Highest Earning Blog Ideas for 2022: ब्लॉग सुरु करण्याची इच्छा तर सर्वांनाच असते आणि सुरुवातीला ब्लॉगिंग करताना प्रत्येकामध्ये एक वेगळाच उत्साह असतो परंतु कालांतराने असे होते की हा उत्सव हळूहळू कमी होऊ लागतो आणि असे वाटू लागते की ब्लॉगिंग फील्डमध्ये काही स्कोप उरलेला नाही. त्यामुळे ब्लॉगिंग सुरु करताना तुम्हाला अशा ब्लॉक आयडिया विषयी माहिती असणे गरजेचे आहे जे तुमच्या ब्लॉगिंग जर्नी मध्ये नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळवून देईल. मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला ब्लॉग जर्नी मध्ये कसे टिकून राहायचे आणि तुमच्या ब्लॉगला उत्कृष्ट रिस्पॉन्स कसा मिळेल यासाठी तुमच्या सोबत (Highest Earning Blog Ideas for 2022) 7 ब्लॉगिंग आयडिया शेअर करणार आहोत तुम्ही या ब्लॉगिंग आयडिया चा उपयोग करून तुमचा ब्लॉग सुरु करु शकतात आणि त्या माध्यमातून तुमच्या ब्लॉग साइटवर भरभरून ट्रॅफिक येईल आणि तुम्ही भरपूर पैसे देखील या आयडिया चा वापर करून मिळू शकतात. त्यामुळे आमचा हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा म्हणजे आपल्याला कुठल्या 7 अधिक पैसा कमवून देणाऱ्या ब्लॉग आयडीया आहेत याची संपूर्ण माहिती मिळेल.
आजचा विषय सुरू करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हे सुचवू इच्छितो की कुठलाही ब्लॉग आयडिया तुमचा (Interest) इंटरेस्ट, (Expertise) त्या विषयात तुम्ही किती तज्ञ आहात, (Competiton) तसेच या विषयात किती कॉम्पिटिशन आहे या सर्वांची माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्हाला असे टॉपिक आणि आयडी यांचा वापर करावा लागेल याच्या मदतीने तुम्ही भरपूर पैसे देखील कमवू शकतात. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यानंतर तुम्ही ब्लोग्गिंग ची सुरुवात करा. तसेच सर्वात महत्त्वाचे जर तुमच्या मनामध्ये अशी शंका असेल की 2022 या साला मध्ये ब्लॉगिंग करणे योग्य आहे का? , ब्लॉगिंग मध्ये खरंच स्कोप आहे का?, पर्यावरण आम्ही आपल्याला असे उत्तर देऊ की लॉगिंग या फिल्ममध्ये स्कोप नक्कीच असेल, कारण ब्लॉग साठी इंटरनेट यूजर भरपूर उपलब्ध आहे याचे कारण असे आहे की जवळजवळ 77 टक्के इंटरनेट युजर नियमितपणे ब्लॉग पोस्ट वाचत असतात. यासोबतच इंटरनेटवर जवळजवळ 570 मिलियन ब्लॉग पोस्ट उपलब्ध आहेत. चला तर मग बघुयात कुठल्या आहेत त्या पाच हायेस्ट अर्निंग ब्लॉग आयडिया.
सर्वाधिक कमाई करणार्या ब्लॉग आयडिया २०२२
Online Money Ideas: सर्वांना पैसे कमावण्याची इच्छा असते आणि आजच्या या ऑनलाइनच्या जगामध्ये कशा प्रकारे ऑनलाईन पैसा कमवता येईल हे जाणून घेण्याची सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे ऑनलाइन बिझनेसचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही तुमच्या आयडियाज ब्लॉकच्या मार्फत शेअर करू शकतात. तुमच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही ऑनलाइन बिजनेस विषयी चा तुमचा अनुभव शेअर करू शकतात, कशा पद्धतीने ऑनलाईन बिजनेस केला पाहिजे याच्या टिप्स तुम्ही शेअर करू शकतात आणि ऑनलाइन बिजनेस करीत असताना कशाप्रकारे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसा कमवतो येऊ शकतो या विषयीची तुम्ही माहिती या ब्लॉगवर शेअर करू शकतात. अशी माहिती शेअर केल्यामुळे तुमच्या ब्लॉग वर येणाऱ्या सर्व रीडरला कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवायचे याची माहिती मिळत जाईल त्यासोबतच तुम्हाला देखील या ब्लॉगचे मदतीने चांगले पैसे कमवता येईल.
