Top 5 Motivational Web Series: मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी आपल्याला पाच अशा वेब सिरीज बद्दल माहिती देणार आहे ज्यांना पाहतांना तुमची मनोरंजन तर शंभर टक्के होणार आहे परंतु त्यासोबत तुम्हाला प्रोत्साहन देखील मिळेल. मी तुम्हाला या आर्टिकल मध्ये अशा पाच वेबसिरीज बद्दल माहिती देणार आहे ज्यांची कथा ही खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही. या सर्व वेब सिरीज बघताना तुमचे मनोरंजन तर होणारच आहे त्यासोबतच तुमचे ज्ञान देखील वाढेल. चला तर मग बघुया कुठल्या आहेत त्या पाच वेब सिरीज.
Top 5 Motivational Web Series to Watch
Explained : तुमच्या मनात कधी असा प्रश्न आलेला आहे का की देशाची आर्थिक परिस्थिती आणि शेअर मार्केट मध्ये काय संबंध असतो? म्युझिकचा जन्म कधी झाला आणि कधी ध्वनीचे रूपांतर म्युझिक मध्ये करण्यात आले? दुसऱ्या ग्रहांवर एलियन राहतात का? जर तुमच्या मनात देखील अशी वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतील आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला नेटफ्लिक्स द्वारे तयार केलेली Explained वेब सिरीज बघणे गरजेचे आहे. खरं तर ही वेब सिरीज नसून एक डॉक्यू सिरीज आहे. म्हणजेच ही एक डॉक्युमेंटरीची सिरीयल आहे. ज्याच्या प्रत्येक नव्या एपिसोडमध्ये एका नव्या टॉपिक विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. हे सर्व टॉपिक देखील असे आहेत ज्यांच्या विषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, आपल्याला त्या विषयाची पूर्ण माहिती नसते आणि सहसा या विषयांवर आपण इतरांसोबत देखील बोलत नाही. अशा निरनिराळ्या विषयांवर ही वेबसिरिज बनवण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला एक नवीन विषयावर संपूर्णपणे माहिती दिली जाते आणि प्रत्येक नवीन एपिसोड सोबत तुमचे ज्ञान देखील वाढत जाते.
प्रेरणादायी वेब सिरीज
Kota Factory: आपल्यापैकी बरेच लोक हे सायन्स या विषयांमध्ये शिकले असेल किंवा सध्या शिकत असाल. सायन्स विषयातील बरेच मुलांचं असं देखील स्वप्न असतं की कधी ना कधी आयुष्य मध्ये आपल्याला आयआयटीमध्ये देखील ऍडमिशन मिळवायची आहे. जर आपण आयटी विषयी चर्चा केली आणि त्याच्या ॲडमिशन विषयी चर्चा केली तर एका शहराचं नाव आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही ते शहर म्हणजे “Kota”. कोटा असे शहर आहे जिथे दर वर्षी हजारो मुलं येतात मेडिकल एक्झाम आणि इंजीनियरिंगची तयारी करण्यासाठी. या कोटा शहराच्या सभोवताली TVF ची वेब सिरीज Kota Factory या वेबसिरीजची कहाणी बघायला मिळते. या वेबसिरीजची कथा एका वैभव नावाच्या मुलाच्या सभोवताली फिरते तो सोळा वर्षाचा आहे आणि तो कोटा मध्ये येतो ॲडमिशन घेण्यासाठी. परंतु या वेब सिरीजचा सर्वात पॉझिटिव पॉईंट असा दिसतो की यामध्ये विद्यार्थ्यांची फक्त एकच बाजू नाही दाखवली तर दोन्ही बाजू दाखविल्या आहे. थोडक्यात काय तर या वेबसीरीज मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांविषयीची सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू बघायला भेटेल. या वेबसीरीज मध्ये उत्कृष्ट असा ड्रामा आणि कॉमेडी देखील पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या जीवनावरती आधारित असलेली ही वेबसिरीज तुम्ही एकदा नक्कीच बघायला हवी.
