What to do After 12th Arts: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शालेय जीवन खूप महत्त्वाची असते कारण शालेय जीवनाच्या आधारावर आपल्या जीवनाला एक विशिष्ट आकार दिला जातो. त्यासोबतच जेव्हा कधी आपण 12 वी पास होतो तेव्हा आयुष्यात काहीतरी मिळवल्याचा आनंद वाटू लागतो आणि त्यासोबतच आता पुढे नेमके काय केले पाहिजे या गोष्टीची चिंता देखील सतावू लागते. बारावी पास झाल्यानंतर नेमकी काय केले पाहिजे, कुठला कोर्स केला पाहिजे, कुठल्या कोर्समध्ये स्कोप जास्त आहे, नेमके काय केले म्हणजे आपली पुढील जीवन सुरक्षित होईल अशी असंख्य प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात फिरू लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याला अशा असंख्य प्रश्नांचा सामना करावाच लागतो आणि ते विध्यार्थी स्वतःचं करिअर उत्कृष्टपणे बनवू शकतात जे कोणाच्याही दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेत नाही. अनेक विद्यार्थी आपल्या आवडीनुसार, योग्य गोष्टींचा रिसर्च करून, त्यांच्यासाठी उत्कृष्ट कोर्स निवडतात. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की बारावीनंतर काय केले पाहिजे तर आजचा हा आमचा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा आपल्या मनात असलेले सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे मिळेल. इथे आम्ही आपल्याला १० उत्कृष्ट कोर्स विषयी सांगणार आहोत जे तुम्ही बारावी आर्ट्स पास झाल्यानंतर करू शकतात. चला तर मग बघुया (What to do After 12th Arts) बारावी आर्ट्स उत्तीर्ण झाल्यानंतर कुठली १० कोर्स तुम्ही निवडू शकता.
बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये करिअर
Bachelor of Arts (B.A.) बारावी आर्ट पास झाल्यानंतर सगळ्यात कॉमन केला जाणार कोर्स म्हणजे B.A. कोर्स हा एक कॉमन डिग्री कोर्स आहे जो तीन वर्षासाठी केला जातो. हा कोर्स फुल टाईम, पार्ट टाईम आणि डिस्टन्स एज्युकेशनचे माध्यमातून देखील पूर्ण केला जाऊ शकतो. ह्युमॅनिटी स्टूडेंट्स मध्ये हा कोर्स खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि यात बऱ्याचश्या विषयांचा समावेश असतो. जसे की राज्यशास्त्र (Political Science), समाजशास्त्र (Socialogy , मानसशास्त्र (Psycology), इतिहास (History), अर्थव्यवस्था (Economy), तत्त्वज्ञान (Philosophy), पुरातत्व (Archaeology), संप्रेषण अभ्यास (Communication Studies) तसेच विविध भाषा जसे की इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, हिंदी इत्यादी. या कोर्सला पूर्ण केल्यानंतर तुम्ही M. A. किंवा B. Ed. अशी डिग्री देखील घेऊ शकता किंवा आणि ग्रज्युएट झाल्यानंतर गव्हर्नमेंट एक्झाम साठी पात्र देखील ठरू शकतात. एका B. A. ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वर्षाला साधारण ₹ 4,00,000/- इतका पगार मिळू शकतो.
What to do After 12th Arts in Marathi
Bachelor of Fine Arts (BFA) जर तुम्हाला फोटोग्राफी, आर्ट, Sculpting या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तीन वर्षाचा डिग्री कोर्स निवडू शकता आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परफॉर्मिंग आर्ट्समध्ये स्पेशलायझेशन देखील करू शकतात. ज्याचा तुम्हाला म्युझिक, डान्स किंवा थिएटर मध्ये करिअर बनविण्यासाठी फायदा होऊ शकतो. Bachelor of Fine Arts ही डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फिल्म प्रोडक्शन (Film Production), ड्रॉईंग (Drawing), ॲनिमेशन (Animation) यासारखे फील्डमध्ये नोकरी करू शकतात. त्यासोबतच तुम्ही फाईन आर्टिस्ट (Fine Artist)), क्राफ्ट (Craft), आणि आर्टिस्ट टीचर (Artist Teacher) सारखे जॉब देखील तुम्हाला मिळू शकतात. एका B.F.A. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 2,50,000/- ते ₹3,00,000/- च्या आसपास मिळू शकतो.
