7 Movies You Must Watch | हे 7 चित्रपट आयुष्यात एकदा नक्की बघितले पाहिजे

Share this

7 Movies You Must Watch: मित्रांनो आजच्या लेखाच्या मार्फत आम्ही आपल्याला सांगणार आहे की आपण आपल्या रिकाम्या वेळेत अशी कुठली सात चित्रपट आहे त्यांना बघितले पाहिजे. हे चित्रपट बघतांना तुमची केवळ मनोरंजन होणार नाही तर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल. मला माहित आहे की आपण सर्वांनी बऱ्याचशा बॉलीवूड चित्रपटांना पाहिले पण आमच्या या लेखात आम्ही आपल्याला अधिक माहिती ही हॉलिवूडच्या चित्रपटांविषयी देणार आहे.

Table of Contents

7 Motivational Movies You Must Watch

The Theory of Everything: या चित्रपटांच्या यादीमध्ये सर्वात प्रथम नाव आहे ते The Theory of Everything या चित्रपटाचे. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. स्टीफन हॉकिंग हे एक महान खगोलशास्त्रज्ञ आहे. स्टीफन हे भौतिकशास्त्र आणि गणितात खूप उत्तम होते. परंतु त्यांची प्रोफेसर चिंतेत होते कारण ते Thesis चा कुठला विषय घ्यावा हे ठरवू शकत नव्हते. स्टीफन ब्लॅक होल या विषयाचा लेक्चर अटेंड करीत होते आणि त्यांना असे वाटते की ब्लॅक होल मुळे आपल्याला समजू शकते की ब्रम्हांड कसे बनले असावे. त्यानंतर ते ब्लॅक होल ला त्यांचा Thesis टॉपिक बनवितात. परंतु त्यांच्या मांस पेशी कमजोर पडू लागतात ज्यामुळे ते जोरात खाली पडतात आणि त्यांच्या डोक्याला मार लागतो. त्यांना डॉक्टर कडून समजते की त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा आजार झाला आहे. या आजारामुळे ते हळूहळू पॅरालाइसच्या अवस्थेत जाऊ लागतात. त्यामुळे ते आता ना तर कोणाशी बोलू शकतात किंवा ना ते आता इतरांप्रमाणे चालू शकतात. असे जरी असले तरीही ते त्यांचा निवडलेला विषय ब्लॅक होल यावर ते त्यांचा शोध सुरूच ठेवतात. या पुढील कथा खूपच मनोरंजक आहे आणि हा चित्रपट तुम्ही नक्की बघितला पाहिजे. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला असे जाणवेल की एक पॅरलेस झालेल्या व्यक्ती जर त्यांना हवे ते करू शकतो तर साधारण माणसाला ही गोष्ट का अशक्य वाटावी.

I Am Kalam: या चित्रपटाची कथा एका गरीब मुलावरती आधारित आहे आणि तो ए. पी. जी. अब्दुल कलाम यांना आपले प्रेरणा स्थान मानत असतो आणि त्यांच्या जीवनशैलीवर तो खूप प्रेरित झालेला असतो. तो स्वतःचे नाव देखील कलाम असे ठेवतो. या चित्रपटात कलामचा एक मित्र दाखवला आहे जो श्रीमंत घरात लहानाचा मोठा झालेला आहे. परंतु या श्रीमंत मुलाच्या पालकांना त्याचे त्या गरीब मुलासोबत असणे आणि राहणे आवडत नसेल. आम्ही या चित्रपटाची पूर्ण कथा सांगणार नाही परंतु जर तुम्ही या चित्रपटाला पाहिले तर तुम्हाला देखील नक्की प्रेरणा मिळेल. हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही कारण हा चित्रपट युट्यूब वरती फ्री मध्ये उपलब्ध आहे.

