10 Powerful Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

Share this

Time Management Tips in Marathi: तुम्ही कुठलेही यशस्वी व्यक्तींचा विचार करा ए.पी.जे. अब्दुल कलाम, बिल गेट्स, रतन टाटा या सर्व व्यक्तींबद्दल तुम्हाला असे वाटते असेल की ज्या पद्धतीने आपण आपला वेळ घालवितो तशाच प्रकारे हे देखील त्यांचा पूर्ण वेळ घालवत असेल.

प्रत्येक यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या कामाची अशी पद्धत बनवलेले असते की ते इतर लोकांच्या तुलनेत त्यांचा जास्तीत जास्त वेळ अर्थपूर्ण कामासाठी देतात. थोडक्यात काय तर हे सर्व लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक प्रोडक्टीव असतात.

आजच्या या लेखामध्ये आपण अशा 5 पद्धती बघणार आहोत ज्याच्यामुळे आपण देखील आपल्या कमीत कमी वेळात जास्त आउटपुट देऊ शकतो . जर आपल्याला देखील हे जाणून घ्यायचे असेल कि आपण आपल्या वेळेचा योग्य वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे तर आमचा हा (Time Management Tips in Marathi) लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

Top 5 Time Management Tips in Marathi

90/90/1 Rule: या नियमात असे सांगितले आहे की पुढचे 90 दिवस सकाळी उठल्यावर पुढची 90 मिनिट फक्त त्या एकाच कार्यावर व्यत्यय न आणता काम करीत रहा जे काम तुमच्या साठी सर्वात महत्त्वाचे आहे आणि ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करायला मदद मिळेल.

जर बघितले तर आजच्या काळात आपल्या सकाळच्या सुरुवात आपण कशी करतो? आपण रोज सकाळी उठल्यावर अंथरुणातच व्हाट्सअप चॅट चेक करतो, इतरांची स्टेटस पाहतो, कुठले ईमेल आलेली आहेत हे चेक करतो किंवा कोणाशी तरी आपण गप्पा मारत बसतो किंवा आपण अशा गोष्टींमध्ये आपला वेळ घालवितो ज्याच्यातून आपल्याला कुठलाही फायदा होत नाही.

थोडक्यात काय तर त्यामुळे तुमच्या सिम्पल ऍक्टिव्हिटीला रियल आउटपुट पासून दूर केले जाते . परंतु याउल यशस्वी लोकांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत आहे की सकाळच्या वेळी मनुष्याचा मेंदूवर कुठलाही ताण नसतो.

हीच खरी वेळ असते जेव्हा आपल्या शरीरामध्ये भरपूर एनर्जी असते आणि काहीतरी करून दाखवण्याची उम्मेद देखील असते. त्यामुळे सर्वात अगोदर आपली ही सकाळची वेळ आपण अतिशय महत्त्वपूर्ण कामासाठी दिली पाहिजे.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

Create the conductive environment: जर तुम्हाला एखाद्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे आणि तुम्ही त्यासाठी भरपूर अभ्यास करीत आहात. परंतु असे समजा की या परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्ही अशा ठिकाणी गेला आहेत जिथे खूप लोकांचा आरडाओरडा ऐकू येत आहे, तुमच्या आजूबाजूला लोक भांडण करीत आहेत, एकमेकांना शिवीगाळ करीत आहेत.

तर अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करू शकाल का? आणि मन लावून तुमचा अभ्यास करू शकाल का? याउलट जर तुम्ही तुमचा अभ्यास करण्यासाठी एका अशा वाचनालयात गेलात जिथे पूर्णपणे शांतता आहे. तुमच्या आजूबाजूला अशीच लोक बसली आहे जे परीक्षेची तयारी करीत आहेत आणि ते सर्व तुमचे मित्र देखील आहे जे तुम्हाला या परीक्षेबद्दल तुमची मदत देखील करीत आहेत. Read more: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र PDF आणि संपूर्ण माहिती

तर मला सांगा या दोनही सांगितलेल्या वातावरण पैकी तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे तुमच्या परीक्षेची तयारी करू शकता? आणि चांगला अभ्यास करू शकतात? सहाजिकच तुमचे उत्तर असेल दुसरे वातावरण म्हणजेच वाचनालय.

कारण तुम्हाला पहिल्या वातावरणामध्ये तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करायचा होता आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या गोंधळातून तुमचे विचलित होणारे लक्ष तुम्हाला तुमच्या अभ्यासावर केंद्रित करायचे होते. या उलट दुसऱ्या पर्यायांमध्ये तुमचे लक्ष विचलीत होत नव्हते आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या इच्छाशक्तीचा वापर देखील करायचा नव्हता.