Personal Finance: प्रत्येक जण आपापल्या मेहनतीने आणि अपना टॅलेंट च्या जोरावर पैसे कमवत असतो त्यामुळे प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की आपण कमावलेल्या पैशाचा कशा प्रकारे योग्य वापर केला पाहिजे. आपल्या पैशाला कशा प्रकारे मॅनेज केलं पाहिजे की त्यातून देखील आपल्याला चांगला नफा मिळू शकेल. त्यामुळे पर्सनल फायनान्स वर आधारित ब्लॉग ला युजर्सकडून जास्त पसंत केले जाते. त्यामुळेच पर्सनल फायनान्स हि मोस्ट पॉप्युलर आणि प्रॉफिट असणारी ब्लॉग Niche बनते. तसेच हा एक असा टॉपिक आहे ज्याला आपण एवर ग्रीन टॉपिक बोलू शकतो आणि प्रत्येक पैसा कमी होणाऱ्या व्यक्तीला याची गरज पडत असते. पैशांची कसे योग्य प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे याविषयी लोकांना जाणून घेण्याची खूप जास्त उत्सुकता असते कारण प्रत्येकाला आपल्या जीवनात समृद्धी आणि भरभराटीची आवश्यकता असते. हा एक असा टॉपिक आहे याची सर्वांना सतत गरज पडतच असते. परंतु या Niche मध्ये कॉम्पिटिशन सुद्धा तितकेच जास्त आहे त्यामुळे जर तुम्ही या टॉपिक वर तुमचा ब्लॉग सुरु करणार असेल तर तुम्ही याची सुरुवात Sub Niche पासून करा आणि यातील छोटे-छोटे टॉपिक वर तुम्ही डिटेल मध्ये लॉगिन करण्यास सुरुवात करा.
Health and Fitness: प्रत्येक मनुष्याच्या जीवनात भरभराटी आणि समृद्धी सोबतच निरोगी शरीर सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. मागील दोन वर्षांमध्ये लोक डॉन लागल्यानंतर बरेच लोक घरातच होती आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आता फिटनेसच्या बाबतीमध्ये निर्णया टिप्स ची आणि माहितीची गरज पडू लागली आहे ज्यामुळे त्यांचे शरीर निरोगी असेलच त्यासोबतच त्यांची पर्सनॅलिटी फिट सुद्धा दिसली पाहिजे. यासोबतच हल्ली मेंटल हेल्थ बद्दल देखील लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या Niche ला अधिक डिमांड असलेल्या Niche या कॅटेगरीमध्ये सहभागी करून घेतलेली आहे. यामध्ये आपण सेल्फ केअर, न्यूट्रिशन, पर्सनल डेव्हलपमेंट अशा टॉपिक्स ला कव्हर करू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला हेल्थ या विषयाबद्दल अधिक माहिती असेल तर तुम्ही या टॉपिक वर सहज तुमचा ब्लॉग तयार करू शकतात. तुम्हाला या टॉपिक वर ब्लॉक बनवताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला या विषयाशी संबंधित सर्व टॉपीक कव्हर करण्याची गरज नाही. या उलट तुम्ही तुमचा ब्लॉग न्यूट्रिशन, फिटनेस, मेंटल हेल्थ किंवा सेल्फ केअर अशा Sub Niche पासून सुरु करु शकतात.
READ MORE POSTS
Relationship & Parenting: कदाचित एखादी व्यक्ती अशी असू शकेल की ज्यांना चांगल्या संबंधांची गरज नाही किंवा बिघडलेले संबंध कशा प्रकारे सुधारावा याचे हे जाणून घेण्याची उत्सुकता नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पारिवारिक संबंधांना त्यासोबतच सामाजिक संबंधांना खूप जास्त महत्त्व दिले जाते. यामुळेच रिलेशनशिप वर आधारित असलेल्या ब्लॉगला सध्या इंटरनेट युजर्स कडून खूप जास्त प्रमाणात पसंत केले जात आहे. त्यासोबतच पॅरेंटिंग या विषयावर आधारित ब्लॉगला सुद्धा जास्त पसंत केले जात आहे. या दोन्ही टॉपिक्स एव्हरग्रीन कॅटेगरीमध्ये मोडले जातात आणि या टॉपिक वर जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी युजर्स निरनिराळे ब्लॉग सर्च करीत असतात. त्यामुळे जर या फिल्म मधली तुम्हाला अधिक माहिती असेल तर या टॉपिक वर तुम्ही नक्कीच तुमचा ब्लॉग सुरू करू शकतात.
Food: खायला कुणाला आवडत नाही आणि ही प्रत्येकाची गरज देखील आहे. त्यामुळे ब्लॉग करिता ही आयडीया एकदम परफेक्ट आहे. यामध्ये तुम्ही जितकी जास्त तुमची क्रिएटिविटी दाखवल तेवढा जास्त तुमचं स्कोप वाढू लागतो. भले तुम्ही एक प्रोफेशनल शेफ आहात किंवा एक असा खाद्य प्रेमी ज्याला विविध पदार्थ बनवून खाण्यास आवडतात. तुम्हीही जर या कॅटेगरीमध्ये येत असेल तर नक्कीच तुम्ही या टॉपिक वर तुमचा ब्लॉग सुरु करू शकतात. परंतु या Niche मध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि अशा प्रकारचे ब्लॉक मोनेटाइज करण्यासाठी तुम्हाला थोडसं जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही या कॅटेगिरी ला तेव्हाच निवडा जेव्हा तुम्ही या फिल्डमध्ये खरोखर एक्सपर्ट असाल.
