What to do After 12th Commerce? 12 वी कॉमर्स नंतर काय करावे

Share this

What to do After 12th Commerce?आज आपण चर्चा करणार आहोत कॉमर्स विषयाबद्दल ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स विषयातून शिक्षण घ्यायचे आहे आणि आपली करिअर बनवायचे त्यांच्यासाठी आजचा हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की बारावी कॉमर्स पास झाल्यावर पुढे मी नक्की काय केले पाहिजे. पुढे जाऊन नेमके कशाचा अभ्यास केला पाहिजे आणि कुठल्या फिल्डमध्ये करिअर बनवता येईल? अनेक प्रश्न कॉमर्स विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात आणि त्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही इथे आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून देणार आहोत. या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहो की बारावी कॉमर्स नंतर कोणते पॉप्युलर कोर्स केले पाहिजे आणि कुठली ऑप्शन्स उपलब्ध आहे. या सर्वांची माहिती इथे मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व शंका दूर करण्यासाठी आमचा आजचा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मग जाणून घेऊया की बारावी कॉमर्स पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कुठले उत्कृष्ट ऑप्शन्स आणि कोर्सेस उपलब्ध आहेत.

बॅचलर ऑफ कॉमर्स मध्ये करिअर (Career in Bachelor of Commerce)

बॅचलर ऑफ कॉमर्स- (बी .कॉम.) बी.कॉम हा तीन वर्षाचा जनरल डिग्री प्रोग्राम आहे याला फुल टाईम कोर्स किंवा करेस्पोंडेन्स कोर्स प्रमाणे पूर्ण केला जाऊ शकतो. या कोर्सला बी. कॉम पास कोर्स असे देखील म्हटले जाते. या कोर्स मध्ये कॉमर्स आणि फायनान्स संबंधित अभ्यासाचा समावेश असतो. कॉमर्स मध्ये प्रामुख्याने फायनान्स, बँकींग अकाऊंट, ऑडिटिंग, कायदा (Law), मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, जनरल बँकिंग, इन्व्हेस्टिंग आणि कन्सल्टींग या विषयांचा समावेश असतो. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स, फायनान्स, इन्शुरन्स, अकाउंटिंग आणि बँकिंग या क्षेत्रात आपले करिअर बनवायचे असेल त्यांच्यासाठी हा कोर्स अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना चार्टरेड अकाऊंटन्सी, कंपनी सेक्रेटरीशिप, कॉस्ट अकाऊंटन्सी करायचे असेल त्यांच्यासाठी पण हा कोर्स उत्कृष्ट आहे. बी.कॉम. जनरल पूर्ण केल्यानंतर तुम्ही टीचींग, मॅनेजमेंट, ॲडव्हर्टायझिंग, जनरल, कायदा (Law), डिझाईन आणि मास कम्युनिकेशन सारखे अनेक करिअर ऑप्शनला तुम्ही निवडू शकता. त्याच प्रमाणे बी.कॉम ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ₹ 300000/- वार्षिक पगार दिला जाऊ शकतो.

बॅचलर ऑफ कॉमर्स होनर्स मध्ये करिअर (Career in Bachelor of Commerce Honors)

बॅचलर ऑफ कॉमर्स होनर्स ( बी.कॉम होनर्स) हा कॉमर्स फिल्डच्या विद्यार्थ्यांमधील खूप प्रसिद्ध असा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे आणि बी.कॉम ओनर्स ग्रॅज्युएट उमेदवारांची अकाउंटिंग, ऑडिटिंग फर्म, बँक, आणि इन्शुरन्स कंपनी मध्ये यांची खूप जास्त मागणी असते. अशा उमेदवारांना अकाउंटिंग, एच. आर. मॅनेजमेंट, फायनान्स, एडमिनिस्ट्रेटिव डिपारमेंटमध्ये सुरुवातीला जुनिअर लेवल या पदावर नियुक्त केले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर टीचींग, मॅनेजमेंट, ॲडव्हर्टायझिंग, कायदा, डिझाईन, जनरलीजम, ॲडव्हर्टायझिंग असे विविध क्षेत्रात नोकरी मिळू शकते. सी.ए. आणि सी.एस. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा कोर्स उत्कृष्ट ठरू शकतो. कॉमर्स होनर्स ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 300000/- इतका दिला जाऊ शकतो.

