How to create your own cryptocurrency in Marathi: खरंतर पैशाच्या देवाणघेवाणीचे बाबतीत आपण ज्या गोष्टीशी परिचित आहोत त्या आहेत रुपये, डॉलर्स, युरो आणि पाउंड. परंतु अचानक लोकांना असे समजू लागले की बिटकॉइन नावाची देखील एक करन्सी (चलन)आहे ज्याला लोक क्रिप्टोकरन्सी या नावाने देखील ओळखतात. म्हणजेच ती करेन्सी एक वर्च्युअल करन्सी आहे. ज्याची आपण इंटरनेटच्या माध्यमातून देवाणघेवाण करू शकतो. क्रिप्टोकरन्सी कशी आहे आणि कशा प्रकारे दिसते आणि हे कुठल्या देशाचे चलन आहे असा बर्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो.
तर याचा कुठलाही विशिष्ट असा चेहरा नाही आणि ही कुठल्याही विशिष्ट देशाची करन्सी देखील नाही. या करेन्सीचा इंटरनेटवर कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही प्रकारे उपयोग केला जातो. त्यामुळे जर आज तुमच्याकडे एक बिटकॉइन आहे तर असे समजून घ्या की तुम्ही 43 लाख रुपयाची मालक आहात. बिटकॉइनला क्रिप्टोकरन्सी असे म्हटले जाते आणि आज आम्ही आपल्याला सांगणार आहो की आपण आपल्या स्वतःची क्रिप्टोकरन्सी कशी बनवू शकतो.
साल 2017 पर्यंत बिटकॉइनचे मार्केट साधारण 12.9 बिलीयन डॉलर एवढे होते. तसेच बिटकॉइनची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली होती. परंतु मागील पाच-सहा वर्षांमध्ये याचे नाव सर्वांच्या ओठांवर आहे. बीबीसी वर्ल्ड किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आज क्रिप्टोकरन्सी विषयी चर्चा केली जाते. बिटकॉइन व्यतिरिक्त बऱ्याच क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत जसे कि Ethereum, beinance, Bitcoin Cash, Litecoin, Ripple, Stellar, NEO, Cardano, IOTA. यामध्ये फायनान्शिअल एक्सचेंज, पेमेंट आणि इन्व्हेस्टमेंट देखील केली जाते. जेव्हा पासून लोकांना बिटकॉइंसमध्ये पैसे कमवण्याचे मार्ग दिसू लागला तेव्हापासून लोकांनी यामध्ये इन्वेस्टमेंट करण्यास सुरुवात देखील केली.
क्रिप्टोकरन्सी कशी बनवावी | How to create your own cryptocurrency
त्यामुळे तुमच्या मनात देखील जर हा प्रश्न पडला असेल की कोणीही साधारण व्यक्ती आपली स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवू शकतो का तर या प्रश्नाचे आम्ही आपल्याला सविस्तर पणे उत्तर देणार आहोत. परंतु क्रिप्टोकरन्सी बनविण्यापूर्वी याचे नियम आणि अटी काय आहेत हे तुम्हाला समजून घेणे फार गरजेचे आहे.
क्रिप्टोकरन्सी मध्ये कॉइंस आणि टोकन यांचा वापर केला जातो, तुम्ही कॉइंस द्वारे टोकन विकत घेऊ शकतात, परंतु तुमच्याकडे असलेल्या टोकन द्वारे कॉइन खरेदी नाही करू शकत. असे समजा की जर तुम्ही पिझ्झा खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही पैसे देऊन पाच दिवस पिझ्झा खाल्ला तर तुम्हाला त्या रेस्टॉरंट कडून काही पॉइंट्स दिले जातील. आता हेच पॉईंट्स टोकन प्रमाणे काम करतात. ज्याच्या सहाय्याने तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा किंवा कॉफीची ऑर्डर करू शकता. परंतु तुम्हाला मिळालेल्या त्या पॉइंटचे तुम्ही कॅश मध्ये रूपांतरित नाही करू शकत.
त्यामुळे तुम्ही स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवण्यापूर्वी या गोष्टीचा नक्की विचार करा की तुम्हाला खरोखरच क्रिप्टोकरन्सी बनविण्याची गरज आहे का? कारण क्रिप्टोकरन्सीचा सर्वात जास्त फायदा फक्त त्याच लोकांना होतो जी त्यांचा जास्तीत जास्त व्यवहार इंटरनेटच्या मार्फत करतात. ही करन्सी त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे त्यांची पेमेंट्स डिजिटल पद्धतीने करतात आणि ज्यांना आपल्या बिजनेस मध्ये डिजिटल पेमेंट युजर बेस वाढवायचा असेल त्यांच्यासाठी ही अतिशय फायदेशीर अशी करन्सी आहे.
