Advanced Communication Skills in Marathi: या जगात दोन प्रकारचे लोक असतात पहिली व्यक्ती असते जी एखाद्या रूम मध्ये गेल्यावर ती सर्वांना सांगते बघा मी आलोय आणि दुसरी ती व्यक्ती असते जी एखाद्या रूम मध्ये गेल्यावर ती सर्व लोक बोलू लागतात बघा तो आलाय. कारण सर्वजण त्या व्यक्तीच्या येण्याची वाट बघत असतात त्यांना ऐकण्याची वाट बघत असतात. जर तुम्हाला देखील अशाप्रकारे चतुराईने बोलणे शिकायचं असेल तर आजचा हा आमचा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.
एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे ज्याचे नाव आहे हाऊ टू टॉक टू समवन हे पुस्तक Leil Lowndes या लेखिकेने लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये 92 कम्युनिकेशन स्किल्स सांगितलेल्या आहे. या स्किल्स पैकी 7 स्किल्स आम्ही आपल्या सोबत या आर्टिकल च्या माध्यमातून शेअर करणार आहोत.
आजचा आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला याच साथ कम्युनिकेशन स्किल्स समजतील. समोरील व्यक्ती आपल्या सोबत आदराने कसा बोलेल? एखादा व्यक्ती सोबत बोलताना तुम्हाला मुळीच वाटणार नाही की आता पुढे काय बोलावे? जर तुम्हाला कोणी विचारले की मला सांगा तुम्ही काय करता तर त्या वेळेस तुम्ही त्याला काय उत्तर दिले पाहिजे? तुमच्याकडे नेहमी काही ना काही इंटरेस्टिंग बोलण्यासारखं काय असेल? जर तुम्हाला कोणाशी बोलण्याचा मूड असेल तर त्याला तुम्ही बोलण्यापासून कसे थांबवावे? लोकांचे आभार कसे मानावे येथे आपल्याला पसंत करू लागतील? तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत कशा प्रकारे संवाद साधला की त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या कुटुंबातील व्यक्ती वाटू लागेल? चला तर मग बघुया सिक्रेट कम्युनिकेशन स्किल कुठली आहे जी खूप कमी लोकांना माहित आहे.
1) एखाद्या व्यक्तीकडून आदर प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे बोलावे?
यासाठी लेखकाने दोन पर्याय सुचवलेले आहे. पहिला पर्याय आहे यु कम्युनिकेशन. जर मी तुम्हाला असे विचारले की तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती कोण आहे? तरी आवर तुम्ही मला उत्तर द्याल आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, त्यांचे मुलं परंतु अधिक तर लोकांच्या जीवनात सर्वात महत्वाची व्यक्ती ते स्वतः असतात.बोलताना वाक्य असे वापरावे की ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलले असेल. उदाहरणार्थ 1. जर तुमचा पहिला मित्र तुम्हाला बोलला कि या कपड्यांमध्ये तू खूप सुंदर दिसत आहे आणि दुसरा मित्र तुम्हाला बोलणार की हे कपडे तुला खूप सुंदर दिसत आहे. यापैकी तुम्हाला कुठला मित्र आहे. तर सहाजिकच तुम्हाला पहिल्या मित्राची बोलली आवडेल कारण त्या वाक्यांमध्ये तुमचे देखील कौतुक केले गेले आहे. उदाहरणार्थ 2.जर कोणी असे बोलले हा एक चांगला प्रश्न होता आणि दुसरी व्यक्ती तुम्हाला बोलली की तू खूप चांगला प्रश्न विचारला तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे आवडेल करण्यामध्ये तुमचे विषयी बोलले गेले आहे.
वाक्यामध्ये थोडाबहुत फेरबदल करून तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अगदी सहज प्रभाव पाडू शकतात. बऱ्याच लोकांना तोंडावरती कौतुक केलेले आवडत नसते. कारण बऱ्याच वेळेस तोंडावर कौतुक करणे हे चमचागिरी चे लक्षण वाटू शकते. तर असे करण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीच्या जास्त जवळ आणि संपर्कात असणाऱ्या व्यक्ती समोर कौतुक करावे. उदाहरणार्थ जोशी सर हे खूप चांगले मॅनेजर आहेत आणि ते त्यांचं काम उत्तम पद्धतीने पार पाडतात. हे वाक्य तुम्हाला जोशींच्या संपर्कातील अशा व्यक्ती समोर बोलायची आहे जो त्यांच्या अगदी जवळ आहे. म्हणजे हा निरोप जोशीसरांनी पर्यंत त्यांच्या सहकार्य मार्फत पोहोचेल आणि जोशींच्या मनात तुमचा प्रभाव वाढू लागेल.
