सकाळी झाडूची ही युक्ती करून बघा घरात पैशांचा पाऊस पडेल | Vastu Tips for Home in Marathi

Share this

Vastu Tips for Home in Marathi: वास्तूशास्त्रनुसार सांगितल्याप्रमाणे घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी झाडूच महत्वाचा वाटा असतो. ज्या घरात झाडूचा योग्य पद्धतीने वापर केला जातो आणि काळजीपूर्वक झाडूला वापरले जाते त्या घरात सकारत्मकता दिसून येते. झाडू योग्य पद्धतीने वापरण्यासाठी काही खास गोष्ट सांगण्यात येतात ज्यामुळे झाडूच्या ह्या युक्तीने तुमच्या घरातील पैशाची तिजोरी भरायला वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया झाडूशी संबंधित काही प्रभावी युक्त्या.

झाडूचा योग्य पद्धतीने वापर

आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असावं अशी सर्वांची इच्छा असते त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कायम झाडून किंवा पुसून घेत असतो. त्यामुळे घरात स्वच्छता तर राहतेच मात्र त्याचबरोबर चैतन्य आणि प्रसन्नता देखील नांदत असते. झाडूला देवी लक्ष्मीचं रूप देखील म्हटलं जात.

घर झाडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व घाण बाहेर टाकली जाते आणि आपल्या घरात स्वच्छता निर्माण होते व पावित्र्य आणि संपत्ती घरात प्रवेश करत असते. जेव्हा गरिबी दूर होते तेव्हाच देवी लक्ष्मी माता घरात प्रवेश करते असं म्हटलं जातं. त्यामुळे झाडूला देवी लक्ष्मी मातेचे रूप मानल गेलय.

मात्र अनेक जणांना हे माहिती नसतं आणि त्यामुळे ते झाडूचा योग्य पद्धतीने वापर करत नाही.चला तर मग बघूया झाडूचा योग्य वापर कसा करावा आणि नवीन झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

घरात झाडू कधी मारावा

तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा झाडूच्या वापराबाबत आणि देखभाली बाबत काही नियमांच पालन केल्यास घरात कधीही गरिबी, टंचाई आणि दुःख येत नाही. उलट भरपूर संपत्ती येते असं म्हणतात. तर या साठी आपल्या घरात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कधीही झाडू वापरू नये.

सुर्योदयपासुन सूर्यास्तापूर्वीचा काळ स्वच्छतेसाठी सर्वोत्तम मानला गेलाय. सूर्यस्था नंतर माता लक्ष्मी घरात येत असते, अशावेळी साफसफाई केल्याने तिला राग सुद्धा येऊ शकतो. यामुळे घरात गरिबी येण्यास सुरुवात होते म्हणूनच सूर्यास्ताच्या आधी झाडून घ्यावं.

याबरोबरच नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील कोणताही सदस्य महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो तेव्हा तो गेल्यावर लगेच घर झाडू नका त्यामुळे केलेलं काम बिघडू शकत. विशिष्ट घरातला प्रमुख व्यक्ती घराबाहेर पडल्यानंतर झाडू लावण्याची चूक चुकूनही करू नका. जर तुम्हू रात्रीच्या वेळी घर झाडत असाल तर झाडल्यानंतर निघालेला कचरा दुसऱ्या दिवशीच घराबाहेर टाकावा.

झाडूवर पाय पडल्यावर काय करावे

घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडावर पडू शकतो मात्र त्यामुळे महालक्ष्मीचा अनादर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर अस घडलं तर लगेचच तिच्यापुढे नतमस्तक होऊन क्षमा मागावी. झाडू बद्दल आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली जाते की दररोज रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजा जवळ झाडू ठेवावा आणि त्यानंतर झोपावे.

असे केल्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तुम्ही जर नवीन झाडू खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा की नवीन झाडूची खरेदी हि नेहमी शनिवारच्या दिवशीच करावी. याच कारण असे आहे की शनिवारी घरात नवीन झाडू वापरण हे वास्तू शास्त्रानुसार शुभ सांगितले गेले आहे.

झाडू ठेवण्याची योग्य जागा कोणती

तुम्ही जर नवीन घर घेतलं असेल किंवा तुम्हाला त्या नवीन घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्ही नवीन घरात जाताना सोबत नवीन झाडून घेऊन जावा. नवीन घरात गेल्यावर नवीन झाडूचाच वापर केल्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि नवचेतन्य निर्माण होतात.

Read more: घरातील घड्याळ कोणत्या दिशेला लावावे

घराची साफसफाई करणारा झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगळा ठेवावा. याबरोबरच वास्तुशास्त्रानुसार घरातल्या झाडूची योग्य जागा कोणती हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं, म्हणून कुठेही झाडू ठेवली जाते.

म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेला झाडून ठेवूनच सर्वात योग्य असतं हे शक्य नसेल किंवा दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला तुमच्याकडे जागा नसेल तर झाडू अशी ठिकाणी ठेवावी जिथे तो कोणाला दिसणार नाही. झाडू कधीही स्वयंपाक घर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नका. त्यामुळे घरात आजारपण आणि गरिबी येऊ शकते.

झाडू ठेवण्याची योग्य पद्धत कोणती

याचप्रमाणे घरात झाडू कधीही उभा ठेवू नका तो नेहमीच जमिनीवर आडवा ठेवा. अशा ठिकाणी ठेवा की बाहेरच्या व्यक्तीला तो दिसणार नाही. झाडू लपवून ठेवावा आणि लक्षात ठेवावं की तिजोरी, पूजा घर किंवा तुळशीच्या रोपाजवळ झाडू कधीही ठेवू नये.

असे केल्याने माता लक्ष्मीचा कोपही होऊ शकतो आणि माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. जराशी आगमन सुद्धा थांबू शकते आणि या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीला आर्थिक समस्या सुद्धा जाणवू शकतात. यामुळे झाडूंश बाबतीत अशा गोष्टी करणार टाळावं .

Vastu Tips for Home in Marathi

सोबतच एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की झाडू कधीही कचऱ्यात जाळू नये तर तो सुद्धा मात्र लक्ष्मीचा अपमान आहे असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे झाडूंच्या ह्या काही युक्ती तुम्हाला भरभरून पैसा देऊ शकतो. याव्यतिरिक्त झाडूच्या बाबतीत तुम्ही कोणते पालन केले आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .

आशा करतो की आजचा आमचा आर्टिकल (Vastu Tips for Home in Marathi) वाचून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आणि अशीच माहिती मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाल नियमितपणे अपडेट्स मिळत राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top