How Oscar Movies Are Nominated: मित्रांनो इतरांप्रमाणे तुम्हाला देखील चित्रपट बघणे आवडत असेल. मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांना सोबत तुम्हाला हॉलीवूड चित्रपटातील थ्रिल्स आणि ॲक्शन सीन्स बघायला देखील नक्कीच आवडत असेल. आपण चित्रपटांना पसंत करतो आणि या चित्रपटांना पारितोषिक देखील दिले जाते.
अशाच पारितोषिकं पैकी प्रसिद्ध पारितोषिक म्हणजे ऑस्कर अवार्ड. ऑस्कर अवॉर्ड हे फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख अवॉर्ड मानली जाते. प्रत्येक चित्रपट निर्माण करणाऱ्याला असे वाटते की त्यांच्या चित्रपटांना देखील ऑस्कर अवॉर्ड मिळाले पाहिजे परंतु असे नाही होत. कारण निर्माण केलेल्या या सर्व चित्रपटांपैकी जो चित्रपट खरोखर उत्कृष्ट असेल अशा चित्रपटांना ऑस्कर अवॉर्ड देण्यात येते.
हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचे हे अवॉर्ड अन्य भाषांमध्ये बनलेल्या चित्रपटांना देखील (नामांकन) नॉमिनेट करण्यात येते आणि ऑस्कर अवार्ड देखील प्रदान करण्यात येते.
त्यामुळे तुमच्या मनात जर असा प्रश्न असेल कि (How Oscar Movies Are Nominated) चित्रपट ऑस्कर अवॉर्ड साठी कशाप्रकारे नॉमिनेट केले जातात. तर आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत कि चित्रपटांना ऑस्कर अवार्ड कसे दिले जाते. तर मित्रांनो जर तुम्हाला ऑस्कर आवड विषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर आमचा हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. म्हणजे तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देखील मिळेल.
What is an Oskar | ऑस्कर अवार्ड काय आहे?
ऑस्कर हे पूर्ण जगातील फिल्म इंडस्ट्रीचे अतिशय महत्त्वाचे आणि सर्वात प्रभावी असे अवार्ड आहे. ऑस्कर अवार्ड ची सुरुवात 1929 मध्ये करण्यात आली होती आणि अगोदर या अवॉर्ड चे नाव Academy Awards असे ठेवण्यात आले होते. ऑस्कर अवार्ड फंक्शनमध्ये हॉलीवूड मधील उत्कृष्ट चित्रपटांना त्यांच्या बेस्ट कामगिरीसाठी आणि उत्कृष्ट प्रदर्शनासाठी अवॉर्ड दिले जातात.
या व्यतिरिक्त इतर देशातील चित्रपटांना अवॉर्ड देण्यासाठी वेगळी कॅटेगिरी देखील तयार केलेली आहे. यात विदेशातील चित्रपटांचे नॉमिनेशन करण्यात येतं आणि त्यांना उत्कृष्ट चित्रपटाचे अवार्ड देण्यात येते.
ऑस्कर आवडला दरवर्षी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स ऑफ आर्ट अँड सायन्स म्हणजेच AMPAS द्वारे आयोजित करण्यात येते. या अवॉर्ड मध्ये बेस्ट ऍक्टर, बेस्ट एक्ट्रेस, बेस्ट मूवी, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट राईटर, बेस्ट म्युझिक अशा प्रकारचे विविध अवॉर्ड्स देण्यात येतात. अकॅडमी अवॉर्ड फंक्शन संबंधित ही माहिती घेतल्यानंतर आता बघूया अकॅडमी अवॉर्ड फंक्शन बद्दल काही महत्वाच्या बाबी.
पहिला अकॅडमी अवॉर्ड फंक्शन 16 मे 1929 मध्ये कॅलिफोर्नियातील रुझवेल्ट हॉटेल मध्ये करण्यात आला. हे फंक्शन सार्वजनिक नव्हते आणि इथे फक्त 270 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात केले गेले होते. तसेच या फंक्शन साठी प्रत्येक पाहुण्यांना पाच डॉलर चे तिकीट देखील घ्यावे लागले होते. या फंक्शन मध्ये जे अवॉर्ड्स देण्यात आले होते त्यांना तीन महिन्या अगोदरच जाहीर करण्यात आले होते. परंतु यानंतर प्रत्येक आवडला कार्यक्रमाच्या दिवशीच जाहीर करण्यात येऊ लागले.
