Rules of successful people | जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग

Share this

मित्रांनो आजच्या Rules of successful people या आर्टिकल मधून आपण जगण्याची बारा असे नियम बघू जी तुम्हाला जीवन जगण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. आज जे मी तुम्हाला बारा नियम सांगणार आहेत हे प्रसिद्ध लेखक Jordan Peterson यांनी त्यांच्या 12 Rules For Life या पुस्तकातून सांगितलेली आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हे बारा नियम नियमितपणे पाळले तर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.

Rules of successful people in Marathi

  1. नेहमी खांदे मागे करून आणि सरळ उभे राहा.

नियम असा सांगतो की तुम्ही जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती समोर उभे राहाल तर तुम्ही तुमचे खांदे पुढच्या बाजूला झुकू नका तर या उलट तुम्ही कोणासमोरही उभे राहताना तुमचे दोन्ही खांदे मागे करून उभे राहा. जसा एखादा विजेता जिंकल्यावर उभा राहतो त्या प्रमाणे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुम्ही यशस्वी असल्याचे वाटू लागेल. जर तुम्ही तुमचे खांदे कोणासमोर चुकून ठेवले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच मिळवले नाही असे वाटेल. त्यामुळे हीच कार्यप्रणाली तुमच्या सोबत सतत घडू लागेल. त्यामुळे तुम्ही नेहमी उभे राहताना सरळ उभे राहिले पाहिजे आणि एखाद्या विजेत्या सारखे दोन्ही खांदे मागे करून ताठ उभे राहिले पाहिजे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक फरक जाणवू लागेल आणि समोरील व्यक्ती तुमच्या सोबत आदराने वागू लागेल.

2.आपण मदत करण्यास जबाबदार असलेल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे स्वत: ला वागवा

या नियमाची माहिती देताना लेखक असे सांगतात की जर तुमच्या घरातील एखादा सदस्य आजारी असेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांना बोलावून घेतात आणि डॉक्टर ने सांगितलेले सर्व औषधे तुम्ही मागवून घेतात आणि तुमच्या परिवारातील त्या सदस्याला देतात. परंतु या उलट जर तुम्ही स्वतः आजारी झालात आणि डॉक्टर ने तुम्हाला विशिष्ट औषधे घेण्यासाठी सांगितले तर त्याकडे तुम्ही फारसे लक्ष देत नाही आणि स्वतःसाठी ती औषधे देखील घेत नाही. एका सर्वेक्षणातून असे लक्षात आले की साधारण 33% लोक हे स्वतःवर लक्ष देत नाही जितके ते इतरांची काळजी घेतात.

Successful kashe banave in marathi

3. आपल्यासाठी चांगला विचार करणाऱ्या लोकांशी मैत्री करा

या नियमात असे सांगितले गेले आहे की तुम्ही त्याच व्यक्तीसोबत मैत्री केली पाहिजे ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये तुमची नेहमी साथ दिली होती. उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती अशी आहे ज्यांची कामगिरी फार चांगली नाही आणि त्याला असे टीम मध्ये टाकले गेले जी टीम खूप उत्कृष्ट काम करते. परंतु त्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण टीमची उत्कृष्ट कामगिरी धोक्यात येऊ शकते आणि या गोष्टीला कारण असते तर ती फक्त त्या व्यक्तीच्या वाईट सवयी आणि निष्काळजीपणा. त्यामुळे तुम्ही नेहमी नवीन मित्र फार विचार करून बनविले पाहिजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही स्वार्थी आहात. एकमेकांना सहकार्य करणं हे दोन्ही बाजूंनी असायला हव. त्यावेळेस तुम्ही निराश असाल तर हेच मित्र तुमच्या मध्ये आशेची किरण निर्माण करतात. त्याच प्रमाणे जेव्हा कधी तुमचे हे मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये निराश होतील तर तुमचे देखील काम आहे की तुम्ही त्यांच्या मनात नवीन ऊर्जा आणि आशेची किरण निर्माण केली पाहिजे.

जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग

4. आपण काल ​​कोण होता याची स्वतःशी तुलना करा, दुसर्‍या कोणाशीही नाही

या नियमात असे सांगितले आहे की जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल जर तुम्ही तुमच्या आजच्या परफॉर्मन्सची तुलना इतर व्यक्तींसोबत नाही तर तुमच्या कालच्या परफॉर्मन्स सोबत केली पाहिजे. याचे कारण असे आहे की या पृथ्वी वर 7.9 अब्ज लोक राहतात आणि कदाचित या लोकांपैकी बरेच लोक असे असतील ज्यांचा परफॉर्मन्स हा तुमच्या परफॉर्मन्स पेक्षा नक्कीच उत्कृष्ट असेल. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सशी तुलना इतरांसोबत करत असाल तर तुम्ही नक्कीच निराश होणार. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमची तुलना तुमच्या मित्रासोबत करत असाल तर त्यात कदाचित तुमच्या असे लक्षात येईल कि तुमच्या मित्राकडे तुमच्यापेक्षा चांगले घर आहे, जास्त पगाराची नोकरी आहे, तुमच्या पेक्षा चांगली तुमच्या मित्राकडे कार आहे. अशी तुलना केल्यावर तुम्ही नक्कीच निराश होऊ शकतात परंतु जर तुम्ही मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काय मिळवलं आहे आणि या वर्षी किती प्रगती केली आहे. असा विचार केला तर तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि आणखीन काहीतरी मिळवण्याचे ध्येय तुम्ही निश्चित करू शकाल.

5. आपल्या मुलांना असे काही करू देऊ नका की जे आपणास नापसंत करते

या नियमात असे सांगितले आहे की तुमचा पाल्य ( मुलं) चांगले नागरिक बनवणे ही समाजाची जबाबदारी नाहीतर तुमची जबाबदारी आहे. बरेचदा असं होतं की काही लहान मुले हे खूप रागीष्ट असतात त्या मुळे मुलाला चांगलं नागरिक बनवणं ही पालकांची जबाबदारी असते त्यासाठी हे तुमचे कर्तव्य आहे की तुमच्या मुलांना हे सांगितले पाहिजे की त्यांचे काय चुकले यावरती त्यांना काय शिक्षा होऊ शकते. चुका काय आहेत त्याप्रमाणे त्यांना योग्य ती शिक्षा देखील केली पाहिजे. प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांसाठी घरातील काही नियम सांगितले पाहिजे परंतु हे नियम फार जास्त असू नये त्यामुळे त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो.

Yash kase milvave | Rules of successful people

6. आपण जगावर टीका करण्यापूर्वी आपले घर परिपूर्ण क्रमाने सेट करा.

बरेच लोकांना सवय असते इतरांना विनाकारण नाव ठेवण्याची. उदाहरणार्थ विराट कोहलीने हा बॉल व्यवस्थित नाही खेळला किंवा शाहरुख खानने अशी एक्टिंग करायला नको होती. परंतु जे लोक याविषयी चर्चा करतात मुळातच त्यांना त्या फिल्ममधलं मुळीच ज्ञान नसतं. लेझर त्यांनाच आपण असे विचारले की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये का काही नाही कमविले तर यावर त्यांची उत्तर असते की या जगामध्ये भरपूर अडचणी आहेत, जे इतरांना खूप सोपे वाटतात परंतु स्वतः केल्यावर ती समजते कि हे काम किती कठीण आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःला नियमबद्ध करत नाही काही मिळत नाही तोपर्यंत तुम्ही देखील इतरांना विनाकारण सल्ले नाही दिले पाहिजे. जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही ज्या शहरात राहत आहे तिथे पूर येणार आहे परंतु या गोष्टीची कल्पना जर तुम्ही कोणाला दिली नाही आणि या शहराचे नुकसान झाले. तर त्या गोष्टीला फक्त तुम्हीच जबाबदार असाल देव नाही.