व्यवसाय प्रशासनात पदवीधर मध्ये करिअर
Bachelor of Business Administration (BBA) जर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं असेल आणि तुमचा इंटरेस्ट Managerial Career मध्ये असेल तर तुम्ही हा कोर्स नक्कीच करू शकतात. हा कोर्स तीन वर्षाचा असून येथे तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट (Business management) या विषयी शिकायला मिळेल. यामध्ये तुम्हाला वित्त (Finance), Human Resource (Human Resource), लेखा (Accounting), ऑपरेशन्स (Operations), व्यवस्थापन (Management), Marketing (Marketing) या विषयांचा अभ्यास करायला मिळेल. हा कोर्स आर्ट सोबत कॉमर्सचे विद्यार्थी देखील करू शकतात. B.B.A. केल्यानंतर तुम्ही M.B.A. देखील करू शकतात आणि त्यानंतर बँकिंग (Banking), शहरी पायाभूत सुविधा (Urban Infrastructure), स्थावर मालमत्ता व्यवस्थापन (Real Estate Management), व्यवसाय सल्लागार (Business Consultancy), सरकारी क्षेत्र (Government Sector), Manufacturing (Manufacturing) अशा अनेक फिल्डमध्ये नोकरी करू शकता. B.B.A. ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक ₹ 3,00,000/- ते ₹ 5,00,000/- पर्यंत पगार मिळू शकतो.
बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लॉ मध्ये करिअर
Bachelor of Arts & Bachelor of Law (B.A.L.L.B.) ज्या विद्यार्थ्यांना कायदा (LAW) मध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी बारावी पास झालेल्या B.A.L.L.B. हा कोर्स पूर्ण केला पाहिजे. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागतो आणि हा एक एकात्मिक कायदा (Integrated Law) कोर्स आहे. या कोर्स मध्ये अर्थशास्त्र (Economics), राज्यशास्त्र (Political Science), समाजशास्त्र (Sociology), इतिहास (History) यासोबतच कर कायदा (Tax Law), गुन्हेगारी कायदा (Criminal Law), नागरी कायदा (Civil Law), कॉर्पोरेट कायदा (Corporate Law), पेटंट कायदा (Patend Law) या सारख्या अनेक विषयांचा अभ्यास करू शकता. हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही वकील (Lawyer), कायदेशीर सल्लागार (Legal Advisor), वकील (Advocate) अशा पदावर काम करू शकतात. B.A.L.L.B.पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 3,00,000/- ते ₹ 6,00,000/- पर्यंत मिळू शकतो.
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मध्ये करिअर
Bachelor of Computer Application (BCA) जर तुम्हाला सॉफ्टवेअर (Software) आणि ॲप्लिकेशन (Application)बनवण्यामध्ये आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला आयटी (I.T.)इंडस्ट्री मध्ये उच्च पगाराची नोकरी मिळवून देऊ शकतो. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software developer), अनुप्रयोग विकसक (Application Developer), सायबर सुरक्षा तज्ञ (Cybersecurity Expert), डेटा सायंटिस्ट (Data Scientist), ब्लॉकचेन डेव्हलपर (Blockchain Developer) सरख्या पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकतात. त्यासोबतच तुम्ही B.C.A. पूर्ण करून M.C.A. देखील पुर्ण केले तर तुमच्या करिअरला एक मोठी उंची देखील मिळेल. एक B.C.A. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 3,00,000/- ते ₹ 6,00,000/- पर्यंत मिळू शकतो.
बॅचलर ऑफ मास मीडिया मध्ये करिअर
Bachelor of Mass Media (B.M.M.) आजच्या काळात मीडिया ही सगळ्यात लवकर आणि तेजीने वाढणारी अशी इंडस्ट्री आहे. त्यामुळे जर तुम्हाला या फिल्ममध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही B.M.M. हा कोर्स केला पाहिजे. कारण हा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही मासिके (Magazines), टेलीविजन (Television), रेडिओ (Radio), इंटरनेट (Internet), वर्तमानपत्रे (Newspapers) यासारख्या मास मिडियाचे तुम्ही देखील भाग बनू शकता. B.M.M. पूर्ण केल्यानंतर तुम्ही सामग्री लेखक (Content Writer), कार्यक्रम व्यवस्थापक (Event Manager), पत्रकार (Journalist), ध्वनी अभियंता (Sound Engineer), न्यूज अँकर (News Anchor), छायाचित्रकार (Photographer), संपादक (Editor) या पदावर काम करू शकता . B.M.M. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ₹ 3,00,000/- ते ₹ 5,00,000/- पर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. या फिल्डमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स करून तुम्ही तुमच्या पगारात वाढ देखील करू शकता त्यासोबतच तुम्ही पत्रकारिता आणि जनसंवाद पदवी (Bachelor of Journalism & Mass Communication) हा कोर्स देखील करू शकतात.
Bachelor of Design मध्ये करिअर
Bachelor of Design (B.Des) तुम्हाला जर डिझायनिंगमध्ये ड्रेस असेल तर तुम्ही Bachelor of Design हा कोर्स नक्की केला पाहिजे. काही काळापूर्वी हा कोर्स फक्त फॅशन डिझाईनिंग, इंटिरिअर डिझायनिंग, आणि टेक्सटाईल डिझायनिंग पुरताच मर्यादित होता. परंतु आता यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता जसे की वेब डिझाईन (Web Design), गेम डिझाइन (Game Design), व्हीएफएक्स डिझाईन (VFX Design). हा चार वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनर (Fashion Designer), इंटिरियर डिझायनर (Interior Designer), कला दिग्दर्शक (Art Director), उत्पादन डिझायनर (Product Desinger), UI आणि UX डिझायनर (UI and UX Designer), ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) त्या स्वरूपात तुम्ही तुमची करिअरच्या सुरुवात करू शकता. Bachelor of Design हा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 2,00,000/- ते ₹ 3,00,000/- पर्यंत मिळू शकतो.