पहिल्या अकॅडमी अवॉर्ड मध्ये कुठलाही मीडियाला आमंत्रित नव्हते करण्यात आले. परंतु दुसऱ्या ॲकॅडमी अवॉर्ड नंतर आता पर्यंत म्हणजेच ऑस्कर पर्यंत या अवॉर्डला मीडियाच्या माध्यमातून अजून जास्त प्रसिद्ध करण्यात आली आहे.
What Are The Rules to Follow of Oscar Award ऑस्कर अवॉर्ड मिळविण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात
आता अकॅडमी अवॉर्ड विषयी ही माहिती घेतल्यानंतर आपण हे बघूया की कुठल्याही चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड साठी नॉमिनेट होण्याकरिता कुठल्या नियमांचे पालन करावे लागते.
नियम 1. ऑस्कर अवॉर्ड करिता नॉमिनेट होण्यासाठी सर्वात पहिला नियम असा आहे की फिल्म किमान चाळीस मिनिटांची असली पाहिजे.
नियम 2: या फिल्मला किमान 35 एमएम किंवा 70 एमएम फिल्म प्रिंटचे असणे गरजेचे आहे किंवा 24 फ्रेम प्रति सेकंद अथवा 38 फ्रेम प्रति सेकंद असणे गरजीचे आहे. चित्रपट प्रोग्रेसिव स्कॅन डिजिटल सिनेमा फॉर्मेट मध्ये असणे गरजेचे आहे . तसेच चित्रपटाचे डिस्प्ले रीजोलुशन 1280 x 720 पेक्षा कमी नसायला पाहिजे.
नियम 3: जर एखाद्या चित्रपटाचा प्रोडूसर किंवा डिस्ट्रीब्यूटर त्यांच्या चित्रपटाला ऑस्कर अवार्ड साठी नॉमिनेट करू इच्छित असेल तर त्यांना ऑफिशियल स्क्रीन क्रेडीट फॉर्म सबमिट करणं गरजेचे आहे. अशा सर्व फॉर्मला अकॅडमी द्वारे गोळा करण्यात येते आणि या चित्रपटांना रिमाइंडर लिस्ट ऑफ एलिजिबल रिलीज (Reminder list of eligible release) लिस्टमध्ये सबमिट करण्यात येते.
नियम 4: अकॅडमी अवॉर्डच्या श्रेणी करिता केवळ एका विशिष्ट क्षेत्रातील सदस्य मतदान करू शकतात. म्हणजेच काय तर बेस्ट म्युझिक डायरेक्टर श्रेणी करिता केवळ म्युझिक डायरेक्टर वोटिंग करू शकतात तसेच बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर श्रेणी साठी केवळ सपोर्टिंग एक्टर्स वोट करू शकतात.
नियम 5: परदेशातील चित्रपट आणि डॉक्युमेंट्री फिल्म साठी नियम थोडेसे वेगळे आहेत. या श्रेणी करिता नॉमिनी नेमण्याचे काम प्रत्येक शाखेच्या ॲकॅडमी मेंबर्स ने बनलेले स्पेशल स्क्रीनिंग ग्रुप करतात. या ग्रुपचा प्रत्येक मेंबर उत्कृष्ट चित्रपटांची निवड करतात. उत्कृष्ट चित्रपटासाठी कीमन 5 किंवा जास्तीत जास्त 10 नॉमिनी असणे गरजेचे आहे.
नियम 6: परदेशातील नोमिनीस चित्रपटांना परदेशातील चित्रपटांच्या सबमिट केलेल्या लिस्ट मधून निवडण्यात येते. प्रत्येक देश एका वर्षात केवळ एका चित्रपटाचे नाव यादीमध्ये सबमिट करू शकते. ऑस्कर मध्ये कुठला चित्रपट नॉमिनेट होणार आणि कुठला चित्रपट अवॉर्ड जिंकणार हे ठरविण्याचे काम द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अंड सायन्स चे सदस्य आणि अकाउंटिंग कंपनी प्राईस वॉटर हाऊस कुपर्स यांच्याकडून केले जाते.
