How Many Words Should Use for Blogging | ब्लॉगिंगसाठी किती शब्द वापरावे

Share this

How Many Words We Should Use for Blogging: बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो ती ब्लॉगिंगसाठी आपण किती शब्दांचा वापर करावा. ब्लॉगला तुम्ही पर्सनल, हॉबी किंवा आवड म्हणून वापरू शकतात. प्रत्येक ब्लॉगरचा त्याच्या ब्लॉग कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही लोक आपल्या मनातील गोष्टी शेअर करण्यासाठी ब्लॉगचा वापर करतात. तर काही लोक आपल्या नॉलेज आणि अनुभव इतरांसोबत शेअर करण्यासाठी ब्लॉगचा वापर करतात.

तर काही लोक आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ब्लॉग लिहितात. ब्लॉग बनवण्याची कारणे काही जरी असली तरी त्याचा रिझल्ट चांगलाच मिळत असतो. ब्लॉग हा खूप उत्तम पर्याय आहे तुमच्या मनातील गोष्टी सांगण्याचा तुम्हाला जे बोलायचे आहे ते जगासमोर ठेवण्याचा उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे जगाला सांगायचे आहे हे तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून सांगू शकतात त्यासोबतच त्यातून तुम्ही पैसे देखील कमवू शकतात.

खूप लोक असे आहेत ज्यांनी त्यांचे प्रोफेशनल सोडून दिली आहे आणि ब्लॉगिंगला आपले करिअर बनवलेली आहे आणि ब्लॉगच्या माध्यमातून ते दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की तुम्हाला इतरांप्रमाणे रांगेत उभे राहून चालणार नाही. कारण ब्लॉगिंग मध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे योग्य skill, knowledge, passion असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला ब्लॉगींग विषयीच्या अधिक माहिती पाहिजे असेल तर या टॉपिक वर आम्ही अगोदरच आर्टिकल लिहिले आहे ते देखील तुम्ही वाचू शकतात. चला तर मग आता हे बघूया की ब्लोगिंगसाठी किती शब्दांचा वापर केला पाहिजे.

ब्लॉगिंग साठी किती शब्दांचा वापर केला पाहिजे हा एक असा प्रश्न आहे ज्याचे कोणीही निश्चित आणि ठराविक असे उत्तर देऊ शकत नाही. परंतु इथे तुम्हाला हे नक्की सांगता येईल की किमान ३०० शब्दांपासून ते २५०० शब्दां पर्यंत तुम्ही तुमची ब्लॉग पोस्ट लिहू शकतात. परंतु या उत्तराच्या मागचे कारण तुम्हाला सखोल जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला नेमके ब्लॉग पोस्ट साठी किती शब्द लिहायला पाहिजे याचं योग्य उत्तर सापडेल. यासाठी तुम्हाला आजचा हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचायचा आहे म्हणजे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळेल.

ब्लॉग लिहिताना कोणती काळजी घ्यावी

How Many Words Should Use for Blogging in Marathi: ब्लॉग बनवण्याचा उद्देश आपल्या रिलेवेंट ओडियन सोबत कनेक्ट करणे असते. यासोबतच तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक वाढविणे आणि क्वालिटी लीड्स जनरेट करणे असते. त्यासाठी तुम्ही जितके उत्कृष्ट पद्धतीने तुमच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट देणार तितक्या जास्त प्रमाणात तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक जनरेट होऊ लागेल. जितक्या जास्त प्रमाणात तुमच्या वेबसाईटवर युनिक विजिट होऊ लागतील तेवढा जास्त तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो.

कारण प्रत्येक ब्लॉगरची हीच इच्छा असते की त्यांच्या वेबसाईटवर जास्त विजिटर, जास्तीत जास्त युजर्स आणि जास्तीत जास्त ब्लॉग रीडर्स्स यायला हवेत. परंतु असे होण्यासाठी तुम्हाला एक ब्लॉगरच्या नजरेतून काही गोष्टी समजून घेणे देखील महत्त्वाच्या आहेत. कारण तुमची ब्लॉग पोस्ट किती शब्दांची असली पाहिजे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हालाही सुनिश्चित करता येईल हे गूगल च्या पेज वर तुमची ब्लॉग पोस्ट ची रँकिंग काय आहे.