How to Start Your Own Cryptocurrency in Marathi
How to create your own cryptocurrency full details: आता जर तुम्ही हे ठरवलं असेल की तुम्हाला स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवायची आहे चला आता समजून घेऊ क्रिप्टोकरन्सीच्या टेक्निकल आणि लीगल गोष्टीं.
स्वताची क्रिप्टोकरन्सी बनण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एखाद्या ब्लॉकचेनचा भाग बनावा लागेल. ब्लॉकचेन एक टेक्नॉलॉजी आहे आणि एक असे प्लॅटफॉर्म आहे इथे केवळ डिजिटल करन्सी नाही तर कुठल्याही गोष्टीला डिजिटल पद्धतीने बनवून त्याचे रेकॉर्ड ठेवले जाऊ शकते. म्हणजेच काय तर ब्लॉकचेन एक डिजिटल लेझर आहे आणि बिटकॉइन हे एक डिजिटल माध्यम आहे. ज्याच्या सहाय्याने आपण कुठलीही गोष्ट खरेदी करू शकतो किंवा विकू शकतो. खरेतर यांना करन्सी असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण याला वास्तविक जीवनात कुठलीही किंमत नाही.
ब्लॉकचेन मध्ये कुठलेही ट्रांजेक्शन करण्यासाठी नेटवर्कच्या सर्व नोट्सला सहमती द्यावी लागते तेव्हाच केलेले ट्रांजेक्शन हे व्हॅलिड समजले जाते. ट्रांजेक्शन झाले आहे की नाही हे कुठलीही एखादी NTT (NianLun Time Token) नाही ठरवू शकत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी साठी ब्लॉकचेनन हे एक भरवशाचे प्लॅटफॉर्म आहे. क्रिप्टोकरन्सी सुरू करणे म्हणजे एखाद्या डिजिटल करन्सी चे नाव ठेवणे असे नाही कारण याविषयी भरपूर ज्ञान असणे खूप गरजेचे आहे हे जेवढे सोपे वाटते तेवढे सोपे मुळेच नाही.
तुम्हाला अगोदर हे ठरवावे लागेल की तुम्ही तुमच्या ब्लॉकचेनला कॅश मध्ये रूपांतरित करण्याची ऑप्शन देणार की नाही किंवा त्याऐवजी पॉईंट्स. ज्याच्या सहाय्याने डिजिटल खरेदी केली जाऊ शकते. असे समजा की तुम्ही स्वतःची क्रिप्टोकरन्सी सुरू केली आहे आणि त्याचे नाव दिले आहे ABC. तर तुमची ही करन्सी कशाप्रकारे कार्य करेल हे देखील तुम्हाला अगोदरच ठरवावे लागेल. कुठलाही सॉफ्टवेअर बनवण्यासाठी त्याची कोडींग करावी लागते ज्याला सोर्स कोड असे म्हटले जाते. अशाच प्रकारे डिजिटल करन्सी बनवण्यासाठी देखील कोडींग करावी लागते. याकरिता तुम्हाला ब्लॉकचेन सर्विस प्रोव्हायडरची मदत घ्यावी लागेल. खरं तर हा विषय इतका खोल आहे की यासाठी तुम्हाला टेक्निकल टीमच्या एक्सपर्ट आणि लीगल ॲडव्हायझर यांच्या सल्ल्याची आणि मदतीची गरज पडेल.
How to make your own crypto coins | How to create your own cryptocurrency information in marathi
ब्लॉकचेन सर्विस वापरण्यासाठी तुम्ही Waves, Block Starter, EOS, Coin List यासारख्या अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांपैकी तुम्ही कोणाही एकाला निवडू शकतात. आता तुम्हाला हे ठरवावे लागेल की क्रिप्टोकरन्सी मध्ये तुम्हाला कॉइन ठेवायचा आहे की टोकन. यासाठी जर तुम्ही एखाद्या फ्री सोर्सचा वापर केला तर तुम्ही सहज तुमचा कॉइन बनवू शकतात. परंतु त्यामध्ये फेर बदल करायचा असेल आणि तुम्हाला हवे त्याप्रमाणे जर कस्टमायजेषण करायचे असेल तर तुम्हाला या कोडिंगचे खोल ज्ञान असणे गरजेचे आहे. फक्त आपली डिजिटल करन्सी सुरू करणे पुरेसे नाही तर त्याची मार्केटिंग करणे, सिक्युरिटी ठेवणे आणि टेक्निकल गोष्टी मेंटेन करणे देखील गरजेचे असते. या साठी तुम्हाला एखादी प्रोफेशनल टीम नेमावी लागेल किंवा एखाद्या फर्म कडे हे काम द्यावे लागेल.