7. आपण अर्थपुर्ण आयुष्य जगले पाहिजे

तुम्हाला माकडाची गोष्ट माहितीच असेल एका काचेच्या बरणीमध्ये एक लाडू ठेवला होता आणि त्या बरणीच्या झाकणाला अशा प्रकारे होल केले होते की त्यामध्ये माकडाचा हात जाऊ शकेल आणि असेच झाले. माकडाने त्या बरनीतील लाडू पाहिले आणि त्या बरणीमध्ये हात घातला. लाडू उचलल्यानंतर तो हात बाहेर काढू लागला परंतु त्याची मुठ बंद असल्यामुळे त्या बरणीतून त्याचा हात बाहेर निघणे अशक्य होते. तो माकड त्याचा हात बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न करीत होता परंतु त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे तो शिकारीच्या हातात सापडला. जर या माकडाने त्या लाडूची लालसा केली नसती तर त्याने त्याची मुठ सोडली असती आणि त्याचा हात बाहेर निघू शकला असता. तर ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य फक्त एवढेच होते की जर तुम्हाला एक अर्थपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही नियम पाळने हे गरजेचे आहे. आणि या नियमांना क्षणिक सुखासाठी मोडले नाही पाहिजे.

जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग | Rules of successful people

8. खरे सांगा किंवा खोटे बोलू नका

या नियमात असे सांगितले आहे की तुम्ही कधीही खोटे नाही बोलले पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला परदेशामध्ये एक सुंदर बंगला विकत घ्यायचा आहे सर्व मित्रांसोबत तिथे पार्टी करायची आहे. परंतु सत्य परिस्थिती ही आहे की तुम्ही आर्थिक दृष्ट्या तेवढे सक्षम नाही. अनेक गोष्टी आहेत जिथे आपल्याला वास्तविकता माहिती असून देखील आपण मना सोबतच खोटे बोलत असतो. त्यामुळे आपल्याला नेहमी आपल्या डोळ्यापुढे फार मोठे उद्दिष्ट ठेवायचे नाही याउलट आपण असे उद्दिष्ट ठेवले पाहिजे जी आपण टप्प्याटप्प्याने मिळवत जाऊ. कारण असे करीत असताना आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढत जाईल आणि ह्या गोष्टीचे समाधान देखील असेल की आपण टप्प्याटप्प्याने का होईना पण आपले स्वप्न पूर्ण करीत आहोत. आपल्याला कधी स्वतःच्या मनासोबत खोटे बोलायचे नाही.

Success honyasathi kay karave

9. तुम्ही ज्याच्याशी बोलता आहात त्याचा कडून तुम्हाला शिकायचे आहे.

आपण जेव्हा कधी कुणासोबत हि चर्चा करत असून तेव्हा हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की त्या चर्चेतून आपल्याला काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे आणि काहीतरी नवीन ज्ञान घेता आलं पाहिजे. त्याचा खरा अर्थ असा असतो की दोन वेगवेगळ्या लोकांच्या विचारातून एक नवीन कल्पना निर्माण व्हायला पाहिजे. आजच्या काळात लोक आपल्या आयुष्यात किती दुःख आहे हे सांगण्यात वेळ व्यतीत करीत असतात. ते समोरचा व्यक्ती काय सांगत आहेत याकडे कधीच लक्ष देत नाही. आपल्याला दुसऱ्यांच्या आयडिया ऐकून वाईट वाटू शकते कारण आपल्या काही आयडिया वर आपण लहानपणापासूनच विश्वास ठेवत आलो आहोत आणि असे देखील होऊ शकते की आपल्या आयडिया चुकीच्या सिद्ध होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जर प्रगती करायची असेल तर इतरांच्या मनातील चांगल्या कल्पना जाणून देखील घ्याव्या लागेल.