तुमची ब्लॉग पोस्ट रँक करण्यासाठी बऱ्याच फॅक्टरचा विचार करणे गरजेचे असते. जर तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट वर जास्तीत जास्त शेअर्स आणि कमेंट पाहिजे असेल तर किमान तुम्हाला 300 ते 600 शब्दांचा वापर तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये करायचा आहे. असे केल्याने तुम्हाला एवरेज सोशल शेअर आणि कमेंट्स सहज मिळू शकतील. परंतु सर्च इंजिनच्या दृष्टिकोनातून ही योग्य शब्दांची लेन्थ (Length) नाही. जर तुम्हाला प्रोफेशनल Journalism किंवा न्यूज पेपर साठी ब्लॉगींग करायची असेल तर 750 शब्दांमध्ये तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग वरून लिंक्स आणि सोशल शेअरिंग सहज मिळू शकते.

ब्लॉग तयार करण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे

आता तुम्हाला हे समजले असेल की कशा प्रकारे तुमच्या ब्लॉग पोस्ट वर थोड्याफार प्रमाणात कमेंट्स आणि शेअर कसे मिळवता येतील. परंतु तुम्हाला यापेक्षा अधिक कमेंट्स आणि शेअर्स पाहिजे असेल तर किमान तुम्हाला 100 ते 1500 शब्दांचा वापर करून ब्लॉग पोस्ट लिहायची आहे. तुम्हाला इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या लांब ब्लॉग मध्ये तुम्हाला तुमच्या रीडर्स्सच्या असलेल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन द्यायचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचा युजरचा प्रॉब्लेमचे सोलुशन देईल तेव्हा तुमचे रीडर्स्स त्याच्या मित्र परिवारामध्ये तुमची ब्लॉग पोस्ट नक्की शेअर करेल. तुमचा ब्लॉग जितका जितका मोठा असेल तेवढा जास्त त्याचा संबंध त्या पोस्ट वर येणाऱ्या ट्रॅफिक वर नक्कीच दिसून येईल. त्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉग पोस्ट साठी कन्टेन्ट बनवायची आहे.

आता आपण हे समजून घेऊ की जर तुमची ब्लॉग पोस्ट 1500 शब्दांपेक्षा जास्त असेल तर रीडर्स्स तुमची ब्लॉग पोस्ट वाचणार का? की अशा ब्लॉग पोस्टला जास्त लोकं असतात? हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की 1600 शब्द म्हणजेच ७ मिनिटांचा रीडिंग टाईम पोस्ट साठी महत्त्वाचा ठरला जातो. साधारणपणे 2500 शब्दांचा जर तुम्ही ब्लॉग पोस्ट तयार केला तर अशा ब्लॉग पोस्टला गुगलवर पहिली रँकिंग सहज मिळते. कारण की एवढे मोठे ब्लॉक पोहोचला वाचण्यासाठी साधारणपणे युजरला आज ८ मिनिटांचा वेळ द्यावा लागतो. थोडक्यात काय तर जर तुम्हाला सर्च इंजिन मध्ये टॉप रँकिंग हवी असेल आणि जास्तीत जास्त युजर्स पर्यंत तुमची ब्लॉग पोस्ट पोहोचवायची असेल तर तुम्हाला अशाच लेन्थची (Length) ब्लॉग पोस्ट लिहिणे गरजेचे आहे.

ब्लॉग पोस्ट लवकर रँक कशी करावी | How to rank fast blog post on google

परंतु या करिता तुमचा कॉन्टॅक्ट अतिशय उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुमची ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येक रीडर्सला यातून समाधान देखील नेणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही 1000 शब्दांपासून 2500 शब्दांपर्यंत तुमची ब्लॉग पोस्ट तयार करू शकतात. परंतु खरा प्रॉब्लेम तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुम्ही गुगल सर्च रँकिंगमध्ये येण्यासाठी ब्लॉग पोस्ट लिहून लागतात आणि असे करत असताना ते आपल्या लीडरचा विचार न करता, तसेच आपल्या रीडर्सला कशा प्रकारे सहकार्य करता येईल याचा विचार न करता पोस्ट लिहू लागतात. असे केल्यामुळे तुमच्या ब्लॉग पोस्टची कॉलिटी आणि कॉन्टिटी दोघांचाही रीडर्स्सला समाधान करण्यात उपयोगी पडत नाही. त्यामुळे गुगलच्या नजरेत जरी हवा असलेल्या ब्लॉग पोस्टची शब्दांचे प्रमाण असून देखील चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स नाही करू शकत.