कारण तुमच्या नवीन कॉइन साठी तुम्हाला एक नवीन ब्लॉकचेन बनवावे लागेल आणि टोकन बनवण्यासाठी तुम्ही उपलब्ध असलेल्या ब्लॉकचेन सर्विसचा वापर करू शकतात जसे की Ethereum. इथे तुम्हाला सुरक्षित नेटवर्क मिळते जिथे तुम्ही निश्चिंत होऊन ट्रेडिंग करू शकतात. Ethereum, NEO, EOS हे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्हाला क्रिप्टोकरन्सी बनवण्याची सोल्युशन्स दिले जातात. Ethereum ही सर्वात पहिली ब्लॉकचेन सर्विस प्रोव्हायडर आहे ज्यांनी टोकन बनवण्याची सुरुवात केली. क्रिप्टोकरन्सी बनवण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण नियोजन केलेली योजना हवी. जसे की ही करन्सी बनवण्यामागे तुमचा उद्देश काय आहे, यासाठी तुम्हाला कुठल्या लोकांना टारगेट करायची आहे, आणि तुमच्या या करन्सी मुळे तुम्ही एखादे चांगले काम करू शकता का. तसेच तुम्हाला ICO आणि STO यावर तुम्ही काय ऑफर देणार आहात हे देखील तुम्हाला ठरवावे लागेल. जर तुम्ही आपली क्रिप्टोकरन्सी बनवली असेल तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कॉईन ची ऑफर द्यावी लागेल. म्हणजेच तुमच्या कॉईन्स वर तुम्ही लोकांना काय ऑफर देणार आहेत आणि सिक्युरिटी टोकेन ऑफरिंग्ज मध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी खरेदी आणि विक्री करण्याच्या सोयी प्राप्त करून देणार आहात.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे | How to create your own cryptocurrency Full Information
बिटकॉइनच्या यशानंतर मार्केटमध्ये जणूकाही क्रिप्टोकरन्सीचा महापूर आलेला आहे. त्यामुळेच नवीन नवीन कॉइंस देखील लॉन्च केले जात आहेत. याचाच फायदा घेऊन बऱ्याच लोकांना लुबाडले देखील गेले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथे त्यांची गुंतवणूक सुरक्षित असेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचे ऑडिट करणे देखील गरजेचे आहे. ज्याच्या साह्याने तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करू शकतात. तुमच्या कंपनीचा व्हाईट पेपर द्वारे लोकांना तुमच्या कंपनी विषयी, तुमच्या टीम विषयी, प्लान, विजन विषयी समजेल. कारण हे लोकांना सांगणे खूप गरजेचे आहे की तुमच्या कॉईनची काय किंमत असेल, तुमचे ICO, STO काय असेल या सर्व गोष्टींची माहिती देणे देखील गरजेचे असते.
कुठलाही प्रॉडक्टची ब्रँडिंग करणे हे खूप गरजेचे आहे ज्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या पर्यंत तुमचा मॅसेज पोहोचला पाहिजे मार्केटमध्ये एक नवीन क्रिप्टोकरन्सी आलेली आहे. ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि लोक तुमच्या क्रिप्टोकरन्सी मध्ये इंटरेस्ट घेऊ लागेल. आणि यासाठी तुम्हाला पुन्हा Bitcoin, Ethereum, NEO यांसारख्या ब्लॉकचेन सर्विसेस प्रोव्हायडरची मदत घ्यावी लागेल. कारण तुमच्या कॉईन मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना हे जाणून घेता येईल की तुमच्या प्रोजेक्टची किती प्रगती आहे. कारण क्रिप्टोकरन्सी वर कुठल्याही बँकेचा किंवा गवर्मेंटचा कंट्रोल नसतो. क्रिप्टोकरन्सीचा वापर फक्त इंटरनेटवर केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला स्वतःची करन्सी बनवण्यासाठी कुठल्याही गव्हर्मेंट लायसन्सची किंवा अप्रूवलची गरज भासत नाही.