टॉप 5 लाइफ चेंजिंग वेब सीरीज
Shark Tank: तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही सुचविलेल्या वेबसिरीजची कथा हे लेखकाने लिहिलेली असते आणि कलाकार त्याप्रमाणे फक्त अक्टिंग करीत असतात. आम्हाला असं काहीतरी सांगा ज्यामुळे खरच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर यावर आम्ही आपला असा सल्ला दिल की जर तुम्हाला रियालिटी शो बघायला आवडत असेल. तर आपण असा शो काय म्हणून बघितला पाहिजे जिथे एका घरात अनेक लोक असतात, एकमेकांविषयी कट-कारस्थान करतात, सतत एकमेकांशी भांडण करतात आणि एकमेकांना शिव्या देखील देतात. त्याऐवजी जर आपण असा रियालिटी शो बघितला जो पाहिल्याने आपल्या जीवनात उत्कृष्ट असा बदल घडू शकतो आणि जर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्ही हा शो नक्कीच बघितला पाहिजे. Shark Tank हा बिजनेस वर आधारित अमेरिकन रियलिटी शो आहे. ज्यामध्ये पाच गुंतवणूकदार समोर बसलेले असतात. जर एखाद्या उमेदवाराची कल्पना त्यांना आवडली तर हे गुंतवणूकदार त्याच्या या कामामध्ये स्वतःच्या पैश्यांची गुंतावनुक करतात. एका मागे एक उद्योजक त्यांच्या समोर येतात आणि त्यांचे प्रोडक्ट दाखवितात त्यांच्या त्या प्रोडक्ट बद्दलच्या आयडिया विषयी सांगतात. ते कशा पद्धतीने या व्यवसायात काम करू शकतात आणि हे प्रोडूक्टस वापरण्याचे काय फायदे आहे याची माहिती देतात. या सर्व गोष्टींची हे आलेले सभासद या गुंतवणूकदारांना माहिती देतात. त्यांची ही कल्पना जर गुंतवणूकदारांना आवडली तर ते त्याच्या या उद्योगासाठी पैसे गुंतवितात. एखाद्या कल्पनेचा कशा प्रकारे विचार केला जातो. एखादे प्रॉडक्ट कशाप्रकारे डेव्हलप केले जाते. गुंतवणूकदार नेमका असा काय विचार करताय की त्या प्रॉडक्ट मध्ये ते स्वतःचे एवढे पैसे गुंतवतात, एक स्टार्टअप कशा प्रकारे सुरू केला जातो. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला Shark Tank या वेब सिरीज मध्ये बघायला मिळेल.
Best Web Series for Entrepreneurs
Silicon Valley: स्टार्टअपचा विशेष जर आपण काढलेलाच आहे तर मी आपल्याला अशा वेब सीरिज बद्दल सांगणार आहे ज्याची संपूर्ण कहाणी एका स्टार्टअप वर आधारित आहे आणि यामध्ये तुम्हाला हसायला देखील मिळेल, कॉमेडीचा आनंद घेता येईल आम्ही तुम्हाला स्टार्टअप विषयी भरपूर काही शिकायला देखील मिळेल. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियातील सिलीकोन व्हॅली नावाचे एक ठिकाण आहे तिथे स्टार्टअपचा खूप मोठा इको सिस्टम आहे. या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या स्टार्टअपची सुरुवात झालेली आहे. याच जागेवर आधारित या शो ची संपूर्ण कथा आहे. ज्यामध्ये तुम्हाला पाच मित्रांची कहाणी बघायला मिळते. हे सर्व मित्र मळून त्यांचा एक स्टार्टअप सुरू करतात. या स्टार्टअप मध्ये त्यांना अनेक अडचणी येतात, अनेक धोक्यांचा देखील त्यांना सामना करावा लागतो. हे सर्वजण आपल्या स्टार्टअपसाठी लढतात, भांडण करतात आणि आपल्या प्रॉडक्टला पुन्हा उभे करतात. या वेब सिरीजला बघून तुम्हाला स्टार्टअप बद्दल भरपूर माहिती मिळेल, तसेच इथल्या संस्कृतीची देखील माहिती मिळेल.
Web Series for Students
The Forgotten Army: मित्रांनो ही गोष्ट खरी आहे की आपल्या देशांमध्ये अनेक देशभक्त होऊन गेलेले आहे ज्यांची तुला जगात कोणासोबत केली जाऊ शकत नाही. त्यापैकीच एक महान देशभक्त ज्यांचे नाव आहे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी आपल्याला शाळेत शिकविले गेले आहे. जर तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्या विषयी माहिती घ्यायची असेल आणि जर तुम्हाला भारतीय सेनेची माहिती हवी असेल तर तुमच्यासाठी ॲमेझॉन प्राईमची फक्त पाच एपिसोड असलेली The Forgotten Army ही एक परफेक्ट अशी वेब सिरीज आहे. आपण आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये भारताच्या स्वातंत्र्या विषयी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी बरेच काही शिकलेली आहे परंतु आपल्याला या पुस्तकांमधून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आर्मी विषयी शिकविले गेले नाही आणि त्यांच्या या आर्मी विषयी कुठे उल्लेख देखील केलेला नाही. त्यामुळेच या वेबसीरिजला The Forgotten Army असे नाव देण्यात आले आहे. या वेब सिरीज मध्ये आपल्याला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या दूरदृष्टी बद्दल जाणून घेता येईल . त्यासोबतच सन 1942 ते 196 पर्यंतचा प्रवास तुम्हाला शाहरुख खानच्या आवाजामध्ये जाणून घेता येईल.