याउलट इथे असे वातावरण होते की ज्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला तुमचा ध्येय गाठण्यासाठी मदत करीत होते. त्यामुळे तुमचे लक्ष्य किव्वा ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सभोवताली अशे वातावरण निर्माण करावे लागेल ज्यामुळे तुमचे लक्ष्य विचलित होणार नाही.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

How to Use Time Effectively

Getting extremely goal at one thing : खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक तलवार बनवणारा कारागीर होता. तो उत्तम अशा तलवारी बनवत असे. त्याने बनवलेल्या तलवारींचा उपयोग सैन्यामध्ये लढणारे सैनिक करीत असे. त्याच्या तलवारीची वैशिष्ट्य असे होते की जे सैन्य त्याने बनवलेल्या तलवारीने युद्ध लढायचे त्यांनाच त्या युद्धात विजय मिळायचे.

एकदा एका राजाला त्या तलवार बनवणाऱ्या कारागीर बद्दल समजले आणि त्याच्या या कलेविषयी राजाला कुतूहल वाटू लागले. त्या राजाने लगेच मंत्रीला सांगितले की मला त्या तलवार बनवणाऱ्या कारागीराला भेटायचं आहे. ताबडतोप मंत्री त्याचे सैनिक घेऊन तलवार बनवणाऱ्या कडे गेला आणि त्याला सांगितले की आमच्या राजाने तुला भेटण्यासाठी बोलावले आहे.

तलवार बनविणारा मंत्री सोबत राजाला भेटण्यासाठी गेला. तलवार बनविणारा राजाला भेटल्यावर राजासोबत खूप आदराने बोलला आणि राजादेखील त्याच्याशी आदराने बोलला. त्यानंतर राजाने तलवार बनवणाऱ्याला प्रश्न केला की तू इतक्या उत्कृष्ट पद्धतीने तलवार कसे काय बनवितो की जो कोणी तू बनवलेल्या तलवारीने युद्ध करतो त्याच्या जिंकले निश्चित असते.

राजाचे प्रश्नाचे उत्तर देत तलवार बनवणारा बोललं की मी लहान होतो तेव्हापासून माझ्या वडिलांनी मला तलवार बनवण्याची कला शिकविली.

हे काम मला एवढे आवडू लागले की मी ठरविले कि मी पूर्ण आयुष्यभर फक्त तलवारच बनवणार आणि या कामांमध्ये मी उत्कृष्ट देखील बनणार. जसजसे मोठे होऊ लागलो तसे तसे मी तलवार कशी बनवायची याची पुस्तके वाचू लागलो. मी त्या सर्व लोकांना भेटलो जे वेगवेगळ्या प्रकारे तलवार बनवायचे.

मी माझ्या आयुष्याचा बराच वेळ याच गोष्टीवर खर्च केला आहे की एक उत्कृष्ट तलवार कशी बनवली पाहिजे. हेच माझे तलवार बनवण्यात उत्कृष्ट असल्याचे रहस्य आहे. मित्रांनो खरं तर ही एक काल्पनिक कथा आहे पण या कथेचा सार्थक एवढाच आहे की कुठल्याही गोष्टी मध्ये जर तुम्हाला उत्कृष्ट बघायचे असेल तर तुम्हाला त्या कामाची आवड असली पाहिजे आणि ते काम तुम्ही सतत केले पाहिजे.

तुम्ही कुठलेही काम आनंदाने आणि सतत करत असाल तर त्या कामांमध्ये तुम्ही 100% उत्कृष्ट बनाल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करू लागतील. तुम्ही जर नीट विचार केला तर मला सांगा सचिन तेंडुलकर, ए.आर. रहमान, अमिताभ बच्चन, ही सर्व मंडळी कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये उत्कृष्ट आहे. तुम्हाला कळलेच असेल की ही सर्व व्यक्ती फक्त एकाच गोष्टीमध्ये उत्कृष्ट आहे जी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित आहे.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

Time Management Skills in Marathi

Build a dominating 18-minute routine: ही पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला सकाळचे फक्त पाच मिनिट वेळ द्यायचा आहे आणि तुम्हाला तुमची कार्याची यादी बनवायची आहे. या यादीमध्ये तुम्हाला सर्वात वर ते काम लिहायचे आहे जे तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वोत्तम कार्य करण्यास प्रवृत्त करतात.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या घड्याळात एक-एका तासाचे गजर लावायची आहे पुढच्या आठ तासांसाठी. कारण इथे आपण असे गृहीत धरत आहे की आपण दिवसभरातील आठ तास काम करीत असतो. जेव्हा तुमच्या घड्याळाचा गजर वाजेल त्या वेळेस तुम्हाला स्वतःला असे विचारायचे आहे की मागच्या तासांमध्ये तुम्ही जे काही काम केले आहे ते खरच प्रॉडक्टिव आहे की नाही?

