What are the 7 symptoms before a good time all information in marathi, चांगला काळ येण्याआधी कोणती ७ लक्षणे दिसतात या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत.
चांगला काळ येण्याआधी कोणती ७ लक्षणे दिसतात? | What are the 7 symptoms before a good time?
सुख-दुःख, नफा किव्वा तोटा होणे हे सर्व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत. आयुष्यात कधी सुखाचा सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचे ढग. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात. हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते आणि काळापेक्षा बलवान काहीही नसते हे देखील तुम्हाला नक्कीच माहिती असेल. प्रत्येकाला काळासमोर नतमस्तक व्हावेत लागते. तुम्हीही तुमच्या आयुष्यात अनेकांना राजाचा रंग आणि रंकाचा राव झालेलं पाहिलं असेल. कालचक्र सतत फिरत असतात त्याला कोणीही कधीही थांबू शकत नाही. परंतु आपले कालचक्र कसे चालले आहे हे आपल्याला कसे कळेल येणाऱ्या काळात आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडतील की संकटाचे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि म्हणूनच आज यापोस्टमध्ये आपण अशाच काही संकेतांचा विचार करणार आहोत. ज्यामुळे आपल्याला कळते की आपल्याला येणारा काळ हा खूपच शुभ असणार आहे व कोणते आहेत. ते संकेत चला जाणून घेऊया.
एकदा नारदमुनी वैकुंठाला पोहोचले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना या लक्षणांबाबत विचारलं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की ते स्वतः मनुष्याला असे काही संकेत पाठवतात की जेणेकरून त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल कळू शकेल. ते संकेत निसर्गाकडून प्राण्यांकडून किंवा भगवंताच्या भक्तांकडूनही मिळू शकतात. माणसांनी फक्त ते संकेत समजून घेणे आवश्यक आहे. चला तर मग तुम्हाला त्या लक्षणांबद्दल चर्चा करूया जे स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितले.
7 symptoms before a good time
त्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षण आहे जर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे चार वाजून 24 मिनिटांनी ते पाच वाजून बारा मिनिटांनी यावेळी तुमचे डोळे उघडत असतील. म्हणजे तुम्हाला जाग येत असेल आणि तुम्हाला देवाचे स्मरण होत असेल किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असं तुम्हाला वाटत असेल. तर हे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगलं लक्षण आहे. त्यामुळे तुमच्यासाठी यशाचे नवेदवार उघडणार हे समजून घ्या. तुम्हाला तुमच्या आयुष्याची योग्य दिशा मिळणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल करताना ईश्वर सदैव तुमच्या सोबत असेल. तर मग मित्रांनो तुम्हाला सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर जाग येते असते की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आता बघूया दुसरा संकेत. जर तुम्हाला असे वाटते की कधीकधी तुमचे मन विनाकारणच आनंदी होते. तुमचा चेहरा खुलतो आणि हास्याने भरतो. तुम्ही रागाच्या ही पलीकडे जात आहात किंवा तुमचे चित्त हल्ली सतत प्रसन्न राहते. तर हे चिन्ह तुम्हाला हे दाखवते की आनंद तुमच्या आयुष्याचे दार ठेवणार आहे. जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल. अशावेळी आपल्याला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. देव आपल्या मनात वास करतो त्यामुळे विनाकारण आनंदी राहणे सतत प्रसन्न राहणे हे सुद्धा एक शुभ लक्षण मानले जाते.
मंडळी तिसरा संकेत आहे की तुमच्या घराच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल. तुमच्या घरात मांजरीने पिलांना जन्म दिला असेल किंवा एखादे माकड तुमच्या घरातील अन्नपदार्थ घेऊन जात असेल किंवा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करत असतील. तर अशी काही संकेत तुम्हाला सूचित करीत असतात की तुमचा भविष्यातील येणारा काळ तुम्हाला नक्कीच बलवान बनवणार आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकाल.
Read More: डोळा फडफडणे शुभ कि अशुभ असते
चौथा संकेत आहे की देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो हे आपल्याला माहितीच आहे. जर एखादी लहान मुलगी किंवा लहान मूल तुमच्याकडे बघून सतत हसत असेल किंवा तुमच्या घरी येत असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल. तर ते तुमच्यासाठी नक्कीच शुभ लक्षण मानलं पाहिजे. अशा प्रकारची वेगवेगळी चिन्हे तुम्हाला असे सूचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने आणि
भरभराटीने भरलेले जाणार आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नवीन नाती जोडणार आहात. भगवंताच्या कृपेनेच असे संकेत मिळत असतात.
पाचवा संकेत आहे की अनेक दिवसांपासून चालत आलेले खर्च अचानक कमी झाले आहेत, उत्पन्नाची नवनवीन साधन तुमच्यासमोर येत आहेत. या लक्षणांवरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि पैसा तुमच्या घरात नक्कीच टिकून राहणार आहे. आई लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होत आहे.
सहावा संकेत असा आहे की पूजा करताना पूजेच्या ताटात फुलांची माळ किंवा चंदन पडणे, देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत असल्याचा भात तुम्हाला होणे, घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन होणे, हे अतिशय शुभ मानले जाते. अशा प्रकारे ही सर्व चिन्ह तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाचा संकेत देत असतात.
मंडळी सातवा संकेत जो भगवान श्रीहरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितला तो असा होता की जर तुम्ही एखाद्या शुभकार्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडलात आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले किंवा तुम्हाला ऋषीमुनी, संत, महाराज, पुजारी यांचा आशीर्वाद मिळाला, तर ते खूपच शुभ लक्षन आहे. याचा अर्थ तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होईल.
What are the 7 symptoms before a good time?
मंडळी हे होते ते सात संकेत (What are the 7 symptoms before a good time?) जे भगवान श्री हरी विष्णूने नारद मुनींना सांगितले आणि याच संकेतांमुळे आपल्याला कळते की आपला येणारा काळ कसा असेल. तो नक्कीच चांगला असेल याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जगात्भारी या वेबसाईटच्या अशाचपोस्ट पाहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.