहे आणि तुम्ही त्या प्रमाणे घडत गेला आहात. त्यानंतर तुम्हाला हे बघायची आहे कि या सर्व घडामोडींत पैकी कुठली अशी घडामोड आहे ज्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळाला होता. यापैकी असे काय होते जे करताना तुम्हाला असे वाटले की तुम्ही तुमच्या आयुष्यात खरच काहीतरी मिळवलेले आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमचं पॅशन काय आहे ते सहजपणे जाणून घेता येईल. परंतु हे करून देखील जर तुम्हाला तुमचे पॅशन नाही मिळाले तरी हरकत नाही. कारण ऍपल कंपनीचे सी.ई.ओ. हे नेहमी सांगतात की “जोपर्यंत तुम्हाला तुमचे पॅशन मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते शोधत रहा, परंतु सेटल होऊ नका.”
Accidental Apprenticeships: तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये बघितले असेल की नायकाला त्या चित्रपटातील खलनायका सोबत लढायचे असते. परंतु तो खलनायक हा अधिक शक्तिशाली असतो आणि नायक त्याच्यासोबत लढण्यासाठी असमर्थ असतो. अशावेळेस त्या नायकाला त्याचा गुरु एका विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणाच्या जोरावरती तो नायक चित्रपटातील खलनायका सोबत लढतो आणि विजयी होतो. जेफ गोइन्स यांच्या मते सेल्फ मेड मेन असे काहीही नसते. कारण कुठलाही व्यक्ती हा एकटाच यशस्वी होत नसतो. या जगामध्ये जेवढ्या उत्कृष्ट आणि यशस्वी व्यक्ती आहेत त्यांचे देखील कोणी ना कोणी मेंटर (गुरु) आहेत, त्यांना देखील कोणी ना कोणी योग्य मार्गदर्शन केले आहे. ऍपल कंपनीचे फाउंडर स्टीफ जॉब यांच्या मते “एखाद्या म्युझिक बँड मध्ये ज्या प्रमाणे सर्व म्युझिक वाजवणारे एकमेकांना साथ देतात आणि त्या गाण्याला उत्तम बनवितात त्याचप्रमाणे प्रत्येकाला कोणाची तरी उत्तम कार्य करण्यासाठी साथ हवी असते.” अशाच प्रमाणे जर तुम्हाला तुमच्या उद्योगांमध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि तुमचा उद्योग मोठा करायचा असेल तर तुम्ही एकटे ही गोष्ट करू शकत नाही यासाठी तुमच्या सोबत तुमची टीम असणे गरजेचे आहे.
HOW TO IDENTIFY YOUR PASSION
Painful Practice: एका कार्यक्रमात बोलताना भारताचे प्रसिद्ध क्रिकेट प्लेयर सचिन तेंडुलकर यांनी सांगितले कि ते जेव्हा कधी क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे तेव्हा ते अजिबात थकत नसे. ते सतत क्रिकेटचा सराव करत असे. त्यासाठी ते वेळेचे कधी भान ठेवत नसे. परंतु जेव्हा प्रॅक्टिस करून ते आपल्या घरी जात असे तेव्हा ते इतके थकून जायचे की त्यांना चालायचा देखील कंटाळा यायचा. अनेकदा तर असे व्हायचे कि ते बिना जेवण करतात झोपुन घ्यायचे आणि त्यांच्या घरच्यांना त्यांना बळजबरीने खाऊ घालावे लागायचे. जर तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीचे पॅशन असेल तर ती गोष्ट तुम्ही बिना कंटाळता सतत करू शकतात आणि त्या गोष्टीची प्रॅक्टिस करताना तुम्ही अजिबात थकत नाही. लेखक जेफ गोइन्स देखील हेच सांगतात की एक्सलेन्स (उत्कृष्टता) हे प्रॅक्टिस करूनच येते फक्त पॅशन असल्याने कधीच येत नाही. बऱ्याच वेळेस असे होते कि ती प्रॅक्टिस खूप त्रासदायक असते परंतु त्या प्रॅक्टिस मध्ये जर तुमचे पॅशन असेल तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस मध्येच सोडून देणार नाही आणि हार देखील मानणार नाही. तसेच ही प्रॅक्टीस करताना तुम्ही थकणार देखील नाही आणि सतत तुम्ही ती प्रॅक्टिस करतच राहाल.