Motivational Web Series
तर मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Top 5 Motivational Web Series वेब सिरीज बघितल्या ज्यामध्ये तुम्हाला बरेच काही नवीन शिकायला मिळेल. त्यातील पहिली वेबसिरीज होती Explained : जर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न पडत असतील की ध्वनीचे म्युझिक मध्ये रूपांतर कस काय झाले? दुसऱ्या ग्रहावर देखील जीवन आहे का आणि एलियन वास्तवात आहेत का? आणि अशी अनेक प्रश्न ज्यांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करीत असतो या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला उत्तर हवे असतील तर तुम्ही ही वेब सिरीज नक्की बघायला हवी. यात तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये एका नवीन विषयाची माहिती मिळेल आणि ही माहिती अतिशय सखोल पद्धतीने सांगितली गेलेली आहे. त्यानंतर आपण दुसरी वेब सिरीज बघितली Kota Factory: ज्यामध्ये आपल्याला कोटा या शहराची कहाणी बघायला भेटते. जिथे दरवर्षी हजर विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे ॲडमिशन घेण्यासाठी येतात आणि आपल्याला या विद्यार्थ्यांचे जीवन प्रवास बघायला मिळतो आणि त्यांच्या जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू बघायला मिळतात. त्यानंतर आपण तिसरी वेब सिरिज बघितली Shark Tank: ही वेब सिरीज नसून खरे तर एक रियालिटी शो आहे ज्यामध्ये पाच गुंतवणुकदार बसलेले असतात आणि ते वेगवेगळ्या उद्योजकांच्या नवनवीन आयडिया ऐकतात आणि त्या आयडिया त्यांना पसंत पडल्या तर ते त्यांचे पैसे या उद्योगासाठी गुंतवितात. त्यानंतर आपण चौथी वेबसिरीज बघितली Silicon Valley: या वेब सिरीज मध्ये आपल्याला Startup विषयी ची कथा बघायला मिळते. जिथे पाच मित्र मिळून एक बिझनेसची सुरुवात करतात आणि त्यांना या बिझनेसमध्ये अनेक अडचणींचा आणि धोकेबाजीचा सामना करावा लागतो. तरी देखील हे त्यांचा बिजनेस कशा प्रकारे करतात हे तुम्हाला या वेब सिरीज मध्ये बघायला मिळेल. त्यानंतर आपण पाचवी वेब सिरीज बघितली The Forgotten Army: यात आपल्याला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयीची आणि त्यांच्या सैन्य विषयीची माहिती बघायला मिळते. ही माहिती आपल्या शाळेच्या पुस्तकात देखील सांगितली गेली नाही. विशेष म्हणजे ही सर्व माहिती आपल्याला सुपरस्टार शाहरुख खानच्या आवाजामध्ये ऐकायला मिळते.
तर मित्रांनो या होत्या Top 5 Motivational Web Series 5 वेब सिरीज ज्यांना बघून तुमची केवळ मनोरंजनच होणार नाही तर तुम्हाला हे पाहतांना नवीन काही तरी शिकायला मिळेल. काहीतरी नवीन करण्याची तुम्हाला प्रेरणा देखील मिळेल. यामध्ये तुम्हाला आम्ही अशा काही व्यक्ती देखील सुचविलेल्या आहेत जे तुम्हाला तुमच्या उद्योगांमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकेल आणि आपल्याला अशी वेब सिरीज देखील सुचविली आहे ज्यामध्ये तुम्हाला भारताचा इतिहासाविषयी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस विषयी ची अशी माहिती मिळेल जे आपल्याला शाळेच्या पुस्तकांमध्ये देखील शिकायला मिळालेली नाही. तर अशा करतो आमचा आजचा आर्टिकल आपल्याला आवडला असेल.
READ MORE POSTS
Post Views: 2,026