Job Vs Business in Marathi: Ben Shapiro हे एक अमेरिकन कंजरवेटिव पॉलीटिकल कॉमेंटेटर आहेत आणि त्यांना एका व्यक्तीने असे विचारले की समजा तुम्ही एका पेन्सिल कंपनीचे मालक आहात व त्या कंपनीमध्ये मी एक सामान्य मजूर आहे. तर तुम्ही सर्व मशीन विकत घेऊ शकतात त्यासाठी लागणारा कच्चामाल देखील विकत घेऊ शकतात परंतु माझ्यासारखा मजुरां शिवाय तुम्ही पेन्सिल्स बनवू शकत नाही.
फक्त तुमच्याकडे कच्चा माल असेल जसे की लाकूड, रंग, ग्रॅफाइट इत्यादी. परंतु या कच्च्या मालापासून तुम्ही जास्त पैसे कमवू शकत नाही जोपर्यंत आम्ही सर्व मजूर मिळून या कच्च्या मालाचे पेन्सिल मध्ये रूपांतर करीत नाही. परंतु तुमच्यासारखे लोक आम्हाला केवळ पगारच देतात परंतु तुम्ही कमवलेल्या जास्त नफ्यातील थोडासा हिस्सा देखील या मजुरांमध्ये वाटत नाही.
या प्रश्नाचे उत्तर देताना Ben Shapiro असे म्हणाले की कारण आम्हीच याची सर्व जबाबदारी घेतलेली असते. त्यामुळे याचा पूर्ण नफा देखील आम्ही घेतो. कारण जर काही पेन्सिल फॅक्टरी कर्जाने बुडाली तर यामध्ये मजुराची कुठली जबाबदारी नसेल. हे नक्कीच होऊ शकते की त्या मजुराला त्याची नोकरी गमवावी लागेल परंतु त्यांना त्यांच्या स्वतःच्या खिशातील पैसे देण्याची गरज पडणार नाही. परंतु या उलट कंपनीच्या मालकाला त्यांनी घेतलेल्या सर्व कर्जाची कुठल्याही परिस्थितीत परतफेड करावीच लागेल. कदाचित त्यासाठी त्याला स्वतःचे घर देखील विकून टाकावे लागेल.
कुठलाही मालक कंपनीच्या मशीन्सवर लाखो रुपये खर्च करत असतो आणि लाखो रुपये त्या मजुरांवर देखील खर्च करीत असतो आणि अपेक्षा करतो कि हे सर्व मिळून एक उत्तम असे प्रॉडक्ट बनवतील. त्यासाठी त्याला भाड्याने जागा विकत घ्यावे लागते, सर्व मॅनेजमेंटची जबाबदारी बघावं लागते जेणेकरून काम सुरळीतपणे पार पडेल. यासाठी त्याला एक कंपनी देखील स्थापित करावी लागते आणि ही देखील काळजी घ्यावे लागते की सरकारला याचे कर देखील मिळाले पाहिजे. तसेच मशीन वापरले शिवाय कुठलाही मजूर या कंपनीमध्ये काहीच काम करू शकत नाही
Job Vs Business in Marathi
पण हे संभाषण मी आपल्याला का सांगत आहे याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असे लक्षात येईल कि यामधून आपल्याला एक नोकरी आणि एक व्यवसाय यातील महत्वपूर्ण फरक जाणवेल.
सर्वात अगोदर आपण हे बघू की नोकरी आणि व्यवसाय याच्यात महत्त्वाचे काय बदल आहेत? यासोबत आपण यामधील सुरक्षा आणि जोखीम या दोघांचा देखील विचार करू. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय परिवारातील पालकांचे हेच स्वप्न असते की आपला मुलगा किंवा मुलगी यांनी चांगले शिक्षण घेऊन एखादी चांगल्या पदाची नोकरी करावी.असे जर झाले तर त्यांचे अर्धे टेंशन कमी होऊन जातं कारण त्यांच्या मते आपली मुले आयुष्यभर त्यांच्या मूलभूत गरजा किमान पूर्ण तरी करू शकतील.