Martian : या चित्रपटाची कहाणी एका कादंबरीवर आधारित आहे आणि त्या कादंबरीचे नाव आहे The Martian ही कादंबरी Andy Weir यांनी लिहिली आहे. या चित्रपटातली कहाणी 2035 या सालातली दाखवलेली आहे. जिथे काही लोक मंगळ ग्रहावर एक रिसर्च करीत आहे. तिथे अचानक एक धुळीची वादळे येते आणि त्यामुळे Mark Watney नावाच्या व्यक्तीला दुखापत होते आणि त्या वादळात तो हरवला जातो. त्यांच्या टीम मधील इतर सदस्यांना असे वाटते की Mark हा मरण पावला असेल. त्यानंतर उरलेले सर्व लोक पुन्हा पृथ्वीवरती येण्याची तयारी करता आणि पृथ्वीवर निघून येतात. परंतु या चित्रपटाच्या कहानी मध्ये ट्वीस्ट तेव्हा येते जेव्हा Mark शुद्धीवर येतो आणि त्याला समजते की या ग्रहावर तो फक्त एकटा मनुष्य उरलेला आहे. त्याच्याजवळ खाण्यापिण्याचे सामान देखील अत्यंत कमी आहे. तो या ग्रहावरून पृथ्वीवर कोणालाही संपर्क देखील करू शकत नाही आणि नासाचे पुढचे मंगळ ग्रहावर येण्याचे मिशन हे चार वर्षानंतर होणार आहे. आता इथूनच Mark ची खरी परीक्षा सुरू होते की यापुढे तो एकटाच या ग्रहावर कसा जगेल. आता पाहण्यासारखी गोष्ट हि आहे कि तो निराश होऊन मृत्यू ची वाट बघेल की आपल्या मेंदूचा योग्य वापर करून कशा प्रकारे जगता येईल त्याचा प्रयत्न करेल. यापुढे काय होते ही स्टोरी मी आपल्याला मुद्दाम सांगणार नाही अन्यथा आपला या चित्रपटातून इंटरेस्ट कमी होईल.

7 Movies You Must Watch At Least Once

Jobs: या चित्रपटाची कहाणी ऍपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात तुम्हाला बघायला भेटेल की कशाप्रकारे एक असा मुलगा ज्याला दत्तक घेतले होते आणि तो सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झाला. त्याने कशाप्रकारे एप्पल सारखी ही संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली कंपनी सुरू केली. या चित्रपटात आपण बघू शकतो की कशाप्रकारे स्टीव जॉब्स आणि स्टीव होजनाईक या दोघांमध्ये मैत्री होते त्यानंतर ते ऍपल कंपनीचे कम्प्युटर्स बनू लागतात. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी स्टीव्ह जॉब नेहमीच प्रयत्न करत असे. तसेच त्यांनी कॅलिग्राफी ला जास्त महत्त्व दिले. या चित्रपटात आपल्याला हे देखील पाहायला भेटेल की ऍपल कंपनी इतकी यशस्वी झाली की ते आपल्या मित्रांना देखील वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक नाते त्यांच्यापासून दुरावत गेले. तसेच तुम्हाला हे देखील बघायला भेटेल की स्टीव्ह जॉब त्यांच्या कंपनीतून का काढून टाकण्यात आलेत आणि त्यांनी हार न मानता पुन्हा एक नवीन कंपनी सुरू केली त्या कंपनीचे नाव नेक्स्ट आहे आणि परत ऍपल कंपनी मध्ये प्रवेश करून या कंपनीचे ते सीईओ बनले. आयपॉड, आयपॅड, आयफोन सारखे वेगवेगळे प्रॉडक्टचे लॉंच करून मोबाईल आणि म्युझिक इंडस्ट्री मध्ये पूर्णपणे त्यांनी यशस्वी बदल घडवून आणला. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक उद्योजकाला नक्कीच पाहायला आवडेल.

Forrest Gump: या चित्रपटाला आतापर्यंत अनेक अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. जसे की बेस्ट पिक्चर, बेस्ट ऍक्टर, बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, बेस्ट डायरेक्टर परंतु लोकांना हा चित्रपट पाहण्याचा खरा इंटरेस्ट तेव्हा आला जेव्हा चायनाचे ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा चे फाउंडर Jack Maa यांनी या चित्रपटाला त्यांचा फेवरेट चित्रपट असल्याचे सांगितले. या चित्रपटाची कहाणी एका फॉरेस्ट नावाच्या मुलावर आधारित आहे आणि त्याचा पाठीचा मणका व्यवस्थित होण्यासाठी त्याच्या पायामध्ये ब्रेसेस लावण्यात आलेले आहे. फॉरेस्ट हा त्याच्या आई सोबतच राहत असतो. त्याला त्याचे मित्र नेहमी त्रास देत असे कारण तो अपंग होता. एक दिवस इतर मुलांपासून पळता-पळता त्याच्या पायातील लावलेली ब्रेसल्स तुटून जातात आणि पळता-पळता त्याच्या लक्षात येते की तो एक जोरात पळणारा धावपटू आहे. एक असा मुलगा जो शरीराने अपंग होता, ज्याच्यावर इतर लोक हसायचे आणि त्रास द्यायचे त्यालाच फुटबॉलची स्कॉलरशिप देण्यात येते. कालांतराने त्याला यु. एस. आर्मी मध्ये भरती करण्यात येते आणि तो वियतनाम मध्ये लढाईसाठी जातो आणि अनेक लोकांचे जीव देखील वाचवतो. या कामासाठी त्यांना सरकारकडून मेडल ऑफ ऑनर देऊन सन्मानित देखील करण्यात येते. याव्यतिरिक्त या चित्रपटात फॉरेस्ट सोबत अशा अनेक घटना दाखविण्यात आल्या आहेत जे पाहताना तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.