तुम्ही केलेले काम जर प्रॉडक्टिव नसेल तर तुम्ही स्वतःला परत विचारायचे आहे की या तासामध्ये मी आणखीन चांगले प्रॉडक्टिव काम कसे करू शकतो. दिवसाच्या अखेरीस पुन्हा पाच मिनिट द्यायचे आहे आणि स्वतःला विचारायचं आहे की दिवसभरामध्ये तुम्ही किती काम केले आहे आणि तुम्ही केलेले हे काम आणखी चांगल्या पद्धतीने कशे करू शकले असते.

ही पद्धत खरोखर खूप सोपी आहे आणि याचा जर तुम्ही रोजच्या जीवनात वापर केला तर तुमच्या हे लक्षात येईल की तुमची कार्य करण्याची पद्धती पूर्णपणे बदलली असेल आणि तुम्ही केलेले काम हे खरोखरच प्रॉडक्टिव होऊ लागली असेल.

Where do you want to land? : बऱ्याच वेळेस असे होते कि आपल्याला गणिताचे शिक्षक अजिबात पसंत नसतात आणि त्याचे कारण असे की आपण गणित या विषयामध्ये नापास झालेले असतो. बऱ्याचदा आपण याचं विचारांमध्ये गुंतलेले असतो त्यामुळे आपण बाहेरील वास्तविकता आपल्या खरोखरच्या परिस्थिती सोबत जोडायला लागतो.

जर आपण आपल्या निर्णयांचा विचार केला तर आपल्याला असे वाटते की आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातामध्ये आहे. परंतु हि गोष्ट अगदी चुकीचे आहे कारण जेव्हा आपण आपण एखाद्या घटनेवर विना विचार करता प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण कुठलातरी वेगळा निर्णय घेतो.

उदाहरणार्थ जर आपल्याला गणितामध्ये कमी मार्क मिळाले तर आपल्याला गणिताच्या शिक्षकाचा राग येऊ लागतो. परंतु वास्तविकते मध्ये आपण आपले लक्ष दुसऱ्या गोष्टीवर केंद्रित करायला हवे होते. जर आपल्याला गणितामध्ये मार्क्स कमी मिळत असेल तर आपण गणिताची कौशल्य शिकले पाहिजे होते.

जेव्हा पण आपण आपल्या मनावर ताबा ठेवतो आणि परिस्थितीचे योग्य कारण शोधतो तेव्हाच तुम्ही तिथे पोहोचू शकाल जिथे तुम्हाला जायचे आहे. त्यामुळे तुम्हाला प्रतिक्रिया वर लक्ष केंद्रित न करता त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आहे जे काम तुम्हाला करायचे आहे.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

वेळेचा सदुपयोग केल्याने काय होते

लेखकाने याचे उदाहरण देताना एक छोटीशी गोष्ट सांगितली आहे. सुनील हा एक मोठा बिझनेस मॅन होता परंतु त्याच्या कंपनीवर अनेक गुन्हे दाखल होते. आकाश एक वकील होतं आणि तो सुनील यांच्यावतीने केस लढत होता. एके दिवशी सुनील आकाशला असे म्हणाला की मला असे वाटत नाही की तुम्ही माझी केस लढू शकतात आणि मला न्याय मिळवून देऊ शकतात.

कारण तुमच्या अगोदर देखील अनेक वकील माझ्यासाठी केस लढत होते परंतु त्यांना यश मिळाले नाही. सुनीलचे हे बोलणे ऐकून आकाशला वाईट वाटले आणि त्याने सुनीलच्याऑफिसच्या बाहेर येऊन आपल्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की मी आता सुनीलची केस लढणार नाही कारण तो मला आवडत नाही.

त्यावर आकाशचे वडील हसले आणि त्याला म्हणाले की हे गरजेचे नाही की आपण त्यांच्यासोबत काम करतो किंवा व्यवसाय करतो ते सर्व लोक आपल्याला आवडतीलच, आपल्याला तर फक्त आपल्या कामावर आणि आपल्या व्यवसाय वर लक्ष केंद्रित करायचे आहे.

वडिलांचे हे बोलणे ऐकून आकाशने ठरवले की तो सुनील सोबत काम करेल आणि त्याची केस लढणारा. त्या नंतर आकाशने सुनील साठी अनेक वर्षे कोर्टाची काम पाहिले आणि त्याच्या अनेक केस लढल्या.

