New Marathi Movie | 2021 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट

Share this

मागच्या वर्ष प्रमाणे आता सध्या पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केले आहे आणि जर आपण कोणते (New Marathi Movie) नवीन मराठी फिल्म 2021 या वर्षी रिलीज होणार हे शोधात असाल तर या लेखातून आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत कि कोणती मराठी फिल्म कधी रिलीज केली जाणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात बरेच बॉलीवूड, हॉलीवूड आणि अनेक सिनेमे जे सिनेमा गृहात प्रदर्शित केले जाणार होते त्यांच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत तर काही सिनेमा हे ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्म प्रदर्शित केले गेले आहेत. या लेखातून आम्ही आपल्याला ज्या फिल्म बद्दल माहिती देणार आहोत ते एप्रिल 2021 पासून रिलीज होणारे New Marathi Movie आहेत.

Upcoming New Marathi Movie in 2021

Jhimma :- हि एक मराठी ड्रामा फिल्म असून हेमंत ढोमे यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे आणि या फिल्मची कथा इरावती कर्णिक यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आपल्याला सुहास जोशी, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि सुचित्रा बांदेकर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतात. हि फिल्म 23 Apr 2021 रोजी सिनेमा हॉल मध्ये रिलीज करण्यात येणार आहे पण सध्याच्या परिस्थितीला पाहता कदाचित रिलीजची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

Zombivli :- हि एक कॉमेडी, ड्रामा, हॉरर फिल्म आहे या फिल्मचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे आणि यात आपल्याला अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैधेही परशुरामी, या सारखे कलाकार पाहायला मिळतात. या फिल्मचे टीझर काही दिवसापूर्वी रिलीज करण्यात आले होते ज्याला प्रेक्षकान कडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई जवळील शहरात एका जोडप्याला झोम्बि दिसतात आणि तिथून घरी फिल्मची कथा सुरु होते. हा चित्रपट 30 April 2021 ला थिएटर मध्ये रिलीज केला जाणार आहे.

Pawankhind:- हि एक आगामी मराठी फिल्म आहे जी 10 Jun 2021 ला रिलीज केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या फिल्मचे दिग्दर्शन दिगपाल लेनजेकर यांनी केले आहे.

Well done Baby :- मराठी सिने सृष्टीतील प्रसिध्द कलाकार पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर या दोघांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्म वर 9 April 2021 रोजी प्रदर्शित झाला आहे. या फिल्म मध्ये आपल्याला एक NRI जोडप्याची कहाणी बघायला मिळते. जे एकमेकान पासून आता दूर होण्याचा प्रयत्न करीत आहे पण त्यांच्या जीवनात एक अशी घटना होते त्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येऊ लागतात. प्रियांका तंवर द्वारे या फिल्मचे दिग्दर्शन करण्यात आले आहे.

YeRe YeRe Pavsa:- येरे येरे पावसा हि एक मराठी ड्रामा फिल्म आहे आणि या फिल्मचे दिग्दर्शन इशफाक खान यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच 2021 या वर्षात रिलीज करण्यात येणार आहे.

Panghrun:- पांघरून हि प्रेमावर आधारित एक मराठी फिल्म आहेत ज्यात आपल्याला असा काळ पाहायला मिळणार आहे जेव्हा महिला फक्त आपल्या परिवार साठी जगात होत्या त्यांच्या साठी त्यांचा परिवार महत्वाचा होता. या फिल्मचे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. गौरी इंगवले, रोहित फाळके, विध्याधर जोशी, प्रवीण तर्डे या सारखे प्रमुख कलाकार आपल्याला या फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे.

List of New Marathi Films of 2021

Gadbad Gondhal :- गाड्बळ गोंधळ या फिल्म मध्ये आपल्याला गार्गी आणि सन्मित्र या दोघांची प्रेम कहाणी पहायला मिळणार आहे. यासोबतच आपल्याला या फिल्ममध्ये दोन पिढ्यान मधील असलेले मतभेद देखी पाहायला मिळणार आहे. संतोष जुवेकर, स्मिता गोंदकर, मिलिंद पाठक, आनंद अभ्यन्कर या सारखे कलाकार या फिल्म मध्ये आहेत आणि योगेश दत्तात्रय यांनी फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट देखील 2021 मध्ये रिलीज होणार आहे.

Basta :- या फिल्म मध्ये आपल्याला एका अशा परिवाराची कथा दाखविली आहे ज्यांच्या मुलीचे लग्न होणार आहे आणि नवरीच्या वडिलांना हे लग्न पार पाडताना काय काय यातना सहन कराव्या लागतात हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. थोडक्यात एका नवरीच्या बापाची यातना तुम्हाला यात पाहायला मिळेल. या फिल्मच्या प्रमुख भुमिके आपल्याला सायली संजीव, सुहास पळशीकर, सुबोध भावे, भारत गणेशपुरे, सागर करंडे या सारखे कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तान्हाजी घडगे यांनी केले आहे.

Email Female:- विक्रम गोखले, निखील रत्नपारखी, दीप्ती भागवत, विजय पाटकर, कांचन पगारे हे कलाकार या फिल्मच्या प्रमुख भूमिकते दिसणार आहे. हि एक ड्रामा फिल्म असून या फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे.

Dimakhilal:- दिमाखीलाल या फिल्म मध्ये आपल्याला एका 12 वर्षाच्या मुलाची कथा पाहायला मिळते जो या फिल्म मध्ये विविध सामाजिक प्रश्नांना सोडविण्याचा पर्यंत करतो. सुनील अग्रेसर यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. हि फिल्म देखील 2021 या वर्षात रिलीज होणार आहे.

Sahi Hai Notebandi:- या फिल्म मध्ये आपल्याला पंतप्रधान द्वारे नोट बंधीची घोषणा केल्यावर काही लोक भ्रष्टचाराने मिळविलेल्या जुन्या नोटा नवीन नोटा मध्ये बदलण्याचा पर्यंत करतात आणि एक महाविद्यालयातील विध्यार्थ्याची यात खून होतो अशी कथा पाहायला मिळणार आहे. बाळासाहेब गोरे यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे आणि यात प्रमुख कलाकार मनोज टाकणे आहे.

Tendlya:- तेंडल्या हि एक मराठी ड्रामा फिल्म आहे सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे.

Babu :- या मराठी फिल्म मध्ये आपल्याला अंकित मोहन, गायत्री दातार, रुचिरा जाधव हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मयूर शिंदे यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे.

तर मित्रानो या सर्व New Marathi Movie नवीन मराठी फिल्म आहेत जे 2021 या वर्षी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे कि सिनेमा गृह देखील बंद करण्यात आलेली आहेत काही New Marathi Movie हे आपल्याला OTT प्लॅटफॉर्म वर जसे Amazon Prime यावर आपल्याला पाहायला मिळतील तर काही फिल्म हे कदाचित आपली रिलीजची तारीख बदलून सिनेमा गृहात रिलीज करतील.

Well Done Baby Movie Review | Marathi Movie | Amazon Prime

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top