बॅचलर ऑफ सोशल वर्ड मध्ये करिअर
Bachelor of Social Word (B.S.W.) जर तुम्हाला सोशल वर्क मध्ये स्पेशल डिग्री हवी असेल तर तुम्ही B.S.W. हा पर्याय निवडू शकता. हा एक तीन वर्षाचा कालावधी असलेला कोर्स आहे आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सोशल वर्करच्या स्वरुपात काम करू शकतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुला गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन (Government Organization) आणि नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन (Non-governmental organizations) दोन्ही ठिकाणी काम करू शकता. त्यासोबतच जर तुम्ही या कामात उत्कृष्ट असेल तर तुम्ही सोशल वर्कर (Social worker )किंवा सोशल एज्युकेटर (Social Educator )देखील बनू शकतात आणि तुम्हाला यासाठी उत्कृष्ट पगार देखील दिला जाईल. कारण की B.S.W. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात वार्षिक पगार ₹ 4,00,000/- ते ₹ 5,00,000/- इतका दिला जातो.
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर | What to do After 12th Arts in Marathi
Bachelor of Hotel Management (BHM) हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (Hospitality Industry) ही भारताची सध्या भराभर वाढणारी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला B.H.M. कोर्स पूर्ण करावा लागेल. हा तीन वर्षाचा कोर्स असून यात तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे आचारी (Chef), फ्रंट डेस्क ऑफिसर (Front Desk Officer), लेखा व्यवस्थापक (Accounting Manager), खानपान अधिकारी (Catering Officer) अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. B.H.M. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही M.H.M. आणि M.B.A. सारखे कोर्स देखील पूर्ण करू शकता आणि वरिष्ठ पदासाठी पात्र ठरू शकतात. एक B.H.M. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुरुवातीला ₹ 3,00,000/- ते ₹ 6,00,000/- इतका वार्षिक पगार दिला जातो.
डिजिटल फिल्म मेकिंग आणि अॅनिमेशन मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये करिअर
Bachelor of Arts in Digital Filmmaking and Animation- हा तीन वर्षाचा कालावधी असलेला अंडरग्रॅजुएट ॲनिमेशन (Undergraduate animation) कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला फिल्म मेकिंग आणि ॲनिमेशन (Film making and animation) या विषयावर अभ्यास करायला मिळतो. हा कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना चित्रपट निर्मिती (Filmmaking), अभिनय (Acting), मीडिया (Media), निर्मिती (Producing), शूटिंग (Shooting) या सारखे फिल्ड मध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यांना ब्रॉडकास्ट मीडिया आणि फिल्म्यकिंग (Broadcast media and filming) मध्ये आपली करिअर बनवायचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही छपाई माध्यमे (Print Media), जाहिरात आणि विपणन (Advertising and Marketing), फॅशन आणि इंटीरियर फोटोग्राफी (Fashion and Interior Photography) अश्या विविध फिल्ड मध्ये नोकरी करू शकतात. डिजिटल चित्रपट निर्मिती आणि अॅनिमेशन (Digital Filmmaking and Animation) मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 2,50,000/- ते ₹ 3,00,000/- इतका दिला जातो.
What to do After 12th Arts: तर अशा दहा पॉप्युलर डिग्री कोर्सच्या व्यतिरिक्त तुम्ही 12 वी आर्ट्स नंतर तुम्ही डिप्लोमा कोर्स देखील करू शकतात जसे की Diploma in Technology, Diploma in Hotel Management, Diploma in Tourism and studies, Diploma in Retail Management, Diploma in Event Management, Diploma in BPO Finance and Accounting, Diploma in Filmmaking and video Editing, Air Hostess or Cabin Crew Training Course, Diploma in Education, Diploma in Nutrition and Health Education, Diploma in Early Childhood care and education, Diploma in Dairy Technology, Diploma in Creative writing in English, अशा प्रकारे तुम्ही बारावी आर्ट्स पास झाल्यानंतर तुमच्याकडे डिप्लोमा करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि यापैकी दहा पॉप्युलर डिप्लोमा कोर्सेसची माहिती आम्ही आपल्याला आजच्या या लेखामध्ये दिलेली आहे. आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला (What to do After 12th Arts) बारावी आर्ट्स नंतर कुठला कोर्स केला पाहिजे ही माहिती आपल्याला आवडली असेल तर हा आर्टिकल शेअर करायला विसरू नका. तसेच या दहा पापुलर कोर्स पैकी तुम्हाला कुठला कोर्स निवडायचा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
READ MORE POSTS
Post Views: 5,831