2) असे काय करावे की बोलताना तुम्हाला असे कधीच वाटणार नाही की यापुढे काय बोलले पाहिजे?
बरेचदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्या सोबत अशा विषयावरती बोलते ज्या विषयांमध्ये आपल्याला फार माहिती नसते किंवा त्या विषयाबद्दल आपल्याला आवड नसते. तर अशा परिस्थितीत आपण फक्त समोरच्याशी बोलताना हा, अच्छा, अरे बापरे, असं का?, हो का? असे शब्द वापरू लागतो. तर लेखकांनी यावरती पॅरोटिंग टेक्निक सुचवलेली आहे. या टेक्निकचा वापर करून आपल्याला समोरील व्यक्ती जे काही बोलत आहे त्यातील शेवटची तीन शब्द वेगवेगळे हावभाव वापरून पुन्हा उच्चारायचे आहे. उदा. जर तुम्ही एखाद्या पार्टी मध्ये गेले आहात तिथे तुम्हाला अचानक अशा व्यक्ती सोबत बोलावे लागले ज्या सोबत तुमची ओळख नाही. तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला विचारा की तुम्ही काय करता. त्यावर ती व्यक्ती उत्तर देईन मी एक व्हिडिओ एडिटर आहे. परंतु तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग विषयी काहीच माहित नाही त्यामुळे तुम्हाला पुढचा संवाद साधता येणार नाही. याऐवजी आपण दुसरे उदाहरण पाहू. जर तुम्ही पार्टीमध्ये अशा व्यक्तीला भेटला ज्या सोबत तुमची ओळख नाही आणि तुम्ही त्याला विचारले की आपण काय करता? त्यावर ती व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल की मी एक व्हिडिओ एडिटर आहे. त्यावर तुम्ही बोलल व्हिडिओ एडिटर. त्यावर समोरील व्यक्ती तुम्हाला बोलेल हो मी फिल्मसाठी एडिटिंग करतो. त्यावर तुम्ही बोलाल फिल्मसाठी एडिटिंग. त्यावर समोरील व्यक्ती बोलेल हो मी बॉलीवुड फिल्मसाठी एडिटिंग करतो. त्यावर ती तुम्ही बोलल बॉलीवूड फिल्मसाठी एडिटिंग. अशाप्रकारे तुमचा संवाद हा वाढत जाईल आणि तुम्हाला पुढे काय बोलायचे आहे याची विचार करण्याची मुळीच गरज पडणार नाही.
3) जर तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही काय करता? तर त्याला काय उत्तर दिले पाहिजे?
Advanced Communication Skills in Marathi: तुम्ही कधी असे उत्तर देऊ नका की मी एक डॉक्टर आहे किंवा मी एक सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. जर तुम्हाला हवे असेल की समोरील व्यक्तीने तुमचे मध्ये ऍड्रेस दाखविला पाहिजे तर तुम्ही नेहमी तुमच्या प्रोफेशन सोबत एक छोटीशी गोष्ट नक्की ॲड करा. जसे मी एक डॉक्टर आहे आणि मी नुकतेच एक अशी ऑपरेशन केले जे करणे फार अवघड होते आणि पेशंटचा जीव देखील वाचविला. किंवा मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी एक असे सॉफ्टवेअर बनवले आहे ज्याचा वापर करून समोरच्याच्या मनात काय विचार चालू आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. अशाप्रकारे छोटीशी स्टोरीचा समावेश केल्यामुळे समोरील व्यक्ती तुमच्या बोलण्यामध्ये अधिक इंटरेस्ट दाखवू लागते. ज्यामुळे तुमचा संवाद देखील वाढल्या जातो.
4) आपण असे काय केले पाहिजे ज्यामुळे आपल्याकडे नेहमीच बोलण्यासाठी काही ना काही इंटरेस्टिंग असावे?