त्यामुळे ब्लॉग पोस्टची लेन्थचा (Length) विचार करून पोस्ट लिहिण्यास सुरुवात करू नका. तुम्ही निवडलेल्या टॉपिकचा सखोल अभ्यास करून त्या विषयाची सखोल माहिती आणि महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन पोस्ट तयार करा. असे करताना तुमची ब्लॉग पोस्ट जर साधारण पणे १५०० शब्दांची जरी असेल तरी हरकत नाही. किंवा संपूर्ण माहिती शेअर करताना तुमचे ब्लॉग पोस्ट जर २५०० किंवा 3000 शब्दांपेक्षा जास्त झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुमची ब्लॉग पोस्ट मनोरंजक, प्रॉब्लेमचे सोल्युशन असणारी, किंवा एखाद्या गोष्टीवर ऍक्शन घेतली जाईल अशा प्रकारचं असणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्हाला तुमची ब्लॉग पोस्ट वाचतांना तुमचे रीडर्सला कंटाळा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे.

आता तुमचे हे लक्षात आले असेल की तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती शब्दांचा वापर करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्टच्या रीडर्सचा सुद्धा विचार करून पोस्ट डिझाईन करायची आहे. तुमचे रीडर्सचा तुम्हाला प्रॉब्लेम तुमच्या पोस्टच्या माध्यमातून दूर करायचा आहे आणि अतिशय मनोरंजक पणे तुमच्या ब्लॉग पोस्ट साठी कंटेंट तयार करायचे आहे.

शब्दांची मर्यादा असणाऱ्या ब्लॉगला काय म्हणतात | How Many Words Should Use for Blogging in WordPress Website

How Many Words Should Use for Blogging for Beginners: तसे बघायला गेले तर ब्लॉग पोस्ट मधील शब्दांचे प्रमाण प्रत्येक इंडस्ट्री करिता वेगवेगळे सुद्धा असू शकते. जसे की फायनान्सशी संबंधित ब्लॉग पोस्ट करिता २१०० ते २५०० शब्दांचा वापर केला जातो. हेल्थकेअर ब्लॉग करिता २००० ते २१५० शब्दांचा वापर करण्यात येतो. मॅनिफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या ब्लॉग पोस्ट करिता १७०० ते १९०० शब्दांचा वापर करण्यात येतो. होम आणि गार्डन ब्लॉग पोस्ट करिता 1000 ते १२०० शब्दांचा वापर करण्यात येतो.

टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेल्या ब्लॉग करिता ८०० ते १००० शब्दांचा वापर करण्यात येतो. फॅशन ब्लॉग करिता ८०० ते ९५० शब्दांचा वापर करण्यात येतो. फुड ब्लॉक करिता १४०० ते १९०० शब्दांचा वापर करण्यात येतो. तसेच ट्राव्हल ब्लॉक करिता १५०० ते १८५० शब्दांचा वापर करण्यात येतो. आता इथे तुम्हाला हे कळाले असेल की कुठल्या इंडस्ट्री मध्ये ब्लॉग पोस्ट साठी किती शब्दांचा वापर करण्यात येतो आणि यानुसार तुम्ही तुमचा ब्लॉग कुठल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये शब्दांचा वापर करू शकतात.

आता तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की तुमच्या ब्लॉग पोस्टच्या शब्दांच्या लेंग्थ (Length) सोबतच तुमच्या ब्लॉग पोस्टचा टॉपिक, पोस्ट प्रेझेंटेशन, रीडर्स सोबत कम्युनिकेट करण्याची स्किल या सर्व गोष्टी तुमच्या ब्लॉग पोस्ट वर आलेल्या रीडर्सला पोस्टवर थांबून ठेवण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे एक उत्कृष्ट ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायचे आहे.