आपण जेव्हा हे बघतो की आपल्यासारखेच करून स्वतःची कंपनी निर्माण करतात आणि करोडो रुपयांचे उत्पन्न कमवितात उदाहरणार्थ Meesho जी चे मूल्यांकन 14 हजार करोड रुपये आहे. PrarmaEasy या कंपनीचे मूल्यांकन 10.5 हजार करोड रुपये. ShareChat या कंपनीचे मूल्यांकन 15.5 हजार करोड रुपये इतकी आहे. भारतामध्ये अशा बऱ्याच कंपन्या निर्माण होत आहे ज्यांची मूल्यांकन आठ ते दहा हजार करोड पेक्षा जास्त आहे. तेव्हा आपल्याला असे वाटायला लागते की का म्हणून आपण केवळ पन्नास हजार मासिक वेतनासाठी नोकरी करावी? ते देखील मार्केटमध्ये इतक्या साऱ्या संध्या उपलब्ध असताना.
नोकरी करणे उत्तम आहे की व्यवसाय
बऱ्याच लोकांना असे वाटते की कंपनी जितके रुपयात विकले जाते तितके सर्व रुपये त्या कंपनीच्या मालकाला मिळतात परंतु यामध्ये कुठलीही तथ्य नाही. यासाठी आपण फ्लिपकार्ट या कंपनीचे उदाहरण घेऊया बऱ्याच लोकांना या कंपनीची माहिती तर असेलच. Sachin Bansal आणि Binny Bansal या दोघांनी आयटी दिल्ली मधून शिक्षण पूर्ण केले त्यानंतर या दोघांनी ॲमेझॉन या कंपनीमध्ये नोकरी केली.
नोकरी करीत असताना या दोघांनी असा विचार केला की आपण देखील ऍमेझॉन सारखी कंपनी भारतात सुरू करू. त्यांनी यासाठी पैसे देखील उभे केले आणि फ्लिपकार्ट ही कंपनी भारतात सुरू केली. तसेच त्यांनी Myntra.com, Flying machin, Jabong.com कंपन्यांना देखील जखडले. फ्लिपकार्ट ही कंपनी तोट्या मध्ये चालू होती. परंतु Walmart सारख्या अमेरिकेतील प्रचंड मोठी कंपनीने नऊ मे दोन हजार अठरा रोजी फ्लिपकार्ट कंपनीचे जवळ जवळ 77 टक्के शेअर्स 16 बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतले.
त्यावेळेस त्यांच्या कंपनीचे मूल्य साधारण सात हजार करोड रुपये इतकी होती. लोकांना असे वाटेल की यांना सोहळा बिलियन डॉलर्स नाही मिळाले परंतु प्रत्येकी एक बिलियन डॉलर तर नक्कीच मिळाला असेल. त्यामुळे प्रत्येकाला असेच वाटते की आपण देखील एक मोठी कंपनी सुरू केली पाहिजे आणि त्यातून भरपूर पैसा कमविला पाहिजे. परंतु फ्लिपकार्ड कंपनी ही मुळातच तोट्या मध्ये चालली होती आणि या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्यांची संयम करण्याची हद्द संपून गेलेली होती. त्यामुळे Walmart सारख्या कंपनीने फ्लिपकार्टचे शेअर्स विकत घेतले जेणेकरून त्यांना भारतात देखील उद्योग करण्यासाठी प्रवेश करता येईल.
Business Kasa Karava in Marathi
अशाच प्रकारे अनेक कंपन्या बुडाल्या जसे की Just buy LIVE या कंपनीमध्ये 840 करोड रुपये गुंतवले होते, PortDesk कंपनी वर 14 करोड रुपये खर्च केला गेला होता, तसेच आपल्या सर्वांना माहीती असलेला hi ही एक मेसेंजर कंपनी होती या वर गुंतवणूकदारांनी 12000 करोड रुपये लावले होते. परंतु या कंपन्या सुद्धा बुडाल्या. थोडक्यात काय तर जवळजवळ 90 ते 95 टक्के व्यवसाय हे त्यांच्या सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये अपयशी होतात. त्यातील उरलेल्या व्यवसायांपैकी 80 टक्के व्यवसाय देखील बुडल्या जातात.