जीवनात यशस्वी कसे व्हावे | Rules of successful people

10. आपल्या बोलण्यात अचूक रहा आणि स्पष्ट बोला

मनुष्याचे जीवन हे खरोखरच खूप गुंतागुंतीचे आहे त्यामुळे मनुष्य फक्त त्याच्या जीवनात त्याच गोष्टी शिकत जातो जे त्याला गरजेचे वाटत असते. ज्या गोष्टींशी त्यांचे कधीच संबंध येत नाही त्या गोष्टी मनुष्य शिकण्याचा प्रयत्न देखील करीत नाही. वास्तविकता ही देखील आहे की या जगातील प्रत्येक गोष्ट मनुष्याला शिकणे अशक्य आहे परंतु आपण आपल्या गरजेपेक्षा नेहमीच थोडेफार जास्त ज्ञान ठेवणे हे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला स्पष्ट भाषा बोलणे खूप गरजेचे आहे. त्याचे उदाहरण देताना लेखक असे सांगतात की ज्या वेळेस तुम्ही आजारी पडतात तेव्हा तुम्ही डॉक्टरला हे स्पष्ट सांगत नाही की तुमचे पोट दुखत आहे, किंवा तुम्हाला ताप आला होता, तुम्ही काल काय खाल्ले होते ज्यामुळे तुमचे पोट दुखत आहे, कुठली विशिष्ट गोष्ट खाल्ल्यामुळे तुमचे पोट दुखते, हे सर्व सांगणे तुम्हाला गरजेचे असते. जोपर्यंत तुम्ही स्पष्ट भाषा वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला नेमके काय झाले आहे याचे निदान डॉक्टर करू शकत नाही. अनेकदा डॉक्टर आजाराचे निधन यामुळेच करू शकत नाही कारण त्यांना पेशंट पूर्ण माहिती देत नाही. योग्य डेटा देण्यासाठी तुम्हाला नेहमी स्पष्ट भाषा वापरणे खूप गरजेचे आहे.

11. आपल्या मुलांना जीवनातील जोखीमेचा सामना करायला शिकवा

यामध्ये लेखक असे सांगतात की तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना एखाद्या जोखीम पासून दूर ठेवण्यापेक्षा त्या परिस्थितीचा सामना कसा केला पाहिजे हे शिकवणे खूप गरजेचे आहे. तर या जगामध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्यामध्ये जोखीम आहे आणि आपण अशा किती जोखीम पासून आपल्या मुलांना दूर ठेवू शकतो. याचे उदाहरण देताना लेखक असे सांगतात की एका गावांमधील मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीचा पूल ओलांडून पलीकडच्या गावात जावे लागत असे. एकदा पावसाळ्यात नदीला जास्त पूर आला आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये शाळेतील बरीच मुले वाहू लागली. त्यानंतर त्या गावातील प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना सांगितले की त्या नदीजवळ जायचे नाही. परंतु त्यातील एका व्यक्तीने आपल्या मुलाला नदीमध्ये कसे पोहायचे याचे शिक्षण दिले आणि काही दिवसानंतर तो त्याच्या मुलाला एका होडीतून नदीमध्ये घेऊन गेला आणि अचानक मुलाला नदीमध्ये ढकलून दिले. तर तो नदीमध्ये पडलेला मुलगा स्वतःला वाचवण्यासाठी पोहू लागला आणि किनार्‍यावर आला. अशाप्रकारे त्याच्या वडिलांनी हे सुनिश्चित केले कि तो योग्य प्रकारे पोहू शकतो की नाही आणि जर धोका वाढलाच असतात तर त्याचे वडील तिथे त्याला मदत करण्यासाठी होतेच. तर अशाप्रकारे आपण देखील आयुष्यात येणाऱ्या जोखीम पासून दूर जाण्याऐवजी त्यांचा सामना कसे करावे याची मुलांना शिक्षण दिले पाहिजे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे

12. जीवनातील प्रत्येक लहान गोष्टील आनंद शोधा

मनुष्याचे जीवन हे खूप कठीण आहे आणि मनुष्याला इच्छा नसताना देखील बऱ्याच वेळा दुःखांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण आपले जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद शोधणं खूप गरजेचे आहे. याचे उदाहरण देताना लेखक असे सांगतात की त्यांना एक लहान मुलगी आहे आणि तिला संधीवाताचा खूप जास्त त्रास आहे. त्यामुळे तिला दररोज इंजेक्शन घ्यावे लागतात. या आजारामुळे तिचे अनेकदा ऑपरेशन देखील करण्यात आले होते. परंतु आपल्यापैकी एखाद्याला अशी मुलगी असते तर आपण विचार केला असता की आपल्या नशिबात किती दुःख आहे. परंतु या उलट लेखक त्यांच्या मुली सोबत एखादी छोट्याशा गोष्टीचा आनंद देखील खुप जोरात साजरा करायचे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक असा देखील डॉक्टरा आला ज्याच्यामुळे त्यांच्या मुलीचा हा त्रास देखील कमी होऊ लागला. सर्वांच्या आयुष्यामध्ये दुःख येणारच आहे परंतु आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व सुखांचा मनापासून आनंद घेतला पाहिजे आणि हा आनंद इतरांवर देखील वाटला पाहिजे.