जर तुम्हाला गुगलच्या सर्च इंजिनवर चांगली रँकिंग हवी असेल तर तुम्हाला दर हफ्त्याला किमान ३ ते ४ ब्लॉग पोस्ट लिहिणे गरजेचे आहे. तुम्ही जितके जास्त प्रमाणात ब्लॉग पोस्ट लिहित जाईल तितक्या जास्त प्रमाणात तुमची ब्रॅण्डिंग आणि तुमच्या रिडर्सचा तुमच्यावरचा विश्वास वाढत जाईल. असे केल्यामुळे तुमच्या ब्लॉग पोस्टवर युनिक विजीट वाढू लागतील आणि तुमचा कन्वर्जन रेट सुद्धा वाढेल.

ब्लॉग पोस्ट साठी शब्दांची मर्यादा किती आहे

तुमचे ब्लॉग पोस्ट मध्ये सोप्या शब्दांचा वापर करा म्हणजे युजरला समजण्यासाठी सोपे जाईल. सोपे भाषेत लिहिलेली ब्लॉग पोस्ट यूजरला वाचण्यासाठी आवडत असते या उलट जर तुम्ही अवघड शब्दांचा वापर केला तर तुमच्या ब्लॉग पोस्ट वाचण्या मध्ये युजर्स इंटरेस्ट कमी होऊ लागतो. कारण तुमच्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला युजरला नेमके काय सांगायचे आहे हे रीडर्सला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक ब्लॉग पोस्ट मध्ये सोप्या आणि सहज समजले जाईल अशा शब्दांचा वापर करायचा आहे.

तुमच्या ब्लॉग पोस्ट वर आलेल्या युजरला थांबून ठेवण्यासाठी तुमच्या शब्दांना छोट्या-छोट्या पॅरेग्राफ मध्ये लिहायचे आहे. आणि ब्लॉग पोस्ट गरजेनुसार ब्लॉग पोस्ट साठी योग्य टायटल, सबटायटल, हायलाइट्सचा वापर करायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या ब्लॉग पोस्ट वर आलेल्या रीडर्स्सचा पोस्ट वाचण्या मध्ये अजून जास्त प्रमाणात इंट्रेस्ट वाढू लागतो. तुमचे ब्लॉग पोस्ट साठी गरजेचे असलेल्या शब्दांची लेंग्थ (Length) पूर्ण करण्या करता विनाकारण तुमच्या ब्लॉग मध्ये शब्द वाढवण्याचा प्रयत्न करू नका किंवा ब्लॉग पोस्ट मध्ये पुन्हा-पुन्हा अगोदर लिहिलेल्या वाक्यांचा उपयोग करू नका. असे केल्यामुळे तुमच्या कॉन्टेन्टची व्हॅल्यू कमी होऊ लागते.

किती शब्दांचा ब्लॉग लिहिला पाहिजे | How Many Words We Should Use for Blogging

How Many Words Should Use for Blogging in WordPress: ब्लॉग पोस्ट लिहिताना तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये Active voice verbs चा वापर करणे देखील फायदेशीर ठरू शकते. असे केल्यामुळे तुमचे ब्लॉग पोस्ट आणि रीडर्स ज्याच्याकडे जास्त वेळ नाही. तो देखील एक्शन घेऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला तुमच्या रीडर्स सोबत डायरेक्ट बोलायचे आहे. तुम्हाला पुढील पैकी कुठले वाक्य योग्य वाटते ते सांगा. उदाहरणार्थ- ब्लॉगच्या शब्दांची length 2500 शब्दांपर्यंत असायला हवी आणि दुसरे वाक्य तुम्ही तुमची ब्लॉग पोस्ट 2500 शब्दांमध्ये लिहायला हवी.

आता हे सांगा या दोन्ही वाक्य यापैकी तुम्हाला कुठले वाक्यात अधिक चांगले वाटले, किव्वा रीडर्स फ्रेंडली वाटले? या दोघांपैकी असे कुठले वाक्य आहे जे वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी तुम्हाला जास्त सोपे आणि फ्रेंडली वाटले. तुमचे यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. परंतु जर आमचा अंदाज विचारला तर आम्हाला असे वाटते कि या दोन्ही दिलेल्या वाक्य पैकी तुम्हाला दुसरे वाक्य नक्कीच आवडले असेल.

