डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | What is Digital Marketing in Marathi

Share this

जगभरात दररोज लाखो करोडो लोक इंटरनेट चा वापर करून आपल्या गरजेच्या वस्तू ऑनलाइन खरेदी करतात. भलेही ती घरीदारी लग्न समारंभासाठी असो, सणानिमित्त असो किव्वा वयक्तिक कारणसाठी. मागच्या काही काळात लोकांचा शॉपिंग करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता पूर्वी सारखे लोक मार्केट मध्ये जाऊन सामान विकत नाही घेत तर ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट वर सामान पसंत करून खरेदी करतात. त्यामुळे जे लोक दुकान चालवितात उदा कपड्यांचे दुकान, इलेक्ट्रिक दुकान, किराणा दुकानं यांचे व्यवसाय जणू ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट मुळे ठप्प झाले आहे. तर ज्या व्यावसायिकांनी डिजिटल मार्केटिंग सुरु केली त्यांचा प्रचंड फायदा होत आहे. तर आपण आज पाहणार आहोत कि डिजिटल मार्केटिंग काय आहे (What is Digital Marketing in Marathi)आणि त्याचे फायदे काय आहे?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | What is Digital Marketing in marathi

डिजिटल मार्केटिंग इंटरनेट, कॉम्पुटर आणि इलेक्ट्रोनिक उपकरणाच्या सहायाने केली जाणारी मार्केटिंग आहे. ज्याच्या सहायाने कुठलीही कंपनी आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करून अतिशय कमी वेळात आपल्या टार्गेट कस्टमर पर्यंत प्रोडक्ट पोहचवू शकते आणि अशा प्रकारच्या मार्केटिंगला ऑनलाइन मार्केटिंग असे म्हणतात. जेव्हा एखादी कंपनी आपल्या बिजनेस किव्वा नवीन प्रोडक्टला लाँच करते तेव्हा त्याला भरपूर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्केटिंग केली जाते. मार्केटिंगचा अर्थ ‘योग्य वेळी योग्य ग्राहकासमोर आपले प्रोडक्ट पोहोचविणे.’ आजच्या युगात तुम्हाला तुमच्या ग्राहकासोबत अशा ठिकाणी कनेक्ट व्हावे लागेल जेथे तो त्याचा पूर्ण वेळ देत असतो आणि ते ठिकाण म्हणजेच इंटरनेट. जर तुम्हाला कमी वेळात जास्त पटीने व्यवसायत नफा कमवायचा असेल आणि कमी वेळात जास्त
लोकांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग करणे गरजेचे आहे.

डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय आहे? | Benifits of Digital Marketing in Marathi

भारतात जवळजवळ सर्व वयोगटातील लोक इंटरनेटचा वापर करतात आणि दररोज हि संख्या वाढत चालली आहे. कुठलीही मोठी कंपनी असो किव्वा छोटी कंपनी प्रत्येक जन मार्केटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. ज्या प्रकारे एखादी कंपनी आपल्या प्रोडक्टचे जाहिरात मोठे बॅनर्स, ब्रोशर द्वारे करतात अशाच प्रकारे ऑनलाईन मार्केटिंग किव्वा डिजिटल मार्केटिंग द्वारे देखील केले जाऊ शकते. ऑफलाईन मार्केटिंग असो किव्वा ऑनलाईन मार्केटिंग दोघांचा उद्देश एकाच कि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे. ऑफलाईन मार्केटिंग मध्ये प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात परंतु डिजिटल मार्केटिंग करून जगभरात कुठेही कमी पैश्यात तुम्ही प्रोडक्टची मार्केटिंग करू शकतात.

डिजिटल मार्केटिंग का महत्वाची आहे?