क्रिप्टोकरन्सी बनवण्यासाठी पाच मिनिटांत पासून साधारण सहा महिने पर्यंतचा अवधी लागू शकतो. कारण याला बनवणे ही एक टेक्निकल प्रोसेस आहे. त्यानंतर याची डॉक्युमेंटेन्शन वाईट पेपर बनविणे, कॉइन किंवा टोकण लॉंच करणे, त्याचे प्रमोशन करणे हे सर्व काही फक्त एका दिवसाचे काम नाही. तर Prolitus.com, Bitexchange.com, ETH Wallet असे असंख्य प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला तुमची स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवण्यासाठी मदत करू शकतात. परंतु कुठलेही क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्व्हेस्ट करण्यापुर्वी आणि कुठल्याही सर्व्हिस प्रोव्हायडर कडून मदत घेण्यापूर्वी त्यांच्याविषयी रिसर्च नक्की करा. कारण जिथे गुंतवणुकीचा विषय आला तिथे फसवणूक देखील येते.
How to Make your own cryptocurrency
जर भारत देशाविषयी बोलायचे झाले तर एखाद्या इंवेस्त्मेंट एक्सपर्ट सोबत चर्चा करणे गरजेचे आहे ज्याला याच्या जोखीमे बद्दल देखील माहिती असेल. ज्यांनी अगोदरच यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांचा अनुभव जर तुम्हाला मिळाला तर तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. किंवा तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचा ब्लॉग वाचू शकतात किंवा व्हिडीओ बघू शकतात ज्याने स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवण्याचा अनुभव सांगितला असेल किंवा शेअर केला असेल.
तसे बघायला गेले तर क्रिप्टोकरन्सी बनवणारे सहसा स्वतःची ओळख इतरांना सांगत नाहीत. Waziex हे क्रिप्टोकरन्सी मध्ये ट्रेडिंग आणि एक्सचेंज ह्या दोन्ही सर्विसेस देतात. तसेच यांचे एप्लीकेशन आपल्याला प्लेस्टोर वर देखील मिळेल. या कंपनीचे सीईओ निश्चाल शेट्टी यांनी असे सांगितले होते की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. भारतात बिटकॉइन विकत घेणे बेकायदेशीर नाही आणि यावर कुठलीही बंदी देखील नाही. परंतु यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची जबाबदारी ही स्वतःचीच असते आणि जर यामध्ये तुमची फसवणूक झाली, तुमचे नुकसान झाले तर कुठलीही सेंट्रल बँक, आरबीआय किंवा गव्हर्मेंट यात सहभाग घेत नाही.
क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यामध्ये जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे नुकसान देखील आहेत. फायदे जर बघायला गेलो तर यामध्ये अनलिमिटेड रुपये तुम्ही ट्रान्सफर करू शकता, यासाठी वेळ देखील कमी लागतो, चार्जेस देखील कमी असतात, पूर्ण जगात ही करन्सी स्वीकारली जाते. परंतु जर नुकसानीचा विचार केला तर एकदा ट्रान्सफर केलेले ट्रांजेक्शन पुन्हा रिफंड नाही केले जात, याच्या रेट मध्ये सतत उतार-चढाव असतो, मोजक्या ठिकाणी याचा वापर केला जातो.
Jaggatbhaari.com आपल्याला नेहमीच कुठल्याही गोष्टी विषयी सखोलपणे माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. तरीदेखील तुम्हाला जर स्वतःची क्रिप्टोकरन्सी सुरू करायची असेल तर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे ज्याला या विषयाचे सखोल ज्ञान असेल, ज्याने स्वतःची क्रिप्टोकरन्सी लॉंच केली असेल. त्यासाठी तुम्हाला अशा देखील लोकांची गरज पडेल जे या प्रोजेक्टसाठी त्यांचे पैसे आणि वेळ दोन्ही तुम्हाला देऊ शकेल. स्वतःची क्रिप्टोकरन्सी लॉन्च करतांना तुम्हाला प्रत्येक निर्णय हा व्यवस्थित घ्यावा लागेल आणि कुठलीही गोष्ट ठरविताना त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही विचार करावा लागेल. क्रिप्टोकरन्सी विषयी तुम्ही जितका सखोल अभ्यास कराल तेवढी तुमची रिस्क कमी होईल आणि स्वतःची क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यासाठी तुम्हाला मोठी मदत देखील मिळेल. तर आम्ही आशा करतो कि आपल्याला How to create your own cryptocurrency हा लेख आवडला असेल.
READ MORE POSTS
Post Views: 1,143