Building Bridges: आपल्या सोबत अशी जादू कधीच होऊ शकत नाही की आपण रात्री एक सुन्दर स्वप्न बघितले आणि सकाळी ते तुमचे पॅशन बनलेले असेल. खरं तर ही एक सतत चालू असणारी प्रणाली आहे (Continuous Process). तुम्हाला सतत एक एक पाऊल पुढे चालायचे आहे आणि सतत प्रॅक्टिस करत राहायची आहे. एक दिवस असा येईल की ही गोष्ट सतत करून तुम्हाला तुमचे पॅशन नक्की मिळालेले असेल.
JAPANESE WAY TO BECOME SUCCESSFUL
Pivot Points: जर तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करीत असाल आणि त्या नोकरी मध्ये तुम्हाला समाधान मिळत नसेल, जर तुम्ही त्या कामात संतुष्ट नसाल तर तुम्ही ती नोकरी बदला आणि दुसरी नोकरी करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात उतार-चढाव हे नेहमीच चालू असेल, बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या कामात अपयश देखील मिळेल. बऱ्याच वेळा तुम्हाला तुमचे पॅशन काय आहे हे शोधायला भरपूर वेळ लागेल. परंतु जेव्हा कधी तुम्हाला तुमचे पॅशन मिळेल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की या अगोदर तुमच्या आयुष्यात आलेले सर्व अपयश देखील किती महत्त्वाची होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये ते सर्व अपयश आलेच नसते तर तुम्ही ते कधीच करू नसते शकले जे तुम्हाला खरंच मनापासून करायचे होते. बऱ्याच वेळा लोकं त्यांच्या आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला घाबरतात परंतु यात त्यांचा दोष नसतो. कारण त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी असते. परंतु जर तुम्ही तरुण असाल आणि अजून तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी नसेल तर रिस्क घ्यायला हरकत काय आहे? बऱ्याच वेळा लोकं रिस्क घ्यायला घाबरत नाही परंतु ते अपयशाला घाबरतात. त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न असतो की जर मी अपयशी झालो तर काय होईल? यामुळे ते कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन रिस्क घेण्याचा प्रयत्न देखील करीत नाही.
The Portfolio Life: या पॉईंट मध्ये लेखक असे सांगतात की तुमचे पॅशन फक्त कामातच नाही तर पुढील 4 गोष्टींमध्ये असणे आवश्यक आहे. 1) काम, 2) घर 3) खेळ 4) उद्देश्य. तुमच्या कामा व्यतिरिक्त घरात आपण आपल्या परिवाराला वेळ दिलाच पाहिजे. कारण आपले कुटुंब आणि आपला मित्र परिवार यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. खेळ म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी करताना तुम्हाला आनंद प्राप्त होतो, जी करताना तुम्हाला थकवा जाणवत नाही. भलेही त्यातून तुम्हाला नफा मिळत असो किंवा नसो. तसेच उद्देश म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला मिळवायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहेत.