यश कशे मिळवावे | Rules of successful people

तर मित्रांनो आजच्या Rules of successful people या आर्टिकल मध्ये आपण हे पाहिले की आपण कोणते 12 नियम जीवनामध्ये पाळले पाहिजे म्हणजे आपण यशस्वी होऊ शकाल. यातील पहिला नियम असे सांगतो की आपण नेहमी ताठ आणि खांदे मागे करून उभे राहिले पाहिजे ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक वेगळा प्रभाव निर्माण होतो आणि आपण विजेता असल्यासारखे आपल्याला वाटू लागते आणि समोरच्यावर आपला प्रभाव पडू लागतो.

दुसरा नियम असे सांगतो की आपण इतरांसोबत स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे. तिसरा नियम असे सांगतो की आपण मित्र त्यांनाच बनविले पाहिजे ज्यांनी तुमच्या वाईट काळामध्ये तुमची साथ दिली होती आणि तुम्ही देखील जेव्हा कधी तुमचे मित्र त्यांच्या जीवनात खूप निराश असतील, त्यांचा आत्मविश्वास हरविला असेल. तेव्हा तुम्ही त्यांची साथ देणे गरजेचे आहे.

चौथा नियम असे सांगतो की तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सची तुलना इतरांसोबत न करता तुमच्या कालच्या परफार्मन्स सोबत करा. ज्यामुळे तुमचे खच्चीकरण होणार नाही आणि तुमची प्रगती तुम्हाला किती झाली हे देखील कळेल. पाचवा नियम असे सांगतो की तुमच्या प्रियजनांना किंवा तुमच्या पाल्यांना चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी ही फक्त तुमची आहे समाजाची मुळीच नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या घरांमध्ये मुलांसाठी विशिष्ट नियम बनविणे गरजेचे आहे.

सहावा नियम असे सांगतो की अगोदर आपण स्वतः मध्ये बदल केला पाहिजे नंतर जगाकडून अपेक्षा ठेवली पाहिजे. सातवा नियम असे सांगतो की एखाद्या छोट्याशा लालसेपोटी तुम्ही तुमच्या जीवनातील नियमांमध्ये तडजोड मुळीच करू नका. आठवा नियम असे सांगतो की आपण नेहमी खरे बोलले पाहिजे कुठेही अजिबात खोटे बोलायचे नाही खास करून आपल्या स्वतःची अजिबात खोटे बोलायचे नाही.

नव्वा नियम असे सांगतो की जेव्हापण तुम्ही एखाद्या व्यक्ती सोबत बोलाल तेव्हा असा विचार करा की त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकून घ्यायचे आहे. त्याला असे काहीतरी माहित आहे ज्याचे ज्ञान आपल्याला घेणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीकडून असे शिक्षण घ्या ज्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. दहावा नियम असे सांगतो की आपण आपल्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्राविषयी देखील माहिती ठेवणे गरजेचे आहे आणि स्वतः बद्दल बोलताना नेहमी स्पष्ट भाषेचा वापर केला पाहिजे.

अकरावा नियम असे सांगतो की आपण आपल्या प्रियजनांना जोखीम पासून दूर ठेवण्याऐवजी त्या जोखिमेचा सामना कसा करावा हे शिकविले पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात जोखीम ही येणारच आहे तर त्यासाठी नेहमीच तयार असलेले योग्य असते. बारावा नियम असे सांगतो की आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या सुखांचा देखील भरपूर आस्वाद घेतला पाहिजे आणि प्रत्येक क्षण सुखाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मित्रांनो या पुस्तकामध्ये अजून अशा बऱ्याच काही इंटरेस्टिंग टिप्स दिल्या आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतात. जर तुम्हाला Jordan Peterson यांचे 12 Rules for Life हे पुस्तक वाचायचे असेल तर Buy Now वर क्लिक करा.

READ MORE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top