7 Inspirational Movies You Must Watch

The Founder: या चित्रपटाची कथा मॅकडॉनल्ड्सचे फाउंडर Ray Krock यांच्या जीवनावर आधारित आहे. 1954 च्या दशकात Ray Krock एका ट्रॅव्हलिंग एजन्सीमध्ये सेल्समन या पदावर काम करत होते. ते एक मिल्क शेक मिक्सर विकायचे काम करत होते. हे काम करत असताना त्यांनी एवढे पैसे कमावले होते की ते एक आरामदायी जीवन सहज जगू शकतील. परंतु Ray Krock यांना आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करायचे होते आणि त्यांचे स्वप्न देखील मोठी होती. त्यांनी हे निरीक्षण केले की तेथील ड्रायव्हिंग रेस्टॉरंट्स हे खूप स्लो असायचे, जास्त गर्दी देखील असायची तसेच त्या रेस्टॉरंटची कार्यक्षमता देखील फार चांगली नव्हती. परंतु कॅलिफोर्निया मध्ये एक रेस्टॉरंट होते जे खूप जास्त मिक्सरची ऑर्डर करीत होते. तर Ray Krock यांनी रेस्टॉरंटला जाऊन भेट देण्याचे ठरविले. तिथे गेल्यावर तिथे दोन भावांना भेटले. त्या भावांची नाव होते Richard आणि Maurice आणि या दोघा भावांचे एक रेस्टॉरंट होते. त्या रेस्टॉरंटचे नाव होते Mc Donald. जिथे ग्राहकांना फास्ट सर्विस दिली जायची, तेथील खाद्यपदार्थाची क्वालिटी देखील खूप चांगली होती आणि परिवारासाठी उत्तम असे हे ठिकाण देखील होते. Ray Krock यांनी त्या दोन भावांना Mc Donald ची फ्रेंचायसी देण्यासाठी तयार करून घेतले. यानंतर काय होते हे तुम्ही चित्रपटात नक्की बघू शकता. हा चित्रपट खरच त्यांनी बघितलं पाहिजे ज्यांची स्वप्न मोठी आहे, ज्यांना जीवनात काहीतरी वेगळे करून दाखवायचं आहे, आणि जे उद्योजक असेल त्या सर्वांनी हा चित्रपट एकदा तरी जरूर पाहायला हवा.

Kung Fu Panda: या चित्रपटाची कहाणी एका पांडा वर आधारित आहे ज्याचे नाव आहे PO आणि त्याला कुंफू शिकण्याची खूप इच्छा आहे. त्यांला तेथील कुंफू मास्टर शिपू खूप आवडत असेल आणि त्यांच्याकडूनच त्याला कुंफू शिकायचे आहे. त्या कुंफू मास्टर कडे एक ड्रॅगन स्क्रोल नावाची एक वस्तू आहे आणि हे ते फक्त अशाच व्यक्तीला देतात जो खूप ताकदवान असेल. हे ड्रॅगन्स स्क्रोल मिळविण्यासाठी एक चिता ज्याचे नाव ताईलुंग आहे तो तिथे स्पर्धेसाठी येत आहे आणि त्यांना कुंफू देखील खूप चांगल्या प्रकारे येते. आता एक स्पर्धेचे आयोजन केली जाते जिथे जिंकणार्‍याला ड्रॅगन वॉरियर बनविले जाईल आणि तो ड्रॅगन स्क्रोलचे रक्षण करेल. आता या स्पर्धेमध्ये एखाद्या कुंफू एक्सपर्ट ला नाही तर या पांड्याला ड्रॅगन वॉरियर केले जाते. परंतु या निर्णयामुळे बाकीचे सर्व लोक नाराज होतात आणि त्यांना असे वाटते की हा इतका जाड आहे जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही तो त्या ड्रॅगन स्क्रोल चे रक्षण काय करेल. परंतु तो पांडा हार मानत नाही आणि तिथून निघूनही जात नाही आणि त्याला ते ड्रॅगन स्क्रोल देखील दिले जाते. ते ड्रॅगन स्क्रोल उघडून पाहिल्यानंतर पांड्याला त्यामध्ये स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. त्याच्या नंतर लक्षात येते की हे ड्रॅगन स्क्रोल तर एक खोटे आहे परंतु त्याला प्राप्त करण्यासाठी जी मेहनत केली जाते आणि जे अफाट परिश्रम केले जातात हेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर तो ताईलुंग नावाच्या त्या चित्यासोबत लढतो. या चित्रपटातून केवळ हाच संदेश देण्यात आलेला आहे की आपण कोणावर हि असे लेबल लावू शकत नाही की ती व्यक्ती काय करू शकते. जर एखाद्या मध्ये काहीतरी करून दाखवण्याची मनापासून इच्छा असेल तर तो त्याची स्वप्न पूर्ण करतो आणि यश मिळवूनच दाखवतो. मिळणाऱ्या यशाचे खरे कारण त्याने केलेली मेहनत असते बाकी दुसरे काहीच नाही.