How Oscar Movies Are Nominated in Marathi
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अंड सायन्सचे सदस्य यांची सहा हजार रिसर्च करणाऱ्या मेंबर्सची टीम आहे. यांचे काम प्रत्येक चित्रपटाला नॉमिनेशन प्रक्रिये करीता गरजेचे असलेल्या सर्व गोष्टी बारकाईने तपासून पाहणे असते. या चित्रपटांमध्ये डायरेक्टर आणि ॲक्टर्स यांच्या व्यतिरिक्त फिल्म एडिटर, मेकअप आर्टिस्ट, म्युझिशियन, फिल्म राईटर यांचादेखील समावेश असतो.
चित्रपट निर्मात्याला या टीम मधील सर्व मेम्बर्स करिता आपल्या चित्रपटाचे शो ठेवावे लागतात. याव्यतिरिक्त स्क्रीनिंग वर वोटर्सचा समावेश करून त्यांच्या नजरेत चित्रपट आणण्यासाठी बराच खर्च देखील करावा लागतो.
चित्रपटाला अवॉर्ड मिळवण्याच्या या प्रणालीमध्ये वोट करणाऱ्यांची भूमिका या करिता महत्त्वाची असते कारण वोटर्स वोटिंगच्या वेळेस रँकिंग करतात. ज्या वरून हे सुनिश्चित करण्यात येते की त्यांना कुठला चित्रपट कुठल्या रँकिंगमध्ये पसंत आला आहे. या वोटिंगच्या आधारावर सर्वात जास्त वोट मिळालेल्या चित्रपटाला विजेता घोषित करण्यात येते.
आपल्या चित्रपटाला विजय मिळावा याकरिता प्रत्यके चित्रपटाच्या दिग्दर्शकाची ही भूमिका असते की त्याने आपल्या चित्रपटाची कशाप्रकारे जाहिरात केली पाहिजे की त्यांचा चित्रपट जास्तीत जास्त वोट करणाऱ्या लोकांच्या नजरेमध्ये येऊ शकेल आणि त्यांना पसंत देखील पडेल. ज्या चित्रपटांमध्ये जास्त स्क्रीनिंग असते ते चित्रपट वोटर्सला जास्त पसंत येतात. तसेच या प्रोसेसमध्ये आपल्या फिल्मीला विशिष्ट पोझिशन वर ठेवण्यासाठी बऱ्याचदा तारेवरची कसरत देखील करावे लागतात. एवढे सगळे प्रयत्न करून झाल्यावर ऑस्कर अवॉर्ड कुठल्या एखाद्या चित्रपटाला देण्यात येतो.
आतापर्यंत ऑस्करच्या फायनल नॉमिनेशन मध्ये आलेले भारतीय चित्रपटांची यादी खालील प्रमाणे आहे.
- मदर इंडिया – Mother India
- एन एन्काऊंटर वुईथ फेसेस – An Encounter with Faces
- सलाम बॉम्बे – Salam Bombay
- लगान – Lagan
- लिटल टेररिस्ट – Little Terrorist
ऑस्कर अवॉर्ड मिळालेल्या भारतीय
- कॉस्टिंग डिजाइनर – भानु अथैया
- फिल्म मेकर – सत्यजित रे
- म्युझिक डायरेक्टर – ए आर रहमान
- लेखक – गुलजार
- फिल्म साऊंड डिझाईन – रेसुल पुकुटी
तसेच साल 2019 मध्ये म्हणजेच 91 व्या ऑस्कर अवॉर्ड फंक्शन मधील काही विजेते कॅटेगिरी
- बेस्ट ऍक्टर- Rami Malek
- बेस्ट एक्ट्रेस- Olivia Colman
- बेस्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म- Spider Man into the spider world
- बेस्ट फोरेन लांग्वेज फिल्म- ROMA
- बेस्ट पिक्चर- Green Book
- बेस्ट डायरेक्टर- Alfonso Cuaron
अशाप्रकारे मित्रांनो आम्ही आपल्याला How Oscar Movies Are Nominated चित्रपटांना ऑस्कर अवॉर्ड कसे दिले जातात या संबंधित असलेली सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आशा करतो की आपल्या मनात ऑस्कर अवॉर्ड विषयी असलेल्या शंकांचे निरसन झाले असेल. तर मित्रांनो आम्ही ऑस्कर अवॉर्ड विषयी लिहिलेला हा लेख वाचून जर आपल्या ज्ञानामध्ये भर पडली असेल आणि तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा आणि ही माहिती व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करा.
READ MORE POSTS
Post Views: 1,139