HOW TO FIND YOUR PASSION IN MARATHI
Magnum Opus: बर्कशायर हैथवे या कंपनीचे सी.ई.ओ. वारेन बफेट असे सांगतात की त्यांनी ठरवले तर ते आत्ता देखील सेवानिवृत्त होऊ शकतात. परंतु ते दररोज सकाळी उठल्यावर त्यांचे बर्कशायर हैथवे या ऑफिसला जायची तयारी करतात आणि ऑफिसमध्ये येऊन मनापासून काम करतात. त्यांच्या मते ते हे काम यासाठी करतात कारण त्यांना या कामांमध्ये खूप जास्त आवड आहे आणि त्यामुळे ते हे काम करताना बिलकुल थकत नाही. तसेच ते दिवसभर अशा लोकांसोबत काम करीत असतात ज्यांचा कामाचा इंटरेस्ट देखील त्यांच्या इंटरेस्ट सारखाच आहे. त्यामुळे वारेन बफेट असे सांगतात की सर्वात अगोदर तुम्ही तुमचे पॅशन शोधा आणि ती गोष्ट करत राहा जी तुम्हाला करायला पसंत आहे. जर तुम्हाला तुमचे पॅशन मिळाले तर तुम्ही कधीच थांबणार नाही. कारण जर तुमच्याकडे पॅशन असेल तर तुम्ही असे काम देखील करू शकतात की जर तुम्ही या जगात नसाल तरीही लोक तुमच्या कामामुळे प्रेरित होत राहतील. कारण तुमच्याकडे जर पॅशन असेल तर तुम्ही तुमचे काम इतके मनापासून केलेले असेल जोपर्यंत तुमच्या मनाचे समाधान झाले नसेल. उदाहरणार्थ जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो द विंची यांनी काढलेले मोनालिसाचे चित्र. तो अनेक वर्ष या चित्रावर काही ना काही ब्रशने फेरबदल करीतच राहिला कारण त्याच्यामध्ये ते चित्र परफेक्ट रंगवली गेले नव्हते. त्याला नेहमी असेच वाटायचे की या चित्रांमध्ये अजूनही काहीतरी कमी आहे. त्याने काढलेले हे चित्र हे कालांतराने जगप्रसिद्ध झाले आणि आजही या चित्राचे कौतुक केले जाते.
मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण टोटल 7 मुद्दे बघितलेत ज्याच्या मदतीने आपल्याला आपले पॅशन शोधायला मदत होईल. यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा होता Prepare: यात आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल की आपल्याला आपल्या आयुष्यात आणखीन काहीतरी वेगळं करायचं आहे. नंतर आपल्याला एका कागदावर ते सर्व महत्वाच्या घडामोडी लिहून काढायचे आहे जे आपल्या आयुष्यात होऊन गेलेल्या आहेत. या घडामोडींपैकी आपल्याला अशी गोष्ट शोधून काढायचे आहे ज्यामुळे आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळाला होता. दुसरा मुद्दा आहे Accidental Apprenticeships: ज्यात आपण पाहिले की विना गुरुचे आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि सेल्फ मेड मेन नावाची कुठलीच गोष्ट नसते. कुणालाही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक लोकांची, शिक्षकांची, गुरुंची, मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये एक योग्य मार्गदर्शक शोधावाच लागेल. तिसरा मुद्दा आहे Painful Practice: याचा अर्थ फक्त योजना बनवून काही होत नसते तर त्यासोबत तुम्हाला भरपूर परिश्रम करणे देखील गरजेचे असते. हे प्रयत्न करत असताना कदाचित तुमच्या मार्गात अनेक अडचणी देखील येतील परंतु ते प्रयत्न जर तुमच्या पॅशन सोबत निगडित असेल तर अडचणी आल्यानंतर देखील तुम्ही थकणार नाही आणि तुम्ही यशस्वी नक्कीच होणार. त्यानंतर आपण चौथा मुद्दा बघितला Building Bridges तुम्हाला तुमच्या जीवनात वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्टेप्स घ्यावे लागेल. ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या पॅशन पर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. त्यानंतर आपण पाचवा मुद्दा बघितला Pivot Points: एखादे काम करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला समाधान नसेल तर तुम्हाला पुन्हा दुसरे काम करून बघावे लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला समाधान मिळते का हे शोधावे लागेल. सहावा मुद्दा आहे The Portfolio Life: यात सांगितले आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करायची आहे तुमचे काम, तुमचे घर, तुमचा खेळ, आणि तुमचा उद्देश्य. त्यानंतर सातवा आणि सर्वात शेवटचा मुद्दा आपण पाहिला Magnum Opus: यात सांगितले गेले आहे की आपण आयुष्यात असे काहीतरी काम केले पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर देखील त्या कामाचे दुनियेने कौतुक केले पाहिजे. ज्याप्रमाणे चित्रकर लिओनार्दो द विंची हे मोनालिसाचे चित्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगवीत राहिले होते. थोडक्यात आपण आपल्या जीवनामध्ये असे काम केले पाहिजे जे करताना तुम्हाला आनंद होतो, जे काम करताना तुम्हाला समाधान वाटते, आणि जे काम करतांना तुम्हाला अजिबात थकवा देखील वाटत नाही.
READ MORE
Post Views: 1,976