Fashion: Clothes and Accessories या दोन्ही गोष्टी वेळेनुसार बदलत जातात परंतु फॅशन ही अशी गोष्ट आहेजी कधीही आऊटडेटेड नाही होऊ शकत.कारण की प्रत्येक नवीन जनरेशन एक वेगळा फॅशन ची सुरुवात करत असते. फॅशन ही एक अशी Niche आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू करू शकता त्यासोबतच अपिलेट मार्केटिंग चा वापर करून किंवा स्पॉन्सरशिप चा वापर करून तुम्ही अधिक पैसे देखील कमवू शकतात. त्यामुळे जर तुमच्या मध्ये खूप उत्कृष्ट फॅशन सेन्स असेल आणि तुम्ही जर फॅशनच्या बाबतीत क्रिएटिव्ह असाल आणि प्रत्येक वेळेस जर तुम्ही नवीन आणि फॅशनेबल काहीतरी तयार करू शकता तरीही निश फक्त तुमच्यासाठीच आहे.
Travel: ट्रॅव्हल हा एक असा विषय आहे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि विविध ठिकाण एक्सप्लोर करण्याची आपल्याला यामार्फत संधी देखील मिळत असते. त्यामुळे इंटरनेट युजर कडून विविध ठिकाणांची माहिती मिळविण्यासाठी यांनी मला जास्त पसंत केली जाते. आम्ही आपल्याला या आर्टिकल मध्ये सांगितलेल्या इतर Niche प्रमाणे ही सुद्धा एक ब्रॉड Niche आहे. यातील अनेक कॅटेगिरी तुम्ही Sub Niche मध्ये विभाजित करू शकतात आणि तुम्हाला सोयीस्कर अशा Sub Niche सेलेक्ट करून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही सोलो ट्रॅव्हल, बजेट ट्रॅव्हल किंवा ग्रुप ट्रॅव्हल या विषयावर माहिती शेअर करू शकता. कारण हा एक असाच टॉपिक आहे ज्यामध्ये जेवढा उत्साह आहे तेवढाच चॅलेंजिंग देखील आहे. आणि तुमची जर बॅग पॅक करून कुठे फिरायला जाण्याची तयारी असेल तर तुम्ही या ब्लॉगवर नक्कीच काम करू शकतात.
Highest Earning Blog Ideas for 2022 in Marathi
याव्यतिरिक्त जर तुम्हाला अजून ब्लॉगची आयडिया हवी असेल तर तुम्ही होम डेकोर, ब्युटी, एज्युकेशन, लाईफस्टाईल, DIY, पेट केअर, टेक्नॉलॉजी अशा पॉप्युलर Niche सेलेक्ट करून तुमच्या ब्लॉग ची सुरुवात करू शकता. परंतु तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इतरांकडे बघून तुम्ही तुमच्या ब्लॉगची सुरुवात करू नका तसेच कुठले टॉपिक मध्ये कमी कॉम्पिटिशन आहे याचा विचार करून देखील तुम्ही तुमच्या ब्लॉगची सुरुवात करू नका. ब्लॉग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कुठल्या विषयांमध्ये आहे आणि तुम्ही कुठल्या विषयांमध्ये एक्सपर्ट आहात हे ठरवायची आहे आणि त्याच टॉपिकला करून तुम्हाला तुमच्या ब्लॉगची सुरुवात करायची आहे. कारण ब्लॉग लिहिताना तुम्हाला आनंद तर मिळालाच पाहिजे त्यासोबतच तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि या ब्लॉगच्या मार्फत तुम्ही पैसे देखील कमवू शकाल. तुम्ही जर इतरांचे ब्लॉग बघून स्वतःचा ब्लॉग तयार केला तर कालांतराने ब्लॉग पोस्ट लिहिताना तुम्हाला कंटाळा येऊ लागेल आणि तुमचा काम करण्याचा इंटर देखील कमी होईल. त्यामुळे सर्वात आगोदर तुम्ही हे ओळखा की तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये आवड आहे आणि कुठली गोष्ट तुम्हाला उत्कृष्टपणे करता येते.
Highest Earning Blog Ideas for 2022: तर मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला 7 हायेस्ट रनिंग ब्लॉक आयडिया शेअर केलेल्या आहेत. यापैकी तुम्ही तुमचा आवडीचा विषय सिलेक्ट करून तुमच्या ब्लॉगची सुरुवात करू शकतात आणि तुमच्या आवडीचा जो काही विषय असेल त्याची सर्व कॅटेगिरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि तुमच्या ब्लॉगची सुरुवात करायची आहे. जसे जसे तुमचे या ब्लॉगवर युजर्स वाढू लागेल तसे तसे तुम्हाला इतर कॅटेगरीज देखील कव्हर करायच्या आहेत. असा करतो आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही सांगितलेल्या सात हायेस्ट अनेक ब्लॉग आयडिया आपल्याला नक्कीच आवडलं असेल. आपल्या मनात अजून काही शंका असेल तर आपण आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता आम्ही नक्कीच आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
Post Views: 1,267