बॅचलर इन कंप्यूटर एप्लीकेशन मध्ये करिअर (Career in Bachelor in Computer Applications)

बॅचलर इन कंप्यूटर एप्लीकेशन: (बी.सी.ए.) ज्या विद्यार्थ्यांना कंप्यूटर लैंग्वेज विषयांमध्ये प्रवेश करायचा असेल त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट कोर्स आहे. हा तीन वर्षाचा अंडरग्रॅजुएट प्रोग्राम आहे. याच्या साह्याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअरची सुरुवात करण्यासाठी प्रसिद्ध असा कोर्स आहे. कारण आय.टी. इंडस्ट्री मध्ये बी.सी.ए. कॅंडिडेटची खूप जास्त मागणी आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावीत इंग्लिश आणि गणित हे दोन्ही विषय सक्तीचे असणे गरजेचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करण्याच्या अनेक संध्या उपलब्ध होतात. त्याच प्रमाणे बी.सी.ए. ग्रज्युएट सिस्टम इंजिनियर, सॉफ्टवेअर टेस्टर, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, जूनियर प्रोग्रमर या पदावर काम करू शकतात. बी.सी. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुरुवातीला ₹ 300000/- ते ₹ 500000/- रुपये इतका वार्षिक पगार दिला जातो.

बॅचलर इन इकॉनॉमिक्स मध्ये करिअर (Career in Bachelor in Economics)

बॅचलर इन इकॉनॉमिक्स – कॉमर्स स्टुडंट्स बी.ए. इकोनॉमिक्स ओनर किंवा बी.एस.सी. इकोनॉमिक्स ओनर्स यापैकी कुठलाही एक कोर्स करू शकतात. हा तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे ज्याला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स स्टुडेंट करू शकतात. या दोन्ही कोर्समध्ये बरेच काही साम्य आहे. फक्त यात काही मेजर फरक असे आहेत की बी.एस.सी. मध्ये मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक या विषयाची ऍडव्हान्स लेव्हलवर माहिती मिळेल. त्याचप्रमाणे बी. ए. मध्ये प्रॅक्टिकल लेक्चरचा समावेश नसतो आणि हे जास्त थिओरॅटीकल असतात. त्याच प्रमाणे या दोन्ही कोर्सच्या फीमध्ये आणि पॅकेजमध्ये थोडीफार बदल बघायला मिळतो. इकॉनॉमिक्स मध्ये बॅचलर डिग्री घेतल्यानंतर तुम्ही सिविल सर्विसेस, गव्हर्मेंट बँक, बिझनेस फॉर्मस, फायनान्स इन्स्टिट्यूट, मॅन्युफॅक्चरिंग फर्म आणि स्टॉक एक्सचेंज सारख्या क्षेत्रात काम करू शकतात. बॅचलर इन इकॉनॉमिक्स पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 300000/- ते ₹ 400000/- तीन ते चार लाख रुपये दिला जातो.

बॅचलर्स ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेटिव मध्ये करिअर (Career in Bachelors of Business Administration)

बॅचलर्स ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेटिव (बी.बी.ए.) कॉमर्सचे असे विद्यार्थी ज्यांना कॉमर्स, बिझनेस आणि ऍडमिनिस्ट्रेशन या फील्डमध्ये प्रॅक्टिकल आणि थिओरॅटीकल नॉलेज घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच केला पाहिजे. हा तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट फर्मस मध्ये आणि इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन मध्ये नोकरी करू शकतात. त्याच प्रमाणे या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फायनान्स, सेल्स, एच. आर, मार्केटिंग या क्षेत्रासाठी अप्लाय करू शकतात. बी.बी.ए. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुरुवातीला साधारणपणे वार्षिक पगार तीन लाख इतका दिला जातो. त्याचप्रमाणे हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एमबीए केल्यावर तुमचा वार्षिक वार्षिक पगार ₹ 400000/- ते ₹ 500000/- रुपये इतका होऊ शकतो.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये करिअर (Career in Bachelor of Management Studies)

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( बी. एम. एस.) हा देखील तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे जो तुम्हाला मॅनेजमेंट फिल्डसाठी पूर्णपणे तयार करेल. या कोर्समध्ये तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयाची सखोल माहिती दिली जाते. बी. एम. एस. कॅंडिडेटला अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, मार्केटिंग अँड सेल्स, फायनान्स अँड रिटेल, कन्सल्टींग अशा फील्डमध्ये नोकरी मिळू शकते. बी. एम. एस. ग्रॅज्युएट स्टुडन्टला सुरुवातीला दिला जाणारा वार्षिक पगार ₹ 300000/- ते ₹ 400000/- इतका असू शकतो.

वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि विधान कायद्याचे पदवीधर मध्ये करिअर (Career inGraduate in Commerce and Legislative Law)

वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि विधान कायद्याचे पदवीधर (Bachelor of commerce and bachelor of Legislative Law) कॉमर्सचे विद्यार्थी ज्यांना कायदा (Law) मध्ये इंटरेस्ट आहे ते एल.एल.बी. करू शकतात. बघायला गेले तर तीन वर्षाचा एल.एल.बी. कोर्स ग्रॅज्युएशनच्या नंतरच करू शकतात. परंतु बारावीच्या नंतर तुम्ही इंटिग्रेटेड एल. एल. बी. प्रोग्राममध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. हा एक प्रोफेशनल LAW प्रोग्राम आहे आणि याचा कालावधी पाच वर्षाचा असतो. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि Law या विषयावर शिकविले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही लॉयर, लीगल ॲडव्हायझर, एडवोकेट, लेक्चरर अशा जॉब प्रोफाइलसाठी तयार होतात. तसेच बी. कॉम. ग्रॅज्युटी एल.एल.बी. कॅंडिडेटला पॅकेज हा जॉब पोझिशनच्या प्रमाणे दिला जाऊ शकतो जो साधारणपणे ₹ 200000/- ते ₹ 400000/- इतका असू शकतो.

What to do After 12th Commerce in Marathi

What to do After 12th Commerce: कॉमर्स स्ट्रीमच्या रेगुलर कोर्सेस नंतर जर प्रोफेशनल कोर्स विषयी बोलायचे झाले तर बारावी कॉमर्स झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या कोर्सेस पैकी तुम्हाला बेस्ट वाटणारा कोर्स निवडू शकतात.

चार्टर्ड अकाउंटेंट ( सी.ए.) हा कॉमर्स फिल्डचा सर्वात जास्त पॉप्युलर असलेला कोर्स आहे हा कोर्स पूर्ण करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ऑडिटिंग फर्म, बँक, फायनान्स कंपनी, लीगल फर्म आणि स्टॉक ब्रोकिंग फर्म यामध्ये नोकरी करू शकतात. तसेच टॅक्स कन्सल्टंट, ॲडव्हायझर, फाउंडेशन ऑफिसर, टॅक्स कन्सल्टंट पदावर नोकरी करू शकतात. त्याच प्रमाणे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या वर वयक्तिक प्रॅक्टिस देखील करू शकतात. तसे बघायला गेले तर हे इतर कोर्सच्या तुलनेत थोडेसे अवघड आहे पण लगातार प्रयत्न केले तर हे कोर्स देखील सहज पूर्ण केले जाऊ शकतात. भारतात नॉन टेक्निकल फील्डमध्ये जास्त पगार घेणाऱ्या प्रोफेशनल्समध्ये सी.ए. यांचा देखील समावेश असतो आणि यांना करियरच्या सुरुवातीला साधारण ₹ 400000/- ते ₹ 600000/- वार्षिक पगार देखील दिला जातो. जसजसे तुमचा या क्षेत्रांमध्ये अनुभव वाढत जाईल त्याप्रमाणे तुमचा वार्षिक पगार ₹ 2000000/- पर्यंत देखील जाऊ शकतो.

कंपनी सेक्रेटरी ( सी. एस.) कॉमर्स स्टूडेंटच्या आवडत्या कोर्स पैकी कंपनी सेक्रेटरी हा देखील एक अतिशय आवडीचा असा कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी एक ते तीन वर्षाचा असतो आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट कॉर्डिनेटर, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ऑपरेशन्स मॅनेजर, कंपनी रजिस्टरार, फायनान्स कन्सल्टन्सी, इन्व्हेस्टमेंट बँकर, अशा विविध पदावर नोकरी करू शकतात. सी. एस. कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 300000/- ते ₹ 800000/- पर्यंत मिळू शकतो आणि जसा जसा तुमचा या क्षेत्रामध्ये अनुभव वाढत जाईल त्याप्रमाणे तुमचा पगार देखील तितकाच वाढत जाईल.

What to do After 12th Commerce: सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर ( सीए.फ.पी.) जर तुम्हाला पर्सनल फायनान्स, म्युचल फंड इन्व्हेस्टिंग, इन्शुरन्स प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंट या विषयात अधिक आवड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्कीच करू शकतात. एफपी एथिकल फायनान्शिअल प्रॅक्टिससाठी सगळ्यात जास्त सन्मान असणारे जागतिक सर्टिफिकेशन असते. या सर्टिफिकेशनला पूर्ण करणारे कॅंडिडेट बँक, इक्विटी ब्रोकरेज, इन्शुरन्स कंपनी, डिस्ट्रीब्यूशन हाऊसेस, आणि फायनान्शिअल प्लॅनिंग फर्म मध्ये काम करू शकतात. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीनंतर या सर्टिफिकेशन चे पाच एक्झाम द्यावे लागतील. सी.ए. कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात वार्षिक पगार ₹ 350000/- आसपास मिळू शकतो.

कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंट ( सी.एम. ए.) हा कॉमर्स स्टुडन्टसाठी अतिशय उपयुक्त कोर्स पैकी एक आहे. हा एक सर्टिफिकेट प्रोग्राम आहे याचा कालावधी सहा महिन्यापासून चार वर्षापर्यंतचा असतो. बारावीनंतर तुम्ही सी.एम. ए. च्या महत्त्वाच्या तीन लेव्हल पैकी दुसरी लेवल म्हणजेच इंटरमीडिएट लेव्हलसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. या प्रोग्रामचा महत्त्वाचा फोकस व्हॅल्युएशन इशू, फायनान्शिअल स्टेटमेंट ऍनॅलिसिस, वर्किंग कॅपिटल पोलिसिज, एक्स्टर्नल फायनान्शिअल रिपोर्टिंग इत्यादी वर केला जातो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही फायनान्शिअल ॲनालिस्ट, कॉर्पोरेट कंट्रोलर, फायनान्शिअल कंट्रोलर, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, अशा पदावर नोकरी करू शकतात. कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला सुरुवातीला वार्षिक पगार ₹ 700000/- आसपास मिळू शकतो आणि हाच वार्षिक पगार चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर या उद्या पर्यंत पोहोचता पोहोचता ₹ 5000000/- जाऊ शकतो.

यासोबतच 12वी कॉमर्स मध्ये मॅथेमॅटिक्स तुमचा ऑप्शनाल सब्जेक्ट असेल तर तुम्ही कुठले कोर्सेस करू शकतात आणि विना मॅथेमॅटिक्सचे बारावी कॉमर्स पूर्ण केल्यावर तुम्ही कुठले कोर्सेस करू शकतात.

What to do After 12th Commerce: बारावी कॉमर्स विथ मॅथमॅटिक्स केल्यावर तुम्ही बी.कॉम ओनर्स, बीकॉम इन मॅनेजमेंट अकाउंटिंग अंड इंटरनॅशनल फायनान्स, अकाउंटिंग अंड टॅक्सेशन, बी. कॉम. इन अकाउंटिंग, बी.कॉम. स्टॅटिस्टिक, बी. कॉम. बँकिंग अँड फायनान्स, बी.कॉम. अप्लाइड इकॉनॉमिक्स यासारखे कोर्सेस करू शकतात.

बारावी कॉमर्स विदाऊट मॅथमॅटिक्स केल्यावर तुम्ही बी.कॉम. जनरल, बी. कॉम. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बी.कॉम. मार्केटिंग, बी.कॉम. टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट यासारखे कोर्सेस करू शकतात.

यासोबतच बी. कॉम स्टुडन्ट आर्ट्सच्या फिल्डमधील हे पुढील दिलेले कोर्सेस देखील करू शकतात. जसे की बॅचलर इन फाइन आर्ट्स, बीए इन आर्ट्स( फाईन/ विजूअल/ परफॉर्मिंग) Bachelor in Fine Arts, BA in Arts (Fine / Visual / Performing), BA in Humanities & Social Science, BA in hospitality & travel, BA in Animation, BDes in Animation, BDes in Design, Bachelor of journalism & mass communication(BJMC), Bachelor in Journalism (BJ), Bachelor of mass media (BMM), BHM in Hospitality & Travel इत्यादी.

एवढेच नाही तर तुम्हाला बारावी कॉमर्स पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर तुम्ही बरेच कोर्सेस निवडू शकतात जसे की. डिप्लोमा इन फायनान्स अकाउंटिंग, डिप्लोमा इन ऍडव्हान्स अकाउंटिंग, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कंप्यूटर एप्लीकेशन, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन फॅशन डिझाइनिंग,

What to do After 12th Commerce: तर मित्रांनो अशा प्रकारे बारावी कॉमर्स उत्तीर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे अनेक कोर्सेसची ऑप्शन्स उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त देखील तुमच्याकडे अनेक असे कोर्सेसचे पर्याय उपलब्ध आहे ज्यांना तुम्ही निवडू शकतात. आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला बेस्ट कोर्सेस ची माहिती दिलेली आहे. आम्ही आशा करतो या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्यासोबत शेअर केलेली (What to do After 12th Commerce?) हि माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि ही यापैकी तुम्ही कुठला कोर्स निवडणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

READ MORE POSTS

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top