What is Influencer Marketing in Marathi | इन्फ्लुएंसर मार्केटिंग म्हणजे काय

Share this

What is Influencer Marketing in Marathi: जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल किंवा तुमच्या प्रोडक्टची ब्रँड अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तरी यासाठी तुम्हाला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग खूप जास्त प्रमाणात मदत करू शकते. कारण आपण अनेक अशा लोकांना इन्शुरन्स होतो ज्यांचे बोलणे आपल्याला पसंत पडते. अशा लोकांवर आपण नक्कीच विश्वास ठेवतो आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण अनेक वस्तूंची खरेदी देखील करत असतो. अशा लोकांना इन्फ्लुएन्सर असे म्हटले जाते आणि त्यांच्या मदतीने कुठलाही ब्रँड किंवा प्रॉडक्ट त्यांच्या सर्विसेसची मार्केटिंग करून घेत असते.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमके इन्फ्लुएन्सर कोणाला म्हटले जाते आणि जरी नाही समजले तरी हरकत नाही कारण आजच्या या लेखांमध्ये आपण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग विषयीचे संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे आमचा हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय याविषयीच्या आपल्या मनात असलेले अनेक प्रश्न आणि शंका याचे आपल्याला समाधान कारक उत्तर नक्की सापडेल.

संपूर्ण माहितीसह इन्फ्लुएंसर मार्केटिंग म्हणजे काय | What is Influencer Marketing in Marathi

तुम्हाला जाहिराती विषयी नक्कीच माहिती असेल कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात करणे ही ट्रॅडिशनल मार्केटिंगची पद्धत आहे. तसेच आता सर्व मार्केट ऑनलाईन झाले असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या लोकांची संख्या देखील तेवढ्याच गतीने वाढू लागलेली आहे. त्यामुळे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हे ट्रॅडिशनल मार्केटिंगच्या तुलनेत जास्त पकड बनू लागली आहे. जसे की अमिताभ बच्चन घडी डिटरजन या प्रॉडक्टची ॲडवटाईज करताना आपल्याला अनेक वेळा टीव्हीवर दिसतात. अशाच प्रकारे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये सुद्धा प्रोडक्टची जाहिरात केली जाते. थोडक्यात काय तर आपल्या सर्वांना आवडत असलेले सेलिब्रिटी किंवा सोशल मीडिया स्टार्स या प्रॉडक्ट विषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतात आणि ते प्रॉडक्ट विकत घेण्याचा सल्ला देतात.

या जाहिराती बघितल्या नंतर आपल्याला देखील ते प्रोडक्ट खरेदी करावेसे वाटते आणि आपण या सेलिब्रिटींचे बोलणे ऐकून त्यांनी सुचवलेले प्रोडक्स अनेकदा खरेदी सुद्धा करीत असतो. थोडक्यात काय तर आपल्या सर्वांवर मूवी स्टार्स किंवा सोशल मिडीया स्टार्सचा इन्फ्ल्यून्स असतो. याच इन्फ्ल्यून्सचा फायदा घेऊन विविध कंपन्या आपापल्या प्रोडक्टचे ब्रँडिंग करत असते आणि सेलिब्रिटींच्या मदतीने आपले प्रॉडक्ट लोकांना विकत असते. इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या साह्याने या कंपनीने आपले भरपूर प्रमाणात प्रोडक्स विकतात आणि खूप मोठा नफा देखील कमवीत असतात.

इन्फ्लुएंसर मार्केटिंगचे किती प्रकार आहेत

तुम्हाला कदाचित विश्वास पटणार नाही परंतु एका सर्वेक्षणातून असे लक्षात आले की 86% महिला शॉपिंग करण्यापूर्वी सोशल नेटवर्कर त्या प्रोडक्स विषयीची माहिती घेत असतात आणि इन्फ्लुएन्सर ज्या प्रॉडक्टची चांगल्या प्रकारे माहिती देतात त्याच प्रॉडक्टला या महिला खरेदी देखील करीत असतात. असे सर्व प्रोडक्ट सोबत होते त्याच्या मुळेच या कंपन्या वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर सोबत (collaboration – कोलॅब्रेशन) सहयोग करण्यात आणि आपल्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगची स्टॅटर्जी नेमकी कशी केली पाहिजे यामध्ये व्यस्त झालेल्या आहेत.

इन्फ्लुएन्सर मध्ये देखील अनेक प्रकार असतात जसे की MEGA INFLUENCERS, ACTORS, ARTIST, ATHLETICS, CELEBRITY. कारण या लोकांची पोपुलारिटी जास्त असते आणि लाखो लोकांकडून यांना पसंत देखील केली जात असते. जसे की विराट कोहली किंवा अमिताभ बच्चन हे असे सोशल मीडिया स्टार आहे ज्यांचे 1 मिलियन पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

त्यानंतर इन्फ्लुएन्सरचा अजून एक प्रकार असतो ज्याला MACRO INFLUENCER असे म्हटले जाते. यामध्ये अशी युट्यूबर्स आणि ब्लॉगर असतात ज्यांचे 100000 ते 1 मिलियन पर्यंत सब्स्क्राइबर्स असतात. तसेच तुम्हाला किंवा मला लाईफ स्टाईल किंवा फॅशन या कॅटेगरीमध्ये इन्फ्ल्यून्स करणे या लोकांना खूप चांगल्या प्रकारे जमते.

