Pmsby Scheme Details in Marathi: तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त वीस रुपये प्रति वर्षासाठी भरायचे आहेत आणि तुम्हाला यामधून दोन लाख रुपयांचा फायदा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला बेनिफिट कशा पद्धतीने दिले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या लेखातून मिळणार आहे.
मित्रांनो 20 रुपये किंमत खूप मोठी नाही हि रक्कम एका पाण्याची बाटलीची किंमत आहे किंवा एका दिवसाचे तुम्ही जवळपास 100 ते 200 रुपये फक्त चहा नाष्ट्यावर खर्च करत असाल किव्वा काहीजण एव्हडी रक्कम तंबाखू अथवा सिगारेट वर खर्च कार्रात असेल. बरेच लोक फक्त त्यांच्या वैयक्तिक शोक पूर्ण करण्यासाठी यापेक्षा अधिक रक्कम दिवसभरात खर्च करीत असतात.
तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाची काळजी असेल किंवा तुमच्या स्वतःच्या भविष्याची जर तुम्हाला काळजी असेल तर फक्त तुम्हाला एका वर्षासाठी वीस रुपये बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत. मग यासाठी कोणती नवी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे, त्यानंतर तुमच्या कुटुंबांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे, तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, कशा पद्धतीने या योजने मधून लाभ दिला जाणार आहे.
याची पूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच जर या वेबसाईटवर तुम्ही पहिल्यांदा आला असला तर अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुप नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नवनवीन माहिती मिळत जातील.
मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागातून असो किव्वा शहरी भागातून असो प्रत्येक सामान्य व्यक्तीसाठी, गोरगरिबासाठी किंवा श्रीमंत व्यक्तीसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त वीस रुपये प्रति वर्ष भरायचे आहे आणि तुम्हाला यामधून दोन लाख रुपयांचा फायदा होणार आहे. या लेखच्या माध्यमातून डिटेल्स माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Pmsby Scheme Details in Marathi 2023
आता इथं सर्वप्रथम समजून घ्या लाभ बेनिफिट अर्ज वगैरे सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे पी एम एस बी वाय हि एक दुर्घटना योजना आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे अपघात झाले असल्यास त्यामध्ये लढ घेतलेल्या व्यक्तीस जर अपंगत्व आले असेल किंवा लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर यामधून लाभार्थी व्यक्तीला इथे बेनिफिट दिले जाणार आहे. फक्त लाभ घेण्यासाठी एका वर्षासाठी वीस रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला दोन लाख रुपयांचा फायदा होणार आहे.
तर हे वीस रुपये तुम्हाला एका वर्षासाठी भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला दर वर्षाला हि योजना रिन्यू करायचं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी भरायचा आता हे समजून घेऊया. या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेमध्ये वीस रुपये तुम्ही भरून शकता आणि दोन लाख रुपयांचा विमा तुम्ही घेऊ शकता.
Pmsby Scheme Full Details in Marathi Language
आता त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये कागदपत्रे आणि वय मर्यादा काय आहे हे देखील बघूया. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचे प्राथमिक केवायसी कागदपत्र लागणार आहे. म्हणजेच तुमचे आधार कार्ड किव्वा पॅनकार्ड तसेच पासपोर्ट फोटो, तुमचा मोबाईल नंबर या सर्व गोष्टींची सहभागी होण्यासाठी तुम्हाला गरज पडणार आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होयासाठी वयोमर्यादा काय आहे?
तुम्हाला जर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर वयोमर्यादा 18 ते 70 वर्षापर्यंत आहे. आपण या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता. आता बघूया प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा कालावधी कशा प्रकारे असणार आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कालावधी किती आहे?
विमा कालावधी वार्षिक असणार आहे महाजेच 1 जून ते 31 मे म्हणजेच 1 जून ते 31 मे या दरम्यान तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
प्रीमियम रक्कम खातेदारकाच्या बचत खात्यातून बँकेद्वारे ऑटो डेबिट सुविधाच्या माध्यमातून डेबिट केली जाणार आहे.
कोणताही व्यक्ती केवळ एका बचत खात्या द्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ प्रत्यक्षरीत्या तुम्हाला कशा पद्धतीने भेटणार आहे हे आता आपण सविस्तर समजून घेऊया.
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये विमाधारकांना दिले जाईल.
दोन्ही डोळ्याचे भरून येणारे नुकसान/ दोन्ही हाताचा किंवा पायाचा वापर न होणे/ एका हाताचा किंवा पायाचा वापर न होणे/ एका डोळ्याची दृष्टी कमी होणे. यासाठी सुद्धा 2 लाख रुपये शासनाच्या माध्यमातून बँकेच्या अंतर्गत दिले जाणार आहे.
एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय यांची दुखापतीच्या आजारासाठी 1 लाख रुपये मदत म्हणून दिली जाणार आहे.
मित्रांनो जर विमाधारक लाभार्थ्यांचा अपघात झाल्यास 30 दिवसाच्या आत दावा सादर करावा लागतो. दावा सादर केल्यानंतर जे काही बेनिफिट आहे ते थेट अकाउंट मध्ये जमा केली जाते.