थोडक्यात काय तर तुमच्यासाठी आय आय टी किंवा एम आय टी मध्ये ऍडमिशन घेणे हे खूप सोपे आहे परंतु एक असा व्यवसाय उभा करायचा ज्याचे मूल्यांकन हे बिलियन डॉलर्स मध्ये असेल हे खरंच खूप कठीण आहे.
तुम्ही सर्वांनी Roman Saini यांच्याविषयी तर नक्कीच ऐकले असेल. ज्याने भारतातील सर्वात कठीण एक्झाम्स देखील यशस्वीपणे पास करून दाखविले. खरे तर आपल्या मुलांनी असे करणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांसोबत एक स्टार्टअप सुरु केला आणि त्याला नाव दिले Unacademy. आजच्या स्थितीला या कंपनीचे मुल्यांकन जवळ जवळ 15000 करोड रुपये इतकी आहे. परंतु तरी देखील तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की जर इतके मोठे मोठे उद्योग अपयशी होत आहे तर आपण देखील एखादा उद्योग सुरू करायला हवा की साधारण पगाराची नोकरी करायला हवी ज्यात आपण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो.
How to Start a Business in Marathi
जर तुम्हाला तुमचं उद्योग यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला काही महत्वपूर्ण नियम हे पाळावेच लागतील.
- नियम 1. तुम्ही उद्योग असा सुरू करा ज्यामध्ये तुम्हाला खरच आवड असेल. यानंतर उद्योगासाठी तुम्ही जो वेळ खर्च कराल आणि भविष्यात तुमचा तो उद्योग अपयशी ठरला तरी त्या वेळेस तुम्ही पूर्णपणे आनंद तर घेतला असेलआणि तुम्हाला तुमच्या उद्योगात यश मिळत गेले तर तुमच्या आनंदा सोबत तुम्ही भरपूर संपत्ती देखील कमवाल.
- नियम 2. जर तुम्हाला तुमचा उद्योग सुरू करायचा असेल तर त्या उद्योगाची सुरुवात तुम्ही कधीही कर्ज घेऊन करू नका कारण तुमच्या त्या उद्योगांमध्ये नफा होणार आहे की तोटा होणार आहे हे कधीच निश्चित नसते. कारण तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतले असेल त्या बँकेला कुठलाच फरक पडणार नाही की तुमचा नफा होत आहे की तोटा होत आहे तुम्हाला तुम्ही घेतलेले कर्ज कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावेच लागेल.
- नियम 3. तुम्हाला तुमचा उद्योग सुरू करायचा असेल तर अगोदर तुम्ही तो उद्योग पार्टटाइम बिझनेस म्हणून सुरु करा. त्यानंतर एक ते दोन वर्ष तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू ठेवा. असे केल्यामुळे तुमच्या हे लक्षात येईल की तुमच्या या व्यवसायातून तुम्हाला किती नफा होत आहे. तसेच तुम्ही हा देखील निर्णय घेऊ शकता की आता तुम्ही या उद्योगाला पूर्णवेळ करू शकता की अजूनही तुम्हाला त्यासोबत तुमच्या नोकरीची गरज आहे की नाही.
मी नोकरी सोडून व्यवसाय करू का | Job Vs Business in Marathi
कुठल्याही उद्योगाची सुरुवात करताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे का ह्या उद्योगामुळे आपण आपल्या देशाचे नाव कसे पुढे आणू शकतो. ज्याप्रमाणे 1945 साला मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी वर न्यूक्लियर बॉम्बने हल्ला करण्यात आला होता आणि तेथील सर्व काही उध्वस्त होऊन गेले होते. तरीसुद्धा फक्त पंधरा वर्षांमध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही जपानची झाली होती.
त्याचे कारण असे की त्यांनी फक्त त्यांच्या देशा पुरता विचार न करता त्यांनी निर्माण केलेले प्रोडक्स हे पूर्ण जगापर्यंत कसे पोहोचेल याचा विचार केला. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी कच्चा माल पूर्ण जगाला पुरवण्याची सुरुवात केली. यासाठी जपानने कोळसा, कापूस आणि स्टील पुरवण्याची सुरुवात केली. एक काळ असा होता की जपानला अतिशय स्वस्त आणि डुप्लिकेट प्रोडक्ट साठी ओळखले जायचे. परंतु SONY कंपनीचे फाउंडर Akio Morita यांनी असे उद्दिष्ट ठेवले की ते यापुढे असे प्रॉडक्ट बनतील की ज्यामुळे जपानला फक्त SONY या ब्रँड साठी नाहीतर जपानला उत्तम कॉलिटीचे प्रॉडक्ट साठी ओळखले जाईल.