एक दिवस जेव्हा आकाश सुनीलच्या ऑफिसमध्ये गेला होता आणि त्याने पुस्तकांच्या मांडणीमध्ये त्याने लिहिलेले पुस्तक पाहिले तेव्हा त्याने सुनीलला विचारले की तू मी लिहिलेले पुस्तक वाचले आहेस का? त्यावर सुनीलने आकाशला उत्तर दिले कि हो तू लिहिलेली मी सर्व पुस्तके वाचतो आणि मला तु लिहिलेली पुस्तके वाचायला आवडतात.

हे ऐकल्यानंतर आकाशच्या मनात सुनील विषयी सकारात्मक भावना निर्माण झाली. त्यानंतर आकाश सुनीलला पसंत करू लागला आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री देखील निर्माण झाली.

आता या गोष्टीचा जर आपण सार्थक पाहिला तर आपल्याला असे समजेल की जर आकाशने सुनीलच्या प्रतिक्रिये कडे लक्ष दिले असते तर आकाशच्या हातून त्याचा एक महत्त्वपूर्ण ग्राहक निघून गेला असता . त्यामुळे आकाशने प्रतिक्रियेवर लक्ष केंद्रित न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले ज्याचा त्याचा फायदा देखील झाला.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करावा

तर मित्रांनो आजच्या Time Management Tips in Marathi आर्टिकल मध्ये आपण प्रॉटडक्टिविटी साठी पाच नियम बघितले ज्यातील पहिला नियम होता 90/90/1 Rule:यात असे सांगितले आहे की 90 दिवसासाठी सकाळचे पहिले 90 मिनिट तुम्हाला एकच काम असे निवडायची आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय पुर्ण करण्यासाठी मदत मिळेल.

आपण दुसरा मुद्दा बघितला की Create the conductive environment: यात असे सांगितले आहे की आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला असे वातावरण बनवावे लागेल जे आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मदत करेल. तिसरा मुद्दा आपण पाहिला Getting extremely goal at one thing.

या मुद्द्यांमध्ये आपण असे पाहिले आहे की जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत ते फक्त एकाच गोष्टी मध्ये उत्कृष्ट आहे ते फक्त त्यांच्याच क्षेत्रातच उत्कृष्ट आहे. तुम्ही एखादी गोष्ट सतत आणि आवडीने करत असाल तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही नक्कीच उत्कृष्ट होऊ शकतात.

चौथा मुद्दा आपण बघितलं की Build a dominating 18 minute routine. ज्यात आपण पाहिले की दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला पाच मिनिट वेळ द्यायचा आहे आणि तुम्हाला कुठली कार्य करायचे आहेत याची यादी बनवून घ्यायची आहे.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

या यादीमध्ये त्याच गोष्टी असतील जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील. त्यानंतर जर तुम्हाला पुढच्या आठ तास काम करायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक तासाचा गजर लावायचा आहे आणि प्रत्येक तासानंतर तुम्ही स्वतःला हे विचारायचे आहे की तुम्ही मागच्या तासाच उत्कृष्ट काम केले आहे का आणि जर नाही.

तर तुम्ही ते काम कसे उत्कृष्ट करू शकतात. त्यानंतर सर्वात अखेरचा मुद्दा आपण पाहिला Where do you want to land? म्हणजे तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे. यात आपण हे पाहिले की आपल्याला सर्वात अगोदर हे माहिती असणे गरजेचे आहे की आपल्याला कुठे पोहोचायचे आहे आणि त्या संदर्भातच आपण आपले सर्व निर्णय घेतले पाहिजे.

आपल्याला काय प्रतिक्रिया येते यावर आपण कधीच निर्णय नाही घेतली पाहिजे. यासाठी आपण आकाश आणि सुनील या दोघांचे एक उदाहरण देखील बघितले होते की कशाप्रकारे आकाशला सूनीलने दिलेली प्रतिक्रिया आवडलेली नसताना देखील त्याने सुनील सोबत अनेक वर्ष काम केले.

कालांतराने सुनीलने आकाशने लिहिलेल्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यानंतर आकाशच्या मनात परिवर्तन झाले आणि ते दोघे चांगले मित्र देखील बनले.

Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे
Time Management Tips in Marathi | वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे

तर मित्रांनो आजच्या या Time Management Tips in Marathi आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला पाच मुद्दे सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करू शकता आणि तुमचे ध्येय लवकरात लवकर पूर्ण करू शकतात. आम्ही आशा करतो की आमचा हा आर्टिकल आपल्याला नक्कीच आवडला असेल.

READ MORE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top