आजच्या या लेखामध्ये आपण पाहिले असे 7 चित्रपट जे खरच खूप प्रेरणादायी आहे यातील पहिला चित्रपट आहे The Theory of Everything: या चित्रपटाची कथा महान खगोल शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांना अपंगत्व आलेला असून देखील त्यांनी कशा प्रकारे ब्लॅक होल या विषयावर ती आपला शोध सुरूच ठेवला. या चित्रपटाची कथा खरच खूप प्रेरणादायी आहे आणि तुम्ही एकदा हा चित्रपट नक्की बघायलाच हवा. त्यानंतर दुसरा चित्रपट आहे I am Kalam: या चित्रपटाची कथा एका अशा लहान मुलावर आधारित आहे जो एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर प्रेरित झालेला आहे आणि तो आपले स्वतःचे नाव देखील कलाम असे ठेवतो. या चित्रपटाची कथा देखील खूप प्रेरणादायी आहे. तिसरा चित्रपट आहे Martian: या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीवर आधारित आहे जो मंगळ ग्रहावर ती एकटा राहून जातो. त्यानंतर तो या ग्रहावर ती कशा प्रकारे त्याचे जीवन जगतो, त्याला जगण्यासाठी कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो, आणि तो परत पृथ्वीवर येऊ शकतो का हे सर्व तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल आणि या चित्रपटाची कथा खूपच प्रेरणादायी आहे. त्यानंतर चौथा चित्रपट आहे Jobs: जर तुम्हाला ऍपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब यांच्या विषयी अधिक जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर स्टीव्ह जॉब यांची बायोग्राफी वाचली नसेल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघा. तुम्हाला हे बघायला मिळेल की कशाप्रकारे एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याला दत्तक घेतले होते त्यांनी ऍपल सारखी एक प्रचंड मोठी कंपनी निर्माण केली. पाचवा चित्रपट आहे Forest Gump: या चित्रपटाची कथा अशा मुलावर आधारित आहे त्याच्या पायामध्ये स्ट्रिप्स आहेत. परंतु तो कालांतराने एक उत्तम धावपटू बनतो. हा चित्रपट चायनाची अलीबाबा या प्रसिद्ध कंपनी फाउंडर Jack Maa यांचा सर्वात आवडता चित्रपट आहे. सहावा चित्रपट आहे The Founder: जर तुम्हाला मॅकडॉल कंपनीचे फाउंडर Ray Krock यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा चित्रपट एकदा नक्कीच बघायला पाहिजे. ज्या लोकांना आपल्या उद्योगांमध्ये प्रगती करायची असेल त्यांनी हा चित्रपट नक्की बघायला हवा आणि आता सातवा चित्रपट आहे Kung Fu Panda: या चित्रपटात एक पांडा दाखविला आहे जो शरीराने खूप जाड आहे आणि त्याला त्याच्या स्वतःच्या पायाला देखील स्पर्श करता येत नाही. या पांड्याला कुंग्फू शिकायचे आहे.

मित्रांनो हे सांगितलेले सर्व ही (7 Movies You Must Watch) चित्रपट तुमचे मनोरंजन करणारच आहे त्यासोबतच हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करतील, जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे निराश झाले असेल तर तुमच्या मनात पुन्हा एक नवीन आशा निर्माण होईल, तसेच तुमच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देखील निर्माण होईल. आम्ही आशा करतो की आजचा हा आर्टिकल आपल्याला नक्की आवडला असेल.

READ MORE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top