अशाप्रकारे त्यांनी जपानची अर्थव्यवस्था वाढवण्यास खूप मदत केली. परंतु आपण असा विचार करत नाही आपण फक्त उद्योग करताना आपल्या देशापुरते विचार केलेला असतो. परंतु असा विचार कधीच करत नाही की आपण आपल्या तयार केलेला माल एक्सपोर्ट कसा केला पाहिजे. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती वाढवायची असेल तर आपण तयार केलेले उत्पादन हे एक्सपोर्ट व्हायला हवे आणि इतर देशा पर्यंत पोहोचायला हवेत.
परंतु आपल्या देशातील ज्यांनी कोणी त्यांचे प्रॉडक्ट इतर देशा पर्यंत पोहोचले तर त्यांनी फक्त देशाचे नाव मोठे केले नाही तर देशाची अर्थव्यवस्था वाढविण्यामध्ये देखील खूप चांगली मदत केली आहे. उदाहरणार्थ Infosys या कंपनीचे फाउंडर Narayan Murthy यांना हे माहिती होतं कि भारतातील लोक कंप्यूटर मध्ये खूप उत्तम आहे.त्यांचे एक बोधवाक्य आहे “Americal value at India price”. उत्कृष्ट दर्जाची सॉफ्टवेअर कॉलिटी ही तुम्हाला भारतीय किमतीत मिळेल. त्याच्यामुळेच फक्त Infosys कंपनीच्या फाउंडरला याचा फायदा झाला नाही तर यासोबत भारताला फायदा झाला आणि इंटरनॅशनल मार्केटला देखील याचा खूप चांगला फायदा झाला.
Business Plan in Marathi
Job Vs Business in Marathi: मित्रांनो अशाप्रकारे आपण नोकरी आणि उद्योग या दोन गोष्टीतील फरक बघितला. आपण या मध्ये असे पहिले कि तुम्हाला नोकरी मध्ये सुरक्षा मिळते त्यासोबतच तुम्हाला निश्चित अशी रक्कम दर महिन्याला मिळते. सोबतच तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की नोकरी करतांना तुम्हाला एका विशिष्ट रकमेपेक्षा अधिक पैसे कमविता येत नाही. तसेच कुठलाही बिझनेस सुरु करणे हे खूप सोपे आहे परंतु तो बिजनेस व्यवस्थित उभा राहण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षाचा काळ देणे खूप गरजेचे आहे.
कुठलाही बिजनेस हा एखाद्या प्रयोगा सारखाच असतो जर तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ दिली तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल अन्यथा तुम्हाला अपयश देखील सहन करावे लागेल. परंतु जर तुम्हाला ही जोखीम घ्यायची असेल तर तुम्ही तुमचा उद्योगाची सुरुवात पार्ट टाइम पासून सुरु केली पाहिजे. आणि तुम्ही तोच उद्योग निवडला पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला खरंच खूप आनंद मिळतो. आपण हे देखील पाहिले की रिवार्ड नेहमी क्रियेटरला मिळतात कंज्यूमरला नाही.
त्यामुळे जर तुमचं व्यवसाय यशस्वी झालाच तर तुम्हाला भरपूर संपत्ती तर मिळतेच त्यासोबतच तुम्ही जर चांगले काम केले असेल तर त्याचा इतर लोकांना देखील फायदा होतो. त्यामुळे आपल्या सोबत आपण आपल्या देशाची देखील प्रगती करण्यास हातभार लावू शकतो आणि देशाची अर्थ व्यवस्था सुधारण्यासाठी मदत करू शकतो.
जर आपल्याला Job Vs Business in Marathi या लेखातून दिलेली माहिती आवडली असेल तर share करायला विसरू नका.
READ MORE
Post Views: 5,597