जर तुम्हाला एखाद्या समारंभांमध्ये जायचं असेल किंवा एखाद्या पार्टीमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्ही ज्याप्रकारे तुम्ही त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी एखादा विशिष्ट असा ड्रेस निवडतात, त्यावर घालण्यासाठी चप्पल किंवा शूज निवडतात आणि व्यवस्थित तयारी करून जातात. याच प्रमाणे तुम्हाला त्या कार्यक्रमात जाण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे वेळ काढून सध्या सुरू असलेल्या बातम्या ( न्यूज) पहायच्या आहे किंवा वाचून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ सध्याची भारताचीआणि देशाची परिस्थिती, सध्या सुरू असलेल्या घडामोडी, शेअर मार्केट, नवीन येणाऱ्या मुव्हीज किंवा वेब सिरीज अशाप्रकारे तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. त्यानंतर तुम्ही कार्यक्रमात गेल्यावर या विषयांपैकी कुठलेही विषयावरती अगदी सहजपणे संवाद साधू शकतात तसेच पॅरोटिंग टेक्निकचा वापर करू नये तुम्ही तुमचं संवाद अजून इंटरेस्टिंग बनवू शकतात.
5) जर तुम्हाला एकादशी बोलण्याचा मूड नसेल तर समोरच्याला तुम्ही तुमच्याशी बोलण्यापासून कसे थांबू शकतात?
बरेच वेळेस असं होतं की समोरील व्यक्ती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याशी अशा विषयावर ती बोलतो यावर आपल्याला बोलायची इच्छा नसते. अशावेळेस आपण लेखकाने सांगितल्याप्रमाणे द ब्रोकन रिकॉर्ड या टेक्निकचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ. तुम्ही आणि तुमचा मित्र मनोज रोज ऑफिसला एकच बाईक वरून जायचे परंतु आता तुम्हा दोघांमध्ये काही मतभेद आहे आणि तुम्ही एकमेकांशी बोलत नाही. जर एखाद्या पार्टीमध्ये तुम्हाला कोणी मनोज विषयी विचारले की तुम्ही दोघी आता एका बाईकवरून येत नाही का? तर तुम्ही उत्तर देऊ शकता नाही आम्ही एकमेकांची बाईक शेअर करत नाही. जर तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारला की तुम्ही एका बाईक वरून येत नाही का? तर तुम्हाला सेम टोनमध्ये सेम उत्तर द्यायचे आहे की आम्ही एकमेकांची बाईक शेअर करत नाही. समोरील व्यक्ती जर बेशरम असेल आणि तुम्हाला पुन्हा विचारले की तुम्ही एका बाईक वरून येत नाही का? तर तरी सेम टोनमध्ये सेम उत्तर द्यायचे आहे की आम्ही एकमेकांची बाईक शेअर करत नाही. ज्याप्रमाणे एकादी तुटलेली सीडी मध्ये एखाद्या गाण्याची तीच लाईन पूर्ण पुन्हा प्ले होते तसेच तुम्हालाही पुन्हा पुन्हा तेच उत्तर द्यायची आहे.
6) आपण कशाप्रकारे इतरांची आभार मानावे की लोक तुम्हाला पसंत करू लागतील?
Advanced Communication Skills in Marathi: लेखिकेने सांगितले आहे की कधीही कुणालाही फक्त आभारी किंवा थँक्यू असे बोलू नका. तुम्ही ज्या कुणाचे आभार मानत आहे त्या व्यक्तीस नेमकी कशाबद्दल आभार मानले जात आहे हे देखील सांगा. उदाहरणार्थ. मला हा पत्ता सांगितल्याबद्दल आभारी, माझी गाडी चालू करून दिल्याबद्दल आभारी, मला लिफ्ट दिल्याबद्दल आभारी, मला बसायला जागा दिल्याबद्दल आभारी, मला गिफ्ट दिल्याबद्दल आभारी इत्यादी.
7) इतरांशी कसे बोलावे की त्यांना तुम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटू लागेल?