त्यानंतर इन्फ्लुएन्सरचा तिसरा प्रकार असतो ज्याला MICRO INFLUENCERS असे म्हटले जाते. यामध्ये ते लोक सहभागी असतात ज्यांचे किमान एक हजारापासून ते एक लाखापर्यंत फॉलोवर्स असतात अशा लोकांना मायक्रो इन्फ्लुएन्सर असे म्हटले जाते. यांना ते ज्या फिल्डमध्ये कार्य करीत असतात त्या विषयाची त्यांना संपूर्णपणे माहिती असते आणि त्यांनी दिलेला सल्ला लोकांना आवडत असतो आणि त्यांच्या सल्ल्यावर ती लोक विश्वास देखील ठेवत असतात. अनेक लोक अशा इन्फ्लुएन्सरवर देखील विश्वास ठेवतात त्यामुळे विविध कंपन्या त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात MICRO INFLUENCERS कडून देखील करून घेत असते.

इन्फ्लुएंसर मार्केटिंग कशी केली जाते | What is Influencer Marketing and How it works:

टॉप इंडियन युट्यूबर्स विषयी जर बोलायचे झाले तर निषा मधुलिका किंवा संदीप महेश्वरी हे नाव तुमच्या नक्कीच परिचयाची असेल. तसेच जर इंस्टाग्राम च्या टॉप इंडियन इन्फ्लुएन्सर विषयी बोलायचे झाले तर त्यामध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा किंवा जॅकलीन फर्नांडिस सारख्या सेलिब्रेटिंगचा समावेश होतो. याच्या व्यतिरिक्त देखील अनेक बॉलिवूड स्टार्स देखील समावेश होतो.

यानंतर इन्फ्लुएन्सरचा चौथा प्रकार ज्याला NANO INFLUENCERS असे म्हटले जाते. त्यांचे किमान एक हजारापासून ते पाच हजारापर्यंत फॉलोवर्स असतात. अशा अशा इन्फ्लुएन्सर सोबत COLLABORATION करून काम करताना कंपन्यांना कमी पैसे द्यावे लागतात. असे इन्फ्लुएन्सर त्यांच्या ऑडियन्स सोबत खूप जवळून रिलेट होतात. आणि अशा इन्फ्लुएन्सरचे एंगेजमेंट रेट सुद्धा खूप अधिक प्रमाणात असते. त्यामुळे लोकांकडून अशा स्मॉल इन्फ्लुएन्सरच्या बोलण्यावर अधिक विश्वास असतो.

आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग विषयीची ही माहिती मिळाल्यानंतर तुम्ही याचा योग्य पद्धतीने वापर करून तुमच्या प्रॉडक्टची किंवा ब्रँडची लगेच मार्केटिंग नाही सुरू करू शकत. कारण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या मुद्द्यांकडे देखील लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.

जसे की तुम्हाला असा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शोधावा लागेल ज्याची ऑडियन्स आणि फोनवर तुमचा बिजनेस किंवा तुमच्या प्रॉडक्टची रिलेट करत असेल. तुम्हाला असा इन्फ्लुएन्सर शोधावा लागेल की ज्याची फॉलोवर्स ची संख्या जास्त आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही जाहिरात केलेल्या प्रोडक्टची माहिती पोहोचली पाहिजे.

यासोबत तुम्हाला हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की जास्त फॉलोवर्स सण याचा असा अर्थ नाही की तुमची मार्केटिंग अतिशय योग्य प्रकारे होईल. कारण सर्च जितका स्पेसिफिक असेल तितकी तुमच्या प्रोडक विषयीची माहिती आणि ऑथेंटिकेशन फॉलोवर्स पर्यंत पोहोचेल.

READ MORE

इन्फ्लुएंसर मार्केटिंग साठी कोणते प्लॅट्फॉर्म वापरतात

तुमचे ब्रँडच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेसची जाहिरात करण्याकरिता तुमच्याकडे एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीची स्टेटर जी असणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही नेमके कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करीत आहात. त्यांची जेंडर, वय, लोकेशन, भाषा, त्यांचा इंटरेस्ट अशा सर्व गोष्टींची तुमच्याकडे माहिती असणे गरजेचे आहे.

जेव्हापण तुम्ही तुमचा मार्केटिंग प्लान तयार करत असेल तेव्हा तुम्हाला हे देखील लक्षात घ्यायचे आहे की तुम्ही तयार केलेला आपल्याला स्पेसिफिक असणे खूप गरजेचे आहे. तुमचा मार्केटिंग प्लेन स्पेसिफिक असल्यामुळे तुम्ही लिमिटेड ऑडियन्स पर्यंत तुमचा ब्रँड अवेअरनेस आणि प्रॉडक्ट सर्विसेसची माहिती पोहोचू शकतात.