डिजिटल मार्केटिंग हि डिजिटल टेक्निक वापरून ग्राहकां पर्यंत पोहचण्याचा एक सोपा मार्ग आहे. जेव्हा स्मार्टफोन नव्हते तेव्हा लोक TV, वर्तमानपत्र, कादंबरी, रेडीओ यांचा जास्त वापर करायचे. तेव्हा अशा ठिकाणी सर्व कंपन्या आपल्या प्रोडक्टची जाहिरात करायचे. परंतु लोक आता आपला जास्त वेळ हा इंटरनेटवर देतात खास करून आजची तरुण मंडळी. याच कारणामुळे कंपन्या आपल्या प्रोडक्टची जाहिरात डिजिटल पद्धतीने करतात. अशा ठिकाणी इंटरनेटवर प्रचार केला जातो जेथे जास्त लोक आपला वेळ घालवितात जसे Facebook, Instagram, YouTube, Whatsapp.मार्केटमध्ये जाऊन शापिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगमुळे वेळेची बचत होते तसेच एका पेक्षा अधिक पर्याय देखील उपलब्ध असतात. शिवाय व्यावसायिकांना कमी खर्चात जास्त नफा मिळतो. कमी वेळात जास्त ग्राहक जोडले जातात ज्यामुळे व्यावसायिकांचे उत्पादन वाढते आणि विक्री देखील वाढते. डिजिटल मार्केटिंगचे महत्व वर्तमानात जास्त बघायला मिळते कारण यात कमी खर्चात जास्त नफा मिळविता येतो.

डिजिटल मार्केटिंग कुठे आणि कशी वापरावी?

ब्लॉगिंग: सर्वात अगोदर ब्लॉगिंग हा पर्याय ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग करण्याचा उत्तम पर्याय आहे. यात तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नावाने एक ब्लॉग बनवायचा असतो. ज्या मार्फत तुम्ही तुमच्या कंपनी द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्विसेस बद्दल सांगू शकतात. जेव्हा तुमचे नवीन प्रोडक्ट लाँच होतील तर त्यांची माहिती तुम्ही यात add कराल. याच्या सहायाने तुम्ही भरपूर ग्राहकांना तुमच्या कडे आकर्षित करू शकतात.

कंटेंट मार्केटिंग: कंटेंट मार्केटिंगच्या सहायाने तुम्ही तुमच्या कंपनीद्वारे बनविलेल्या सर्व प्रोडक्टची माहिती एका कंटेंटच्या स्वरुपात लिहू शकतात. तुम्हाला लिहिण्यासाठी योग्य वाक्य आणि आकर्षक पद्धतीने लिहावे लागेल. ज्यात प्रोडक्टच्या डील आणि ऑफर्स बद्दल लिहावे लागेल. यात वाचणाऱ्या युजरला तुमचे बोलणे चांगले वाटेल आणि तुमच्या व्यापाराची लोकप्रियता देखील वाढेल. ज्यामुळे प्रोडक्टची सेलिंग देखील वाढेल.

सर्च इंगीन ऑप्टीमायजेषण: जर तुम्हाला search engine द्वारे तुमच्या ब्लॉगवर भरपूर ट्राफिक आणायची असेल तर तुम्हाला SEO म्हणजेच search engine optimization चे ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. युजरला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तो Google चा वापर करतो आणि Google SEO वापरून माहिती युजरला देतो. जर तुमची वेबसाईट SEO द्वारे Google च्या पहिल्या पेजवर किवा सर्वात वरती दिसते तर तुमच्या ब्लॉग वर जास्त ट्राफिक येऊ शकते. त्यामुळे तुमची वेबसाईट google च्या SEO गाईड लाईन प्रमाणे बनवावी लागेल. म्हणजे भरपूर ऑरगॅनिक ट्राफिक तुमच्या वेबसाईट वर येऊ शकेल.

सोशल मिडिया मार्केटिंग: सोशल मिडिया हे डिजिटल मार्केटिंगचा महत्वाचा भाग आहे. सोशल मिडियावर व्यापारी फक्त आपले प्रोडक्ट प्रोमोट नाही करू शकत तर त्यांना हे देखील समजून घेता येते कि युजर त्यांच्या ब्रॅड बद्दल काय चर्चा करतात. सोशल मिडिया मार्केटिंग तुमच्या व्यापारासाठी खूपच फायदेशीर असते. Social Media Marketing मध्ये तुम्ही Facebook, Instagram, Snapchat, Twitter, LInkedIn, Pinterest अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या बिजनेसची जाहिरात करू शकतात.