तुमच्यासोबत कधी अशी झाली आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला आयुष्यात पहिल्यांदाच भेटलात परंतु त्या व्यक्ती सोबत बोलताना तुम्हाला असे वाटते किया व्यक्तीसोबत मी पुढची अजून काही तास सहज बोलू शकतो, या व्यक्तीसोबत मी यापूर्वीदेखील बोललो आहे, ही व्यक्ती मला समजून घेत आहे, तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्या व्यक्तीला अगोदर पासून ओळखतात किंवा ती व्यक्ती तुमची जुना मित्र किंवा मैत्रीण आहे. साधारणपणे आपण याला आपल्या भाषेत ” इन्स्टंट रेपो”, “ केमिस्ट्री”, “ ट्युनिंग किंवा क्लोजनेस” असे बोलतो. ग्रंथ हेच खरे कारण
“एकॉइं” आहे. ज्यामध्ये समोरील व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीला आणि टोनला आपण कॉपी करतो आणि त्याच्या प्रमाणेच बोलू लागतो. त्यावेळेस समोरील व्यक्ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला लागतो आणि आपल्याला त्यांच्याप्रमाणेच मानू लागतो. उदाहरणार्थ. जर तुम्हाला कोणी सांगितले कि मी प्रोफेशनल एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर तुम्ही तुमची ओळख सांगतांना मी डॉक्टर आहे असे नका सांगू. तुम्हाला देखील त्याच प्रमाणे मी प्रोफेशनल ने डॉक्टर आहे असे बोलायचे आहे. त्यामुळे समोरील व्यक्तीला तुम्ही त्याच्याप्रमाणेच वाटू लागतात. बघायला गेलं तर ही गोष्ट खूप छोटी आहे पण याचा खरंच खूप जास्त प्रभाव पडतो. याचे दुसरे उदाहरण म्हणजे ज्या रूममध्ये मेडिकल स्टाफ काम करतात त्याला ते हॉस्पिटल असे बोलतात, ज्या रूममध्ये मेकॅनिक काम करतात त्याला ते गॅरेज असे बोलतात, ज्या रूममध्ये रेडिओ आर जे काम करतात त्याला ते रेडिओ स्टेशन असे बोलतात, डिजिटल मार्केटिंग वाले त्यांच्या रूमला एजन्सी बोलतात तर ज्या रूममध्ये इंजिनियर काम करतात त्याला ते ऑफिस असे बोलतात. पुस्तक प्रकाशित करणारे त्यांच्या रूमला पब्लिशिंग हाऊस असे बोलतात. जर तुम्हाला या व्यक्तींसमोर तुमचा प्रभाव पाडायचा असेल तर तुम्हाला यांच्याप्रमाणेच बोलावे लागेल आणि यांची बोलण्याची पद्धत कॉपी करावी लागेल. ज्यामुळे ते सहजपणे तुम्हाला त्यांच्याप्रमाणेच मानू लागेल.
तर अशाप्रकारे आपण या लेखातून बघितलं (Advanced Communication Skills in Marathi) कुठल्या त्या सात पद्धती आहे ज्यामुळे तुम्ही तुमची कम्युनिकेशन स्किल म्हणजेच बोलण्याचे पद्धतीमध्ये सुधार करू शकतात आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे बोलावे, असे काय करावे की बोलताना तुम्हाला असे कधीच वाटणार नाही की यापुढे काय बोलले पाहिजे? जर तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही काय करता? तर त्याला काय उत्तर दिले पाहिजे?
समोरील व्यक्ती समोर तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणखीन वजन वाढवू शकतात. ज्यामुळे समोरील व्यक्ती तुम्हाला पसंत करू लागेल, तुमच्या बोलण्यामध्ये अधिक इंटरेस्ट घेतला जाईल, तुमच्याकडे बोलण्यासाठी अनेक विषय असतील, तुम्हाला नको असलेले विषय तुम्ही सहजपणे चालू शकतात, आणि कुठल्याही व्यक्तीला तुम्ही त्यांच्याप्रमाणे वाटू लागेल. आपण असे काय केले पाहिजे ज्यामुळे आपल्याकडे नेहमीच बोलण्यासाठी काही ना काही इंटरेस्टिंग असावे? जर तुम्हाला एकादशी बोलण्याचा मूड नसेल तर समोरच्याला तुम्ही तुमच्याशी बोलण्यापासून कसे थांबू शकतात? आपण कशाप्रकारे इतरांची आभार मानावे की लोक तुम्हाला पसंत करू लागतील? इतरांशी कसे बोलावे की त्यांना तुम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटू लागेल?
अशा करतो की आम्ही सांगितलेल्या (Advanced Communication Skills in Marathi) 7 पद्धतीत तुम्हाला नक्कीच आवडले असतील ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमचा आर्टिकल शेअर करायला विसरू नका.
READ MORE
Post Views: 15,456