असे केल्याने तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची जास्तीत जास्त लोकांपर्यंत विक्री देखील करता येईल आणि तुम्हाला इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या मदतीने चांगला रिझल्ट देखील बघायला मिळेल. तुम्हाला तुमच्या (campaignign) कॅम्पेनिंगसाठी योग्य सोशल मीडिया प्रथमच देखील वापर करावा लागेल जसे की युट्युब किंवा इंस्टाग्राम.

परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि तुम्हाला युट्युब वर तुमचा मार्केटिंग कॅम्पेनिंग चालविले पाहिजे. कारण युट्युब हा दुसरा सगळ्यात जास्त लोकांकडून विजीट केला जाणारा वेबपेज आहे आणि या प्लॅटफॉर्मवर दोन पेक्षा अधिक लोक दर महिन्याला ॲक्टिव्ह असतात. तसेच या प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्हिडिओच्या द्वारे ब्युटी, फॅशन, फिटनेस अशा विविध क्षेत्रात संबंधित असलेल्या प्रोडक्टची जाहिरात करू शकतात.

त्याचप्रमाणे इंस्टाग्राम या सोशल मीडिया विषयी जर बोलायचे झाले तर हे देखील लोकांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात वापरण्यात येणारे ॲप आहे. आणि या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला वन बिलियन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर्स असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची जर मार्केटिंग करायचे असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम किंवा युट्युब अशा प्लेटवर मार्केटिंग केली पाहिजे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे प्रोडक्ट विषयीची माहिती पोचवता येईल. असे केल्यामुळे तुमच्या ब्रान्डला किंवा प्रॉडक्टला जास्तीत जास्त लोकांकडून एंगेजमेंट मिळेल आणि तुम्ही जो कॅम्पेनिंगसाठी पैसा खर्च करेल त्याचा तुम्हाला पॉझिटिव्ह रिजल्ट देखील सहज मिळेल.

इन्फ्लुएंसर मार्केटिंग करावयाची योग्य पद्धत

What is Influencer Marketing in Marathi: जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इन्फ्लुएन्सर द्वारे एक चांगला मेसेज सुद्धा द्यावा लागेल जो इतर प्रोडक्ट पेक्षा नक्कीच युनिक देखील असला पाहिजे. असे केल्यामुळे कंजूमर तुमच्या प्रोडक्ट कडे सहजपणे आकर्षित होतात. यासोबतच तुमच्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या प्रत्येक स्टेपला ट्रॅक सुद्धा करता आले पाहिजे म्हणजे तुम्हाला तुम्ही चालवत असलेल्या मार्केटिंग CAMPAIGN मध्ये नेमकी किती प्रोग्रेस होत आहे हे तुम्हाला तपासता येईल. यासाठी तुम्ही traackr, klear, thomson अशा विविध tools हा देखील वापर करू शकता.

तसेच जर तुम्हाला एक इन्फ्लुएन्सर बनायचे असेल तर तुम्हाला सर्वात आगोदर एक परफेक्ट Niche शोधावी लागेल आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्यासाठी परफेक्ट असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील शोधावा लागेल. आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला रेगुलर तुमचे स्वतःचे कंटेंट अपलोड करावे लागेल. जर तुम्ही नियमितपणे हाय क्वालिटी कन्टेन्ट अपलोड करत असाल तर तुम्हाला देखील विविध कंपन्यांकडून ब्रेड इन्फ्लुएन्सर च्या ऑफर्स येऊ लागतील. तसेच यासोबतच तुम्ही sponsored content, affiliate marketing, webinars, consulting अशा विविध पर्यायांचा वापर करून इन्फ्लुएन्सर बनू शकतात आणि त्यातून भरपूर प्रमाणात पैसे देखील कमवू शकतात.

तर मित्रांनो आता तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की (What is Influencer Marketing in Marathi) इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय, आणि कशाप्रकारे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केली जाते, इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचे किती प्रकार असतात हे देखील आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगितले आहे, त्यासोबतच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी किती फॉलोवर्स असणे गरजेचे आहे व त्यासाठी तुम्ही कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला पाहिजे या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला आजच्या या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

आम्ही आशा करतो की (What is Influencer Marketing in Marathi:) इन्फ्लुएंसर मार्केटिंग म्हणजे काय याविषयीची आपल्या मनात असलेले सर्व शंका आणि प्रश्न आपल्याला समाधानकारक उत्तर नक्कीच मिळाली असेल आणि आमचा हा आर्टिकल आपल्याला आवडला असेल तर या आर्टिकल ला आपण आपल्या मित्र परिवारामध्ये देखील नक्कीच शेअर करा. आणि इंटरनेटवर मार्केटिंग विषयीचे आपल्या मनात अजून काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकतात आम्ही नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top