गुगल एडवर्ड: तुम्ही जेव्हापण एखादी ब्लॉग किव्वा वेबसाईट वर काहीतरी वाचायला जातात तर तेथे तुम्हाला अनेक जाहिराती दिसतात. ह्या जाहिराती गुगल द्वारे दाखविल्या जातात. Google AdWords वापरून कोणताही व्यापारी आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करू शकतात. हि सर्विस फ्री नसते येथे तुम्हाला गुगलला पैसे द्यावे लागतात. गुगल या जाहिरातींना चांगल्या वेबसाईटवर दाखवितात. ज्याच्या सहायाने तुम्ही तुमच्या टार्गेट ग्राहकांपर्यंत तुमचे प्रोडक्ट्स पोहचवू शकतात. गुगल एडवर्ड द्वारे तुम्ही अनेक प्रकारच्या जाहिराती चालवू शकतात. जसे Text Ads, Image Ads, GIF Ads, Match Content Ads, Video Ads, Pop-up-Ads, Sponsored Search, Web Banner Ads.

Apps मार्केटिंग: इंटरनेट वर बऱ्याचश्या कंपन्या स्वतःचे Apps बनवून करोडो लोकां पर्यंत पोहोचले आहेत आणि अशा वेळी आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात apps वर करणे यालाच apps मार्केटिंग असे म्हणतात. apps मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंगचा खूप चांगला पर्याय आहे. कारण आजकाल जास्त संख्येने लोक आपल्या स्मार्टफोन मध्ये अनेक apps वापरतात. यासाठी कोणीही आपला व्यवसाय लाखो लोकां पर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या apps मध्ये आपली जाहिरात देऊ शकतात. ज्यात युजर द्वारे तुमच्या जाहिरातीवर क्लिक करून तो सहज तुमच्या वेबसाईटवर येऊ शकतो आणि तुमच्या प्रोडक्टची माहिती घेऊ शकतो आणि प्रोडक्ट देखील विकत घेऊ शकतो.

युट्युब मार्केटिंग: आज YouTube हा सगळ्यात मोठा search engine आहे ज्यामुळे YouTube वर प्रचंड ट्राफिक असते. हा एक असा पर्याय आहे जिथे तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सला विडिओ द्वारे प्रमोट करू शकतात. तुम्ही बघितले असेल की जेव्हापण तुम्ही youtube वर एखादा विडिओ बघता तर तो विडिओ चालू असताना मध्येच एखादी जाहिरात येते. तर हि एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटिंग असते. ज्यांना लोक बघतात आणि आकर्षित होतात. youtube वर प्रचंड प्रमाणात विवर्स असतात ज्यामुळे आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करणे सोपे असते.

इमेल मार्केटिंग: Email marketing करून कंपनी इमेल द्वारे ग्राहकांना प्रोडक्टची माहिती पाठविते. सोबतच यात प्रोडक्टची संपूर्ण माहिती आणि डील देखील उपलब्ध असते. या माहिती शिवाय वेबसाईटची लिंक देखील असते. ज्यात ग्राहकांना सोप्या पद्धतीने खरेदी करण्याची माहिती दिलेली असते. इमेल मार्केटिंग द्वारे तुम्ही एका क्लिक मध्ये लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतात. डिजिटल मार्केटिंग करिता हा खूप चांगला आणि सोपा पर्याय आहे.

डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून व्यापार जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहचविता येतो आणि यातून भरपूर लाभ देखील मिळतो. तर आम्ही आशा करतो कि (What is Digital Marketing in Marathi) डिजिटल मार्केटिंग काय आहे? आणि त्या विषयीची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल. आमचा हाच प्रयत्न असतो कि आमच्या आर्टिकलच्या सहायाने तुम्हाला पूर्ण माहिती मिळावी म्हणजे तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल आणि आपल्या शंका दूर होतील. अजून आपल्याला काही शंका असल्यास आपण कॉमेंट करून विचारू शकतात.

इतर पोस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top