Nuksan Bharpai List | अवेळी पाऊस नुकसान भरपाई

Share this

Nuksan Bharpai List: नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकासानिसाठी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. नुकसान भरपाईचे पैसे प्रत्येक जिल्ह्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले आहेत.

प्रत्येक महसूल विभागांना किती पैसे आलेले आहेत त्यानंतर यामध्ये जे 23 जिल्हे पात्र असणार आहे ते 23 जिल्हे कोणते आहेत? कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी पात्र असणार आहे? प्रत्येक जिल्ह्यांना किती पैसे दिले आहेत? त्यानंतर या जिल्ह्यासाठी जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले शासन निर्णयामध्ये स्पष्टरित्या दाखवण्यात आलेला आहे याची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

त्यासाठी आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच या वेबसाईटवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अपडेटसाठी Whatsapp ग्रुप लगेच जॉईन करा.

सर्वप्रथम आपण मंत्रिमंडळ निर्णय पाहू त्यानंतर शासन निर्णय कोणकोणत्या जिल्हे आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊ. राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असेल या नुकसानाची भरपाई महसूल विभागाद्वारे वितरित करण्यात आलेली निधी पुढीलप्रमाणे असणार आहे.

आता सर्वप्रथम अमरावती विभागासाठी किती निधी आहे हे समजून घेऊया. त्यानंतर नाशिक विभागासाठी, पुणे विभागासाठी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण किती निधी आहे हे बघूया.

Nuksan Bharpai List Full Details

Nuksan Bharpai List
Nuksan Bharpai List

Nuksan Bharpai List 2023 | अवेळी पाऊस नुकसान भरपाई

आता अमरावती विभागासाठी 24 कोटी 57 लाख 95 हजार एवढी रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक विभागासाठी 63 कोटी 9 लाख 77 हजार रुपये तसेच त्यानंतर पुणे विभागासाठी 5 कोटी 37 लाख 70 हजार रुपये, त्यानंतर छत्रपती संभाजी नगर साठी 84 कोटी 75 लाख 19 हजार एव्हडा निधी शासनाकडून देण्यात आलेला आहे.

मित्रांनो हे महसूल विभाग आहेत आता या महसूल विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात समाविष्ट आहेत हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुमचा जिल्हाधिकारी यामध्ये असेल तर तुम्हाला निधी दिले जाणारे, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामधून किती शेतकरी आहेत?

याचीसुद्धा सविस्तर रित्या माहिती देण्यात आली आहे. एकूण निधीची रक्कम 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये एवढी आहे आणि निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे.

तसेच प्रत्येक जिल्ह्यानुसार हा निधी पाठवण्यात आलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. आता बघा या ठिकाणी आपण समजून घेऊया सोबतचे जे प्रपत्र देण्यात आलेले आहेत हे प्रपत्र आहे 2023 मध्ये शेती पिके व इतर नुकसानी करिता वितरित करावयाच्या निधीचा लेखा शीर्षक निहाय तपशील या ठिकाणी 10 एप्रिल 2023 रोजी पाठवण्यात आलेले आहे.

आता यामध्ये काही जिल्हे देण्यात आलेले आहेत, एकूण निधी देण्यात आली आहे, शेतकऱ्यांची संख्या देण्यात आली आहे ही याची पूर्ण डिटेल्स आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो आजचा लेख थोडासा मोठा होईल परंतु तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा ठरणारे आहे कारण या मार्फत तुम्हाला सर्व तुम्हाला समजून येणार आहे.

अवेळी पाऊस नुकसान भरपाई

आता सर्व प्रथम अमरावती विभागामधून जिल्हे आहे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम असे पाच जिल्हे आहेत. या पाच जिल्ह्यामध्ये 26132 शेतकरी आहेत आणि यासाठी निधीची रक्कम आहे जी आहे इथं 2 कोटी 24 कोटी 57 लाख 95 हजार आहे.

त्यानंतर दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग आता नाशिक विभागामधून सर्वप्रथम जिल्हा आहे नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर असे हे पाच जिल्हे आहे. आता यामध्ये बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या आहे 70 हजार 666 आणि निधी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे या विभागासाठी 63 कोटी 9 लाख 77 हजार रुपये एवढी.

त्यानंतर आता पुणे विभागामधून काही जिल्हे आहेत पुणे विभागामधून सुद्धा पाच जिल्हे आहेत ते पाच जिल्हे कोणते आहेत त्यानंतर निधी किती आहे हे सुद्धा आपण इथे समजून घेऊया. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे तो सुद्धा आपण इथं जाणून घेऊया सर्वात मोठा विभाग आहे.

पुणे विभागामधून सर्वप्रथम पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे पाच जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत. या पाच जिल्ह्यामध्ये एकूण बाधित शेतकरी 6331 एव्हडे आहेत आणि यासाठी निधीची एकूण रक्कम 5 कोटी 37लाख 70 हजार एवढी निधी देण्यात आलेली आहे.

मार्च नुकसान भरपाई | Nuksan Bharpai List March 2023:

त्यानंतर आता सर्वात मोठा जो विभाग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजी नगर मध्ये किती जिल्हे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया आणि किती रक्कम हे सुद्धा पाहूया. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव असे हे जिल्हे आहेत.

आता या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगर विभागासाठी जे पात्र लाभार्थी संख्याआहेत 1 लाख 22 हजार 18 आणि यासाठी 84 कोटी 75 लाख 19 हजार एवढी निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभागासाठी आलेला आहे. आता एकूण जे राज्य आहेत आणि राज्यांना देण्यात येणारा निधी यासर्वांची एकूण रक्कम आहे 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये आणि यामध्ये जे एकूण बाधित लाभार्थी शेतकरी आहेत 2 लाख 25 हजार 147.

मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे 10 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आला आहे आणि यामध्ये जे आता बाधित असणारे जे शेतकरी आहेत टे कोणत्या राज्यातील आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. राज्यात माहे मार्च 2023 दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीमध्ये जे पडलेला अवेळी पाऊस आहे.

यामुळे शेती पिकाचे नुकसान झालेली असेल तर या नुकसानाची भरपाई घोषित करण्यात आली आहे 33% पेक्षा जास्त बाधित शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन लेखामध्ये नवीन माहितीसह.

आपल्या व्यवसायाची वेबसाईट बनवा आणि आपला व्यवसाय ऑनलाईन सुरु करा कारण तुमचे संभाव्य ग्राहक देखील तुमची ऑनलाईन वाट पाहत आहे. त्यासाठी आजचं संपर्क करा Way to Digital

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top