कारण या वाक्य मध्ये तुमच्यासोबत डायरेक्ट बोलण्यात आले आहे आणि तुम्हाला एका मित्राप्रमाणे संधी देण्यात आलेला आहे. त्यासोबतच तुम्ही कशा प्रकारे पुढील ऍक्शन घेतली पाहिजे यासाठी तुम्हाला प्रेरित सुद्धा या वाक्यातून करण्यात आलेली आहे. थोडक्यात काय तर तुम्हाला नेहमी हे लक्षात ठेवायचे आहे की ब्लॉग पोस्ट बनवताना तुम्हाला अशा शब्दांचा वापर करायचा आहे की जणू तुम्ही तुमचे मित्रासोबतच चर्चा करत आहात. असे केल्यामुळे तुमच्या रीडर्सला तुम्ही योग्य प्रकारे सोलुशन देऊ शकतात.

ब्लॉग पोस्ट कशी लवकर rank करावी | How Many Words Should Use for Blogging in Blogger

आता हे समजून घेऊ की अशाप्रकारे लिहिलेले ब्लॉगला तुमचे रीडर्स्स किती पसंत करू शकेल? मी तुमच्या ब्लॉग पोस्ट वर किती वेळ थांबेल? आता या सर्व गोष्टी अवलंबून आहे तुम्ही ब्लॉग पोस्ट कशा प्रकारे तयार केली आहे आणि तुमच्या ब्लोग मध्ये नेमके कोणत्या कोणत्या कंटेनरचा वापर केलेला आहे. थोडक्यात 80% तुमच्या ब्लॉग पोस्ट च्या दिसण्यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे जर तुमची अशी इच्छा असेल की तुमच्या ब्लॉग पोस्ट वर जास्तीत जास्त रीडर्स्स यायला हवे आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्या ब्लॉग पोस्ट वर थांबायला हवे आणि जास्तीत जास्त लोकांनी तुमचा ब्लॉग इतर लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये फ्रेंडली आणि सोप्या शब्दांत सोबतच इमेजेस आणि व्हिडिओचा देखील शक्य तेवढा वापर करायचा आहे. केल्यामुळे तुमच्या ब्लॉग पोस्ट वर आलेले रीडर्सला कंटाळवाना वाटणार नाही आणि त्यांचा पोस्ट वाचण्याचा इंट्रेस देखील वाढू लागेल. परंतु तुम्हाला येथे ही देखील काळजी घ्यायची आहे की तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्ही ज्या इमेजेस आणि व्हिडिओ चा वापर करणार आहे हे तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट च्या टोपी ची रिलेटेड वापरायची आहे विनाकारण कुठलेही इमेजेस आणि व्हिडिओ चा वापर करू नका.

आता तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला सर्च इंजिनवर rank करण्यासाठी तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये किती शब्दांचा वापर करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला पोस्टची संबंधित इमेजेस आणि व्हिडिओ चा वापर करायचा आहे, टायटल, सबटायटल, हायलाइट्स या सर्वांचा वापर करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला रेगुलर बेसिस वर पोस्ट पब्लिश करायचे आहे.

आम्ही आशा करतो की तुमच्या मनात असलेला प्रश्न की (How Many Words We Should Use for Blogging) ब्लॉग साठी किती शब्दांचा वापर केला पाहिजे याची तुम्हाला समाधान कारक उत्तर नक्कीच मिळाले असेल. आम्ही आशा करतो कि एक चांगला ब्लॉगर बनण्यासाठी आजच्या आर्टिकल मधून आम्ही आपल्या सोबत शेअर केलेली माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही पोस्ट आपल्याला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या पोहोचला शेअर करू शकतात आणि या पोस्ट विषय आपली काय प्रतिक्रिया आहे हे कळण्यासाठी आम्हाला कमेंट देखील करू शकतात.

READ MORE POSTS

ब्लॉग कसा तयार करावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top